बरेच दिवस झाले थिएटरात गेलो नव्हतो, काल अजय देवगणचा शैतान पाहून आलो. कथा, सादरीकरण, चित्रीकरण वगैरे ठीकठाक आहे; पैसे खर्च करून मुद्दाम जाऊन बघण्यासारखा काही नाही. OTT वर पाहिला तर ठीक आहे.
हिंदी सिनेमांतून सातत्याने केली जाणारी हिंदू धर्म, श्रद्धा, परंपरा, उपासनापद्धती यांची हेटाळणी हिंदूंना इतकी अंगवळणी पडली आहे कि आजकाल त्यात फारसे कुणाला काही वावगे वाटत नाही. इतर असंख्य हिंदी सिनेमांप्रमाणे हा सिनेमा देखील हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अपमान करतो.
चित्रपटात वनराज नावाचा खलनायक आणि कबीर व त्याचे कुटुंब अशी पात्रे आहेत. कबीरच्या तरुण मुलीला वनराज वशीकरणाद्वारे कह्यात घेतो. अघोरी शक्ती प्राप्त करण्यासाठी त्याला तिच्यासहित एकूण १०८ मुलींचा बळी द्यायचा असतो. कबीरला "तुझ्या मुलीला माझ्यासोबत पाठव" असे सांगताना तो "कन्यादान" असा शब्दप्रयोग अनेक वेळा करतो.
सन्मार्गाने केली जाणारी सात्विक ईश्वरोपासना, दुराचाराने केली जाणारी दुष्ट अघोरी शक्तींची उपासना आणि इतरही अनेक प्रकार हे विशाल हिंदू धर्म परंपरेचा भाग आहेत. त्यांतील अयोग्य भागाबद्धल चर्चा होऊ शकेल. तथापि प्रत्येकाची स्वतःची अशी एक चौकट आहे. ती morpf करून वेगळ्याच स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न करणे हे अयोग्य आहे.
१. १०८ हा अंक हिंदूंच्या सात्विक उपासना पद्धतीतील एक पवित्र अंक आहे. अघोरी उपासनेतही हा अंक वापरला जात नाही. "अघोरी शक्ती प्राप्त करण्यासाठी १०८ मुलींचा बळी" अशी मांडणी अगदीच अस्वीकारार्ह आहे.
२. कन्यादान हा हिंदू सामाजिक परंपरेतील एक महत्वपूर्ण, पवित्र आणि गंभीर भाग आहे. कन्याबळीशी त्याची तुलना करणे हे अगदीच अस्वीकारार्ह आहे.
प्रतिक्रिया
20 Mar 2024 - 5:56 pm | स्वरुपसुमित
खुप उशिर झाला .लगेच बोलायला पाहिजे होते
21 Mar 2024 - 10:12 am | Bhakti
हा सिनेमा एका गुजराती सिनेमाचा रिमेक आहे.युट्यूबवर त्या गुजराती सिनेमाची स्टोरी ऐकली.बापरे प्रचंड भयानक स्टोरी लाईन आहे. एका मुलीची आई असल्याने असे मुलींच्या अत्याचार पाहू शकत नाही,तेव्हा कधीच पाहणार नाही हा सिनेमा.
जाऊद्या सिनेमा डब्यात गेलाय, जास्त भाव देऊ नका.
21 Mar 2024 - 5:06 pm | nanaba
त्यामुळे चित्रपटाच्या वाट्याला जाणार नाही.
21 Mar 2024 - 5:20 pm | सोत्रि
चित्रपट काहीसा वेगळा कंटेंट द्यायचा प्रयत्न करतो पण प्रयत्न फसला आहे आणि सिनेमा टुकार झाला आहे. (कथानकात जबरदस्त पोटेंशिअल होतं).
कुठल्याही कलाकृतीला आपण ह्या परिप्रेक्षातून बघणं टाळायला हवं असं मा़झं वैयक्तिक मत आहे. कलाकाराचं सृजन काय असावं हे आपण कसं ठरवू शकतो?
विशाल हिंदू धर्म परंपरा आहे हे मान्य केलं तर त्याचा परिपूर्ण आणि अभ्यास आणि आकलन कोणीही केलेलं नाही. केवळ ऐकीव माहितीच्या आधारे श्रद्धास्थानं बनवली गेली आहेत, त्यामुळे येता-जाता त्यांना धक्का लागण्याइतकी ती तकलादू असतात.
प्रत्येकाची स्वतःची अशी एक चौकट आहे हे मान्य केलं तर वरचा आक्षेप निरर्थक ठरतो. माझ्या मते प्रत्येक कलाकाराला त्याचं त्याचं वैयक्तिक इंटरप्रिटेशन करण्याचा हक्क आहे आणि असावा.
- (सर्जनशील) सोकाजी
22 Mar 2024 - 4:42 pm | मनिष
लाईक ठोकायचे आहे ह्या प्रतिसादाला, काय करु?
लई दिवसांनी सोकाजी अण्णा?
- (आमि बी) सर्जनशील/सृजनशील
21 Mar 2024 - 7:11 pm | अहिरावण
असल्या चित्रपटांमुळे खरेच हिंदू संस्कृती/धर्म्/रिती यांना फरक पडतो ? मला नाही वाटत तसे.