पुरंदरची लढाई भाग १ आ - ईबुक १२५

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
15 Dec 2023 - 1:05 am
गाभा: 

पुरंदरची लढाई भाग १ आ - ईबुक १२५

पुरंदरला वेढा टाकून २ महिने झाले तरी तो चिवटपणे झुंज देत राहिला. दमदमे बांधकाम मजूर, खंदकात कामे करणारे, सामान वाहतूकीची जनावरे यांच्यावर अचानक गडावरून रात्री-अपरात्री धावून येऊन छापेमारीत अतोनात नुसान होत होते. वेळ वाया जात होता. मोहिमेचा वाढलेला खर्च, जून महिन्यानंतर पावसात, चिखलात आजूबाजूचे किल्ले जिंकणे अशक्य असल्याने सिवाच्या वाटाघाटीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आपली शान वाढेल असा सल्ला मिर्झा राजेंना पटला.

२६

२७

२८

२९

३०

३१

३२A

३३A

३४A

३५

३७

३८a

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

४६

४७

४८

अशारितीने पुरंदर किल्ला लढवला गेला. मुरारबाजी आणि त्यांचे धाकटेबंधू जे वज्रगडाचे किल्लेदार होते, धारातिर्थी पडले. शिवाजी महाराजांनी युद्ध न करता सामोपचाराने स्वराज्यावरील मुगलसेनेच्या वावटळीचा रोख बदलून ती विजापुरकरांच्यावर जावी आणि आपले जितके गड वाचवता येतील तेवढे पदरात पाडून घ्यायला वाटाघाटींचा मार्ग स्वीकारला.
पुरंदरच्या पायथ्यापाशी भव्य शामियान्यात वाटाघाटींच्या किचकट कलमांसाठी दोन्ही बाजूचे मसलतकार, वकील, दुभाषे यांच्यात चर्चांचे फेरे सुरू झाले. एका बाजूला शिवाजी महाराजांशी कानगोष्टी करताना डबीर लोक येरझाऱ्या घालत होते. तर मिर्झाराजे आपल्या सल्लागारांना औरंगजेबाने या कामगिरीवर जाताना दिलेल्या लेखी आदेशानुसार कलमांचे लिखित मसूदे तयार करत होते. खाडाखोड करत वाक्यरचना बदलून मिर्झा राजेंच्या मानेचा होकार समजून घेत होते.
पुरंदरगडावर अडकलेल्यांना, जखमींना सोडवणे यासाठी महाराजांनी आपले वरिष्ठ सरदार गडावर पाठवून त्यांना धीर दिला. या साठी मिर्झाराजेंनी खास परवानगी दिली. यामुळे दिलेरखानाला राग आला.नं तर तो सलोख्यात कसा बदलला ते पुढील भागात...

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

15 Dec 2023 - 11:45 am | मुक्त विहारि

धन्यवाद

धन्यवाद मुक्त विहिरी जी.
वरील ई-बुक १२५ वर आधारित दोन भागात धागा सादर करून काही दिवस उलटून गेले. १५० टिचक्या पडल्या. त्या आधी च्या भागाला ३५० पडल्याचे दिसत होते.
ईबुक १२६ 'शामियान्यातील वाटाघाटी व धूर्त तह' वरील आधारित धागा २५०० टिचक्या पार करून गेलाय.
यावरून वाटते की प्रत्येक धागा आपले भाग्य घेऊन येतो. कदाचित या विषयावर आधीच्या माहितीमुळे नाविन्य घटले असावे. शिवाय नकाशातील माहिती, तपशील शोधून वाचायला वाचकांना रस कमी असावा. असो. दमदमे कसे असतात, तटापर्यंत पोहोचायला करावे लागणारे बोगदे वगैरे बाबी या मोहिमेत प्रकर्षाने दर्शविल्याने त्यावर विचार अपेक्षित होते. असो.
जितक्या टिचक्या पडल्या की तितके मिपाकर वाचकांनी ते वाचले असे मानावे? की पुन्हा पुन्हा टिचक्या मारणारे काही सदस्यांमुळे ती संख्या कमी असावी. यावर कुणी शोध कार्य केले आहे का? त्यातील निष्कर्ष काय असावे?

छान माहिती आहे, तुमच्या मेहनतीला सलाम.