धमर्राज मुटके ह्यांचा मिपा वरचा लेख बघतील
मला स्वतःला शिक्षक लोकांचा चांगला अनुभव नाही ,पण माझे विचार पूर्व ग्रह दूषित नाहीत
माझ्या स्वतःच्या शाळेत मध्ये किराणा दुकान दार ज्याचा मुलगा सकाळी नापास होतोय दुपार पर्यन्त पास होतो
शिक्षक फक्त रुबाब करायला येत असतात
सध्या शाळेत ची भंग अवस्था झालेली आहे कोणालाच काही पडलेली नाही
जुने मॅनॅजमेण्ट स्ट्रिक्ट होते ,स्टॅफ रूम मधून गाद्या हटवाल्या ,वर्गात खुर्च्या लावून दिल्या नव्हत्या
आता शिक्षक सरळ झोपा काढतात
३० लाख भरून शिक्षक होता येते आख्या गावाला माहीत आहे '
पॉलिस किंवा इतर खाते निदान जीवाचा धोका पत्करते ,१४-१८ तास काम करते ,आमच्या शाळेत १२ ते ६ फक्त शिक्षक येतात
ज्ञान दान तर काहीच नाही
अहमदनगर मधील एक तालुका ,गेल्या ५ वर्षात आख्या तालुक्यातून कोणे iit किंवा neet झालेला नाही
आमच्या वेळी लोक पुण्यात जाऊन iit करायचे
मी स्वतः मेरिट लिस्ट मध्ये आलो तेव्हा फोटो पण छापला नव्हता माझा शाळेने
आता खरी मेख
उत्तर प्रदेश मध्ये अनामिक शुक्ला प्रकरण गाजले होते ,एकाच शिक्षक २५ शाळे मध्ये आरामात एक कोटी चा घोटाळा
आता महाराष्ट्र सरकाने म्हणून शिक्षकांचे फोटो लावा म्हणून आदेश दिला कारण बरेच शिक्षक वर्गात हजर राहत नाहीत ,तोतया शिक्षक पाठवतात
२०० च्या वर शिक्षकांत असे आहे ज्यांनी अपंगत्वा नाही तर नकली घटस्फोट केला आहे https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/teacher-transfers-informati...
शासनाचा आदेश धुडकावला आहे https://www.loksatta.com/nagpur/in-wardha-teachers-did-not-follow-govern...
स्वतःचा फोटो लावण्यात कमीपण वाटतो
कंत्राटी शिक्षक निदान मुजोर पण करणार नाही एवढा
प्रतिक्रिया
23 Dec 2023 - 11:08 pm | कंजूस
पैसा बोलतो. मला यांतून काय मिळणार ही वृत्ती बळावली आहे. कॉपी का कर(व)तात? तर शाळेचा निकाल चांगला दिसतो. धनदाणग्यांच्या मुलांना शिक्षण घेऊन नोकऱ्या करायच्या नसतात. त्यांच्याबरोबर इतरांची फरफट होते.
24 Dec 2023 - 10:04 am | सर टोबी
वय परत्वे दररोज काहीतरी बिघडलंय असं सतत वाटत असतं आज काल.