आय.टी मधील मंदी आणी उपाय

उदय's picture
उदय in काथ्याकूट
22 Dec 2008 - 1:47 pm
गाभा: 

तशी ही कल्पना गेले काही दिवस डोक्यात घोळत होतीच, पण आत्ताच वाचलेल्या एका लेखामुळे इथे खरडण्याचे धाडस करत आहे. लेख योग्य नसेल तर क्रुपया काढून टाकावा.

बळी तो कान पिळी या तत्वाबद्दल बहुतेक जणांचे एकमत असेल. अमेरिकेत राहिल्यामुळे एक समजले आहे की पैसा असेल की बळ येते. उपाशी पोटी बळ येत नाही. कदाचित गांधीजींना येत असेल, पण मी काही गांधी नाही. मागे एकदा मी बी.पी.ओ.कॅनडा डॉट कॉम आणी गुज्जुवेब डॉट कॉम बघताना विचार आला की मराठी लोकांनी अशी प्रकारची कंपनी का चालवू नये? ड्रूपल, झूमला वगैरे ओपन सोर्स वापरून आपण सुध्धा एक कंपनी चालवू शकतो, जी इतर लोकांसाठी सर्विस देईल. रोशन शहा गुज्जुवेब चालवतो, गुजरात मध्ये त्याने कंपनी काढली आहे जिथे तो गुजराथी लोकाना रोजगार देतो, मग आपण का असं काही करू शकत नाही? जर कुणाला इन्टरेस्ट असेल तर इथे मत द्यावे, ही विनंती. माझ्या डोक्यात इतरही काही कल्पना आहेत. जर कोणाला पी.एच.पी. मध्ये अनुभव असेल, पण सध्या नोकरी नाही म्हणून फ्री लान्सर म्हणून काम करायचे असेल (फुकट न्हवे, पण २ री नोकरी मिळेपर्यंत ) तर मला निरोप द्यावा.

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

22 Dec 2008 - 2:00 pm | सखाराम_गटणे™

चांगली कल्पना आहे.
होईल तशी मदत करेन

----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

अवलिया's picture

22 Dec 2008 - 2:12 pm | अवलिया

चांगली कल्पना आहे.
होईल तशी गटणे मदत करेलच.

-- अवलिया

लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया हवी तिथे वापरता येईल. :D

अवलियाची अनुदिनी

पर्नल नेने मराठे's picture

22 Dec 2008 - 5:07 pm | पर्नल नेने मराठे

सुरेख कल्पना आहे...

चुचु

आम्हाघरीधन's picture

22 Dec 2008 - 7:31 pm | आम्हाघरीधन

कल्पना छान आहे. मी पण मदतीला तयार आहे.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

राहुल बनसोडे's picture

22 Dec 2008 - 7:57 pm | राहुल बनसोडे

आम्हि चालवतोय एका वर्षापासुन एक कंपनी. एप्लिकेशन नेक्सस नावाने. oDesk वर 4.95/5.0 रेंटिग आहे. पैसा हि चांगलाच आहे corporate jobs पेक्षा भेटा www.applicationnexus.com

मिसंदीप's picture

24 Dec 2008 - 3:28 pm | मिसंदीप

तात्या,

तुम्ही नाहक आम्हा सारख्या आय्.टी मधल्या लोकांबद्द्ल काही मते बनवुन घेतली आहेत.
पगार जरी चांगले असले तरी प्रत्येक जण उधळ्या आसतोच असे नाही. त्यामुळे या मंदीच्या काळात प्रत्येक आय्.टी वाला हवालदील आहे असे नाही,काहीजण अजुनही धिरोदत्त ,आशावादी व संयमी आहेत.(माझ्यासारखे :) )
आणि तसेही प्रत्येक जण स्वतःचे करीअर स्वत: निवडत असतो, तेव्हा एकदा ते निवडल्यावर दुसरे क्षेत्र निवडलेल्या माणसाचे चांगले होत आहे म्हणुन आगपाखड करण्यात कितपत शहाणपण आहे ?

बाकी आपण सुज्ञ आहतच !!

मिसंदीप's picture

24 Dec 2008 - 3:30 pm | मिसंदीप

प्रतिक्रिया वेगळ्या विषयाला द्यायची होती... क्षमस्व