१९७५ साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली. लोकशाही असलेल्या देशासाठी हा निश्चितच दुःखद प्रसंग होता. लोकाना आंदोलने वगैरे करता येत नव्हते, झोपडपट्टी हटवणे नी नसबंदीची चुकीची अंमलबजावणी हे दोन मुद्दे पुढे रेटले जातात. पण ह्या आणीबाणीला एक चांगली बाजूही आहे. आजही बर्याच सरकारी कार्यालयात लाच दिल्याशिवाय कामे होत नाहीत, लाचलुचपत खात्याने सरकारी अधिकारी पकडला तरी “निर्दोष” सुटेपर्यंत त्याचा पगार चालू राहतो, बऱ्याच वर्षांनी काम न करता पगार घेऊन तो परत त्याच नोकरीला चिकटतो. श्रीमंत माणसाने कार चालवून लोक मारले तरी त्या श्रीमंता साठी अख्खी सरकारी यंत्रणा कामाला
लागते, उशिरा ब्लड सँपल घेतले जातात नी ते बदललेही जातात. मुंबई पुण्यासारखे शहर पहिल्या पावसातच तुंबतात, कारण नाले /गटार सफाईत भ्रष्टाचार झालेला असतो. कुठेतरी वाचल की मुंबई फक्त आणीबाणी काळात तुंबली नव्हती, कारण नालेसफाई व्यवस्थित झाली होती.
तसेच एका मिपाकराचा अनुभव वाचला
“आणिबाणीपूर्वी एका ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या सरकारकडून फार अपेक्षा नव्हत्या. रेशनला रांगा लावूनही कधी रॉकेल मिळायचे नाही तर कधी साखर संपून जायची. रेशनचा काळा बाजार जोरात चालू असे. एसटी आगारातून खेड्यापाड्यात जाणाऱ्या गाड्या कधीही वेळेवर सुटत नसायच्या आणि बऱ्याचश्या फेऱ्या रद्द व्हायच्या. संपूर्ण आगारातून कायम गर्दी असायची. रात्रीच्या मुक्कामी गाडीलाही गर्दी असायची आणि बऱ्याचदा काहीतरी सटर-फटर कारणाने तीही रद्द झाली की एस्टी आगारातच रात्री मुक्काम करावा लागत असे. तेव्हा रिक्षासारखी खाजगी वाहने तुरळक असायची आणि ती भरायलाही तास तास थांबायला लागायचे. संध्याकाळी तर खेड्यापाड्यात रिक्षा जात नसत. आणीबाणीत रेशन वेळेवर मिळायचे, रॉकेल संपले किंवा साखर संपली असे कधी होत नसे . कोणी तक्रार करेल म्हणून रेशन दुकानदार शिधापत्रिका व्यवस्थित भरत असे. एसटी आगारातून वेळच्या वेळी गाड्या सुटत, गाड्या रद्द होणे बंद झाले त्यामुळे गाड्यांमध्ये होणारी गर्दी कमी झाली. रात्रीच्या शेवटच्या गाडीला फारच कमी प्रवासी असतं. जि. प. च्या कार्यालयात कधी कर्मचारी वेळेवर येत. साहेबपासून शिपयापर्यंत सगळे कार्यालयीन वेळेत जागेवर सापडायचे त्यामुळे कामेही झटपट होत असत. शाळेत जाताना किंवा येताना एसटी वेळेवर मिळत असल्याने वेळेची बचत होत होती.”
मी अनेक वयस्क लोकांशी बोललो, ते सर्वसामान्य होते, आणीबाणीत सामान्य माणसाला काहीही त्रास नव्हता असेच त्यांच्या बोलण्यातून दिसले. सरकार “सरकार” म्हणून काम करत होते, सरकारी अधिकाऱ्यांवर सरकारचा वचक होता, सरकारी नोकर वेळेवर कामावर दाखल होत, रेल्वे वेळेवर धावत होत्या, रस्त्यावर गाडे लाऊन जागा अडवल्या जात नव्हत्या, रात्री फिरायला बंदी होती त्यामुळे गुन्हे कमी झाले होते.
वरील सर्व जर खरं असेल तर आणीबाणी हा भारतासाठीचा सुवर्णकाळ मानावा का?? सर्वसामान्य माणसास हवेच काय असते आणखी?
ता.क- विनोबा भावे ह्यानी आणीबाणीस “अनुशासन पर्व” असे संबोधले होते.
वाचने
6634
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
मानसरोग तज्ञ
'अनुशासन पर्व' पुन्हा एकदा यावे.
सगळ्यांनाईक अनुशासन परवाई
In reply to 'अनुशासन पर्व' पुन्हा एकदा यावे. by चित्रगुप्त
सुधारित
In reply to 'अनुशासन पर्व' पुन्हा एकदा यावे. by चित्रगुप्त
सहमत, मोदींना अनुशासन पर्व
In reply to सुधारित by पॅट्रीक जेड
आपले राज्य भले = ३. ५
In reply to सुधारित by पॅट्रीक जेड
"आणीबाणी हा भारतासाठीचा
हे वाचून फुस्कान हसू आले
In reply to "आणीबाणी हा भारतासाठीचा by चौकस२१२
हे वाचून फुस्कान हसू आलेयेणारच. आणीबाणीत इतकं चांगल सुशासन होतं की आजचा काळ पहिला तर हसूच येईल.आणि जी लोक "संविधान खतरे मी है " नावाने शिमगा करीत आहेतसंविधान बदलायचंय म्हणून ४०० सीट्स हव्यात अस आधी भाजपेयीच बोंबलत फिरत होते. जनतेने दणका दिल्यावर डोळ्यापुढे तारे चमकू लागले नी मग “मी नाही त्यातली….” हे सोंग घेतले भाजपेयींनी.:)देश खुप पुढे आलाय.....
आणीबाणी सुवर्ण काळ की काळा
In reply to देश खुप पुढे आलाय..... by कर्नलतपस्वी
आणीबाणी सुवर्ण काळ की काळा कालखंड ही संपूर्ण राजकीय दृष्टीकोनातून केलेली चर्चा आहे. देश पन्नास वर्षे पुढे आला आहे. मागे ढकलू नका.कर्नल साहेब, दृष्टिकोन राजकीयच आहे. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने आणीबाणी नेमकी काय होती?? तुमच्या सारखे अनुभवी जून जाणते लोक नक्कीच सांगू शकतात.माझ्या दृष्टीकोनातून बाष्कळ चर्चाआणीबाणी खरच वाईट होती की तो सुवर्णकाळ होता हे आणीबाणी नंतर वीसेक वर्षणी जन्मलेल्या माझ्य सारख्याना जाणून घ्यायची इच्छा आहे.सविंधान खतरे मे है, हे सांगून दिशाभूल करणे आणीबाणी पेक्षा जास्त खतरनाक आहे.संविधान बदलायच्या घोषणा भाजपेयींनीच केल्या होत्या.भुजबळबुवा
In reply to आणीबाणी सुवर्ण काळ की काळा by पॅट्रीक जेड
डॉ. साहेब,
In reply to भुजबळबुवा by सुबोध खरे
घटना बदल करताच ना यायला ते
In reply to आणीबाणी सुवर्ण काळ की काळा by पॅट्रीक जेड
स्टंटबाजी
In reply to देश खुप पुढे आलाय..... by कर्नलतपस्वी
अर्थातच काळा कालखंड.
ते कसं??
In reply to अर्थातच काळा कालखंड. by कांदा लिंबू
बाहुबली ,काय स्वतःसाठी खड्डा
In reply to ते कसं?? by पॅट्रीक जेड
सामान्य जनतेसाठी मोदींची
In reply to बाहुबली ,काय स्वतःसाठी खड्डा by चौकस२१२
आणीबाणी- “सुवर्णकाळ” की “काळा” कालखंड?
३६००० लोक दीड वर्षापेक्षा
मी सर्वसामान्यांच्या दृष्टीने
In reply to ३६००० लोक दीड वर्षापेक्षा by सुबोध खरे
सर्वसामान्य म्हणजे कोण कोण?
सर्व सामान्य म्हणजे अ -
In reply to सर्वसामान्य म्हणजे कोण कोण? by चित्रगुप्त
मी त्यावेळी चोवीस वर्षांचा होतो आणि ...
व्वा. छान अनुभव. एकंदरीत
In reply to मी त्यावेळी चोवीस वर्षांचा होतो आणि ... by चित्रगुप्त
बाबू' लोकांची 'खाबू'गिरी बंद झाल्याने त्यांना मात्र त्रास झाला असेल.हा प्रतिसाद खूप काही सांगून जातो.हा काळ माझ्या आठवणीत स्वच्छ
परंतु या धाग्याचा मूळ हेतूच
In reply to हा काळ माझ्या आठवणीत स्वच्छ by सुबोध खरे
परंतु या धाग्याचा मूळ हेतूच शुद्ध नाहीधाग्यात मी दोन्ही बाजू मांडल्या आहेत. बाकी माझा भर “सर्वसामान्य” ह्या शब्दावर आहे. त्यांना काही त्रास झाला नसेल आणी सरकारी नोकर खाबुगिरी नी चिरीमिरी न घेता कामे करत असतील तर ह्यात वाईट काय होते?सहमत.
In reply to हा काळ माझ्या आठवणीत स्वच्छ by सुबोध खरे
आणीबाणीची ही काळी बाजू माहीत
In reply to सहमत. by खेडूत
आणीबाणीत सर्वसामान्य जनतेला
+१
In reply to आणीबाणीत सर्वसामान्य जनतेला by आग्या१९९०
मला आणीबाणीचा काळ अत्यंत
लंगोट दुपटी बदलणेहे सर्व करत असत. नंतर काही काळाने जरा बदल घडला असला तरी खिमठ, मेतकूट भात, नाचणी सत्त्व, विविध खिरी वगैरे पौष्टिक आहार मला मुबलक मिळत असे. रेशनिंग नव्हते. इकडे तिकडेरांगणे, सरपटणे आणि बागडण्याससंचारास देखील आडकाठी नव्हती. मी सिस्टीम विरुद्ध अत्यंत जोरदार आवाज उठवू शकत असे. मलादुपट्यातबांधून ठेवू जाता मी प्रस्थापित सिस्टीम वर लाथाळ्या झाडी आणि भोकाडरुपी लाखोली वाही. तरीही मला तुरुंगात टाकले गेले नाही किंवा मुस्कटदाबी झाली नाही. एकंदरीत बहारीचा काळ होता. तसा आयुष्यात पुन्हा आला नाही. पुढे तर मला चक्क कामाला जुंपले गेले.या प्रतिसादास
In reply to मला आणीबाणीचा काळ अत्यंत by गवि
तान्हे बाळ होतात तर :)
In reply to मला आणीबाणीचा काळ अत्यंत by गवि
"दो दीवाने तिहाडके" असे फिल्मी गाणे आम्ही रचून देऊ
तात्कालीन पंत-प्रधानीण बाईने
In reply to "दो दीवाने तिहाडके" असे फिल्मी गाणे आम्ही रचून देऊ by चित्रगुप्त
तात्कालीन पंत-प्रधानीण बाईने राबवलेले अनुशसन पर्व हे सर्वसामान्य जनतेसाठी उपकारक होते५तुमचा वरील अनुभव वाचून तरी असेच वाटतेय उपकारक होते. पण इटालीयन बाईचा मुलगा लायक असेल तर नक्की व्हावा पंतप्रधान, सध्याचे भाषणं वगैरे पहिले की वाटतंय तसं.@पॅट्रिक: अॅमेझॉनवर आपली चरणधूळ आणि चरणामृत उपलब्ध करून द्यावे
In reply to तात्कालीन पंत-प्रधानीण बाईने by पॅट्रीक जेड
आपला तो बाळ्या दुसऱ्याचं ते
In reply to @पॅट्रिक: अॅमेझॉनवर आपली चरणधूळ आणि चरणामृत उपलब्ध करून द्यावे by चित्रगुप्त
नौटंकी आणि संधिसाधूपणा यात
In reply to "दो दीवाने तिहाडके" असे फिल्मी गाणे आम्ही रचून देऊ by चित्रगुप्त
२५ जून आता संविधान हत्या दीन
आता उघड झाला या धाग्याचा खरा हेतु.
In reply to २५ जून आता संविधान हत्या दीन by पॅट्रीक जेड
काय हेतू? तुमच्याच
In reply to आता उघड झाला या धाग्याचा खरा हेतु. by चित्रगुप्त
त्यात ओळखायचे काय?
In reply to आता उघड झाला या धाग्याचा खरा हेतु. by चित्रगुप्त
emergency-was-a-mistake-it
In reply to २५ जून आता संविधान हत्या दीन by पॅट्रीक जेड
मनोरंजक प्रतिसाद.... ते मनोरंजक धागा...हा प्रवास सुरू झाला तर..
संविधानहत्यादिन यामागील तर्क
खूप काही लिहिता येईल...
In reply to संविधानहत्यादिन यामागील तर्क by नठ्यारा
आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी