बोल्ट्झमन ब्रेन

साहना's picture
साहना in काथ्याकूट
30 Jun 2023 - 10:46 am
गाभा: 

बोल्ट्झमन ब्रेन

आपले विश्व हे अफाट आहे आणि ह्या विश्वाकडे अफाट वेळ सुद्धा आहे. ह्या विश्वाच्या पोकळींत मॅटर आणि अँटी मॅटर ह्यांचे द्वंद्व सतत चालू असते. ह्या द्वंदात अत्यंत छोट्या कालावधीसाठी म्हणजे कदाचित सेकंदाच्या अब्जावधी भागासाठी मॅटर आणि अँटी मॅटर वेगळा होऊ शकतो आणि हा मॅटर कुठलेही रँडम संरचनेचे रूप धारण करू शकतो. उदाहरणासाठी ह्या अफाट पसार्यात कुठेतरी निव्वळ रँडम पद्धतीने आपण ज्या खुर्चीवर बसला आहात तशीच खुर्ची निर्माण होऊ शकते. आणि दुसऱ्याच निमिषांत ती अँटी मॅटर द्वारे नष्ट सुद्धा होते. हि प्रक्रिया पूर्ण व्हॅक्युम म्हणजे पोकळींत सुद्धा होऊ शकते.

आता ह्याच पद्धतींनी कितीही क्लिष्ट संरचना निर्माण होऊ शकते कारण infinite काळ आणि infinite मॅटर असेल तर ह्याची प्रोबॅबिलिटी १ होते. उदाहरणार्थ एका माकडाला टंकलेखन सामुग्री देऊन कोट्यवधी युगांचा कालावधी दिला तर कधी तरी ते माकड शेक्सपिअर चे संपूर्ण साहित्य निव्वळ रँडम पद्धतीने टंकलिखित करेलच.

आता तुम्ही इथे हे वाचत बसला आहात ह्याचा अर्थ काय ? तर तुमचा जो मेंदू आहे तो मेंदू डोळे कान इत्यादीतून येणारे सिग्नल्स प्रोसेस करून तुमचे मन निर्माण करतो. तुमच्या आठवणी स्वभाव ह्या सर्व गोष्टी खरे तर फक्त तुमच्या मेंदूतील न्यूरॉन्स ची रचना आहे. आता समजा विश्वांत असा मेंदूच क्षणाच्या एक कोटीच्या भागासाठी कुठे निर्माण झाला तर ? तर त्या मेंदूला त्या आठवणी वगैरे त्या क्षणासाठी खरेच वाटेल पण प्रत्यक्षांत मेंदू लवकरच नष्ट होईल.

आता तुम्ही खरोखर तुम्ही आहात कि असाच एक मेंदू आहात ?

आणि समजा ह्या प्रकारे मेंदू सारखी क्लिष्ट रचना निर्माण होऊ शकते तर संपूर्ण शरीर इतकेच नव्हते तर संपूर्ण ग्रह, तारे वगैरे सर्व सुद्धा क्षणाच्या १ कोटिव्या भागासाठी निर्माण होऊ शकते आणि त्या काळांत उपस्थित असल्येला सर्व लोकांना मात्र त्याची जाणीव असणार सुद्धा नाही. काही गणिताच्या आधारे असा मेंदू दर १० वर ५०० शून्ये वर्षांत निर्माण होऊ शकतो. जितकी संरचना क्लिष्ट तितका वेळ जास्त पण विश्वाचा पसारा इतका मोठा आणि कालातीत आहे कि हा कालावधी फारच छोटा आहे.

ह्यालाच बोल्ट्झमन ब्रेन म्हणतात. हि कल्पना लुडविग बोल्ट्झमन ह्या जर्मन भौतिकशास्त्रज्ञाने १८९६ साली मांडली. प्रत्यक्षांत हि कल्पना गौर गोपाल दास किंवा सद्गुरू छाप पोकळ कथा वाटली तरी प्रत्यक्षांत ह्याचा संबंध थर्मोडायनॅमिक नियमांशी आहे आणि एंट्रॉपी सारख्या संकल्पनांशी आहे.

बोल्ट्झमन ब्रेन ची संकल्पना हि वेदांत तत्वज्ञानाशी मिळती जुळती वाटली म्हणून मी काही वाचन केले केले तर काही लोकांनी ह्याचा संबंध हिरण्यगर्भ ह्या ब्रहदारण्यक उपनिषद किंवा योगवसिष्ठ मधील संकल्पनांशी जोडला आहे. ब्रह ने हिरण्यगर्भाची निर्मिती केली आणि संपूर्ण विश्व् हे हिरण्यगर्भातून निर्माण झालेली प्रतिमा आहे. हिरण्यगर्भ बोल्ट्झमन ब्रेन असू शकतो.

https://en.wikipedia.org/wiki/Boltzmann_brain

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

30 Jun 2023 - 11:12 am | कपिलमुनी

What is real ? असा प्रश्न मॅट्रिक्स चित्रपटात विचारला होता त्याची आठवण होते

मॅट्रिक्स हा वेदांत वर आधारित चित्रपट होता. चित्रपटाच्या शेवटी नवरस म्हणून जे गाणे आहे ते बृहदारण्यक उपनिषदातील शांती मंत्र आहे.

https://www.youtube.com/watch?v=DOtoIBrBAYE

ब्रम्हाने हिरण्यगर्भ निर्माण केले ? हे चूक वाटते आहे. हिरण्यगर्भ आधी होते आणि त्यातून ब्रम्ह जन्मला असे आठवते आहे. चुभुद्याघ्या.

साहना's picture

30 Jun 2023 - 1:05 pm | साहना

ब्रम्ह , ब्रम्हा नाही. ब्रम्हा म्हणजे ब्रम्हा विष्णू महेश मधील ब्रम्हा हे हिरण्यगर्भातून निर्माण झालेले असू शकतात.

ब्रम्ह - ज्याला इंग्रजीत ब्रह्मन असे म्हटले जाते ते.

कॉमी's picture

30 Jun 2023 - 6:33 pm | कॉमी

ओह ओके.
आता ब्रम्ह म्हणजे काय विचारणे आले.

धर्मराजमुटके's picture

30 Jun 2023 - 12:59 pm | धर्मराजमुटके

प्रत्यक्षांत हि कल्पना गौर गोपाल दास किंवा सद्गुरू छाप पोकळ कथा वाटली तरी प्रत्यक्षांत ह्याचा संबंध थर्मोडायनॅमिक नियमांशी आहे आणि एंट्रॉपी सारख्या संकल्पनांशी आहे.

एकंदरीतच देसी संकल्पना गोर्‍यांनी सांगीतल्यावरच आपल्याला खर्‍या वाटतात हे सत्य अजूनही शाश्वत आहे तर.

वेदांत विषयावरील सर्वांत चांगली आणि accessible ऑथॉरिटी सध्या स्वामी सर्वप्रियानंद आहेत असे वाटते ते मूळ भारतीय असून सध्या न्यू यॉर्क मधील वेदांत सोसायटीचे प्रमुख आहेत. गोऱ्या काळ्यांचा संबंध नाही. शेवटी हे ज्ञान सर्व मानवजातीसाठीचे आहे.

अहिरावण's picture

30 Jun 2023 - 1:11 pm | अहिरावण

हे असे चांगले लिहून मनातील क्षोमाचा निचरा करायचे सोडून तुम्ही भलत्या विचारप्रसवाच्या अधीन होऊन सोमरसप्राशितइंगळीदंशितमर्कटलीला का करता?

कानडाऊ योगेशु's picture

30 Jun 2023 - 6:17 pm | कानडाऊ योगेशु

समजा असा अतिप्रगत मेंदू तयार झाला आणि तो इतका अतिप्रगत आहे कि त्याने त्याच्या क्षणिक असलेल्या अस्तित्वार मात करण्याची कॢप्ती शोधली तर?

बोल्ट्झमन ह्यांनी ह्यावर सुद्धा विचार केला होता. त्या क्षणिक मेंदूला जे अस्तित्व जाणवते ते बोल्ट्झमन विश्व पण त्यांच्या बाहेर काहीच नाही कारण जे इतर सर्व काही आहे ते सुद्धा क्षणिक आहे. त्यामुळे त्या मेंदूने आपल्या क्षणिक अस्तित्वावर मात सुद्धा केली तरी त्याच्या बाहेर आणखीन काही नाही. मुळांत "काळ" हीच संकल्पना निरर्थक आहे. ते क्षणिक अस्तित्व आणि त्याच्या बाहेरचे अस्तित्व ह्यांत काही विशेष फरक नाही.

रिचर्ड फिनमेन ह्यांनी सुद्धा ह्या विषयावर मत व्यक्त केले होते.

वेळ म्हणजे नक्की काय भानगड, बदल न होणाऱ्या जगात वेळ ही संज्ञा असेल का, आणि कोणते बदल सर्वात महत्वाचे ह्या वर वेळ ही संज्ञा विसंबून आहे का वैगरे प्रश्न नेहमी पडतात.

संक्षी तर वेळ असे काही अस्तित्वातच नसते म्हणायचे.

खरतर संक्षी नावाचं काही अस्तित्वात नाही किंवा संक्षी रंध्रारंध्रात व्यापून राहिले आहेत असेही म्हणता येईल.
अशा विषयांची गंमत म्हणजे कोणतेही वाक्य घेऊन त्याभोवती कोणत्यातरी तत्त्वाची / प्रमेयाची रचना करुन ते सिद्ध करता येते / खोडून काढता येते.

संक्षी तर वेळ असे काही अस्तित्वातच नसते म्हणायचे.

--- काही म्हणा, संक्षी होते तेंव्हा एक वेगळीच गंमत होती राव. त्यांचा प्रतिसाद आला की त्यावर प्रतिसादायला अनेक जण हिरिरीने कळफलक सरसावायचे. 'साध्याही विषयात आशय मोठा' असे सगळे चालयचे.

प्रसाद गोडबोले's picture

1 Jul 2023 - 12:27 pm | प्रसाद गोडबोले

उत्तम !

हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत्॥ स दाधार पृथिवीं द्यामुतेमां कस्मै देवाय हविषा विधेम ॥

लेखन आवडले पण काहीकाही वाक्ये पुरत्या मॅथेमॅटिकल रिगर ने लिहिलेली नाहीत असे जाणवले .
उदा.

ब्रह ने हिरण्यगर्भाची निर्मिती केली आणि संपूर्ण विश्व् हे हिरण्यगर्भातून निर्माण झालेली प्रतिमा आहे.

हे असे योगवसिष्ठ मध्ये लिहिलेले आहे का ? कारण ही वाक्यरचना चुकीची वाटली. ब्रह्म काहीच करत नाही. ते बस क्वांटम सुपरपोझिशन मध्ये आहे ... ते काहीतरी निर्माण बिर्माण करते असे वाटणे हा आपला विचार झाला , आपले ऑब्झर्वेशन झाल्याने त्याची क्वांटम सुपरपोझिशन , वेवफंक्शन कोलॅप्स झाले , तेही फक्त आपल्यासाठी , इरव्ही ते आपल्या जागी आहे तसेच आहे. हिरण्यगर्भ म्हणजे ती स्टेट कोलॅप्स झाली तो क्षण अन त्याक्षणी घेतलेला फिजिकल फॉर्म असे म्हणाता येईल.
बाकी
कॉन्शसनेस अर्थात "मी आहे" ही जाणीव ही खुप गहन संकल्पना आहे ! ती फक्त ब्रेन मुळे आहे असे म्हणणे जरा बोल्ड स्टेटमेन्ट वाटते. ज्या प्राण्यांना ब्रेन नसतो त्यांनाही मी आहे ही जाणीव असते. मी आहे ह्या जाणीवेचा उदय ब्रेन मध्ये नसुन त्याच्याही खुप आधी आहे.

असो , खुप अवांतर झाले.

कॉमी's picture

1 Jul 2023 - 1:44 pm | कॉमी

प्राणी (animal) ह्या वर्गीकरणात ब्रेन नसलेले कोणी येत नाही असा समज आहे.

प्राणी हा शब्द जीव अश्या अर्थी ते असल्यास "मेंदू नाही पण स्व ची जाणिव आहे" असा जीव कोणता ते दिले तर वाचायला आवडेल.

कोणाला तरी स्व ची जाणीव आहे असे पुराव्याने शाबीत करणे अवघडच. बाह्य निरीक्षण करून तसा अंदाज बांधावा लागतो.

पण तरी. मेंदू नसलेले बोले तो..

अमीबा, स्पंज, व्हायरस, बॅक्टेरिया, वनस्पती.

कोणाला तरी स्व ची जाणीव आहे असे पुराव्याने शाबीत करणे अवघडच. बाह्य निरीक्षण करून तसा अंदाज बांधावा लागतो.

बरोबर आहे.

प्रसाद गोडबोले's picture

1 Jul 2023 - 5:01 pm | प्रसाद गोडबोले

माझ्यामते

"मी आहे" ही जाणीव जिथे फर्स्ट सेल्फ रप्लिकेटिन्ग केमिकल्स तयार होतात त्या तिथेच आहे. त्यामुळे प्रत्येक जीव जो जिवंत रहाण्याचा प्रयत्न करत असतो , रप्लिकेट करण्याचा , पुनरुत्पादन करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला मी आहे ही जाणीव असते, असे माझे मानणे आहे. आणि एकदा हे विधान केले की कॉन्शसनेस हा ब्रेन मध्ये, केमिकल रिअ‍ॅक्शन्स मधुन तयार होत नसुन त्याच्याही खाली खुप खोलवर कदाचित क्वांटम लेव्हल ला होत असणार असे मानावे लागेल. .

सर्वच विषय अतिशय डम्ब डाऊन करून लिहिलेला आहे. नाहीतर मला सुद्धा समजण्यास कठीण आहे. विशेषतः वेदांताशी त्याचा संबंध जोडण्याचे काम माझेच आहे,

इतर कुणी तरी हा चांगला पोस्ट लिहिला आहे : https://www.advaita-vision.org/hiranyagarbha-a-boltzmann-brain/

त्यातिल मजकुरापेक्षा ग्राफ खूप छान आहे.

> ती फक्त ब्रेन मुळे आहे असे म्हणणे जरा बोल्ड स्टेटमेन्ट वाटते.

स्व ची जाणीव हि फक्त ब्रेन (किंवा संबंधित जैवशास्त्रीय प्रक्रिया) ह्यांच्या मुळे आहे असे माझे स्वतःचे मत आहे.

शानबा५१२'s picture

9 Jul 2023 - 12:42 pm | शानबा५१२

बोल्ट्झमन ब्रेन हे शिर्षक वाचुनच खुप बरे वाटले. ह्यांची हि शोकातिंका आहे. You should also read about Grignard reagent and its inventor.

धन्यवाद मिपा.