महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या वर्षी होऊ घातल्यात. या अनुषंगानं काही बाबी चर्चाव्याशा वाटल्या! :-)
सद्य परिस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण इतकं किचकट, विचित्र आणि गलिच्छ झालेलं आहे की कुणाचा पायपोस कुणाच्या पायात जातो ते सांगता येत नाही.
सततची नवनवीन भांडणं, राजकीय हाणामाऱ्या, मोर्चे.. जणू केवळ राजकारण करण्यासाठीच यांना आपण निवडून देत असतो. कामं वगैरे आपापल्या गतीनं होतात, त्यात यांचा काही हातभार आहे असे वाटतच नाही.
काही आठवड्यांपासून सजगपणे लोकांच्या प्रतिक्रिया ऐकत/बघत्/वाचत होतो. सरळ दिसतं की सर्वसामान्य जनता या सगळ्याला आता जाम कंटाळली आहे. उत्तम अन् समर्थ पर्याय पुढे आला तर नक्कीच त्याला चांगली संधी आहे.
- सध्या ७ प्रमुख पक्ष महाराष्ट्रात झालेत. काँग्रेस, २ रा. काँग्रेस, २ शिवसेना, भाजप आणि मनसे.
- त्यात वंचित आघाडी आणि ओवेसी यांची मतं घेण्याची ताकद किती हे वेगळे.
- मतविभाजनाचा फायदा घेण्यास सगळेच पक्ष उत्सुक असतात, पण यावेळच्या परिस्थितीत कोणाला मुळात खरोखर फायदा होऊ शकेल हा मुद्दा लक्षवेधी असू शकेल.
महाराष्ट्र भाजपनं अतिशय घाणपणे मागच्या काही वर्षात राजकारण केलंय. एकतर आयारामांनी भाजप भरलंय. पार्टी विथ डिफरन्स वगैरे सगळं नावाला उरलंय. भाजपला स्वत:वर विश्वासच उरला नाहीये असं वाटायला लागलंय. मला अजूनही वाटतं की भाजपनं तो पहाटेचा शपथविधी न करता विरोधात बसणं स्विकारलं असतं तर पुढची निवडणूक त्यांना एकट्याला लढवता आली असती आणि जिंकताही आली असती. संधिसाधू राजकारणाचा फास स्वतःहून स्वतःच्या गळ्यात घालून घेण्याचा त्रास आज सगळ्यात जास्त त्यांनाच होतोय आणि आपण आलिया भोगासी करतोय.
बाकी दोन्ही शिवसेना, दोन्ही रा.काँ आणि काँग्रेस मला स्वतःला पसंत पडत नाहीत कारण त्यांच्याकडे विकासाचा कोणताही आराखडा नाही. केवळ संधिसाधूपणाच हे सर्व पक्ष करताना दिसतात ज्याचा आता अक्षरशः उबग आलाय. दुर्दैवानं भाजपही त्याच रांगेत जाऊन बसू पाहतोय.
मला तरी वाटतं की राज ठाकरेंना या निवडणूकीत उत्तम संधी आहे. ते कोणत्याही आघाडीत अजून नाहीत.
त्यामुळे जर महाराष्ट्र पिंजून काढला, मुख्य विरोधकाची जागा घेतली, इतर सर्व पक्षांच्या विरुद्ध आघाडी उघडली आणि लोकांना विश्वास दिला तर; मतांचं पोलरायजेशन मनसेच्या बाजूनं घडू शकेल.
यात मुख्य अडचण अशी वाटते की मनसेचा पाया महाराष्ट्रभर अजूनही नाही. पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग सोडला तरी त्यांचा पुरेसा जम बसलेला आढळत नाही.
त्यामुळे या संधीचा फायदा मनसे जागांच्या बाबतीत कितपत उचलू शकेल याबद्दल शंका आहे. अर्थात् पक्ष महाराष्ट्रभर पोचवायला का होईना याचा उपयोग होऊ शकतो, जर तसं केलं तर!
अर्थात् हे सगळं नुसतंच विचारमंथन झालं. यासाठीचा अभ्यासपूर्ण विदा माझ्याकडे नाही. तरीही आपल्या सर्वांचं यावर मत जाणून घ्यायला आवडेल.
इत्यलम्
प्रतिक्रिया
12 Sep 2024 - 2:20 pm | अमरेंद्र बाहुबली
काल पंतप्रधान मोदीनी मुख्य सरन्यायाधीशांच्या घरी भेट दिली. पंतप्रधानांनी काही सामाजिक, नैतिक संकेत पळायचे असतात. सगळेच बासनात गुंडाळलेले दिसताहेत.
देशाला शिकलेला पंतप्रधान का असायला हवा हे ह्यावरून कळते.
योगायोग म्हणजे अपात्रतेची आज होणारी सुनावणी पुढे ढकलली आहे. कमाल आहे.
14 Sep 2024 - 6:23 pm | चौकस२१२
काल पंतप्रधान मोदीनी मुख्य सरन्यायाधीशांच्या घरी भेट दिली.
पंतप्रधानानि काही छुपी भेट घेतली नाही एका उत्सवासाठी घेतली .. गुपचूप असती तर जनतेला कळून दिली असती का ?
14 Sep 2024 - 8:43 pm | अमरेंद्र बाहुबली
हेच तर चुकलंय.
12 Sep 2024 - 3:45 pm | राघव
अबा, एक मात्र मान्य करायलाच लागेल.
टोमणे मारत समोरच्याला उकसवत बोलत/लिहित राहण्याची तुमची हातोटी वाखाणण्यासारखी आहे!
या एका धाग्यावरच जवळपास अर्ध्या प्रतिक्रिया तुमचे आहेत आणि उरलेल्यापैकी अर्ध्याहून जास्त प्रतिसाद तुमच्या प्रतिक्रियांना दिलेली उत्तरे आहेत!
अगदी दुर्लक्ष केले तरिही कुणी ना कुणी तुमच्या टोमण्यांनी चरफडतोच! :-)
असो. अगदीच राहवले नाही म्हणून कौतुक केले!
12 Sep 2024 - 6:36 pm | अमरेंद्र बाहुबली
खूप खूप धन्यवाद. खरं बोललं की सख्या आईलाही राग येतो.
13 Sep 2024 - 3:15 pm | राघव
खरं बोलण्याबद्दल काही बोलत नाही मी. टोमण्यांबद्दल मात्र हे "खरं" आहे! ;-)
14 Sep 2024 - 2:34 pm | अमरेंद्र बाहुबली
भारताला कुठलीही राष्ट्रभाषा नाही हे हया महोदयाना माहित नाही का??
20 Sep 2024 - 1:07 pm | अमरेंद्र बाहुबली
महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातला पळवण्यात आला आहे मित्रो…
https://www.saamana.com/maharashtra-loses-one-more-projects-to-gujarat-v...
सत्ता जानाराच आहे नाहीतरी. म्हणून शक्य ते “आपल्या” होमस्टेट ला पाठवलं जातंय
20 Sep 2024 - 2:42 pm | चौकस२१२
भाजप काय किंवा कांग्रेस काय कुठल्या एका भाषिक समूहाचे नाहीत हे कळत नाही की तुम्हाला ?
आज केवळ कर्म धर्म संबंधाने पंतप्रधान आणि गृहमंत्री गुजराथ चे आहेत , उदय दुसरया राजयोतील असतील.. तेवहा काय ओरडणार?
आणि उद्योग स्वतःचा फायदा तिथेच जाणार ना
20 Sep 2024 - 1:43 pm | कंजूस
कारखानदार कसे ठरवतात कोणत्या राज्यात जायचे?
ते आपल्याला एवढंच सांगतात की या प्रकल्पासाठी या राज्यांचा विचार केला. नाणार आणि जैतापूर सरकारी प्रकल्प गुजरात किंवा तमिळनाडू का घेत नाहीत?
20 Sep 2024 - 3:14 pm | रामचंद्र
<नाणार आणि जैतापूर सरकारी प्रकल्प गुजरात किंवा तमिळनाडू का घेत नाहीत?>
हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
20 Sep 2024 - 2:44 pm | चौकस२१२
१) महाराष्ट्र भाजपनं अतिशय घाणपणे मागच्या काही वर्षात राजकारण केलंय. जशास तसे मुळात उधवानी घाणेरडे पणा केला नसता ( आणि काकांनी त्यात हात धून घेतले नसते ) तर हि वेळ आली नसती
२) एकतर आयारामांनी भाजप भरलंय. हे मात्र खरे
23 Sep 2024 - 7:07 pm | कंजूस
नाना पटोले मुख्य मंत्री होणार......
जर मविआकडे सत्ता आली तर आणि कॉन्ग्रेसला अधिक जागा मिळाल्या तर त्यांचा मुख्यमंत्री आणि त्यांच्यापैकी नानाच होतील.
23 Sep 2024 - 8:37 pm | अमरेंद्र बाहुबली
नाना पाटोळेनी शिवसनेशी पंगा घेऊन स्वतःचा फडणवीस करुन घेतलाय. उद्धव ठाकरे त्यांच्या नावाला कधीही हिरवा कंदील दाखवणार नाहीत. बाळासाहेब थोरात व्हायची शक्यता आहे. पुढील मामू मधील प्रामुख्याने उद्धव ठाकरे, अनिल परब, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुप्रियाताई. असे क्रम आहेत.
23 Sep 2024 - 8:57 pm | कंजूस
यातले कुणी होण्याची शक्यता नाही.
ज्यांच्या जागा जास्ती त्याचा मुलं यावर एकमत झालंय.
23 Sep 2024 - 8:58 pm | कंजूस
दुरुस्ती
मुख्यमंत्री