लंडनमधील संग्रहालये (भाग १) - कुठे रहावे ?

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in भटकंती
20 Dec 2023 - 7:27 pm

नमस्कार मित्रहो, 'लंडनमधील संग्रहालये' असे शीर्षक जरी इथे दिलेले असले, तरी मला अजून लंडनला जायचे आहे. येत्या मार्च मधे आठ-दहा दिवस तिथे राहून बघितलेल्या संग्रहालयांबद्दल लिहावे, अशी इच्छा आहे. लंडनला प्रथमच जाणार असल्याने तिथली काहीच माहिती नाही. airbnb खोली घेऊन उभयतांनी मुक्काम करावा, असा बेत आहे. दररोज मेट्रो /बसचा प्रवास कमित कमी व्हावा, या दृष्टीने हुडकत असता कोणत्या भागातील घरे शोधावीत असा प्रश्न पडला आहे. यावर जाणकार मिपाकरांनी मार्गदर्शन केल्यास खूप मदत होईल.
मला मुख्यतः कलासंग्रहालयेच बघायची आहेत. बाकी 'टूरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन्स' म्हणतात, त्यात फारशी रूची नाही.
-- (अगदी चार ओळींचा धागा काढत असल्याबद्दल क्षमस्व. परंतु पुढील भाग व्यवस्थित होण्यासाठी मुळात ही माहिती मिळणे गरजेचे आहे. खोलीचे आणि विमानाचे बुकिंग झाल्यावरच व्हिसा साठी अर्ज करता येईल, त्यामुळे सगळे लवकर करावे लागणार आहे)

प्रतिक्रिया

कंजूस's picture

20 Dec 2023 - 9:13 pm | कंजूस

वा.

ब्रिटिशांनी (आणि जर्मन, फ्रेंचांनी) इजिप्तमध्ये गुहा शोधून काही वस्तू त्यांच्या देशात नेल्या आणि कला संग्रहालयात ठेवल्या. (नंतर इजिप्तमधून वस्तू बाहेर नेण्यात बंदी आली.) तर ती संग्रहालये "egyptian museum in uk" मध्ये सापडतील.

खेडूत's picture

20 Dec 2023 - 9:29 pm | खेडूत

राम राम काका!
भारतातून जाताय की फ्रान्समधे आधीच आहात?
लंडनमधले मिपाकर अजून माहिती सांगतीलच. पण अंडरग्राऊंड (मेट्रो) झोन सहा किंवा थोडेसे बाहेर, स्वस्त पडेल. हौंस्लो, वेंबली भागात एखादा महिना राहायचे तर एजंटकडून किंवा गमट्री वर सर्व्हिस अपार्टमेंट मिळू शकेल. मेट्रो आणि बस सेवा उत्तम आहे! तिकडे बाहेर बरी हॉटेल्स दिवसाला साठ पौंडात मिळावीत.

जाता जाता हे म्युझियम पण पहा!

लंडन जवळचे तुलनेने स्वस्त भाग

होन्स्लो - पश्चिम लंडन - अन्डरग्राऊंड ची सोय आहे. थेट साउथ केन्सिन्ग्ट्न स्टेशन ला जाणारी पिकॅडिली लाईन पकडायची, जवळपास सगळी म्युझिअम्स ह्या स्टेशन ला लागून च आहेत
फेल्टहॅम - बस पकडून होन्स्लो ला जावू शकता (१२ ते १५ मि). शिवाय तुम्ही जर लंडन हिथ्रो एअर पोर्ट वरून ये-जा करणार असाल , तर फेल्टहॅम अगदी हाकेच्या अंतरावर च म्हणा
बार्किन्ग अँड डॅगेनहॅम - पूर्व लंडन, अन्डरग्राऊंड च्या बर्‍याच लाईन्स अगदी ३० मि मधे मध्यवर्ती लंडन ला घेवून जातात, बहुतेक झोन ४ मधे असल्यामुळे तिकीट पण जास्त महाग पडणार नाही
क्रॉयडन - दक्षिण लंडन. सध्या वाढत्या गुन्हेगारीमुळे पुन्हा बदनाम झाले आहे. अंडरग्राऊंड ची सोय नाही, पण नॅशनल रेल चे प्रमुख जन्क्षन आहे. अगदी ५-५ मि ला लंडन ब्रिज आणि लंडन विक्टोरिया ला ट्रेन्स असतात आणि फक्त १५ ते १८ मि मध्ये मध्यवर्ती लंडन. शिवाय गॅटविक एअर पोर्ट वरून ये-जा करणार असाल तर सगळ्यात सोईस्कर
गेला बाजार हॅरो आनि वेम्ब्ली पण चांगले पर्याय आहेत. ट्रॅवल फॉर लंडन चे डे ट्रॅवल कार्ड जे लंडन ट्रॅवल झोन्स मध्ये एका दिवसात अमर्यादित फिरण्याची मुभा देते ते घ्या. सध्याची किंमत आहे माणशी१५.२० पाऊंड्स. फॅमिली कार्ड चा पण पर्याय आहे, पण मी कधी ट्राय नाही केला.

माझे (फिरण्यासाठी) आवडते शहर. इमारतींमध्ये जुन्या फोर्टमधील मुंबईचा भास होत असल्यानं शहर परके वाटत नाही. तेथील मराठी मित्राशी ओळख करून देतो.

एका ट्रीपला आम्ही व्हिक्टोरिया स्टेशनच्या जवळच अत्यंत छोटे capsule hotel होते तिथे राहिलो होतो. खोली म्हणजे एक बेड फक्त आणि बाजूला एक फूटभर gap आणि बाथरूम. पण महत्वाचे म्हणजे स्वस्त, आणि जागा मोक्याची. बाहेर पडले की ट्युबने अथवा लाल बसने कुठेही जाता येते. (अवांतर: Victoria मधून सुटणाऱ्या आणि strand इत्यादी भागातून जाणाऱ्या बसच्या वरच्या मजल्यावरील सर्वात पुढची सीट मिळवा, अप्रतिम इमारती दिसतात)

V&A, ब्रिटिश म्युसियम, टेट आणि रॉयल एशियाटिक तुम्ही पहालच. पण एकदा Westminster Palace म्हणजे पार्लमेंटची अप्रतिम tour केली होती. तसेच Windsor castle आणि टॉवर ऑफ लंडन पहा. बकिंगहॅम राजवाड्यात आत जाता येते, ते आधी बुक करून ठेवा. Kensington Palace इत्यादी राजवाडेसुध्दा आतून बघता येतात.

बाकी आठवेल ते नंतर सांगतो.

मनो's picture

21 Dec 2023 - 1:16 pm | मनो

हे ते हॉटेल

https://maps.app.goo.gl/e1QcSBSJWvxf3bjj8

नवरा- बायको दोघेही सडे (कमी सामान) आणि पुर्ण दिवस बाहेर भटकत असल्याने आमची गैरसोय झाली नाही, तुम्हाला चालणार असेल तर या प्रकारची सोय (चिंचोळी/बारीक खोली, कमी रेट) मध्यवर्ती शहरात बऱ्याच जागी आहे.

चित्रगुप्त's picture

21 Dec 2023 - 8:29 pm | चित्रगुप्त

तुम्ही दिलेले हॉटेल चांगल्या जागी आहे. साधारण त्याच भागात आणि किंमतीत airbnb बघतो आहे, म्हणजे घरचा चहा, खिचडी, उपमा, थालीपीठ वगैरे बनवता येईल (सगळे सामान बरोबर घेऊन जाऊ). बायको बरोबर असल्याने आणि दोघांना बाहेरचे जेवण आवडत नसल्याने ते सोयीचे होईल.
Guilderhall Art Gallery हे एक आणखी संग्रहालय कळले. तुम्ही सुचवलेले बघूच. खरेतर लंडनला आठ दिवसही पुरेसे नाहीत असे दिसते. फार वर्षांपासून 'The Hay wain' (John Constable) हे चित्र बघण्याची फार इच्छा आहे.

.

चित्रगुप्त's picture

21 Dec 2023 - 8:33 pm | चित्रगुप्त

@कंजूस, खेडूत, चावटमेला : प्रतिसादातून दिलेल्या अनमोल सूचनांबद्दल अनेक आभार. शक्यतो रोजचा ट्यूब-बस प्रवास टाळण्याच्या दृष्टीने जागा हुडकतो आहे. नातेवाईक आहेत पण ते बरेच लांब रहातात.

लंडन ला बेकर स्ट्रीट स्टेशनवर पहान्यासारखे बरेच काही आहे.
इथ
१) मादाम तुसौ म्युझीयम.
२) २२१ बी बेकर स्ट्रीट येथे शेरलॉक होम्स चे घर पहाण्यासारखे आहे.
३) ट्रॅफल्गार स्क्वेअर येथे गेलात तर पहान्यासारखे बरेच काही आहे. चालत फिरण्याची मजाही घेता येईल
४) ट्रॅफल्गार स्क्वेअर मधे रिगले बिलीव्ह इट ऑर नॉट हे म्युझीयम आहे. त्याचा आनंद जरूर घ्या.
५) ग्राहमे पार्क वे इथे रॉयल एअर फोर्स म्युझीयम आहे. हे वेळ काढून जरूर पहा .
६) वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ मधे हॅरी पॉटर टूर आहे ( याला बुकिंग करावे लागते)
७) बाथ सिटी
८) ग्रीनीच (हो तेच ते ग्रीनीच मीन टाईम वाले)
बाकी तिथे एखाद्या स्थानीक पब मधे जाउन या. मजा येईल. वातावरण छान असते.
खाण्याच्या बाबतीत लंडन ची स्पेश्यालिटी म्हणजे "फिश न चिप्स"
भारतीय डिशेस खायच्या असईल तर हन्स्लो मधे श्रीक्रूष्ण चा वडा पाव मिसळ , दोसा मिळते. वेम्बली मधे गुजराती आणि साउथ हॉल ला पंजाबी फूड मिळते ( आपण लोक इथे भारतात पास्ता , पिझ्झा चायनीज खायला मरतो आणि बाहेर गेल्यावर भारतीय खाणे शोधतो )

चित्रगुप्त's picture

18 Jan 2024 - 8:15 pm | चित्रगुप्त

@ विजूभाऊ, माहितीबद्दल अनेक आभार.
लंडनमधील सगळी संग्रहालये बघायची आहेत. विशेषतः टेट ब्रिटन, ब्रिटिश म्यूझियम, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट, नॅशनल गॅलरी वगैरे. बकिंगहॅम पॅलेस पायी अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, तोही बघता येईल.
घरी (airbnb) आल्याचा चहा, खिचडी, उपमा, स्मूदी वगैरे करता येईल. अधून मधून जवळच असलेल्या 'पिमलिको तंदूरी इंडियन' मधे जाता येईल.
चित्रकलेचे एक वर्कशॉप पण बहुतेक करायचे आहे.
जायला अजून सुमारे दोन महिने असल्याने व्यवस्थित अभ्यास करून जायचा प्रयत्न करणार आहे. ब्रिटिश इतिहासाबद्दलचे विडियो सुचवा.

वेळ असेल तर हिस्टरी ऑफ ब्रिटन - BBC masterpiece
https://watchdocumentaries.com/a-history-of-britain/

चौथा कोनाडा's picture

19 Jan 2024 - 6:04 pm | चौथा कोनाडा

रोचक धागा आणि माहितीपुर्ण प्रतिसाद !
हार्दिक शुभेच्छा !

चित्रगुप्त's picture

20 Jan 2024 - 8:22 pm | चित्रगुप्त

खालील चित्र सर्वांना दिसते आहे का ? (आगामी लेखासाठी माहीत करून घ्यायचे आहे) कृपया कळवा.
.

चौथा कोनाडा's picture

20 Jan 2024 - 11:00 pm | चौथा कोनाडा

हो... दिसत आहे..
.. म्हणजे मला तरी दिसत आहे :)

कर्नलतपस्वी's picture

21 Jan 2024 - 7:11 am | कर्नलतपस्वी

+1