गाभा:
पूर्वी एखाद्याला दुसरा एखादा माणूस स्वखुशीने भेट देत असे व घेणारा मिळेल ती भेट, कमी किंमतीची असली तरी, समाधानाने घेत असे. एखाद्या क्षेत्रातील यशामुळे अशी भेट दिली जात असे.
कालांतराने भाऊबीज, दिवाळी पाडवा, वाढदिवस अशा प्रसंगानुरुप प्रत्यक्षात अनुभवास आले की, देणारा घेणाऱ्यालाच विचारतो," तूला काय पाहिजे माझ्याकडून ?" मागणाराही सांगतो, ""मला अमुक दिवशी अमुक पाहिजे." देणारा देतो. अशी दृष्ये चित्रपटातही पाहिली.
आजकाल, खरे तर, कधीपासून कोण जाणे, भेटीतील निखळ संतोष गायब होऊन त्यात डिमांड आणि सप्लाय आलेले आहे की काय, असे वाटते. मागणाराच मोठा होऊन देणारा बिच्चारा झालेला आहे.
प्रतिक्रिया
8 Sep 2023 - 5:06 pm | कर्नलतपस्वी
सहमत. आय हेट धिस.
मला देऊ नका मी देणार नाही.
नात्यांचा गोडवा संपला की उरते ती फरपट...
रक्तबंबाळ वेताळ होऊन फांदीवर लटकतो
विक्रमाची फडफड....
8 Sep 2023 - 7:46 pm | अहिरावण
देणार्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी
वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भिमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी
देणार्याने देत जावे
घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे.
- विंदा
12 Sep 2023 - 4:50 pm | विजुभाऊ
देणाराने देत जावे कॅटॅगरी तशी अगदीच दुर्मीळ नाहिय्ये.
घेणाराने घेत जावे ही देखील तशी अल्प संख्य आहे.
घेता घेता एक दिवस देणाराचे हात घ्यावे ही देखील दिसते.
पण काही शहरांत टी टी एम एम ऐवजी टी टी एम टी अधीक प्रमाणात दिसते
13 Sep 2023 - 8:01 pm | अहिरावण
आमच्या व-हाडात या... एम एम टी एम ...
13 Sep 2023 - 11:01 am | राजेंद्र मेहेंदळे
एकोळी धागे काढण्यात पी एच डी केली आहे काय?
13 Sep 2023 - 3:15 pm | केदार पाटणकर
छान प्रश्न.
13 Sep 2023 - 5:27 pm | चौथा कोनाडा
१०० % सहमत.
वस्तूंची सुबत्तता हेच कारण.
कालाय तस्मै नमः