परिवहन क्षेत्र: दहा वर्ष विकास की जुमला

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in राजकारण
14 Mar 2024 - 10:47 am

या सरकारचे दहा वर्ष पूर्ण झाले. दहा वर्षांत रस्ते,रेल्वे, विमान वाहतूक, जलमार्ग वाहतूक या क्षेत्रात खरंच प्रगती झाली आहे की फक्त जुमलेबाजी. मी स्वतः आकडे देत नाही. मिपाव करांनी वास्तविकता काय आहे यावर प्रकाश टाकावा.

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

14 Mar 2024 - 11:11 am | अहिरावण

परिवहन क्षेत्रात जुमला आहे किंवा नाही किंवा कसे यावर "जाणकार" मिपाकर प्रकाश टाकतील.

मात्र, या निमित्ताने चर्चेत राहून धागा चालवायचा, मात्र त्यासाठी पुरेशी मेहनत घ्यायची नाही, एका ओळीत चर्चा चालू करायची हा तुमचा जुमला आम्हास कळला आहे.

लब्बाड कुठले !!

चौथा कोनाडा's picture

14 Mar 2024 - 11:58 am | चौथा कोनाडा

जो पर्यंत आमच्या गावातील पीएमपी, बीआरटी, रेल्वे जाळे, एस.टी बस आणि स्थानके सुधारत नाहीत तो पर्यंत जुमलाच ! मग किती का देशपातळीवर रस्ते,रेल्वे, विमान वाहतूक, जलमार्ग वाहतूक, उड्डाणपुल, भुयारे, जमीनीसमुद्रा खालचे मार्ग इ तयार होईनात !

आणी आमच्या गावाची लोकसंख्या ५२३ !!!!

चौथा कोनाडा's picture

14 Mar 2024 - 2:16 pm | चौथा कोनाडा

आणी आमच्या गावाची लोकसंख्या ५२३ !!!!

पुनवडी ग्राम इ.स. १३६९ का ?
हा ... हा ... हा ....

आमचं पुणं शहर म्हंतोय आमी इ.स. २०२४ मधलं ... श्मार्ट शिट्टी .... लोकसंख्या अंदाजे ८० लाख आजमितीस....

मिपाकरांना सर्व आकडे तोंडपाठ असतात पण देत नाहीत.

परिवहन क्षेत्रात उत्तम प्रगती झाली आहे. मी पहिले साकीनाका (मुंबई) येथे २५ वर्षे राहत होतो तिथे १०-१२ वर्ष मेट्रोचे काम चालु असल्यामुळे कंटाळून ठाण्याला आलो. तिथे कसेबसे ५-७ वर्ष काढले तर इथेही मेट्रोचे काम चालू झाले. रस्त्यावर कुठेही गेले तरी काहीतरी खोदकाम चालू असते. आपल्या उज्ज्वल उद्यासाठी आज त्रास सहन करा अशी घोषवाक्ये जागोजागी लिहिलेली असतात.माझा काल आणि आज तर कुर्बान झालाच आहे कदाचित भविष्य देखील पुढील जन्म सुखात जाईल या आशेवर निघून जाईल.
बाकी कशामुळे नाहि तरी रहदारीच्या त्रासाने माझ्यापुरता कर्मविपाक सिद्धांत सिद्ध झालेला आहे. मी मागील जन्मी काहीतरी पाप केले असणार म्हणूनच मी जिथे जिथे जातो तिथे रहदारीत अडकतो.

अहिरावण's picture

15 Mar 2024 - 7:40 pm | अहिरावण

घराची शांती करा.

मदनबाण's picture

17 Mar 2024 - 10:50 am | मदनबाण

परिवहन क्षेत्रात अजुन अमुलाग्र बदल होण्याची गरज आहे. यात वैयक्तिक वाहने कमी होऊन त्या जागी सार्वजनिक परिवहनाचा वापर वाढवला गेला पाहिजे असे मला वैयक्तिक दृष्ट्या वाटते. रिक्षा,टॅक्सी इं पर्याय वापरले जातात कारण त्या ठिकाणची सार्वजनिक परिवहन व्यवस्था कमी पडत असते ! याचा परिणाम स्वरुप प्रदुषणात फार मोठ्या प्रमाणात वाढ होणे हे अनुभवास येते. देशातील मेट्रो शहरे आता लोकसंंख्या वाढीने आणि कुठल्याही आराखड्याचा वापर न करता बांधकाम केल्याने विकृत रुप धारण करुन उभी राहिली आहेत. शहरे आता फक्त गॅस चेंबर्स झाली आहेत !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dharala Prabhu - Title Track Video | Harish Kalyan | Anirudh Ravichander | Tanya Hope

चौथा कोनाडा's picture

18 Mar 2024 - 3:25 pm | चौथा कोनाडा

१०१% असहमत !

परिवहन क्षेत्रात अजुन अमुलाग्र बदल होण्याची गरज आहे.

चाललंय ते चांगलं चाललंय ! विकास प्रगती पथावर आहे !

यात वैयक्तिक वाहने कमी होऊन त्या जागी सार्वजनिक परिवहनाचा वापर वाढवला गेला पाहिजे

वाहन कंपन्यांसाठी धोकादायक ... औद्योगिक विकास रोखणारा

रिक्षा,टॅक्सी इं पर्याय वापरले जातात कारण त्या ठिकाणची सार्वजनिक परिवहन व्यवस्था कमी पडत असते !

रिक्क्षावाले, टॅक्सीवाले आणि तत्सम व्यावसायिक यांच्या पोटावर पाय आणणारा.. त्यांचा रोजगार हिसकावून घेऊन त्यांना जगण्याचं नाकारणारा

याचा परिणाम स्वरुप प्रदुषणात फार मोठ्या प्रमाणात वाढ होणे

कुठल्याही प्रकारचा सेक्टर आणि त्याचा विकास म्हटलं की प्रदुषण वाढणारच, त्याची फार चिंता करू नये.. हळहळ व्यक्त करून पुढं वाटचाल करावी.

देशातील मेट्रो शहरे आता लोकसंंख्या वाढीने आणि कुठल्याही आराखड्याचा वापर न करता बांधकाम केल्याने विकृत रुप धारण करुन उभी राहिली आहेत

. विकृत रुप हे ही एक रूप आहे असे समजून त्यात आनंद मानावा ! कालाय तस्मै नमः किंवा तत्सम मन्त्र पुटपुटत रहावेत.. चांगला गूण येतो, कालांतराए आनंद वाटू लागतो.

शहरे आता फक्त गॅस चेंबर्स झाली आहेत !

गॅस चेंबर्सच्या त्रासाविरुद्ध आपली प्रतिकारशक्ति वाढवणं ही काळाची गरज हे ओळखून घ्यावे !

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Mar 2024 - 12:31 pm | अमरेंद्र बाहुबली

जो पर्यंत सरकारी नोकर भारत सरकारचा पगार घेऊन जूमलेबाज पक्षाची चाटूगीरी सोडनार नाहीत तो पर्यंत ह्या सुधारणा होणार नाहीत.

मुक्त विहारि's picture

17 Mar 2024 - 6:41 pm | मुक्त विहारि

स्थानिक पातळीवर, बोंबाबोंबच आहे...

डोंबिवलीत, मिनी बसेस आणि त्या पण १०-१२ 'ओ - रूट वार चालवल्या तर, किमान ७०% रिक्षा कमी होतील.

तीच गत, फेरीवाल्यांची.... त्यांना कितीही तंबी द्या किंवा हाकला, परत येतातच.

तीच गत, डोंबिवली लोकल बाबतीत... एकतर, डोंबिवली येथून फक्त स्लो लोकलच सुटतात आणि त्या पण ऐन गर्दीच्या वेळी , दिव्या पासून भरून येतात.

तीच गत संध्याकाळी होते.

ऐन गर्दीच्या वेळी, ठाणे ते डोंबिवली हा प्रवास जीवघेणा आहे.

जाउ द्या...

जे जे जागतिक केंद्र असलेल्या डोंबिवली येथे होते ते ते सर्वत्र...

या दहा वर्षांत कार्य झालेले आहे हे सरळ दिसून येते. राष्ट्रीय महामार्गांचं बांधकाम आणि दुरुस्ती मोठ्या प्रमाणावर झाली आहे.
सर्वात मोठे कार्य सीमेलगतच्या रस्त्यांचे झाले आहे. त्यामुळे सैनिक कुमक आणि हालचाली वेगाने होणे शक्य झाले आहे दिसते आहे.

रेल्वे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण झालं आहे. अनेक नवीन रेल्वेगाड्या आणि मार्ग सुरू झाले आहेत. रेल्वेगाड्यांचा वेळ आणि सुरक्षितता सुधारण्यावर लक्ष द्यायला हवे. पण रस्ते आणि रेल्वे यांच्या देखभालीसाठी अधिक निधी द्यायला हवा.

हवाईक्रांती तर नक्कीच झाली. विमानतळांचं विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण झालं आहे. अनेक नवीन विमान कंपन्या आणि मार्ग सुरू झाले आहेत. जलमार्ग वाहतूक क्षेत्रातही काही प्रगती झाली आहे. विमान प्रवासाची तिकिटं स्वस्त करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अनेक नवीन नद्यांमध्ये जलमार्ग वाहतूक सुरू झाली आहे. मात्र त्यात हवा तसा वेग दिसून येत नाही. जलमार्ग वाहतूक क्षेत्रात अजूनही खूप विकासाची आवश्यकता आहे. जलमार्ग वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व्हायला हवी.

तरीही, काही आव्हानेही आहेत. अनेक रस्ते अजूनही चांगल्या स्थितीत नाहीत. रेल्वेगाड्यांचा वेळ आणि सुरक्षितता अजूनही चिंतेचा विषय आहे.
तरीही या सरकारच्या दहा वर्षांत रस्ते,रेल्वे, विमान वाहतूक, जलमार्ग वाहतूक या क्षेत्रात निश्चितच प्रगती झाली आहे.
या क्षेत्रातील प्रगतीसाठी सरकार, नागरिक आणि उद्योग यांच्यातील समन्वय आवश्यक आहे.
मोदी सरकारणे धोरण आखून गडकरी यांनी कार्य घडवून आणले आहे हे निश्चित.