रिमोट राज्यशकट ( मराठयांची उत्तरेतील जरब! )

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
25 Aug 2023 - 5:03 am
गाभा: 

एकूणच मराठयांची शक्ती ( मराठा जात नव्हे तर " मराठा समूह ") याबद्दल माझ्य मनात बऱ्याच वर्षात पडलेले काही प्रश्न आहते, विचारावेसे वट्ले.. हरकत नसावी
या खालील विधानात बऱ्याच चुका हि असतील तरी कोणी अभ्यासु व्यक्तीने यावर प्रकाश टाकवा अशि विनन्ति ( मनो यनि लिहवे अशि विनन्ति)

१) जेव्हा मराठ्यानी दिल्ली वर जरब बसवला त्यानंतर प्रत्यक्ष तिथे कोणी भोसले घराण्यातील कोणी का राहिले नसतील? जसे इस्लामी आक्रमक आले पण त्यातील काही भारत्तात कायमचे स्थायिक झाले तसे त्याचा त्यांना राजय प्रस्थापित करण्यास चांगलाच उपयोग झाला , म्हणजे असे कि नुसते आले आक्रमण केले पैसे घेतले आणि गेले असे ना करता मुघल निर्माण झाले !
शिंदे होळकर आणि गायकवाड कायमचे वसलेल दिसतात पण पेशव्यानी कधी छत्रपतींना असे सुचवले असेल का " कि बॉस वेळ आली आहे आपण आता गादि सातारहून दिल्ली ला हलवा " किंवा छत्रपतीनांच असे वाटले असले का ? कि आपण आता देश चालवू तिकडे बसून

२) दिली / आग्र्यातील आणि ग्वालेर वैगरे किल्ल्याचे भव्यता बघितल्यावर आणि त्याची तुलना कोल्हापूर किंवा शनिवार वाडा याच्याशी केल्यावर मनात परत शंकेची पाल चुकचुकते कि बलाढय खरंच कोण होते ? मराठ्यांची जरब जी नकाशात २/३ भूभाग व्यापलेले दाखवली जाते ती "राबवणे" कसे शक्य होते ( त्या काळाची दळणवळणाची साधने बघता ) डेव्हिल्स आडवोकेट या म्हणी प्रमाणे मन असे म्हणते कि उत्तरेतील लोकांनी हा विचार केला असले कि "घ्या बाबाबानो चौथाई पण रोज येऊन हल्ले करू नका ... सुखाने जगूद्या तुमचा उपद्रव नको म्हणून तुम्हाला देतो

काही उत्तरे अशी मिळाली ( किल्ले संधर्बात )
- महाराष्ट्र्र भागातील किल्ले वैगरे ब्रिटिशांनी ठरवून उध्वस्त केलं
- भूभाग सपाट नसल्यमुळे ते तेवढे भव्य दिसत नाहीत ( मग शनिवार वाड्याचे काय ? आग्र्याचा लाल किल्या यावर शनिवार वाडा राज्य करीत होता ते त्यांच्या तुलनात्मक भवयतेवरून तरी वाटत नाही )
- राजस्थान टिकून राहिले कारण तह झाले

आणि दुसरा प्रश्न
एवढे सगळे मधय आणि उत्तर भारतात आणि हैदराबाद मध्ये होत असताना सध्याचे कर्नाटक/ केरळ/ तामिळनाडू येथील हिंदू राजे यात सहभागी झाले का? आर्थिक / मनुष्यबळ देऊन

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

26 Aug 2023 - 1:19 pm | चित्रगुप्त

इथे बघा काही उत्तरे मिळतात का. (आणि मिळाली तर ती थोडक्यात इथे लिहावीत ही विनंती.. मी फक्त जालावर थोडा शोध घेऊन खालील दुवे देत आहे. अद्याप फारसे वाचलेले नाही)

https://mr.wikipedia.org/wiki/मराठा_साम्राज्य

https://www.youtube.com/watch?v=YYDgwUU6CfA

https://www.mpscacademy.com/2015/05/english-maratha-wars.html

https://www.uttar.co/question/6118aef8a2e92364090f1bca

https://shivray.com/maratha-samrajya/

https://www.tarunbharat.net/Encyc/2023/6/22/Before-the-British-the-Marat...

यूट्यूबीवर खालील चॅनेल मराठा साम्राज्यावर असलेले दिसते:
https://www.youtube.com/@MarathaEmpireHistory/featured

भूभाग जिंकून तिथे आपला माणूस कायम ठेवणे व त्या माणसावरही वचक ठेवणे बऱ्याच राजांना जमलं नाही. दक्षिणेतही मोठ्या राजांचे मांडलिक स्वतंत्र झाले किंवा महाराजांना ऐकेनासे झाले.
समजा नायक(मांडलिकांनी) महसूल वाटा दिला नाही तर केवळ कडक शब्दांत तंबी हा उपाय असे.
मराठ्यांनी म्हणजे पेशव्यांनी तिकडे मोगलांचा प्रदेश घेऊन नंतर त्यांच्यापैकीच एकाला विश्वासाने राखणीला ठेवले.
तुलनात्मक मुघलांचे उदाहरण घेतले तर भावंडांनी एकमेकांचे खून केले,डोळे काढले आणि सत्ता आपल्या हातात ठेवण्याची कृती दहशतीने दाखवली.
मराठे एवढे क्रूरपणे वागत नव्हते.

भूभाग जिंकून तिथे आपला माणूस कायम ठेवणे व त्या माणसावरही वचक ठेवणे बऱ्याच राजांना जमलं नाही.
पण मग प्रशा असा पडतो कि यूरोपातील शक्तींना ते कसे जमले?

तुलनात्मक मुघलांचे उदाहरण घेतले तर भावंडांनी एकमेकांचे खून केले,डोळे काढले आणि सत्ता आपल्या हातात ठेवण्याची कृती दहशतीने दाखवली.
मराठे एवढे क्रूरपणे वागत नव्हते.

मराठी लावणीचा इतिहास या म.वा.धोंड यांच्या पुस्तकातला उतारा यापूर्वी मी इथे दिला होता. पुन्हा एकदा देतो.

पानपतानंतर महाराष्ट्राचे भाग्य थोर म्हणून माधवरावासारखा माणसांची योग्य परीक्षा असलेला व त्यांच्याकडून कामे करुन घेणारा नेता लाभला. त्याने महादजी शिंदे, नाना फडणीस, गोपाळराव पटवर्धन, रामशास्त्री वगैरे कर्तबगार माणसांना पुढे आणले. निजामाचा दणदणीत पराभव केला, जानोजी भोसल्याचे बंड मोडून काढले आणि स्वार्थाकरता इंग्रजांशी संंगनमत करु पाहणाऱ्या राघोबाला आपल्या बाजूस वळवण्याचा प्रयत्न केला व त्यात अपयश आल्यावर त्याला कैदेतही टाकले. अवघ्या ११ वर्षांनी माधवराव मृत्यू पावला तेव्हा तत्कालीन एका पत्रलेखकाने "वाघ गेला! सारी कोल्ही राहिली आहेत. ईश्वरसत्ता प्रमाण!" असे उद्गार काढले आणि त्याची प्रचीती काही वर्षातच आली.

पुढे नानाने पुण्यात आणि महादजीने उत्तरेत पराक्रम गाजवून 'खूप शर्तीने राज्य राखले' असले तरी मराठेशाही आतून किडत चालली होती. नारायणरावाचा खून करुनही अपेक्षित राज्यप्राप्ती न झाल्याने रघुनाथराव इंग्रजांस मिळाला. नानाच्या चुलतभावाने (मोरोबा फडणीस) याने नानावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला आणि बारभाईचे विसर्जन होऊन नानाच्या हाती कारभार आला. नाना कर्तबगार असला तरी सहकाऱ्यांचा विश्वास तो कधीच संपादू शकला नाही. सरदार व सैन्यात हेवेदावे-बेशिस्तपणा वाढीस लागला. सर्वत्र बेबंदशाही माजू लागली. याचे एक उदाहरण म्हणजे तुकोबा होळकराने बदामीस टिपू सुलतानाचा पराभव केला पण त्याच्या सैन्याने मराठी मुलखातच गावे लुटली, बायका नासवल्या रयतेची गुरे नेली. तुकोबा होळकर पेशव्यांच्या फौजेचा सेनापती म्हणून त्या लढाईवर गेला होता.

उत्तरेत प्रचंड पराक्रम करुन पानपताचे अपयश धुवून काढलेला महादजी पेशव्यांचे दर्शन घेण्यास पुण्यास यायला निघाला तेव्हा नानाने घाबरुन कॉर्नवालिसकडे सैन्याची मदत मागितली. महादजीच्या सैन्याने पुण्यात २० महिने तळ दिला, त्या काळात पुण्यात दुष्काळाचा भयंकर कहर चालू होता. पुण्यात पटकीचा धडाका सुरु झाला होता. आजाराने आणि भुकेमुळे कंगाल लोक रस्त्यात मरुन पडत होते. लोक आपल्या फिकिरीत होते त्यात शिंद्याच्या लष्कराचे पंचवीसएक हजार लोक आणखी पुण्यात आल्याने पुण्याचे लोक जास्तच चरफडले. या सर्व परिस्थिचीची तमा न बाळगता शिंदे व पेशवे 'पुणे ग्राम गोकुळ क्रीडले त्यांत कृष्ण श्रीमंत धनी' असे पवाडे रचवून घेण्यात व विलासात मग्न होते.

दोनच वर्षानी सवाई माधवरावाने आत्महत्या केली आणि स्वार्थ, हेवेदावे, परस्परसंशय, भ्याडपणा, कारस्थाने, कपट, फितुरी, विश्वासघात, अंदाधुंदी, खुनशीपणा, सूडबुद्धी, धर्मभोळेपणा, दक्षिणा, स्त्रैणता, स्वैराचार, नाचरंग, तमाशे या राष्ट्रीय दुर्गुणांना उधाण आले.

दुसरा बाजीराव गादीवर येण्यास पुणे दरबारातील सरदार, होळकर, सातारा-कोल्हापूरचे छत्रपती यांचा विरोध होता. त्यामुळे त्याने दौलतराव शिंद्याशी संधान साधून त्याला नानासह दोन कोटींची वरात दिली. दौलतराव शिंद्याने नानाला कैदेत टाकले आणि त्याचा उपासमार करणे, तापल्या तोफेवर विवस्त्र बसवणे असा अमानुष छळ केला. नानाच्या गटातील अप्पा बळवंत मेहेंदळे सारख्यांनी विषभक्षण करुन स्वतःची सुटका करवून घेतली. पण दौलतरावाने मृतांच्या नातेवाईकांचाही छळ केला. दौलतरावाने पुण्यास जे केले तेच पुढे त्याने ग्वाल्हेरास केले. स्वतःचा सेनापती नारायणराव बक्षी याच्या अंगास बाण बांधून बत्ती मारून आकाशात उडवले आणि ठार केले. का? तर 'बक्षीचा पक्षी केला' असा प्रास साधण्याकरिता.

ही मोठमोठ्या सरदार मंडळींची गत. सामान्य रयतेचे विलक्षण हाल झाले. वानवडीवर शिंद्यांची पलटणे होती. ते शहरावरच तोफा रोखून लोकांजवळ धान्य मागत आणि लोकांच्या घरात बेलाशक शिरुन दाणावैरण नेत.

या अंदाधुंदीच्या काळात बाजीरावसाहेबांनी शिंद्यांचा तगादा भागवण्याकरता पुण्यात पट्ट्यांचा सुळसुळाट केला होता १. कर्जपट्टी, २. सरंजामपट्टी, ३. वेतनपट्टी, ४. सावकारपट्टी, ५.उंबरेपट्टी, ६. भाडेपट्टी आणि कहर म्हणजे ७. संतोषपट्टी. ही संतोषपट्टी बाजीरावसाहेबांस पेशवाई मिळाली याकारण रयतेस संतोष झाल्याचे गृहीत धरून वसूल करण्यात येत होती.

व्यक्तीदोषाने प्रेरित होऊन बाजीरावाने अनेक खुनशी कृत्ये केली त्याचा त्रासही रयतेस भोगावा लागला. विठोजी होळकराचा अमानुष वध केल्याचा प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे. "बापू गोखल्याने विठोजीस सरकारांत पाठविले. सरकारवाड्यात पोचताच त्याला बेडी तोडून ठार मारिला. दोनशे कमचा मारून लागलीच हत्तीच्या पायास बांधोन वोढविला" हा प्रसंग चालू असताना बाजीराव शनिवारवाड्याच्या वरच्या दिवाणखान्यातून या प्रसंगाचा तमाशा आनंदाने पाहत बसले होते. पुढे बाजीरावाने आपल्या दृष्टिसुखार्थ होळकराचा मुडदा तसाच चौकात चोवीस तास ठेवला .

मराठी साम्राज्याच्या विस्तारास आधी कारणीभूत ठरलेले शिंदे आणि होळकर आता उत्तरेत एकमेकांशी आधीच लढत असताना, एकमेकांचा मुलुख उद्ध्वस्त करत असण्यात रंगले असताना या प्रसंगाने यशवंतराव होळकर प्रचंड संतप्त होऊन पुण्यास येण्यास निघाला आणि त्याच्या फौजेने येताना मराठी प्रांतात विलक्षण धिंगाणा घातला. खानदेश प्रांताचे त्याच्या सैन्याने केलेले नुकसान पुढे पन्नास वर्षेपर्यंत भरुन निघाले नाही. दिवाळीच्या सुमारास यशवंतराव पुण्यात पोचला आणि बाजीराव पुण्यातून पळून वसईस गेला आणि कारभार इंग्रजांवर सोपवून मोकळा झाला.

ऐन दिवाळीच्या काळात यशवंतरावाने पुण्याला यमपुरीचा अनुभव दिला. दौलतरावाचे कौर्य फिके पडावे इतके कौर्य यशवंतरावाने पुण्याबाबत दाखवले. 'शहर गायीसारखे हळहळते' अशा स्वरुपाचे उतारे तत्कालीन अनेक पत्रात उपलब्ध आहेत.

मराठेशाहीचा कारभार इंग्रजांवर सोपवल्याचे बाजीरावासह कोणत्याच मराठा सरदारास आवडले नसले तरी सगळेजण इंग्रजांशी स्वतंत्रपणे लढले, होळकराने अनेकदा इंग्रजांस चोपलेही. मात्र अखेरीस प्रत्येकजण पराभूत झाला.

या सर्व घटनांनी सुरापूरकर, प्रतिनिधी, कोळी, पेंढारी, बेरड, रामोशी सर्वच टोळ्या बंड करुन उठल्या आणि स्वतःच्याच राज्यात लुटालूट करु लागल्या. आपल्या काखेत लहान मुलांना घेऊन बायकांनी नदीत जीव दिला.

चित्रगुप्त's picture

30 Aug 2023 - 12:25 am | चित्रगुप्त

बापरे. हे सगळे प्रथमच समजले. (होळकर-शिंदे यांच्या वैमनस्याबद्दल थोडेसे माहिती होते) जगातल्या कोणत्याही भागातल्या कोणत्याही जमातीतले लोक वेळप्रसंगी कोणत्याही थराला जाऊ शकतात, याची वानगी यातून मिळाली.

विवेकपटाईत's picture

27 Aug 2023 - 5:32 pm | विवेकपटाईत

उत्तर भारतात मंदिरांच्या रूपाने मराठा साम्राज्याच्या खुणा सर्वत्र दिसतात. उत्तर प्रदेश असो किंवा ओडिषा मराठी माणसांचा स्थानिक लोक आदरच करतात. मराठ्यांना चौथ वसुलीत अधिक रस असल्यामुळे साम्राज्याचा विस्तार करण्याकडे लक्ष दिले नाही. राजस्थान व्यापार मार्गावर असल्यामुळे तिथले राजे श्रीमंत होते आणि त्यांनी मोठे मोठे महाल बांधले. महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी होती.

कर्नलतपस्वी's picture

27 Aug 2023 - 8:08 pm | कर्नलतपस्वी

विषय खुप मोठा आहे.

तुमच्या प्रश्नांचा आवाका एवढा मोठा आहे की त्यासाठी अनेक पानांचे पुस्तकच लिहावे लागेल. थोडक्यात, आपला विजय मोठा करुन सांगताना मराठी इतिहासकारांकडून बरीच अतिशयोक्ती होते, हे मला मान्य आहे. एक लढाई जिंकली, म्हणजे शत्रूचे संपूर्ण राजकारण आणि अर्थकारण आपण ताब्यात घेतले असे झालेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. दुसरे, त्याहूनही महत्त्वाचे, म्हणजे 'सल्तनत-ए शाह आलम, दिल्ली ता पालम' अशी मोगलांची अवस्था होती. असल्या ओसाडगावचा राजा बनण्यात कुणाला रस होता?

अखिल भारतातील हिंदू एक, ही कल्पनाच मुळात बरीच नंतरची आहे. आजच्या राजकारणात असल्या बेरजा (आणि वजाबाक्या) करण्याचा खेळ फार नंतर सुरु झाला. त्याकाळी नुसत्या मराठ्यांमध्येच अनेक गट होते. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा भाऊ एकोजीराजे त्यांच्याविरुद्ध लढला. जानोजी निंबाळकर, धनाजी जाधवांचा मुलगा चंद्रसेन जाधव हे तर निजामाचे नौकर होते. पेशव्यांनी दाभाडे, रघुजी भोसले अश्या स्वकियांविरुद्ध लढाया दिलेल्या आहेत. नुसते हिंदू आहात म्हणून दाक्षिणात्य हिंदू किंवा राजपूत मराठ्याना सामील होतील असे मानणे म्हणूनच चूक आहे. याउलट मी 'अज्ञात पानिपत'मध्ये लिहिल्याप्रमाणे दिल्लीत इस्लामच्या रक्षणासाठी बोलावलेल्या अब्दालीने हिंदू आणि मुसलमानांची यथेच्छ कत्तल केली, वर कारण काय तर मुसलमान दाढी न ठेवल्याने ओळखता आले नाहीत! जो-तो आपला स्वार्थ पाहून निर्णय घेत असे, हे इतिहासात दिसते, त्याला तात्विक मुलामा नंतर चढविला जातो!

कर्नलतपस्वी's picture

29 Aug 2023 - 2:44 pm | कर्नलतपस्वी

छ शाहूमहाराज हे राजे जरी असले तरी विरभोग्या वसुंधरा या न्यायाने पावर सेटंर पेशव्यांकडे होते. पेशव्यांनी छत्रपतींची सेवा करण्यात धन्यता मानली. पेशवे व इतर शुर सरदारांनी भुभाग जिंकला पण छत्रपतींनी कुठलीही राजनायीक, प्रशासनीक निर्णय घेतले नाहीत. मराठ्यांची पाठ फिरताच शत्रू पुन्हा शिरजोर झाले. थोरल्या राजांची अष्ट प्रधान, महसूल वगैरे व्यवस्था विस्कळीत झाली. फौजी भाषेत कमांड आणी कंट्रोल ढिला झाला.

थोरल्या बाजीरावांनी बडोदा,ग्वाल्हेर, धार,माहेश्वर अशी मजबूत फळी बनवली. त्यांच्या नंतर पेशवाईत भाऊबंदकी चालू झाली. सरदार बलाढ्य झाले, स्वतंत्र झाले व किंग मेकरची भुमिका बजाऊ लागले.यशवंतराव होळकर यांनी स्वतः ला महाराज घोषित केले. सातारा,कोल्हापूर नाममात्र राहीले व त्यांची पकड कमी होत गेली. पानिपत ने त्यात आणखीनच भर टाकली. पुढे इंग्रजानी संस्थाने, राज्ये खालसा केली व सर्व अधिकार काढून घेतले. असे काहीच छत्रपती किवां पेशव्यांनी केले नाही. निजाम, टिपू किंवा रजपूत राजघराणी खंडणी देऊन आपली स्वतंत्रता आबाधीत ठेवण्यात यशस्वी झाले.

या उलट इग्रंजाची निश्चित राजकीय, प्रशासनीक व्यवस्था होती. या सर्वांच्या वर सर्वेसर्वा अशी राज्यपद्धती होती . वेल डिझाईन कमांड कंट्रोल व्यवस्था असल्याने प्रत्येकास अपल्या मर्यादा माहीत होत्या. वेळ पडल्यास कुणालाही कठोर दंडाचे प्रावधान होते.

माझ्या म्हणण्यास गाढे अभ्यासक मनो यांनी समर्थन दिले त्यानुसार एक स्वतंत्र पुस्तकच एक प्रतिसाद होईल.

चौकस२१२'s picture

28 Aug 2023 - 6:55 am | चौकस२१२

मनो आपण अधून मधून लिहिलेत तरी चालेल
अखिल भारतातील हिंदू एक, ही कल्पनाच मुळात बरीच नंतरची आहे. आता विचार केल्यावर हे समजले ... हे म्हणजे युरोपात सगळे ख्रस्ती होते तरीहि युद्ध व्हायची तसे भारतात ( त्याकाळी देश हि नवहता म्हणा ) दोन सत्तेत भांडण किंवा एकोपा व्हायचा मग ते एका धर्माचे का असेनात असेच ना ?

असो ओसाड गाव चा राजा याबद्दल मात्र शंका आहेच ... लुटून/ स्वारी करून परत येणे याऐवजी स्वतः निदान ओसाड असले तरी मुख्य मानले जाणारे राजय होते तर का गादीवर बसले नाहीत! ( छत्रपती किंवा त्यांनी नेमलेले पेशवे )

कंजूस's picture

28 Aug 2023 - 10:04 am | कंजूस

'आवाका मोठा आहे' हेच खरं.
दुसरं म्हणजे काय काय कसं झालं हे सांगता येतं कागदपत्र पाहून. परंतू या राजाने अमुक ठिकाणी तमुक मनुष्य ठेवला,का ठेवला,आपला मराठा का नाही ठेवला असा टीकात्मक इतिहास नसतो. ते लेख असतात.

कर्नलतपस्वी's picture

29 Aug 2023 - 2:47 pm | कर्नलतपस्वी

मनो यांचा खुपच अभ्यास असल्याने त्यांचे लिखाण आपल्या सगळ्यानांच फायदेशीर ठरणार यात शंकाच नाही.

वरील प्रतिसाद माझ्या अल्प मती ने दिला आहे कुठलाही अधिकारीक संदर्भ मागू नये.

सुरिया's picture

29 Aug 2023 - 7:13 pm | सुरिया

अखिल भारतातील हिंदू एक, ही कल्पनाच मुळात बरीच नंतरची आहे. आता विचार केल्यावर हे समजले

हे शहाणपण 'राष्ट्रकारणासाठी एकदोन धर्मांतराने छत्रपति शिवाजी महाराजांचे हिंदू राष्ट्र सिध्द होत नाही' असे सांगितले तंव्हा कुठे गेले होते.
आपले राज्य स्वराज्य, प्रजेचे हितकारी राज्य असावे असे राजांना वाटायचे हाच तर मुद्दा होता.

सुरिया, मला काही उपरती वैगरे झालेली नाहीये ... मी फक्त मनो यांच्या मुद्दा समजला हे दर्शवित होतो
तुम्ही खोडडसाळपणे "शिवाजी महाराजांचे प्रयत्न आणि स्थापित रयतेचा हिंदू धर्म/चालीरीती वाचवणे याचा संबंध नाही असे दाखवताय "

रूढार्थाने शिवा महाराजांची स्वराज मोहीम हि काही "बघा आता सगळ्या हिंदूंना एकतर अनु " वैगरे अशी होती असे कोणी म्हणत नाहीये
पण त्यांनी जे वाचवले ते रयतेचे स्वराज्य आणि त्या स्वतःचा धर्म / चालीरीती टिकवणे हे आपोआप आले ...

माझे मूळ वाक्य वाचायची तसदी घ्या.. मी सुरवातीलाच म्हणले कि " जसे टोकाचाय हिंदुत्ववाद्यांनी छत्रपतींचे पर्यंत वपरून आपली पोळी भाजू नये ......"

असो पण तुमचा ब्रिगेडी अपप्रचार चलु राहू दे.. वाचणाऱ्याला समजते