गीतकार

केदार पाटणकर's picture
केदार पाटणकर in काथ्याकूट
15 Sep 2023 - 1:02 pm
गाभा: 

हिंदी चित्रपटात आजवर अनेकानेक गीतकार येऊन गेले. शैलेंद्रपासून समीरपर्यंत. प्रत्येक गीतकाराचे कोणते ना कोणते गाणे मला आवडलेले आहे. त्यातल्या त्यात मला इंदिवर व आनंद बक्षी अधिक भावले.
तुम्हाला भावलेले गीतकार कोणते ?

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

15 Sep 2023 - 1:33 pm | अहिरावण

>>>तुम्हाला भावलेले गीतकार कोणते ?

कानडाऊ योगेश

केदार पाटणकर's picture

15 Sep 2023 - 1:58 pm | केदार पाटणकर

अच्छा. ते तर प्रतिभासंपन्न आहेत. नुकतीच त्यांची ए सर्टिफिकेट असलेली कविता वाचली. आमची दुपारही चांगली गेली.

गड्डा झब्बू's picture

15 Sep 2023 - 2:13 pm | गड्डा झब्बू

तुम्हाला म्हणे मिपा नाव बदलायचं आहे?
जिलबी सम्राट आयडी घ्या! मस्त शोभुन दिसेल :-)

रंगीला रतन's picture

15 Sep 2023 - 10:36 pm | रंगीला रतन

लोल...चारोळीघाल्या आयडी पण शोभेल :=)

केदार पाटणकर's picture

15 Sep 2023 - 2:44 pm | केदार पाटणकर

मस्त. एकेक प्रश्नाच्या माझ्या माझ्या जिलब्या व तुमचे गड्डे. बाय दे वे, झब्बू खेळ आवडता दिसतोय.

सर टोबी's picture

15 Sep 2023 - 5:51 pm | सर टोबी

प्रभावीत होणं कमी झालं कि शब्द हळूच तुमचा ठाव घ्यायला लागतात. आणि अशी शब्दांची जादू प्रत्येक गीतकाराने केलेली आहे. त्यामुळे अमुक एकच गीतकार सांगणं हे इतर गीतकारांवर अन्याय करणारं वाटतं. एकदा एका मित्राला अमर चित्रपटातील गाण्याचे शब्द ऐकवले: न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहाँ जातें; अगर दुनियां चमन होती तो वीराने कहाँ जातें. तो थोडा वेळ दिङ्मुढ झाल्यासारखा गप्प झाला आणि नंतर जणू काही ते माझेच शब्द आहेत अशा अविर्भावात मला घट्ट मिठी मारली.

अगदी चालू गाणी लिहणाऱ्या आनंद बक्षींनी देखील “ कैसा है, कौन है, वो जाने कहाँ है जिसके लिए मेरे होंठों पे हाँ है” अशा दाद मिळवून जाणाऱ्या ओळी लिहल्या आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Sep 2023 - 9:13 pm | अमरेंद्र बाहुबली

पुढील धाग्यासाठी तुम्हाला मदत करतो.
मला नानखटाई आवडते, तुम्हाला काय आवडतं?
मला झोपायला चटई आवडते, तुम्हाला आवडते का?
मला हत्ती हा प्राणी आवडतो. तुम्हाला कुठला प्राणी आवडतो?
हे झाले की व्यनि करा.

कर्नलतपस्वी's picture

16 Sep 2023 - 6:55 am | कर्नलतपस्वी

मस्त आडीयल क्लपनेचा विलास आहे.

मल एक गाणं आठवलं
धागा धागा अखंड विणूया
ऐकोळी ,चारोळी द्वारे
मिपाकरांना छळूया

आवडते मज नानकटाई
झोपण्यास मज हवी चटाई
काय आवडतं तुला.....
काय कराच मला,
खड्डय़ात......

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Sep 2023 - 9:37 am | अमरेंद्र बाहुबली

खिक्क.

कर्नलतपस्वी हे माझे आवडते कवी.

गीतकार हे सिच्यूएशन वर आधारीत गीते लिहीतात. त्यामुळे अमूक एक प्रतिभासम्पन्न आणि तमूक एक वाईट असे शेरे मारता येणार नाहीत.
आनंद बक्षी नी "डिस्को ८२" लिहिले आणि त्यानीच अच्छा तो हम चलते है लिहीले आणि त्यानीच कुछ तो लोग कहेंगे हे गाणेही लिहीले

अमर विश्वास's picture

16 Sep 2023 - 9:53 pm | अमर विश्वास

साहिर लुधियानवी ....
प्यासा, हमराज, गुमराह, हम दोनो, कभी कभी, ताजमहाल ..... अक्षरशः शेकडो गाणी आहेत ...

अनिता's picture

16 Sep 2023 - 10:45 pm | अनिता

मोकालाया नंतर दुसरा कोणीही गीतकार माझा आवडता नाही

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Sep 2023 - 10:40 am | अमरेंद्र बाहुबली

खिक्क.

गदिमा, साहिर लुधियानवी, शैलेन्द्र, मजरूह सुल्तानपुरी, शकील बदायुनी, नीरज, दिनकर, गुलजार, अंजान (काही खास गाणी), आनंद बक्षी.. ही काही नावे.
अक्षरशः अनेक आहेत.
एकोळी,दोनोळी धाग्यापेक्षा आपल्याला काही गीतं आवडली असतील तर त्यावर एखादा लेख लिहावा अशी विनंती.

अहिरावण's picture

18 Sep 2023 - 6:59 pm | अहिरावण

भलत्या अपेक्षा !

धर्मराजमुटके's picture

22 Sep 2023 - 8:26 pm | धर्मराजमुटके

ते "वैद्य पाटणकर आम्लपित्तनाशक काढा" जाहिरातीचे गीतकार होते तेच मला सगळ्यात जास्त भावलेले गीतकार होते.
अति अवांतर : वैद्य पाटणकर तुमचे कोण :) ?