पडले पूल, पडले छत,
२०१४ आधी पडत नव्हते का?
मेले लोक चेंगराचेंगरीत,
२०१४ आधी मरत नव्हते का?
समस्या जुनी, पण आवाज नवा,
कोण बदललं, कोण विचारेल का?
चुकीच्या हातात सत्ता दिली,
कळलं नाही, कोण भुललं का?
नवीन वाद, जुने प्रश्न,
उत्तरं मात्र राहिली तशीच.
स्वप्न दाखवून, फसवणूक झाली,
झाली चूक, जनता न शिकली.
विचार करावा आपण, मंथन करावे,
काय फरक, काय बदल घडले?
दोष देऊन संपत नाही काही,
दोष काढून, काम चालले.
पडले पूल, पडले छत,
२०१४ आधी पडत नव्हते का?
सर्व मिळून शोधू उत्तर,
की बदल खरोखर घडले का?
प्रतिक्रिया
5 Jul 2024 - 3:41 pm | आंद्रे वडापाव
२०१४ पूर्वीचेच अतिरेक्यांना पाठिंबा देणारे ...
२०१४ नंतर राष्ट्रभक्त म्हणून मिरवू लागले ...
6 Jul 2024 - 5:00 pm | मुक्त विहारि
मनोरंजक कविता....
6 Jul 2024 - 6:36 pm | कर्नलतपस्वी
पडले पूल, पडले छत,
२०१४ आधी पडत नव्हते का?
मेले लोक चेंगराचेंगरीत,
२०१४ आधी मरत नव्हते का?
कवीता समयोचित आणी भारी.
लगे रहो.
6 Jul 2024 - 8:04 pm | मुक्त विहारि
कवितेचा अर्थ असा की, भाजप नको...
6 Jul 2024 - 7:58 pm | रात्रीचे चांदणे
२०१४ पूर्वी काही वाईट घडल तर ओरडा ओरड होत नव्हती का?
6 Jul 2024 - 10:24 pm | रामचंद्र
हा तर उत्तुंग षटकार!
7 Jul 2024 - 12:14 pm | आंद्रे वडापाव
२०१४ आधी , आरडाओरड करणार्यांना देशद्रोही मानलं जायचं का ?
२०१४ आधी , शेतकरी आंदोलनाला खालिस्तानी आंदोलन म्हटलं जायचं का ?
२०१४ आधी पंप्र खोट्या पदव्या दाखवाव्या लागायच्या का ?
7 Jul 2024 - 12:40 pm | पॅट्रीक जेड
+१
हाच उपरोध आहे. काहीही घडलं की अंधभक्त २०१४ आधीचा दाखला देतात.
7 Jul 2024 - 3:10 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
7 Jul 2024 - 12:55 pm | आग्या१९९०
बघा ना ! फुटपट्टी पण २०१४ आधीची वापरतात.अद्याप नवीन केलीच नाही. यदाकदाचित केलीच तर ती अचूक होईल की नाही ह्याची त्यांनाही खात्री नसावी.
7 Jul 2024 - 1:37 pm | आंद्रे वडापाव
ह्या पंप्र ला
एक मराठी शब्द बिरूद चपखलपणे बसते...
" थापाड्या "...
ह्याच्या आधीच्या कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही पंप्र साठी
हा शब्द कोणालाही वापरावासा वाटला असेल...
7 Jul 2024 - 4:30 pm | आंद्रे वडापाव
ह्या पंप्र ला
एक मराठी शब्द बिरूद चपखलपणे बसते...
" सोंगाड्या "...
ह्याच्या आधीच्या कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही पंप्र साठी
हा शब्द कोणालाही वापरावासा वाटला असेल...???
7 Jul 2024 - 2:04 pm | चौथा कोनाडा
आजचा रैवार ..हसत खेळत
7 Jul 2024 - 3:42 pm | नावातकायआहे
चान चान!
आयडीला शुभेच्छा!