गाभा:
आजच्या तोक्यो टाईंम्समधे एक इंटरेस्टींग बातमी वाचली.
पर्यायी वीजनिर्मीतीचा एक आगळा वेगळा प्रयोग तोक्योत चालला आहे. माणसांच्या चालण्यातून वीज बनवायचा! तोक्यो स्थानकावर ठरावीक सात तिकिट गेट्सवर जमिनीवर ही प्रेशर पॅड्स बसवली आहेत. त्यावरून अंदाजे ८०,००० लोक्स दिवसातून चालतात, व त्यातून मिळालेल्या विजेवर एक १०० वॉट्सचा दिवा ८० मिनिट्स चालतो. तसेच शिबुया मधल्या हाचिको चौकात देखिल अशी ४ पॅड्स लावली आहेत. तोक्यो स्थानकाचा दिवसातून १८ लाख लोक वापर करतात, तर शिबुया स्थानक २४ लाख लोक वापरतात. म्हणजे जर ह्या पॅड्सचे कव्हरेज वाढवले आणी जर ती जास्त एफिशियंट केली तर इंधनास एक पर्याय म्हणून भारतातल्या देखील मोठ्या शहरात त्याचा वापर करता येईल
आपले सि.एस्.टी किती लोक्स वापरत असतील बरे दिवसातून?
-- चंबा मुतनाळ
प्रतिक्रिया
21 Dec 2008 - 7:13 pm | सखाराम_गटणे™
चांगला प्रयोग आहे.
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
21 Dec 2008 - 7:21 pm | विकास
अशा प्रकारचे आधी एकदा ऐकले होते. हा प्रयोग नक्कीच चांगला आहे. उर्जेचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही तरी लोकांचे (चांगल्या अर्थी) लक्ष वेधण्यासाठी (पब्लि़क एज्युकेशन) .
बाकी आत्ता एक कल्पना स्फुरली: तमाम संगणक टंकण्याच्या प्रक्रीयेतून जर परत उर्जा निर्मिती (रीचार्ज) करता आली तर नुसती मिपामुळे किती उर्जा तयार होईल! ;)
21 Dec 2008 - 10:53 pm | पिवळा डांबिस
काय जपानी डोकं आहे!!!
यालाच म्हणतात,
लाथ मारीन तिथे वीज काढीन!!!
:)
22 Dec 2008 - 6:11 am | प्राजु
यलो नॉटी अंकल... यू सेड इट!
मस्त आहे ही कल्पना. खरंच भारतात अस्तित्वात आली तर... किती बरं होईल!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Dec 2008 - 6:50 am | चतुरंग
अशाप्रकारचे छोटे ऊर्जानिर्मिती प्रकल्प हे थेट डीसी (डायरेक्ट करंट) प्रकारची विद्युत निर्मिती करु शकत असल्याने विजेचे वहन वगैरे करण्याच्या भानगडीत न पडता स्थानिक स्वरुपात म्हणजे जिथे निर्मिती तिथेच वापर ह्या तत्त्वावर किफायतशीर ठरु शकेल असे वाटते.
ही आणखी काही प्रयोगांची माहिती.
जवळ जवळ १५ वर्षांपूर्वी मी माझ्या एका मामांसोबत अशा प्रकारच्या पर्यायी ऊर्जा समस्येवर विचार केलेला आठवतोय.
त्यात ट्रॅफिक सिग्नलला लागणारी ऊर्जा तिथे चौकातच उभ्या राहिलेल्या आणि जाणार्या वहानांचा वापर करुन निर्माण करता येऊ शकेल का अशी कल्पना विचारात होती.
चतुरंग
22 Dec 2008 - 10:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
जपानमधला प्रयोग चांगला वाटला, आणि चतुरंग, तुम्ही दिलेल्या लिंकवरचे प्रयोगही!
नेदरलंड्समधे सायकलींना डायनामोवाले दिवे लावतात, अंधारातही सायकल चालवताना रस्ता दिसावा आणि इतर चालकांना आपण दिसावे म्हणून. त्याचा वापर जिममधे, स्टॅटीक आणि चालणार्या सायकलींवरही करून बॅटरीज चार्ज करता येतील ना?
अर्थात ही ऊर्जा सध्याच्या, पारंपारीक ऊर्जेच्या तुलनेत खूपच कमी असेल पण थेंबे थेंबे तळे साचे!
22 Dec 2008 - 10:17 am | सहज
लेख व दुवे वाचायला मजा आली.
अजुन एक दुवा
22 Dec 2008 - 3:16 pm | दिपक
जपानमधला हा प्रयोग चांगला आहे. आपल्या मुंबईत दादर, छ.शि.ट. आणि चर्चगेट रेल्वे स्थानकावर हा प्रयोग करुन पाहायला हवा. :)
22 Dec 2008 - 4:52 pm | सोहम_व
आपल्याकदेहि असेच नवनवे प्रयोग व्हायला हवेत कारन पर्यायि ऊर्जा हा जागतिक प्रश्न आहे.
22 Dec 2008 - 5:04 pm | मैत्र
काही वर्षांपूर्वी ( साधारण आठ) आय आय टी पवइ मध्ये मेकॅनिकल च्या विद्यार्थ्यांनी
या प्रेशर पॅड सारखे मेकॅनिकल स्पीड ब्रेकर बनवण्याचा विचार मांडला होता आणि मला वाटतंय काही प्रारूपही बनवलं होतं.
कल्पना: टोल नाका किंवा जिथे थांबायलाच लागतं तिथले स्पीड ब्रेकर हे गाडी मुळे दबून खाली जातील त्या रेसिप्रोकेटिंग मोशन चं रुपांतर रोटरी मोशन मध्ये करुन त्यावर डायनॅमो चालवता येइल का अस विचार होता. पुढे काय झालं हे माहित नाही.
वरच्या उदाहरणावरून आठवण झाली. माणसांच्या चालण्याने उर्जा निर्माण होत असेल तर या पद्धतीने नक्कि होइल.
चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे सौर उर्जेसारखं तिथल्या तिथे जरी वापर झाला दिवे / पंखे इ. साठी तरी उत्तम..