रिलायन्स पॉवर चा आय. पी. ओ.

व्यंकट's picture
व्यंकट in काथ्याकूट
3 Jan 2008 - 9:07 am
गाभा: 

अनील धीरूभाई अंबानी ग्रुप च्या रिलायन्स पॉवर चा आय. पी. ओ. १५ जानेवारीस येत आहे. जाणकारांकडे काय महिती आहे? आणि सल्ला काय आहे?

प्रतिक्रिया

व्यंकटराव,

रिलायन्स पॉवर चा आय. पी. ओ. भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा आय. पी. ओ. आहे. हे त्याचे मोठे वैशिष्ठ्य तर आहेच. पण
या शेअर मधे नक्की फायदा आहे यात संशय नाही....

याची बिडींग किंमत ही ४१० ते ४५० अशी ठरवली गेली आहे.

आय.पी.ओ मध्ये शेअर ज्यांना मिळतील ते भाग्यवान ठरतील यात संशय नाही. कारण या शेअर चे लिस्टींग १००० च्या आसपास होण्याची अपेक्षा आहे... आणि येत्या २ वर्षात मोठा परतावा देणारा शेअर हमखास आहेआयाअय.पी.ओ. येण्याअगोदरच रिलायन्स पॉवर ला कित्येक कोटींचे एक मोठे कंत्राट मिळाले आहे. आणि यापुढेही अधिक कामे मिळतीलच.

तेव्हा डोळे झाकून हा शेअर घ्यावा हे माझे मत आहे. अधिक जाणकारांनी यावर भाष्य करावे ही अपेक्षा

- सागर

शरुबाबा's picture

3 Jan 2008 - 5:07 pm | शरुबाबा

IPO kharedi karnysathi kay procedure aahe , pls mala margdarshn kara

तुमचे ऑनलाईन ट्रेडींग अकाऊंट असेल तर खात्यातले पैसे वापरुन तुम्ही आय.पी.ओ. या पर्यायामधून तुम्हाला हवे तितके शेअर्स साठी रिक्वेस्ट देऊ शकता. पैसे मात्र आधी द्यावे लागतात. त्याला पर्याय नसतो.

तुम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा वर्तमानपत्रांत येणार्‍या जाहिरातींत लक्ष ठेवा. रिलायन्स वाल्यांनी उल्लेखिलेल्या ठिकाणी तुम्ही ड्राफ्ट आणि आवेदन देऊ शकता... तुम्हाला शेअर्स ऍलॉटमेंट झाली तर तुमच्या पत्त्यावर तसे कळवले जाते व आणि नाही झाली तर ड्राफ्ट पाठवला जातो. कदाचित याचा उपयोग होऊ शकेल.

धन्यवाद
सागर

इनोबा म्हणे's picture

3 Jan 2008 - 7:26 pm | इनोबा म्हणे

या बाबतीत तुम्ही शेरखान.कॉमशी संपर्क करा.माझ्यामते शेरखान ही संस्था खरेदी-विक्रीकरीता चांगला पर्याय आहे.

(शेरास सव्वाशेअर) विनोबा

संजय अभ्यंकर's picture

3 Jan 2008 - 9:15 pm | संजय अभ्यंकर

जे सध्याचे समभाग धारक आहेत, त्यांना ५% ते १०% सुट मिळेल.

संजय अभ्यंकर

व्यंकट's picture

3 Jan 2008 - 10:00 pm | व्यंकट

सागर विनायक संजय धन्यवाद.
१ लाख कमाल मर्यादा आहे असा ऐकून आहे. कमीत कमी किती चा लॉट अलोकेट होईल असे जाणकरांना वाटते?