मदत हवी : birth certificate बीड

चिंटु's picture
चिंटु in काथ्याकूट
12 Apr 2024 - 6:54 am
गाभा: 

बीड मधून birth certificate हवे आहे.
मी सध्या पुण्यात आहे. वय 40.

SSC certificate, passport, aadhar, कॉलेज सोडतानाचा T C अशा साऱ्या साऱ्या documentsवर माझी जन्मतारीख आहे. काहींवर जन्मठिकाणही आहे. पण काही ठराविक कामासाठी birth certificate हवे आहे. ( जन्मानंतर बीडशी संबंध राहिला नाही. आणि बहुतेक शाळेत admission घेताना ते submit केल्याने सध्या माझ्याकडे नाही. अन योगायोगाने गरज पडली नव्हती आजवर)

आपल्यापैकी कुणी बीड मध्ये आहे का?

किंवा कुणाला ह्याबाबत माहिती आहे का?

दुर्दैवाने घरगुती अडचणींमुळे मला स्वतःला आत्ता पुण्याहून बीडला नुसत्या चौकशीसाठी जमेल असे दिसत नाहीये. नेमकी प्रोसेस माहिती असेल, तर त्या प्रोसेससाठी,कागदपत्रे सबमिट करण्यासाठी जाऊन येऊ शकतो.

प्लिझ, काही माहीत असेल तर अवश्य सुचवा.

दुर्दैवाने सध्या तिकडे फारशी लोक परिचयाची नाहीत. वेळेची नड आहे. ही कामे करणारी कुणी consultant, agent मंडळी मिळाली तर बरं होईल. (औपचारिकता अन कागदपत्रांची पूर्तता ह्यासाठी तिकडं जाऊ शकतो. पण सरकारी काम आहे. फॉलो अप घेऊन, तळ ठोकून करुन घ्यावे लागणार आहे. ते घरच्या परिस्थितीमुळे जमत नाहीये. )

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Apr 2024 - 5:32 pm | अमरेंद्र बाहुबली

वय मीय नी पुण्यात आहात तर बीड ला जाऊन यावे असे सुचवेन. कुणाल पाठवायचे असेल तर बरेच पैसे लागतील. ऑनलाइन मिळतं का? चेक करुन पहा. नसेल मिळत तर पुण्यातिलच असे काम करणारा कुणीतरी पहा. त्याच्या ओळखीने कदाचित तो काढून देऊ शकतो.
ह्या सर्व शक्यता तुम्ही पडताळून पहिल्या असतील अस वाटतय. जर जावच लागणार असेल तर मग नाईलाज आहे. कुठल्या दवाखान्यात जन्म झालाय. त्याची माहिती इंटरनेट वर शोधून पहा. त्या दवाखान्यात काम करणाऱ्या कुणाचा नंबर मिळाला तर ठीकच. थेट संपर्क करुन तो काढू शकतोय का पहा. हे सगळं नसेल होत तर मग कळवा बीड ला एक मित्र असतो त्याचा भाऊ कदाचित मदत करू शकेल.

तुर्रमखान's picture

13 Apr 2024 - 1:14 am | तुर्रमखान

माझं आणि माझ्या परिचयातल्या कुठल्याही व्यक्तीला वरील कागदपत्र असल्यावर जन्म दाखला लागला नव्हता. साधारण दोन हजार नंतरचा जन्म असेल तर असा दाखला लागतो असं एका कडून कळलं. त्या आधी जन्म दाखला सगळ्यांकडे असण्याची शक्यता नसते.

निपा's picture

16 Apr 2024 - 12:28 pm | निपा

बऱ्याच देशातला वर्क visa काढताना जन्मदाखला लागतो .... बऱ्याचदा apostille करून पण लागतो .

फॊर्म ५ भरून म्युनिसिपालिटी किंवा ग्राम पंचायत दाखल देते . एका दिवसात काम होईल