परवा काही कारणाने बॅकेत गेलो होतो. बँक अगदी पुण्यात, मध्यवर्ती मराठी भागात. पण Relationship Manager, त्याचा रिपोर्टीग मॅनेजर बिहारी, आणि स्वतः ब्रँच मॅनेजर अमराठी. बाकी बराच स्टाफ मराठी असूनही पहिले वाक्य इंग्लिशमधे, पण दुसर्या वाक्यापासूनच हिंदीच सुरु झाले, राहिले.
तेच आमच्या कंपनीतही. १०-१२ लोकांच्या टीममधे केवळ दोनजण अमराठी आहेत. तरीही जेवतांना, कित्येक वेळा कॉलवर सहजच हिंदीत बोलतात. पुण्या-मुंबईत हेच चित्र बहुतांशी खाजगी कार्यालयात पहायला मिळाले. मात्र स्थानिक शासकीय कार्यालयात बहुतांशी मराठीच वापरली जाते.
मी स्वतः लहानपणापासून कित्येक वेगवेगळ्या शहरात/गावात राहिल्याने "'बाहेरील लोकं' इथे यायलाच नको" असे *अजिबात* वाटत नाही. पण निदान महाराष्ट्रात मराठीत बोलायला नको का?नाहितर कार्यालयीन भाषा इंग्लिशमधे बोला.
मराठी राजभाषा दिनानिमित्त सहजच हा विचार/प्रश्न मनात आला.
>>> तुम्ही तुमच्या कार्यालयात कुठल्या भाषेत बोलता?
प्रतिक्रियेत कृपया तुमची Industry आणि शहर/गावही लिहा.
परभाषीयांशी वैर न घेता मराठीत (निदान) बोलणे कसे वाढवता येईल?
प्रतिक्रिया
27 Feb 2023 - 2:21 pm | सतिश पाटील
आपल्याच राज्यात हिंदी इंग्रजीच्या कुबड्या घेणे म्हणजे भीक मागायची लक्षणे आहेत, कार्यालयीन कामात फक्त कामापुरतेच इंग्रजी आणि हिंदी, नंतर बिनधास्त मराठी.
28 Feb 2023 - 12:15 am | प्रसाद गोडबोले
मी आधी कट्टर मराठी आग्रही होतो , पण मध्यंतरी मराठी लोकांचे - त्यातही "विशिष्ठ लोकांचे " काही इतके वाईट अनुभव आले की ह्या असल्या नीच लोकांची भाषा बोलायचीच नाही असा टोकाचा निर्णय घेतला . मी आता सार्वजनिक जीवनात मराठी बोलणे अल्मोस्ट बंद केले आहे. इंग्रजीत बोलल्यावर सर्वसामान्य मराठी माणुस बिथरतो अन हिंदीत बोलल्यावर बिचकुन बोलतो असेही लक्षात आलेले आहे .
आता मराठीचा वापर नाहीच , वापरलीच तर शुध्द पुणेरी ब्राह्मणी बोली , न च्या जागी न ण च्या जागी ण. एकदम सुस्पष्ट अन सानुनासिक , तीही केवळ अध्यात्मिक संतसाहित्य वगैरे संदर्भात अभ्यास करायला.
बाकी मराठीत बोललोच तर केवळ काड्या सारायला.
#ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु दे =)))) ;)
28 Feb 2023 - 7:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> तुम्ही तुमच्या कार्यालयात कुठल्या भाषेत बोलता?
मराठी
औरंगाबाद.
-दिलीप बिरुटे
28 Feb 2023 - 3:18 pm | श्वेता व्यास
पुणे--आयटी--अनौपचारीक-मराठी/औपचारीक-इंग्रजी
28 Feb 2023 - 4:06 pm | अमर विश्वास
समोरच्याला कळेल अशा भाषेत
सगळे मराठी असतील तर मराठीतच .. पण एखादा अमराठी असेल तर हिंदी / इंग्लिश ....
28 Feb 2023 - 4:43 pm | धर्मराजमुटके
ठिकाण : मुंबई / ठाणे
सुरुवात नेहमी मराठीतच. बहुधा अनेक दाक्षिणात्य, गुजराती मराठी बोलतात. ज्यांना कळत नाही ते हिंदीतून सुरुवात करतात मग मी हिंदी वर जातो.
आवश्यकता असेल तर गुजराती, हिंदी इंग्रजी. दाक्षिणात्य असेल तर दोन चार शब्द (वणक्कम, नन्री वणक्कम, सोलूंगा, चेपन्डी इ. इ.) समोरच्याला खुश करण्यासाठी. मुळात समोरचा माणुस मराठी बोलायला उत्सुक असतोच. आपण ज्या राज्यात राहतो तिथली भाषा थोडी तरी यावी असे बाहेरच्याला वाटत असते पण आपणच त्याला हतोस्ताहित करत असतो असे माझे मत.
28 Feb 2023 - 7:51 pm | आलो आलो
प्रथमतः माझी कौटुंबिक पार्श्वभूमिका सांगतो (गरजेचे आहे) - माझी मातृभाषा मराठी नाही पण तरीही महाराष्ट्रातील हि आमची ३ री पिढी असल्याने (शिक्षण इंग्रजी) पण आजोबा वडिलांच्या व्यवसायापासून ते माझ्या व्यवसायापर्यंत आणि आई मराठी विषय शिक्षिका व बायको मराठीची प्राध्यापिका असल्याने मराठीशी जास्त संपर्क आणि घराबाहेर शक्यतो मराठीच बोलतो.
माझ्या कार्यालयात व्यवसायानिमित्त माझे २ प्रकारच्या लोकांशी जास्त संपर्क येतो
१) मी विक्रेता भूमिकेत
२) मी खरेदीदार भूमिकेत
प्रसंग १ ) मी जेव्हा खरेदीदार असतो त्या वेळी मी संभाषणाची सुरुवात मराठीतूनच करतो समोरचा कोणत्याही राज्यातील असो (शक्यतो गुजरात, दिल्ली किंवा राजस्थान ) त्या त्या वेळी माझी भाषा समजून घेण्यात ते लोक कष्ट घेऊन प्रयत्न करतात आणि भाऊ किंवा दादा असल्या विशेषणांनी युक्त त्यांची मातृभाषा + हिंदी + मराठी असे संभाषण होते.
एक निरिक्षण असे आहे कि जेव्हा आपण भाषिक आग्रह धरून त्या भूमिकेत असतो त्या वेळी परभाषिक माणूस जो आपल्याला काहीतरी पटवण्याच्या उद्देशात असतो त्या वेळी तो थोडा दबून गेलेला असतो व जास्त संभाषण करून आपल्याला त्याच्या सोयीने वळवण्याचा जास्त प्रयत्न करत नाही. थोडक्यात म्हणजे त्यांच्या बेस प्राईस वर लवकर येतो.
प्रसंग २) मी जेव्हा विक्रेता असतो त्या वेळी मी संभाषणाची सुरुवात मराठीतच करतो पण समोरील व्यक्ती जर मराठी समजत नाही अशी भूमिका घेतो त्या वेळी मी त्याच्याशी त्याला समजेल अशा भाषेत बोलतो. (या वेळी मात्र मी अधिक सावधगिरीने माझ्या बेस प्राईस च्या वर डील कशी राहील यासाठी प्रयत्न करतो प्रत्येक वेळी त्यात यश मिळेलच असं नाही पण तरीही योजनाबद्ध असे प्रयत्न करतो.)
पण आल्यावर स्वागत व जाताना निरोप मात्र मराठीतूनच.
प्रथमश्रेणी कर्मचारी - तिन्ही अमराठी (एक राजस्थानी २ गुजराथी) आणि त्यांच्या गावीच असतात त्यांच्याशी मात्र इंग्रजी + हिंदी आणि बाकी कर्मचारी वर्ग सगळा मराठीच असल्याने संभाषण मराठीतच होते.
असे गरजेनुसार प्राथमिकता असते - म्हणून "प्रसंगोचित" असे संभाषण कार्यालयात होते.
असो कोणताही पक्ष आपण फक्त मराठीचेच भक्त
2 Mar 2023 - 5:43 am | nutanm
आमचया कार्यालयात 1००% मराठी सक्ती . कार्यालय घर मुंबई. असल्याने मराठा बोलणे लिहिणे मराठीच आहे सक्तीने. मुंबई.
8 Mar 2023 - 10:47 am | शानबा५१२
वरचा एक प्रतिसाद वाचला, त्यातला 'नी*' शब्द आवडला. आता कटु अनुभव एवढे वाढलेत की असे मत लगेच बनते. माझे बोलाल तर मी जास्त करुन मराठी बोलतो, ऑफीस आता घरच झाले आहे. पण अन्य ऑफिसमध्ये असताना मी त्याम्च्या भाषेत बोलतो, मराठि म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत हे मत अजुन टिकुन आहे.
9 Mar 2023 - 6:21 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
आधी चेन्नई,बंगळुरु,हैद्राबाद,गुजरात.. म्हणजे महाराष्ट्राबाहेर राहणार्या मराठी लोकांना तेथील स्थानिक भाषा शिका असा आग्रह धरायला हवा. अन्यथा ह्या मराठी लोकांचा बराच वेळ हा गणेशोत्सव साजरा करणे, वडापावाचे,मिसळपावाचे महात्म्य स्थानिक लोकांना सांगणे ह्यात जात असतो.
15 Sep 2023 - 3:24 pm | केदार पाटणकर
उत्तर - मराठी
17 Sep 2023 - 9:56 am | उग्रसेन
यत्र तत्र सर्वत्र मराठी
18 Sep 2023 - 2:46 pm | अहिरावण
मराठी सोडून जगात भाषा आहेत? नवीनच माहिती
19 Sep 2023 - 6:38 pm | विजुभाऊ
मी मराठीतच बोलतो. जिथे हिंदी भाषीक असतील त्यांच्याशी सर्वप्रथम मराठी मधे आणि त्यांना समजेल नाही तर इंग्रजीमधे बोलतो.
ते देखील समजले नाहीतर गुजराथी किंवा पंजाबी मधे बोलतो.
फारच गरज पडली तर राजस्थानी ( मारवाडी) मधे बोलतो.
इतक्या सगळ्या भाषा समजल्या नाहीत तर तमीळ किंवा जर्मन मधे सुरवात करतो.
19 Sep 2023 - 8:56 pm | अमरेंद्र बाहुबली
मराठी नी इंग्रजी. हिंदी भाषीकांसमोर त्यांच्या भाषेत बोलून लाळघोट्यापणा करणे मला जमत नाही,