ताज्या घडामोडी- मार्च २०२३

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
1 Mar 2023 - 8:04 pm

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका विशेष पथकाद्वारे आपल्या राजकीय विरोधकांवर पाळत/ हेरगिरी केली म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेस नेते, माजी खासदार आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांचे चिरंजीव संदीप दिक्षित यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्याकडे केली आहे.

संदीप दिक्षितांच्या ट्विटर खात्याला निळ्या टिक्स नसल्याने ते खाते अधिकृत नाही असे वाटून अन्यत्र खात्री करून घेतली तर ए.एन.आय च्या ट्विटर खात्यावरही तेच सापडले.

त्याचे झाले असे की २०१५ मध्ये पहिल्यांदा बहुमतातले सरकार स्थापन केल्यानंतर अरविंद केजरीवालांच्या सरकारने FBU (Feedback Unit) या विभागाची स्थापना केली. या विभागाचा उद्देश सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी वगैरे लाच मागत असतील किंवा अन्य प्रकारे कोणताही भ्रष्टाचार करत असतील तर त्यांच्याविरोधात टिकेल असा पुरावा गोळा करणे असेल असे सांगितले गेले होते. २०१६ मध्ये या विभागाने कामाला सुरवात केल्यानंतर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पुरावे गोळा करण्यापेक्षा आपच्या विरोधकांवर पाळत ठेवल्याचे काम जास्त केले असे नायब राज्यपालांनी याविषयी सी.बी.आय चौकशी करायची शिफारस करताना म्हटले होते -- "… seems to have been well-conceived attempt to establish extraneous and parallel covert agency with overarching powers of snooping and trespass… without any legislative, judicial or executive oversight whatsoever". सी.बी.आय ने म्हटले की या विभागाने हाताळलेल्या ७००+ केसेसपैकी ४०% अशा हेरगिरीशी संबंधित होत्या. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात यावा ही मागणी संदीप दिक्षित यांनी केली आहे.

असे देशद्रोहाचे आरोप कोर्टात टिकत नसतात. तसेच या प्रकरणी अन्य कोणत्याही कायद्याअंतर्गत आरोप ठेवला तरी देशद्रोहाचा आरोप ठेवता येईल का याविषयी साशंक आहे. तेव्हा या मागणीला तसा फारसा अर्थ नाही असे वाटते. तरीही एक महत्वाची गोष्ट म्हणजे यातून एक गोष्ट समोर येत आहे की पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांसाठी विरोधकांची आघाडी होणे बर्‍यापैकी कठीण आहे. एक तर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासून मोठ्या राज्यांमध्ये मते फिरवू शकतील असे विरोधक- अखिलेश, चंद्रशेखर राव, केजरीवाल वगैरे दूर राहिले. कारण समजायला फार कठीण नाही. त्या यात्रेत सहभागी झाले असते तर राहुल गांधी हेच विरोधकांचे नेते असतील हे एका अर्थी मान्य करण्यासारखे झाले असते. नेमक्या त्याच गोष्टीला ते तयार नव्हते. आताही मनीष सिसोदियांना अटक केल्यानंतर काँग्रेसने फार जाहीर विरोध केला आहे असे दिसले नाही. त्याचे कारण काय असावे? तर त्यातून सिसोदिया आणि आपला उगीच महत्व काँग्रेसकडून दिले गेले असे चित्र उभे राहू नये असे त्या पक्षाच्या नेत्यांना वाटत असावे असे दिसते. आता तर थेट केजरीवालांवर देशद्रोहाचा खटला भरावा अशी मागणी कॉंगेस नेत्याने केली आहे. एकेकाळी शीला दिक्षित स्वतःच्या नावावर दिल्लीत भरपूर मते फिरवू शकायच्या. आता त्या तर गेल्याच आणि संदीप दिक्षितही फार प्रभावशाली नेते राहिले आहेत असे वाटत नाही. पण प्रश्न कोण प्रभावशाली आहे आणि कोण नाही यापेक्षा काँग्रेसच्या नेत्याकडून असे आरोप होत आहेत यामुळे २०२४ मध्ये विरोधकांची एकत्र आघाडी व्हायच्या मार्गात अडचणी आहेत हेच चित्र लोकांपुढे उभे राहते. त्यातून काँग्रेसच्या वरीष्ठ नेतृत्वाकडून संदीप दिक्षित यांच्यावर कारवाई झाली नाही, किमान त्यांच्या मागणीला पक्षाचे समर्थन नाही अशा स्वरूपाचे काही वक्तव्य आले नाही तर हे चित्र अधिक स्पष्टपणे मतदारांपुढे उभे राहायला मदत होईल.

प्रतिक्रिया

इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी घोषणा केली आहे की देश हळूहळू व्हिसा आणि मास्टरकार्डचा वापर बंद करेल. देशांतर्गत पेमेंट सिस्टमच्या वापरास प्रोत्साहन देणे आणि परदेशी संस्थांवरील देशाचे अवलंबित्व कमी करणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे. इंडोनेशियाने या पेमेंट सिस्टम्स टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या निर्णयाचा जागतिक पेमेंट उद्योगावर महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची अपेक्षा आहे, कारण इंडोनेशिया ही एक मोठी आणि वाढणारी बाजारपेठ आहे.

परदेशी पेमेंट प्रणाली टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा विचार करणारा इंडोनेशिया हा पहिला देश नाही. अलिकडच्या वर्षांत, चीन आणि रशिया सारख्या देशांनी त्यांच्या स्वतःच्या पेमेंट सिस्टम विकसित करण्यासाठी आणि व्हिसा आणि मास्टरकार्डवरील त्यांचे अवलंबन कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत.

आणि त्यांच्याकडे तेल आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द !
गुजरत मधल्या कोर्टाने शिक्षा दीली आणी लगेच २४ तासात अध्यक्षांनी कारवाइ केली

संपादित

कपिलमुनी's picture

24 Mar 2023 - 2:34 pm | कपिलमुनी

बच्चू कडू ना २ वर्षे शिक्षा झाली पण अजून आमदारकी आहे, पण २४ तासात रागां ची खासदारकी घालवली .

कुठे गेले त्ये "इम्युनीटी" म्हणल्यावर ओरडणारे ?

बच्चू कडू याना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात एक एक वर्षाच्या शिक्षा झालेल्या आहेत आणि त्या एकत्र भोगायची आहेत म्हणून त्यांची आमदारकी रद्द झाली नाही.

हे मी अगोदर पण लिहिलेले आहे.

परंतु तुम्ही वैयक्तिक प्रतिसाद म्हणून तेंव्हा बोंब मारली होती.

बाकी लिली थॉमसच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दोन किंवा अधिक वर्षे शिक्षा झाली तर आमदार खासदार आपोआप अपात्र ठरतो असा निकाल दिलेला आहे. उद्या जर उच्च/ सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली तर त्यांची खासदारकी वाचू शकते.

आपण आपला अभ्यास करायचाच नाही आणि केवळ पूर्वग्रहदूषित प्रतिसादच द्यायचा ठरवले आहे म्हटल्यावर कोण काय करणार?

सुबोध खरे's picture

24 Mar 2023 - 6:52 pm | सुबोध खरे

Following the verdict, a legislator stands disqualified immediately when convicted for two or more years’ prison.

Read more at:
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/lily-thoma...

प्रसाद गोडबोले's picture

25 Mar 2023 - 11:55 am | प्रसाद गोडबोले

=))))

तुम्हाला असं सारखं सारखं तोंडावर पडताना बघायला फार मजा येत आहे =))))

हे घ्या , ज्या बच्छु कडुंच्या नावाने तुम्ही बोंब मारत आहात तेच स्वतःच तुमच्या लाडक्या श्री.श्री. राहुल गांंधींच्या समर्थनार्थ बोलत आहेत =))))

राहुल गांधीवरील कारवाई चुकीची- बच्चू कडू
https://www.esakal.com/maharashtra/rahul-gandhi-disqualification-bacchu-...

शिवाय ते स्वतःच आमदारकी गेली तरी आनंद होईल असे म्हणालेत =))))

तथास्तु

रागा काय बच्चु कडु काय की तुम्ही काय , तुम्ही सगळे एकाच गटातले आहात , हे असे सारखे सारखे तुम्हाला तोंडावर पडलेले बघायला फार मजा येत आहे.

बाकी २०२४ चे बेटिंग करायचे का सुरु ? ;)
मी म्हणतो ह्या वेळी राहुलजी गांधीजी इंदिराजींचे रेकोर्ड तोडुन ४५०-५०० खासदार निवडुन आणतील , बोला कितीची पैज ;)

विवेकपटाईत's picture

25 Mar 2023 - 7:49 am | विवेकपटाईत

ज्या प्रमाणे आधीच्या तीन केसेस मध्ये राहुल गांधींनी कोर्टात माफी मागितली होती. तसेच या केस मध्ये पण माफी मागितली असती तर बहुतेक त्यांना दंड झाला नसता किंवा कमी झाला असता. लंडन मध्ये असतानाही त्यांनी न्यायपालिके विरुद्ध गरळ ओकले होते. उच्च न्यायालयातून स्थगिती घेऊन शहीद होण्याचे नाटक करून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न. जर न्यायालयातून स्थगिती मिळाली नाही तर लालू यादव अत्यंत प्रसन्न होतील. बाकी भविष्यात प्रियांका सुपुत्र गांधी वारसा चालवणार.

'चिडलेल्या मनोस्थितीत पटकन बोलून गेलो' असं पालुपद चालू ठेवायचं होतं.
ज्या लोकांवर आरोप आहेत, वारंट काढलेलं आहे ते कायद्याच्या कचाट्यात येतीलच. पण सामान्यकरण करायची घाई नडली. तरीही त्यांना यावर अडूनच राहायचं आहे हे दिसलं.

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Mar 2023 - 12:59 pm | चंद्रसूर्यकुमार

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. त्यांना आदरांजली. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते.

कपिलमुनी's picture

29 Mar 2023 - 1:39 pm | कपिलमुनी

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. खासदारकी रद्द झालेले राष्ट्रवादीचे नेते मोहम्मद फैजल यांची लोकसभेतील अपात्रता रद्द करण्यात आली आहे.

फैसल १३ जानेवारीला स्थानिक कोर्टाने निर्णय दिल्यानंतर लोकसभा सदस्यत्व रद्द झालं होतं. यानंतर २५ जानेवारीला हायकोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. या काळात निवडणूक आयोगाकडून पौटनिवडणूक देखील जाहीर करण्यात आली. त्याविरोधात फैसल सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने या तत्परतेबद्दल निवडणूक आयोगाला फटकारलं.

तर आता राहुल गांधींना जर वरच्या कोर्टात जाण्यासाठी तीस दिवस दिले आहेत तर बंगला काढून घेण्याची घाई कशाला करत आहेत?

कंजूस's picture

29 Mar 2023 - 4:02 pm | कंजूस

दोन महिन्यांपूर्वी वार्षीक दहा हजार रु फी दाखवत होती या निळ्या टिकसाठी. आता सात हजार रु दिसतेय.
Blue
@RailwaySeva
@RailMinIndia
सरकार यांची फी भरता असेल?
Grey tick
@AshwiniVaishnaw
ही नवीन आहे. काही अकाउंटला नारिंगीसुद्धा दिसली.

Twitter account पेक्षा रेल्वे /किंवा इतर मंत्रालयं app काढत नाहीत?

पाकिस्तानच्या गुजरातमध्ये रमजान महिन्यात तरावीहची नमाज अदा करण्याच्या बहाण्याने मौलवीने एका मुलावर मशिदीत बोलावून लैंगिक अत्याचार केले. मोहम्मद रियाझ असे नाव असलेल्या आरोपी मौलवीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. गुजरात पोलिसांनी २७ मार्च रोजी आरोपीच्या अटकेची पुष्टी केली.

पाकिस्तानी मीडियामधील वृत्तानुसार, १० मार्च २०२३ च्या रात्री घडली. गुजरातमधील शाहीन चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खालिदाबाद येथील जामिया मस्जिद बुराकमध्ये ही घटना घडली. तक्रारीत म्हटले आहे की, जामा मशिदीचे मौलवी मुहम्मद रियाझ यांनी ९ मार्चच्या रात्री फोन करून मशिदीत येण्यास सांगितले.

मौलवींनी मुलाला मशिदीत तरावीहच्या नमाजाचे नेतृत्व करण्यास सांगितले होते, कारण हा मुलगा हाफिज-ए-कुराण आहे, ज्याचा अर्थ कुराण पूर्णपणे लक्षात आहे. तरावीहच्या नमाजानंतर मशीद समितीचे सदस्य उपलब्ध नसल्याने मौलवींनी पीडित मुलाला मशिदीतच झोपण्यास सांगितले. तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी रियाझने मुलाला दिलेल्या जेवणात झोपेचे औषध किंवा मादक पदार्थ मिसळले.

यामुळे मुलगा रात्री बेशुद्ध पडल्याचे पाहून मौलवी रियाझने त्याच्यावर बलात्कार केले. सकाळी शुद्धीवर आल्यावर मौलवी रियाझने आपल्यावर बलात्कार केल्याचे मुलाने पाहिले. मुलगा उठल्यानंतर मौलवीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याला तोंड बंद ठेवण्याची ताकिद दिली. पण तो मुलागा सांगेल अशा संशयाने मग मौलवींनी मुलाला शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली.

महाराष्ट्र, गुजरात आणि बंगालमध्ये रामनवमीच्या दिवशी दंगली घडवून आणल्या गेल्या असाव्यात असा संशय आहे. जुम्मा नमाज (शुक्रवारच्या नमाज) नंतर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस हाय अलर्टवर आहेत, असे झी न्यूजने म्हटले आहे .
३० मार्च २०२३ रोजी गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील पंजरीगर मोहल्लाजवळ रामनवमीच्या मिरवणुकीवर मुस्लीम लोकवस्तीच्या फतेपूर परिसरात दगडफेक करून हल्ला केला गेला. विश्व हिंदू परिषदेने या हल्ल्याला दुजोरा देताना म्हटले आहे की, हा हल्ला मोठा होता पण भगवान रामाची मूर्ती वाचली.

हावडा येथील शिबपूर परिसरात रामनवमीच्या मिरवणुकीवर इमारतींच्या टेरेसवरून दगडफेक करण्यात आली. महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये, हिंसक जमावाने हिंदूंवर हल्ला केला, दगडफेक केली, वाहने पेटवली आणि राम मंदिरावरही हल्ला केला. जळगाव आणि मालाडमध्येही अशाच घटना घडल्या आहेत.

यामागे एखादा देशव्यापी कट असावा असे वाटते.

कंजूस's picture

4 Apr 2023 - 5:37 am | कंजूस

ब्रिटिशांच्या ताब्यात भारत गेला नसता तर . . .
अर्धा भारत बुरख्यात असता.

कपिलमुनी's picture

31 Mar 2023 - 12:05 pm | कपिलमुनी

एका वर्षात गॅस २२.५० % वाढला आता सगळे टोल १८ % वाढणार आहेत (संपणार कधी देव जाणे !)

या सगळ्यापासून लक्ष हटवण्यासाठी
यामागे एखादा देशव्यापी कट असावा असे वाटते.

सुबोध खरे's picture

3 Apr 2023 - 11:33 am | सुबोध खरे

हायला

आमच्या मोलकरणीचा पगार वाढला, झाडूवाल्याचा वाढला, सरकारी नोकरांचे पगार वाढले, प्राध्यापकांचे पगार वाढले.

आय टी मधील हमालांचे पगार वाढले. जिकडे तिकडॆ पगार वाढले

पण पेट्रोलचे, गॅसचे दर मात्र कमी व्हायला हवे होते ते झाले नाहीत.

नक्कीच देशव्यापी कट आहे.

युगपुरुष केजरीवाल यांनी सर्वाना वीज फुकट दिली, शिक्षण फुकट दिलं पाणी फुकट दिलं

तसा गॅस पण फुकटच मिळायलाच हवाच.

कपिलमुनी's picture

4 Apr 2023 - 1:05 am | कपिलमुनी

२२% प्रतिवर्षी पगारवाढ यापैकी कोणाची झाली ते सांगा ?

सुबोध खरे's picture

4 Apr 2023 - 12:09 pm | सुबोध खरे

२२% प्रतिवर्षी गॅसच्या दरात वाढ झाली आहे का?

उगाच काहींच्या काही?

२२% प्रतिवर्षी वाढली असती तर आता सिलिंडर २४६० रुपये झाला असता

सध्याचा वाढलेला दर हा दर वर्षी ११ % वाढ या दराने आहे.

मास्तरांचा( शिक्षक प्राध्यापक इ) पगार याच काळात १२. २ टक्क्याने वाढला आहे. अर्थात यात मिळालेली बढती आणि त्या अनुषंगिक वाढलेला पगार अंतर्भूत नाही.

कपिलमुनी's picture

5 Apr 2023 - 1:49 pm | कपिलमुनी

gas

या वर्षी आणि प्रतिवर्षी यातील फरक समजून घ्यायचाच नाहीये त्याला कोण काय करणार?

चालू द्या तुमचं वैचारिक बद्धकोष्ठ

जाता जाता -- ते बच्चू कडूंच्या अपात्रतेबद्दल काय झालं

Supreme Court Refuses To Entertain Plea Of 14 Opposition Parties Against 'Misuse' Of CBI & ED ; Says General Guidelines Can't Be Issued LIVELAW NEWS

https://www.livelaw.in/top-stories/supreme-court-sc-plea-fourteen-politi...

कपिलमुनी's picture

5 Apr 2023 - 8:18 pm | कपिलमुनी

तुमची गटार चालू द्या!

>>एका वर्षात गॅस २२.५० % वाढला
असे स्पष्ट लिहिले असतना येउन जिथे तिथे हागून घाण करायची ..

इथून पुढे जशास तसेच उत्तर दिले जाईल !

सुबोध खरे's picture

6 Apr 2023 - 9:45 am | सुबोध खरे

यामागे एखादा देशव्यापी कट असावा

कटाचे काय झाले? ( सुमार केतकरांची आठवण झाली)

आणि

बच्चू कडूंच्या अपात्रतेबद्दल काय झालं ?

कपिलमुनी's picture

6 Apr 2023 - 12:48 pm | कपिलमुनी

स्वतःची चूक दाखवून दिली की लगेच बगल देण्यात एक्स्पर्ट आहात.

सुबोध खरे's picture

6 Apr 2023 - 12:52 pm | सुबोध खरे

तुम्ही स्वतः बद्दल बोला

बच्चू कडू यांचं काय झालं?

१८% टोल दरवाढ मला अतीच वाटतेय. मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग २००१/२ ला बनवला तेव्हा प्रतिवर्षी ३०००० (तीस हजार) गाड्या जातील असे पुढील १५ (का २०?) वर्षे - असे गृहितक होते. २००८/१० नंतर या संख्येत कितीतरी वाढ झाली असेल. रस्त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर अजून तरी वाढवले नाही (आता प्रस्तावित आहे) पण टोल खूप वेळा वाढवला. तसेच या रस्त्यावर सर्वाधिक गरज असून सुध्दा परतीचा टोल दिला जात नाही. हे खूपच विचित्र आहे. पुणे बेंगलोर महामार्गाचा टोल पण खुपदा वाढवला आहे आणि ईकडे तर काम पण निकृष्ट दर्जाचे आहे. वीजबीलाबाबत पण तेच. खुलेआम चालणारी वीजचोरी खपवून घेतली जाते मात्र सर्वसामन्यांची वीज एकदम तत्परेतेने कापली जाते आणि वरुन दरवाढ पण त्यांच्याच माथ्यावर. सरकार कोणतेही असो सर्वसामान्य मध्यमवर्गीयच भाववाढीत भरडला जातो.

प्रसाद गोडबोले's picture

3 Apr 2023 - 12:01 pm | प्रसाद गोडबोले

तुम्ही कधी कधी व्हॅलिड , एकदम योग्य मुद्दे मांडता पण इन जनरल तुम्ही मोदीद्वेष , भाजपद्वेष , हिंदुद्वेष आणि काही अंशी ब्राह्मणद्वेषाने भारलेले आहात हे तुमच्या प्रतिसादांवरुन सातत्याने जाणवत असल्याने तुमच्या योग्य मुद्द्यांवरही अनुमोदन , सहमती , समर्थन एन्डॉर्समेन्ट द्यायची इच्छा होत नाही.

घरुगुती गॅसच्या वापरातील महागाई नियंत्रित ठेवण्यातील भाजपचे अपयश अगदी ठळकपणे लक्षात येण्याजोगे आहे , मात्र त्याच वेळेला रशिया युक्रेन युध्दामुळे जगात पेत्रोल आणि डिझेलच्या किमती भडकल्या आहेत त्या मात्र भाजपाने व्यवस्थित हाताळल्या आहेत , युध्दाचा फायदा घेऊन आपल्या भारतीयांच्या हिताची डील पदरी पाडुन घेण्यातील परराष्ट्र मंत्रालयाचे यश वाखाणण्याजोगे आहे, हेच त्यांना एल.पी.जी बाबत का जमले नसावे हे अनाकलनीय आहे.

टोलवाढ अन्यायकारक आहे ह्यात संदेह नाही, गडकरींनी ह्या आणि पुढच्या कित्येकपिढ्यांची भविष्ये अक्क्षरशः विकली आहेत .

ह्या सगळ्यात सर्वात जास्त कोणी भरडला जात असेल तर तो म्हणजे मध्यमवर्गीय , टॅक्सपेयर , नोकरदार माणुस . पण दुर्दैवाने त्यांची व्होटबॅन्क अशी नाही त्यामुळे मिठाची गुळणी धरुन गप्प बसण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही.

२०२४ मध्ये झक मारत भाजपाला च मत देण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. श्री . श्री .श्री. राहुल गांधी परदेशात जाऊन देशांतर्गत राजकारणा विषयी बरळत आहेत अन त्या निमित्ताने अन्य देश जसे की जर्मनी भारतीय अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करत आहेत , हे भयंकर आहे. हे राहुलगांधी निवडुन आले अन यदाकदाचित पंतप्रधान झाले तर मिंधेपणे ह्या जर्मनीच्या अन अन्य देशांच्या दबाखाली झुकुन नाटोला समर्थन देतील अन रशियासोबतचे व्यावहारिक संबंध भिघडवतील अन तेव्हा पेट्रोल डीझेल च्या किमती काय आभाळाला भिडतील ह्याची कल्पनाच करवत नाही. बाकी टोल बाबत बोलायचेच तर इथे लोणावळ्यअपसुन पार कोल्हापुरपर्यंत सगळे टोल नाके , आणि त्याच्या आसपासचे मतदार संघ कोणाची, कोणत्या राजकीय पक्षाची राखीव कुरणे हे जगजाहीर गुपीत आहे, त्यांनी इतकी टोलवाढ होऊन काहीही केलेले नाही ह्यावरुनच त्यांचे किती साटे लोटे आहे हे सरळ सरळ लक्षात येते !

असो.

कंजूस's picture

4 Apr 2023 - 5:34 am | कंजूस

म्हणजे सपोर्टींग प्राईम ही रु १४०० आहे हे रिफाइनरींनी सांगितले होते चार वर्षांपूर्वी. मग निर्णय घेतला/ठरवले सरकारने की टप्प्या टप्प्यांत ही किंमत गाठायची. म्हणजे अजून दोनशे रुपये वाढतील.

सौम्य शब्दांत चांगले भाषण करतात, चुका दाखवतात.