विंडोज एक्सपीची सीडी कस्टमाईझ करा!!!

तात्या विंचू's picture
तात्या विंचू in काथ्याकूट
15 Dec 2008 - 6:58 pm
गाभा: 

आपली ऑपरेटींग सिस्टीम अपडेट आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आपण अनेकदा वेबसाईटवरुन वेगवेगळे पॅचेस, सिक्युरीटी अपडेटस, सर्व्हिस पॅक्स डाउनलोड करत असतो. पण आपल्या दुर्दैवाने आपली ओएस क्रॅश होते. विंडोज ऑपरेटींग सिस्टीम वापरणार्‍या बर्‍याच जणांना हा अनुभव असेल. ओएस इन्स्टॉल केल्यानंतर पुन्हा आपला पीसी पुर्ववत होण्यासाठी परत सगळे पॅचेस, सिक्युरीटी अपडेटस, सर्व्हिस पॅक्स इन्स्टॉल करावे लागतात. कारण आपल्याकडे ऑपरेटींग सिस्टीमची फक्त बेसिक इन्स्टॉलेशनची सीडी असते. कधी कधी ह्या सीडी मध्ये आवश्यक असे ड्रायव्हर्स नसतात. ते आपल्याला परत टा़कावे लागतात. ह्या सगळ्या प्रकारात बराच वेळ जातो. ह्या सगळ्या कटकटींपासुन सुटका करण्यासाठी आपण करुया आपल्या काँप्युटरसाठी कस्टमाईझ केलेली सीडी, ज्यात असतील तुम्हाला लागणारे सर्व ड्रायव्हर्स ,पॅचेस, सिक्युरीटी अपडेटस आणि सर्व्हिस पॅक्स!!!

यासाठी लागेल डॉटनेट फ्रेमवर्क २.०, nLite 1.4.9.1, तुमची विंडोज ऑपरेटींग सिस्टीमची बेसिक सीडी आणि तुम्हाला लागणारे सगळे ड्रायव्हर्स ,पॅचेस, सिक्युरीटी अपडेटस आणि सर्व्हिस पॅक्स.

१. डॉटनेट फ्रेमवर्क २.० मायक्रोसॉफ्टच्या साईटवर मिळेल. सध्या लेटेस्ट .नेट फ्रेमवर्क ३.५एसपी१ आहे. ते टाकले तरी चालेल. मी २.० टाकले आहे.

२. http://www.nliteos.com/ या साईटवरुन nLite 1.4.9.1 डाउनलोड करा.

३. ऑपरेटींग सिस्टीमची बेसिक सीडी तुमच्याकडे असेलच.( नसली तर तुम्हाला शक्य असलेल्या सर्व उपायांनी मिळवा!! :) म्हणजे खरेदी अथवा कॉपी, टॉरेंट, पी२पी, इत्यादी... )

४. ड्रायव्हर्स तुमच्या काँप्युटरच्या उत्पादकाच्या साईटवर मिळतील. बाकी पॅचेस, सिक्युरीटी अपडेटस आणि सर्व्हिस पॅक्स साठी मायक्रोसॉफ्ट आहेच!

माझ्याकडे विंडोज एक्सपी सर्व्हिस पॅक १ ची सीडी आहे. या सीडीमध्ये मी एक्सपी सर्व्हिस पॅक ३ आणि साटा ड्रायव्हर इंटीग्रेट केला. (साटा ड्रायव्हरमुळे तयार होणरी नवी सीडी लॅपटॉपवर एक्सपी इन्स्टॉल करण्यासाठी सुद्धा चालेल!!! :) )

कॄती:

१. सर्वप्रथम डॉटनेट फ्रेमवर्क इन्स्टॉल करा. त्यानंतर nLite इन्स्टॉल करा.

२. एक्सपीची सीडी तुमच्या हार्डडिस्कवर कॉपी करा. लागणारे सर्व ड्रायव्हर्स ,पॅचेस, सिक्युरीटी अपडेटस आणि सर्व्हिस पॅक्स एका वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह करा.

३. nLite सुरु केल्यावर येणार्‍या विंडोमध्ये तुम्ही कॉपी केलेल्या एक्सपी फोल्डरचा पाथ द्या. पाथ दिल्यावर तुमच्या सीडीविषयी माहिती दिसुन येइल.

४. नेक्स्ट क्लिक केल्यावर आधीचे सेशन लोड करायची विंडो येइल. nLite पहिल्यांदाच रन केलेले असल्याने सेशन नसतील. पुन्हा नेक्स्ट क्लिक!!

५.आता येते टास्क सिलेक्शनची विंडो. मी सर्व्हिस पॅक आणि साटा ड्रायव्हर इंटीग्रेट करणार असल्याने फक्त लागणारे ऑप्शन्स सिलेक्ट केले.

६.सर्व्हिस पॅकच्या .exe फाईलचा पाथ सिलेक्ट बटनावर क्लिक करुन द्या. सर्व्हिस पॅकच्या फाईल्स एक्सॅट्रॅक्ट करुन nlite त्या फाईल्स विंडोजच्या सेटअपमध्ये इंटीग्रेट करेल. ही सर्व प्रोसेस झाल्यावर तुम्हाला तुमच्या सेटअपची व्हर्जन बदलल्याचे दिसुन येइल.

७. आता येइल ड्रायव्हर सिलेक्शनची विंडो. यात ड्रायव्हरसोबत असलेल्या .inf फाईलचा पाथ द्यावा लागेल. त्याबरोबर nlite .inf फाईलमध्ये असलेले सगळे ड्रायव्हर्स दाखवेल. हे ड्रायव्हर्स कुठल्या मोडमध्ये (पीएनपी की टेक्स्टमोड) इन्सर्ट करायचे हे सिलेक्ट करावे लागेल. पीएनपी म्हणजे प्लग & प्ले. या मोडमध्ये इन्सर्ट केलेले ड्रायव्हर्स विंडोज सुरु झाल्यावर लोड होतील. टेक्स्टमोड मध्ये इन्सर्ट केलेले ड्रायव्हर्स विंडोज सुरु होताना म्हणजे बूट होताना लोड होतील. आता मी टेक्स्टमोडमध्ये ड्रायव्हर्स इन्सर्ट केले.

८.ड्रायव्हर्स इंटीग्रेट केल्यावर .iso फाईल तयार करण्याची प्रोसेस चालू होइल. ही .iso फाईल तुमच्या ड्राईव्हवर सेव्ह करा. किंवा तुम्हाला हवे असल्यास डायरेक्ट सीडीवर राईट करा.

९. .iso फाईल तयार झाल्यावर कस्टमायझेशन फिनिश्ड म्हणून विंडो येइल. ही .iso फाईल निरोमधून सीडीवर राईट करता येइल.

प्रतिक्रिया

अनंत छंदी's picture

15 Dec 2008 - 7:48 pm | अनंत छंदी

नमस्कार!
कॉम्प्युटरबद्दल मला फारशी माहिती नाही. पण काही दिवसांपूर्वी मी एका ठिकाणी घोस्ट इन्स्टॉलरच्या सहाय्याने सेटअप सिडी तयार केलेली पाहिली आहे. समजा जर काही कारणास्तव हार्डडिस्क फॉर्मेट करण्याची पाळी आली तर त्या सिडीच्या सहाय्याने काही क्षणात सगळी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता येतात. ही सिडी कशी तयार करावी हे आपण मला सांगू शकाल का? मला प्रोग्रामींग लँग्वेजचे ज्ञान नाही. कृपया सहकार्य करा.

लिखाळ's picture

15 Dec 2008 - 8:51 pm | लिखाळ

बरोबर.
आपल्या सी ड्राईवची एक इमेज सिडीवर लिहून ठेवायची आणि वेळप्रसंगी उपयोगात आणायची असे करताना मी सुद्धा काहिंना पाहिले आहे. मी संगणक घेतला तेव्हा तसे करुन ठेवण्याचा सल्ला मला स्नेह्यांनी दिला होता. पन ती इमेज कशी करायची ते मला माहित नाही. इथे त्याबद्द्ल सुद्धा माहिती दिली तर बरे होईल. तसेच लेखामधल्या पद्धतीमध्ये आणि या पद्धतीमध्ये काय फायदे तोटे आहेत ते पन कळाले तर बरे.

लेखातले एकही चित्र दिसले नाही. महत्वाची माहिती दिल्याबद्द्ल आभार.
-- लिखाळ.

आजानुकर्ण's picture

15 Dec 2008 - 8:57 pm | आजानुकर्ण

लायनक्समध्ये हे करणे फार सोपे आहे. विशेषतः उबुंटूमध्ये अगदी डाव्या हाताचा मळ. http://www.psychocats.net/ubuntu/backup

आपला
(उबुंटूप्रेमी) आजानुकर्ण

लिखाळ's picture

15 Dec 2008 - 9:03 pm | लिखाळ

अच्छा.. उबंटुबद्दल तुम्ही मागे मोठा लेख लिहिला होता.. तेव्हापासूनच ते वापरुन पहावे असे मनात आहे.
पाहू कधी जमते ते :)
-- लिखाळ.

तात्या विंचू's picture

16 Dec 2008 - 1:26 pm | तात्या विंचू

परत नव्या साईटवर फोटो अपलोड केले आहेत. आता दिसण्यास प्रॉब्लेम नसावा..
आधी दिलेल्या फोटोंची लिंक ब्लॉगवरुन कॉपी केली होती. त्यामुळे दिसत नसावेत फोटो...

तात्या विंचू's picture

17 Dec 2008 - 7:04 pm | तात्या विंचू

घोस्ट इन्स्टॉलरच्या सहाय्याने सेटअप सिडी तयार केलेली पाहिली आहे
याची मला माहिती नाही. हे मी कधीही करुन बघितलेले नाही अथवा माझ्या माहितीतल्या कोणी केल्याचे आठवत नाही..
माहिती मिळाल्यास नक्की कळवीन...

चैतन्यकुलकर्णी's picture

15 Dec 2008 - 10:42 pm | चैतन्यकुलकर्णी

काही दिवसांपुर्वी मी विंडोज लाईव्ह प्रकाराने एक सीडी तयार केली होती. ती पद्ध्तदेखील उपयोगी पडू शकेल. लायनक्स च्या लाईव्ह सीडीप्रमाणे विंडोजदेखील वापरता येते, इंस्टॉल करावे लागत नाही. दुरूस्तीच्या कामात उपयोगी पडते.
त्यापमाणेच http://www.reactos.org/en/about.html यासाईटवर ओपनसोर्स विंडोज (मायक्रोसॉफ्ट कडून नाही) प्राथमिक अवस्थेत मिळू शकेल.
इतर प्रकारांनीही आयएसओ इमेज तयार करता येते.

माहितीबद्द्ल धन्यवाद.

शोध घेत रहा ... उत्तमतेचा, नाविन्याचा आणि सत्याचा!

सखाराम_गटणे™'s picture

16 Dec 2008 - 1:33 pm | सखाराम_गटणे™

>>माहितीबद्द्ल धन्यवाद.
सहमत

----
सखाराम गटणे

आनंदयात्री's picture

16 Dec 2008 - 3:10 pm | आनंदयात्री

>> डॉटनेट फ्रेमवर्क २.० मायक्रोसॉफ्टच्या साईटवर मिळेल. सध्या लेटेस्ट .नेट फ्रेमवर्क ३.०एसपी१ आहे. ते टाकले तरी चालेल. मी २.० टाकले आहे.

चुक लेटेस्ट फ्रेमवर्क ३.५ आहे.

>>३. ऑपरेटींग सिस्टीमची बेसिक सीडी तुमच्याकडे असेलच.( नसली तर तुम्हाला शक्य असलेल्या सर्व उपायांनी मिळवा!! म्हणजे कॉपी, टॉरेंट, पी२पी, इत्यादी... )

तुम्ही पायरसीला चालना देत आहात ??

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Dec 2008 - 3:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>>३. ऑपरेटींग सिस्टीमची बेसिक सीडी तुमच्याकडे असेलच.( नसली तर तुम्हाला शक्य असलेल्या सर्व उपायांनी मिळवा!! म्हणजे कॉपी, टॉरेंट, पी२पी, इत्यादी... )
तुम्ही पायरसीला चालना देत आहात ??

याकडे कुणाचं लक्ष आहे का? पायरसी हा माझ्या माहितीततरी गुन्हा आहे.

आनंदयात्री's picture

16 Dec 2008 - 3:17 pm | आनंदयात्री

>>याकडे कुणाचं लक्ष आहे का? पायरसी हा माझ्या माहितीततरी गुन्हा आहे.

संपादक मंडळाचे इकडे लक्ष आहे का ?

(असे संपादक मंडळाचे लक्ष वेधणे अवांतर प्रतिसादात मोडते का ? )

तात्या विंचू's picture

17 Dec 2008 - 7:07 pm | तात्या विंचू

खरेदी ऑपशनपण टाकला आहे...

दिपक's picture

16 Dec 2008 - 3:11 pm | दिपक

माहितीबद्दल धन्यवाद :)

आयएसओ इमेज मध्ये ’पावर आयएसओ’ आणि ’मॅजीक आयएसओ’ ने पण बदल करु शकतो.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Dec 2008 - 11:31 am | घाशीराम कोतवाल १.२

झकास आहे हे लय झाक हाय राव मला आवडला बर
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...