सीवूड तलाव (नवी मुंबई), एक सहज फेरफटका

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in मिपा कलादालन
29 May 2024 - 5:13 pm

सीवूड येथील तलावात भरपूर फ्लेमिंगो पक्षी आल्याचे कळले होते. सकाळची कामे आटोपून साधारण दहाच्या सुमारास तलावास भेट दिली .
पाम बीच रस्त्यालगतच हा तलाव आहे.

पोहचता क्षणीच फेरी काही फुकट जाणारनाही याची जाणीव झाली. तलावात पुष्कळ पक्षी दिसत होते. तलावाच्या भोवती पायी फेरी मारण्यासाठी चांगला रस्ता केलेला आहे. फेरी मारता मारता टिपलेले पक्षांचे, तलावाचे व सभोवतालच्या इमारतींचे काही फोटो.

चालतांना नेहमीच्या किंवा क्वचित दिसणाऱ्या नाना प्रकारच्या वनस्पती नजरेस पडतात.
जशी ही चिंच. मस्त मोहरली आहे. हिच्या फुलोऱ्याची आंबूस चवीची भाजी लहानपणी खाल्ली आहे.

ही विलायती चिंच

ही जखम जोडी

ही जलपर्णी

हिचे नाव माहित नाही. शाळेत असतांना वहीची फाटलेली पाने चिकटवण्यासाठी शेंगांचा रस डिंकासारखा वापरायचो.

बऱ्याच झाडांच्या उंच शेंड्यावर कावळ्याची घरटे दिसली.

जपानमधील अकिरा मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने जंगल निर्मितीची नवीन पद्धत शोधली.
सर्वसाधारणपणे एक हजार चौरस फूट जागेत २५० मोठे, उंच, मध्यम आणि लहान अशा चार प्रकारच्या ४० पेक्षाही जास्त देशी पण दुर्मीळ वृक्षांची योग्य अंतरावर लागवड केली जाते, ज्यामध्ये कोणत्याही वृक्ष गटांचे वर्चस्व आढळत नाही. सर्व आपआपसात स्पर्धा न करता समान पातळीवर वाढताना आढळतात. (जालावरून साभार)
अशा जंगलांमुळे धूळ व ध्वनी प्रदूषण रोखण्यास मदत होते.

सकाळचे अकरा वाजत आले होते. मॉर्निग वॉक वाले आणि कामावर जाणारे बहुतेक जण घरी परतले असल्याने शुकशुकाटच होता. मुंगूस, सरडे, कोकीळ दिसले पण फोटो घेण्याआधीच अदृष्य होत होते. एक मनीमाऊ मात्र ऐटीत रस्त्यावरून चालत होती.

दोन श्वान चाफ्याखालच्या गारव्यात मस्त झोपले होते.

मैदानी खेळ, लहानांसाठी घसरगुंडी वगैरेसाठी जागा आहे.

स्थानिक लोकांच्या तलावातील होड्या

रस्त्याच्या कडेने ठिकठिकाणी थोडासा आराम करण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे.

द थिंकर (प्रतिकृती) - सांगत आहे पर्यावरण व शहर दोन्हीचा विचार करा

द थिंकर, फ्रेंच कलाकार ऑगस्टे रॉडिनचे विचारशील नग्न पुरुषाचे शिल्प, त्याच्या सर्वात प्रसिद्ध कामांपैकी एक. रॉडिनच्या हयातीत आणि नंतर अनेक आकारात अनेक संगमरवरी आणि कांस्य आवृत्त्या अंमलात आणल्या गेल्या, परंतु सर्वात प्रसिद्ध आवृत्ती म्हणजे 1904 मध्ये 6 फूट (1.8-मीटर) कांस्य पुतळा (सामान्यत: स्मारक म्हणून ओळखला जाणारा) कास्ट जो रॉडिनच्या बागेत बसला होता. पॅरिसमधील संग्रहालय. त्याच्या एकाग्र आत्मनिरीक्षणाच्या क्षणी मोठ्या स्नायूंच्या आकृतीने अनेक दशकांपासून प्रेक्षकांना मोहित केले आहे. (जालावरून साभार. गूगल भाषांतर जसेच्या तसे)

जाता जाता तलावाचे अजून एक दोन फोटो

तलावाचा परीघ बराच मोठा म्हणजे साधारण साडे तीन किमीचा आहे. रमतगमत फेरी मारण्यास जवळपास दीड तास लागला. या भागात राहणाऱ्या लोकांना एखाद्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी असाच एखादा फेरफटका निश्चितच मारता येईल .
(टीप : पक्षी जास्त दिवस दिसणार नाहीत)

प्रतिक्रिया

सीवुडचे सर्व तलाव पाहीले. पाम बीडच्या सिग्नल वरून चाणक्यकडे आत गेल्यावर लगेच उजवीकडे खाडीकडे जाण्याचा पूल होता तो मात्र त्यांनी बंद करून टाकला. पाम बीचवरून एक अंडरपास ( वाहनांसाठी नाही) आहे तिथे एक तलाव आहे. पण त्यांच्या बाजूने एक खाडीवर जाण्याचा मार्ग तोही बंद केला. तलाव हे शेवटी तलावच असतात. त्यात भरती ओहोटीचे पाणी वर खाली होत नाही.

कर्नलतपस्वी's picture

29 May 2024 - 7:32 pm | कर्नलतपस्वी

फोटो आणी वर्णन या बद्दल लिहीत नाही कारण तुमचा हातखंडा आहे.

जैववैविध्य अभ्यास करण्या साठी चांगली साईट आहे. जर सात्यत्याने बघत राहीले तर अनेक नवीन आणी निसर्गातील चमत्कार दिसून येतील.

सर्व प्रकारचे पक्षी,त्यांचे अधिवास, प्रजनन, पॅरेन्टिंग या सर्व गोष्टी बघणे आनंद दायी असते.

सुरूवातीला पक्षी ओळखण्यात साठी फिल्ड गाईड आणी मर्लिन ॲण्ड्राॅईड मोबाईल ॲप डाऊनलोड केल्यास आवाजावरून पक्षी ओळखण्यात मदत होईल.

थोड्याच दिवसात शंभर सव्वाशे पक्षी सहज ओळखू शकाल.

हिचे नाव माहित नाही. शाळेत असतांना वहीची फाटलेली पाने चिकटवण्यासाठी शेंगांचा रस डिंकासारखा वापरायचो.

प्रथमदर्शनी सुभाबुळ वाटते. या शेंगा कुटून आम्हीं क्रिकेट खेळण्यासाठी चेंडू बनवायचो.

प्रथमदर्शनी सुभाबुळ वाटते. या शेंगा कुटून आम्हीं क्रिकेट खेळण्यासाठी चेंडू बनवायचो.

मलापण सुबाभूळ वाटली.माझी आई सांगते ती लहानपणी या वाळलेल्या शेंगा तीन तीन भाग करून ते तोडून त्यांना बांधून पैंजण बांधून खेळायच्या.

श्रीरंग_जोशी's picture

4 Jun 2024 - 8:51 pm | श्रीरंग_जोशी

सुंदर ठिकाणाची उत्तम ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

5 Jun 2024 - 1:36 pm | मुक्त विहारि

सध्या मी, नेरुळला असल्याने, ह्या ठिकाणी आठवड्यातून एकदा तरी धावती भेट होतेच.

Nitin Palkar's picture

6 Jun 2024 - 11:50 am | Nitin Palkar

सुरेख वर्णन, छान प्रकाश चित्रे, ओघवते निवेदन.

मुंबईत अजूनही अशा जागा टिकून आहेत आणि टिकून राहायलाच हव्यात असे वाटते.
वर्णन आणि छायाचित्रे सुरेख.

कंजूस's picture

8 Jun 2024 - 6:15 pm | कंजूस

हे तलाव.

अजूनही अशा जागा टिकून आहेत आणि टिकून राहायलाच हव्यात असे वाटते.

काठाविना तलाव म्हणजे मेलेला पाण्याचा साठा. सीवुडच्या सर्व तलावांची गळचेपी केलेली आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2024 - 12:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छायाचित्र आणि लेखन छान. लिहिते राहावे.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

7 Jun 2024 - 5:43 pm | चौथा कोनाडा

सीवूड तलाव नवी मुंबईचा सुंदर फेरफटका !
प्रचि नेहमीप्रमाणे छानच ! मजा आली आप्ल्या सोबत फेफ करताना !
धन्यवाद, गोरगावलेकर !

टर्मीनेटर's picture

7 Jun 2024 - 7:30 pm | टर्मीनेटर

एक दोन वेळा पाम बीच रोडवरुन जाताना हा तलाव पहिला आहे पण कधी थांबुन निरिक्षण केले नाही. फोटोंमधले फ्लेमिंगो पक्षी बघीतल्यावर ह्या सिझनमध्ये पुन्हा कधी ह्या परिसरात जाणे झाले तर आवर्जुन थांबुन पहाणार!

बगळ्या सारखाच पक्षी आहे...

गोरगावलेकर's picture

3 Jul 2024 - 2:13 pm | गोरगावलेकर

आज बऱ्याच दिवसांनी लॉगिन केले. सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे आभार.