मतदानपुर्व कल बघण्यासाठी मी सर्वसाधारणपणे ओपीनीयन पोल्स आणि सोबतीला गूगल ट्रेण्ड्स्वर लक्ष ठेऊन असतो (पहा गूगल ट्रेन्ड्स २०२४ ). या दोन्हीतही मोदींचे अद्यापतरी एकंदर वर्चस्व दिसते. सोबत युट्यूब चाळत असल्याने आपसूक त्यावर येणार्या जाहीरातींकडे लक्ष जाते या जाहीरातींच्या प्रभावाला क्वांटीफाय करणे तसे अवघडच पण व्ह्यूज, त्यावर आलेले प्रतिसाद आणि प्रत्येकाला स्वतःला जाणवलेल्या प्रभावाबद्दल सामुहीक चर्चेतून जरासा अंदाज येऊ शकेल आणि काही प्रमाणात रोचक चर्चा होऊ शकेल.
माझे यापुर्वी सोशल मिडीयावरील राजकीय जाहीरातींकडे फारसे लक्ष गेले नव्हते. या आठवड्यात प्रथमच लक्ष गेले. व्यक्तीशः भाजपाच्या जाहीरातीत नकारात्मकतेवर अधिक भर, काँग्रेसच्या जाहीरातीच्या तुलनेत कमी प्रभाव क्षमता आणि कमी व्ह्यूज आहेत का अशी शंका आली किंवा काही चांगल्या प्रभावी जाहीराती माझ्या नजरेतून सुटल्या असेही असू शकेल, नाही असे नाही.
* तुम्हाला आवडणार्या पक्षाच्या आवडत्या जाहीरातीसोबतच, आवडणार्या पक्षाच्या न आवडणार्या जाहीराती आणि न आवडणार्या राजकीय पक्षाच्या आवडलेल्या जाहीरातीही मनमोकळेपणाने नोंदवाव्या. किंवा मतमोजणीच्या आधी कबुल करावेसे वाटले नाही तरी मत मोजणी झाल्या नंतर का असेना मनमोकळे पणाने सांगितल्यास संबंधीत पक्षांना झाला तर फायदाच होईल.
* मी स्वतः युट्यूब किंवा समाज माध्यम दुवे दिलेले नाहीत पण त्यांचा आंतर्भाव केल्यास बरे पडेल.
* प्रश्न मुख्यत्वाने २०२४ लोक्सभा निवणूकातील समाज माध्यमांवरील तुम्हाला आवडलेल्या न आवडलेल्या निवडणूक जाहीराती कोणत्या? असा आहे अनुषंगिक जुन्या निवडणूक जाहीरातींचे स्मरण करून देण्यास हरकत नसावी.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर, धागाचर्चा हॅक करणे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.
प्रतिक्रिया
11 Apr 2024 - 4:57 pm | अमरेंद्र बाहुबली
11 Apr 2024 - 5:37 pm | माहितगार
टिकात्मक व्यंग जाणवत पण विनोद जाणवत नाही पुन्हा पुन्हा दाखवल्यास र्हेटॉरीकल वाटेल असे वाटते. याच विषयावर एक बिहारी अमेचर कलाकारांची कल्पक युट्यूब शॉर्ट रील छान आहेत. एका सिबीआय आणि एका ईडी आधीकार्याने धाड टाकल्यावर एक पुढारी पळतो शेवटी दमून खाली बसतो त्यावेळी त्याला प्रत्यक्ष पकडण्याचा प्रयत्न केल्यास त्या आधीकार्यांना विजेचा झटका बसतो. झटका का बसतोय म्हणून खाली पहातात तर खाली मोदी-भाजपा लिहीलेली लक्ष्मण रेषा दिसते त्या लक्ष्मण रेषेला ते नमस्कार करून परततात. परत पहाण्यात आल्यास दुवा देईन ईतरही कुणी पाहील्यास दुवा द्यावा.
11 Apr 2024 - 6:48 pm | सर टोबी
युक्रेन युद्धात भारतीयांची सुटका करण्यासाठी मोदींनी युद्ध थांबवले या बातमीची येथेच्छ धुलाई झाली असतांनाही "पापा की परी" अशी जाहिरात करण्याचा वेडेपणा केला गेला आणि सर्वात जास्त टवाळकीचा विषय बनण्याचे श्रेय या जाहिरातीला मिळाले.
स्वयंवरावर आधारित, विरोधकांच्या आघाडीची खिल्ली उडवणारी क्लिप सत्ताधारी पक्षाने तयार केली आहे. कुठल्याही गोष्टीला लग्न किंवा स्त्री-पुरुष संबंध अशा नजरेतून बघणे मला व्यक्तिशः अतिशय हीन मनोवृत्तीचे लक्षण वाटते. सुदैवाने सत्ताधारी पक्षाच्या बाजूने अथवा विरुद्ध फार काही गहजब उडालेला नाही.
11 Apr 2024 - 10:27 pm | माहितगार
भारतात कोणतेही सरकार असते तरी युद्धात अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका होण्यासाठी रशियाने युद्धास पुरेशा तासांचा विलंब आणि सेफ्टी कॉरीडॉर द्यावा हे नवल नाही. खास करून रशियावरील आर्थिक निर्बंधांना पाचर मारून भारताने रशियाला मोक्याच्या वेळी मोठी मदत केली आणि यामुद्यावर आमेरीकेसोबतचे संबंध यशस्वीपणे सांभाळले. अगदी इसीसच्या तावडीतून केरळच्या नर्सेस सोडवून आणण्यात यश आले होते पण भाजपाला अशा पद्धतीचे क्रेडीट घेणे नीटसे जमले नाही असे म्हणावे ?
11 Apr 2024 - 10:42 pm | सर टोबी
खरं तर सभ्यतेचे सगळे संकेत मोडून भाजप कुठल्याही लहान सहान गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी धडपडत असते.
इराक आणि कुवेतच्या युद्धात सगळ्या भारतीयांना सुखरुप मायदेशी आणणे ही आज पर्यंतची सर्वात मोठी सुटका करणारी मोहीम होती. खास करून देशाची आर्थिक परिस्थिती अक्षरशः तोळामासा असतांना ही मोहीम राबवलेली होती.
11 Apr 2024 - 10:52 pm | माहितगार
लोकशाही राजकारणात पक्ष कोणतेही असले तरी श्रेयासाठी झटावेच लागते. काही गोष्टीत भाजपाईंना नीटसे जमल्यासारखे वाटत नाही. काँग्रेससारखा सत्तेतील प्रदिर्घ अनुभव नसल्यामुळे सत्तेत असताना पॉलीटकली राईट रहात डिप्लोमॅटीक बोलण्याची कला जुन्या भाजपाई नेत्यांकडे पुरेशी नसणे हि भाजपातली समस्या आहे. त्यामुळेच मोदींना खुल्या पत्रकार परिषदा मोदींना टाळाव्या लागल्या असाव्यात. तरी गेल्या वर्षाभरात बर्याच केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाखतीमध्ये बरीच सुधारणा दिसून आल्यासारखे वाटते आहे.
12 Apr 2024 - 6:43 am | सर टोबी
अगदीच अनुल्लेखाने मारायला जमत नाहीय म्हणून काहीतरी भलतेच प्रतिसाद देत आहात असं दिसतंय.
खाडी युद्धात भारतीयांची सुखरुप सुटका केली याची जाहिरात पहिल्याचं आठवतंय का? इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला प्रोत्साहन द्यायचं धोरण होतं तेव्हा महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश, आणि भारत सरकार यांचे स्वतःचे उद्योग होते. त्या उद्योगांच्या स्वतःच्या व्यावसायिक जाहिराती वगळता त्या सरकारांनी आपले ढोल वाजवले का?
आता येऊ केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाखतींकडे. या मुलाखतींमध्ये ऋजुता, कमतरता मान्य करण्याचा प्रांजळपणा, जनतेच्या अडचणींबद्दल सहानुभूती अशा गोष्टी तर दूरच. फक्त आणि फक्त सत्तेची गुर्मी दिसून येते. आदरणीय निर्मला सीतारामन, परम आदरणीय जयशंकर, आणि युवकांच्या आकांक्षांचे प्रतिनिधी अनुराग ठाकूर यांच्या मुलाखती जरा गुगलुन बघा.
12 Apr 2024 - 10:03 am | माहितगार
मी धागा लेखात नमुद करायचे राहीले पण मी जाहीरातींची चिकित्सा मुख्यत्वे मार्केटींग प्रोफेशनल चा दृष्टीकोण ठेऊन करतोय. मार्केटींग मध्ये जे खरचं केलय आणि वस्तुस्थितीला धरून आहे मग लहान का असेना त्याच्या श्रेयाची मांडणी करणे योग्य आणि महत्वाचे मानले जाते. मग पक्ष कोणता का असेना.
प्रतिपक्षाला टोलवणे सर्वच राजकीय नेत्यांना आणि समर्थकांना करावे लागते. पडद्यामागे काही केलं तरी छान छान वाटणार बोलावं ह्या साठी सत्तेचा दीर्घ अनुभव लागतो जो काँग्रेसी नेत्यांकडे आपसूक आहे, भाजपाईत हळू हळू सुधारणा होते आहे हे माझे व्यक्तिगत मत अर्थात मार्केटींगच्या दृष्टीकोणातून.
12 Apr 2024 - 10:57 am | सर टोबी
पुष्टी करणारी काही माहिती आपल्याकडे आहे का? म्हणजे सत्ता राबवण्याच्या अनुभवातून आलेलं छान छान बोलण्याचं कसब वगैरे? थोडक्यात सत्ता राबवण्याच्या सुरुवातीच्या काळातील मंत्र्यांच्या मग्रुरीचे किस्से आपल्याला माहित आहे का?
काँग्रेसने सत्ता, खास करून आत्ताच्या सत्ताधीशांच्या तुलनेत, चांगल्याच पद्धतीने राबवली आहे ही बाब इथून पुढे उत्तरोत्तर जनतेला समजणार आहे. फक्त त्यासाठी लागणारा प्रांजळपणा दाखवण्यासाठी देखील आपण आढेवेढे घेत आहात.
12 Apr 2024 - 11:16 am | माहितगार
:)) माझ बालपण काँग्रेसी कुटूंबात गेले आहे.
12 Apr 2024 - 9:27 am | विवेकपटाईत
या जाहिरातीचा फायदा भाजपला झाला. जो विसरला होता त्याला ही आठवले. बाकी या मुलीचा उपयोग ट्रोलर्स नी जास्त केला. फसलेली जाहिरात.
12 Apr 2024 - 9:49 am | माहितगार
मधील उप्प्रतिसादांमुळे तुम्ही नेमके कोणत्या जाहीराती संदर्भाने बोलत आहात हे स्पष्ट होत नाही.
12 Apr 2024 - 10:03 am | सर टोबी
कुठे कुठे ओळखी आहेत केंद्रात.
11 Apr 2024 - 7:14 pm | अहिरावण
वाचनीय धागा असेल अशी अपेक्षा आहे
11 Apr 2024 - 10:33 pm | माहितगार
मार्केटींगमध्ये प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुम्ही अधिक काय देता आणि जे अधिक देत आहात तेच ग्राहकाला (मतदाराला) अधिक ऊपयूक्त कसे आहे हे पटवून द्यायचे असते आणि अशी मार्केटींग अधिक प्रभावी समजली जाते. मार्केटींगच्या तत्वानुसार नकारात्मक प्रचार कोणत्याही बाजूचा असो सहसा प्रभावी मानला जात नाही. तुम्हाला स्मरत असेल तर मोदींची चायवाला म्हणून संभावना करणे २०१४च्या निवडणूकी काँग्रेसला भोवले होते.
11 Apr 2024 - 7:25 pm | वामन देशमुख
काही जाहिराती आवडल्या-नावडल्या तर इथे डकवीन.
धागा वाचून युट्युबवर 2024 loksabha elections political ads शोधले तर ही जाहिरात पहिल्यांदा दिसली -
https://youtu.be/8CqYtg6D4yE?si=zjRNz_8PKEQnM-Ez
11 Apr 2024 - 7:44 pm | वामन देशमुख
२०१९ सालीचा "गठबंधन इक्सप्रेस्" हा राजकीय व्यंगपट मला खूप आवडला होता -
https://youtu.be/e9J6ZtQ91OI?si=Is0Qvq0OssAXauCG
11 Apr 2024 - 10:19 pm | माहितगार
२०१९ ची 'गठबंधन एक्सप्रेस' विरोधी पक्षातील गोंधळ आणि नेतृत्व स्पर्धा दाखवणारे व्यंगपट म्हणून अधिक चांगले आहे किंआन नकारात्मकता भासत नाही पण सर्वसामान्य जनतेवर प्रभाव समजण्यासाठी जरासे दुर्बोध आहे. २०२४ ची 'मैं ही दूल्हा हूं' सर्वसामान्य जनतेस समण्यास सोपे असले तरी उथळ आणि नकारात्मकता भासणारी वाटते. मला वाटते भाजपा कडे आता पैसा चांगला आहे तर किमान जाहिरात एजन्सी बरी बघावयास हवी होती.
11 Apr 2024 - 10:40 pm | माहितगार
खानदानी लुटेरों का सच! (२०२४) ही सुद्धा नकारात्मक आहेच पण शिवाय श्रोत्यांना जाहीरात कशा संबंधाने आहे हे समजण्याच्या दृष्टीने जराशी दुर्बोधही वाटते का?
मला खरेच भाजपाच्या यावर्षीच्या अद्यापपर्यंतच्या तरी जाहीराती पुरेशा भावताना दिसत नाहीत. अजून काही जाहीराती ऐन मतदानाच्या आधीच्या आठवड्यात आल्यातर बघावे लागेल.
12 Apr 2024 - 7:49 am | मुक्त विहारि
माझ्या दृष्टीने, देशाचे संरक्षण ही प्राथमिकता...
बळवंतराय मेहता ते अभिनंदन, हा इतिहास बघता, सध्या तरी भारताची संरक्षणा बाबतीत प्रचंड प्रगती आहे...
इट का जबाब पत्थर से देने वाला, ये नया भारत हैं...
12 Apr 2024 - 9:18 am | अमरेंद्र बाहुबली
ते दिसलच. चीन ने बळकावलेल्या भूमीवरून.
12 Apr 2024 - 9:31 am | विवेकपटाईत
चीन ने २०१२ पर्यंत जमीन बळकावल्या होत्या. गेल्या नऊ वर्षांत त्यातील काही भाग एका चकमकीत मौकेचा फायदा घेऊन पुन्हा मिळविला आहे. अर्थात तो भाग पूर्वी भारताचाच होता. भारताने चीन भाग काबीज केला नाही.
12 Apr 2024 - 9:39 am | अमरेंद्र बाहुबली
हो का? हे व्हॉट्सऍपी ज्ञान झाल.
12 Apr 2024 - 6:15 pm | चंद्रसूर्यकुमार
काही आठवणीतील निवडणूक जाहिराती--
१. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने 'माझ्या हृदयाचे स्पंदन केवळ देशासाठी' अशाप्रकारच्या जाहिराती वर्तमानपत्रांमध्ये दिल्या होत्या. त्या जाहिरातींचा फार उपयोग झाला नाही. लोकसभा निवडणुक झाल्यावर तीन महिन्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुक होती त्यावेळेस त्या स्पंदनाचा उल्लेखही जाहिरातीत नव्हता.
२. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या वेळेस टिव्हीवर त्यावेळच्या चारही प्रमुख पक्षांच्या जाहिरातींचा भडिमार चालू होता. राष्ट्रवादीची जाहिरात-- "मी राष्ट्रवादी.. महाराष्ट्रवादी" आणि भाजपची जाहिरात- "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा" या जाहिरातींनी अगदी वैताग आणला होता. तेव्हा एक व्हॉट्सअॅप फॉरवर्ड आला होता- "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा" असा प्रश्न विचारून खाली देशाच्या नकाशात महाराष्ट्राभोवती गोल करून- इथे असे त्याचे उत्तर होते.
आणखी जाहिराती आठवल्यास लिहितो.
12 Apr 2024 - 6:21 pm | अमरेंद्र बाहुबली
भक्तका चश्मा नावच्या एका जाहिरातिने सध्या धुमाकूळ घातलाय. जिज्ञासुनी यूट्यूब वर हुडकून पहावी.
12 Apr 2024 - 7:26 pm | माहितगार
हि जाहीरात म्हणताय का? जाहीरातीत कल्पकता आहे. पण मी जाहीरात बनवणारा असतो तर मोदी का चष्मा किंवा भाजपा का चष्मा असे शब्द प्रयोग वापरले असते. नकारात्मक जाहीराती कट्टर समर्थकांना आवडू शकतात. मार्केटींग तत्वाच्या दृष्टीने पहायचे झाल्यास काँग्रेसला भाजपाचे मतदार काही प्रमाणात तरी वळवावे लागणार तुमच्या भावी मतदाराच्या पुर्वीच्या स्वप्नांचा आणि आकांक्षांचा अपमान आणि नकळत होणारा भक्त या संकल्पनेचा अवमान प्रत्यक्षात किती मतदार स्विकारतील? भाजपा जाहीरातीतल्या नकारात्मकते बद्दल मी अशाच स्वरुपाचे निरीक्षणे वर नोंदवली आहेत.
12 Apr 2024 - 7:32 pm | माहितगार
ह्या समस्या आमच्याच काळातील आहेत का तुमच्या राजकीय काळापासून चालत आल्या आहेत असाही प्रतिवाद भाजपा कडून होऊ शकतो आणि जोडीला त्यांनी काय काय केले त्याच्या परतफेड जाहीराती येऊ शकतात. ट्या शिवाय लास्ट माईल डेलीव्हरी हि संकल्पना भाजपाने राबवलेली असल्याने मूळ संकल्पना चांगली असली तरी सहज प्रतिवाद करण्या जोगी आहे. सुशिक्षीतांच्या बेकारीच्या प्रश्नावर भर दिला असता तर अशाच संकल्पनेतील जाहीरात अधिक प्रभावी असली असती का.
12 Apr 2024 - 7:26 pm | रात्रीचे चांदणे
मेरे विकास का दो हिसाब, हि काँग्रेसची जाहिरात चागली वाटतेय.
एकाच टॅग लाईन मध्ये भरपूर प्रश्न मांडलेत.
12 Apr 2024 - 7:38 pm | माहितगार
मेरे विकास का दो हिसाब होय ही काँग्रेस जाहीरात प्रभावी आहे असे वाटते. मेरे विकास का दो हिसाब या सिरीज मध्ये त्यांच्या आणखी जाहीराती सुद्धा आहेत का? 'हाथ बदलेगा हालत' हि टॅगलाईन सुद्धा प्रभावी वाटते.
13 Apr 2024 - 2:35 pm | अहिरावण
लाख रुपयत शिवण मशीन
12 Apr 2024 - 7:45 pm | माहितगार
हि अग्निवीर योजने वरील सैनिकी रोजगार तात्पुरता असल्याबद्दल टिका आहे आणि बदल करण्याचे आश्वासन पण त्याच मॅनिफेस्टॉत इतर सुशिक्षीत बेकारांना केवळ एकाच वर्षाच्या इंटर्नशीपचे आश्वासन. राजकारणात तसे विरोधाभास असतातच. विरोधाभास न कळत ही तयार होत असतात. पण या वेळी काँग्रेसचा जाहीरात प्रयत्न एकंदरीत आता पर्यंततरी भाजपा पेक्षा अधिक प्रभावी वाटतो आहे.
12 Apr 2024 - 7:50 pm | चंद्रसूर्यकुमार
जाहिरात प्रभावी असली तरी जे प्रॉडक्ट विकायचे आहे ते beyond redemption गंडलेले आहे.
12 Apr 2024 - 8:25 pm | माहितगार
:)
12 Apr 2024 - 8:30 pm | अमरेंद्र बाहुबली
जाहिरात प्रभावी असली तरी जे प्रॉडक्ट विकायचे आहे ते beyond redemption गंडलेले आहे. सहमत. शशी थरूर वगैरे दिला असता तर भाजपच्या प्रोडक्टची “आधीच उल्हास त्या फाल्गुन मास” गत झाली असती.
12 Apr 2024 - 8:56 pm | रात्रीचे चांदणे
प्रोडक्ट गंडलेलच असल तरीही गेल्या वेळ्या पेक्षा काँग्रेसच्या जागा वाढतील अस वाटतय.
13 Apr 2024 - 5:27 pm | माहितगार
मला वाटते महाराष्ट्रात आघाडीच्या रुपाने (क्रेडीट शरद पवार), तसेच मध्य प्रदेश आणि राजस्थानात जराशा वाढतील. असा माझा व्यक्तिगत कयास आहे.
13 Apr 2024 - 2:32 pm | अमरेंद्र बाहुबली
13 Apr 2024 - 2:32 pm | अमरेंद्र बाहुबली
13 Apr 2024 - 2:35 pm | अहिरावण
१ नंबर
याला म्हणतात सृजनशीलता, कल्पकता
शिका तुम्ही यातून... बिनकामाच्या शिव्या देत फिरत असता नुसते !!
13 Apr 2024 - 5:29 pm | माहितगार
हम्म खरेच हे व्यंगचित्र मार्मिक आहे. व्यंगचित्रकार गौरव सर्जेरावांची आणखी काही रोचक व्यंगचित्रे असल्यास लिंक द्यावी.
23 Apr 2024 - 9:16 pm | माहितगार
* १) LS polls: BJP, Congress use strategic advertising to sway undecided voters - Business Standard
* २) Social media box office: Decoding digital ad spending in first phase of Lok Sabha polls - इंडिया टूडे
३) Analysis of campaign songs and newspaper ads of the BJP and Congress during Lok Sabha elections The Hindu-CSDS-Lokniti
नाव द हिंदू असले तरी हि चेन्नई मुख्यालय अस्लेली दाक्षिणात्य वृत्तसंस्था पक्की भाजपा विरोधक राहीलेली आहे तर CSDS-Lokniti डावीकडे कललेली मंडळी आहेत. माझ्या पहाण्यात आलेली भाजपा जाहीराती नकारात्मक वाटल्या पण CSDS चा अभ्यास व्यापक असेल त्यांचा निस्कर्ष अगदी विरुद्ध आहे.