या सुंदर ग्रहावर आपला हक्क काय ?

बामनाचं पोर's picture
बामनाचं पोर in काथ्याकूट
16 Dec 2008 - 3:29 pm
गाभा: 

काल नविन सिनेमा पाहिला.. 'The Day the Earth Stood Still' . बेकार होता तसा पण त्यातले एक वाक्य होत , परग्रहावरुन आलेला एलियन माणसाला ( अर्थातच हिरॉईनला ) म्हणतो , ' its not your planet, i didnt came to destroy this planet , i came to save it ..from you.. because you human never change '.
थोडा विचार केला तर पटतं हे. या सुदंर पृथ्वी वर आपला काय हक्क ? अफाट पसरलेल्या विश्वाकडे नजर टाकली की जाणवत आपण किती शुल्लक आहोत ते. अगदी निसर्ग साध्या पाउसाच्या रुपाने रागवला तर हतबल होउन जातो. पण तरी बदलत नाही , अंगातला ज्ञानाचा माज कायम आहे. स्वता:च्या सुखा साठी लुटणे सुरुच आहे आणि रोज वाढतंच आहे.

निसर्गाने.....

धरती दिली राहयला.... आपण काल्पनीक रेघा मारुन. हा माझा देश.. हा तुझा , हे माझे राज्य .. हे तुझे , हि माझी मुंबई.. हा तुझा बिहार...

पाणी दिले.... आपण त्याला शीवायचे नियम बनवले . स्वताचं ठरवलेल्या जातीच्या आधारे... जणू काही आपल्या बापाचं आहे पाणी.

झुळझुळणारी नदी दिली ... . आपण तिला अडवुन स्वता:च्या घरात उजेड पाडला..

वाघासारखा उमदा प्राणी .... आपली शोभा वाढवायला आपण त्याची कातडी सोलली , तेही भ्याडांसारख त्याला फसवुन पिंजरयात पकडून.

घनदाट जंगल निर्माण केले.... आपण ते रोज तोडून कमी करतो आहोत.. अनेक कारणं देउन...

युरेनियम सारखा धातु दिला... आपण त्याचे bomb करुन एकमेकांच्या जीवावर उठलो.

....... यादी खरंच न संपणारी आहे.....

उद्या जर खरच सृष्टिकर्त्ता ( हवंतर देव म्हणा ) जर समोर आला आणी म्हणाला... " अरे हे सगंळ मी तयार केले आहे, तुला देखील ... तुला थोडं जास्त डोकं दिले ते या माझ्या निर्माणाची काळजी घेण्याकरता. पण तू तर याचा नाश करतो आहेस. आता तुझे अस्तित्व संपवून मी पुन्हां हि सृष्टि बाकिच्या सर्वांसाठी निर्भय , निर्धोक का करु नये. ?? " .

आपल्या बाजूचा एक तरी मुद्दा आहे का ?????

प्रतिक्रिया

कलंत्री's picture

16 Dec 2008 - 7:32 pm | कलंत्री

या सृष्टीतील माणूस एक घटक आहे. माणुस जर नष्ट झाला तर परत एकदा सृष्टी बहरु शकते.

अर्थातच त्यासाठी नष्ट व्हायची वाट पहायची का?

शंकरराव's picture

16 Dec 2008 - 8:03 pm | शंकरराव

या सृष्टीतील माणूस एक घटक आहे. माणुस जर नष्ट झाला तर परत एकदा सृष्टी बहरु शकते.
कोणी लावला हा शोध ?

अर्थातच त्यासाठी नष्ट व्हायची वाट पहायची का?

हसावे का रडावे ?????

माणुष्याचे निसर्गाशी असणारे नाते द्रुढ व संतूलित असावे असे वाटते. निसर्ग संतूलनात जीवनाची उन्नत्ती आहे.

कलंत्री's picture

16 Dec 2008 - 9:35 pm | कलंत्री

आज अनेक पक्षी, पशु, किटकांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नद्या प्रदुषित होत आहे, दर्‍या, टेकड्या नष्ट करुन शहराचा विकास होत आहे.

शहरात होणारे प्रदुषण, आदिवासीवर होणारे अत्याचार यावरुन काय बोध घ्यावा?

हा सर्व निसर्गाचा क्रम आहे की मानवाची अघोर कहाणी आहे?

इनोबा म्हणे's picture

16 Dec 2008 - 10:41 pm | इनोबा म्हणे

तुम्ही जंगलात राहता की शहरात?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विनायक प्रभू's picture

16 Dec 2008 - 9:25 pm | विनायक प्रभू

एका डोळ्यात हसु तर दुस-या त आंसु- बघा जमतय का?
मी बेशुद्ध आहे

अवलिया's picture

16 Dec 2008 - 10:48 pm | अवलिया

लेख चांगला आहे पण लेखाचे शीर्षक आणि शेवटचा प्रश्न मेळ खात नाही
शीर्षक हक्क काय विचारतो अन प्रश्न आपल्या बाजुचा मु्द्दा विचारतो म्हणजेच हक्क शाबीत झाला असे समजुन बाजु मांडण्याचा प्रयत्न दिसतो. दोन्हीची सांगड कशी घालावी याचा निर्णय होवु शकत नाही असे वाटते.
बाकी विचार विचार करण्यासारखे असल्याने विचार केल्याशिवाय लिहिणे योग्य नाही.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी