मदत हवी आहे - कोरिया भ्रमण

विअर्ड विक्स's picture
विअर्ड विक्स in काथ्याकूट
17 Jan 2023 - 5:01 pm
गाभा: 

दक्षिण कोरियाला ( जोंगि ) ३०-४५ दिवस ट्रेनिंग साठी जावयाचे आहे . तर पुढील संदर्भात माहिती हवी होती
१. शाकाहारी जेवण उपलब्धता - भारतातून डाळ व तत्सम पदार्थ कोरियात विमानातून नेऊ शकतो का ?
२. हवामान - जबर थंडी चा मोसम आहे तर हीटर व तत्सम कपडे रास्त दारात उपलब्ध होतील का भारतातून आणणे श्रेयस्कर ?
३. भाषा काठिण्य - इंग्रजी सहज बोलली जाते व कोणते विशिष्ट app डाउनलोड करावे लागेल भाषा सुलभतेसाठी ?
४. सिम कार्ड - गरज आहे का भारतीय ४G फोन चालतील वायफायवर ?
५. ट्रॅव्हल अडाप्टर व तत्सम विशिष्ट उपकरणे - गरज ?

अनेक दिवसांनी मिपावर आल्याने कुठल्या सदनात प्रश्न टाकावा याबाबत घोळ झाला असल्यास चूकभूल द्यावी घ्यावी.

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

18 Jan 2023 - 3:01 am | राघवेंद्र

जेजू बेटावर जाऊन या. बऱ्याच कोरियन टीव्ही सिरीयल मध्ये उल्लेख असतो.

होम टाउन चा चा चा नेटफ्लिक्स वर बघितले असतील तर Pohang City पण जाऊन या.

बाकीच्या प्रश्नावर बाकीच्या प्रश्नावर जास्त माहिती नाही.

फेसबुक वर दक्षिण कोरीयामधील भारतीयांचे समुह असतील त्यात विचारा. तिथे माहीती मिळण्याची जास्त शक्यता आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Jan 2023 - 12:14 pm | राजेंद्र मेहेंदळे

सॅमसंग / एल जी/ह्युंदाई मध्ये काम करणारे कोणी मित्र किवा परीचित असतील तर लगेच माहिती मिळू शकेल. बाकी माझा पास.

कंजूस's picture

19 Jan 2023 - 1:06 pm | कंजूस

कंबोडायण - रवि वाळेकर.
चौफेर समाचार दिवाळी अंक २०२२.
लेखक फक्त शाकाहारी जेवणावर निरनिराळे देश कामानिमित्त (जिंदाल कंपनीत नोकरी) )फिरले आहेत. (सुमात्रा, कंबोडिया,इजिप्त वगैरे. ) पुस्तकेही लिहिली आहेत. यांच्याकडून माहिती मिळण्याची शक्यता अधिक.

खेडूत's picture

19 Jan 2023 - 2:16 pm | खेडूत

डाळी, मसाले नेता येतात.

कार्यालयात सगळे इंग्रजी बोलतात. तरुणांना इंग्रजी अजून बरी जमते. गूगल translate वापरून आपले म्हणणे स्क्रीन द्वारे सांगता येईल.

थंडीचे कपडे, थर्मल वेर, कानटोपी, मोजे आवश्यक, पण तिथे अजून चांगले मिळतात. विशेषतः जॅकेट आणि बूट.

आपले 4G रोमिंग मध्ये ठेवल्यास मोफत इन कमिंग एसेमेस मिळवून भारतातल्या बँकेचे व्यवहार करता येतात. बाकी फोन वत्सप वापरून करता येतात.
कोरियन मंडळी वात्सप ऐवजी ककाव टॉक वापरतात तेही वापरणे बरे पडते.

युनिव्हर्सल अडप्तर प्लग घेऊन जाणे चांगले, तिथेही मिळतो. पण लॅपटॉप आणि मोबाईल असे दोन नेहेमी वापरावे लागतात, एकतरी घेऊन जावे.

हल्ली शाकाहारी लोकांना खायला काही तरी मिळणे तुलनेने सोपे झाले आहे. मिश्र आहारी असाल तर प्रश्नच नाही.

बाकी प्रवासाला शूभेच्छा! तिथले फोटू वैगेरे टाकून भटकंती बद्दल सांगा.

खेडूत's picture

19 Jan 2023 - 2:16 pm | खेडूत

डाळी, मसाले नेता येतात.

कार्यालयात सगळे इंग्रजी बोलतात. तरुणांना इंग्रजी अजून बरी जमते. गूगल translate वापरून आपले म्हणणे स्क्रीन द्वारे सांगता येईल.

थंडीचे कपडे, थर्मल वेर, कानटोपी, मोजे आवश्यक, पण तिथे अजून चांगले मिळतात. विशेषतः जॅकेट आणि बूट.

आपले 4G रोमिंग मध्ये ठेवल्यास मोफत इन कमिंग एसेमेस मिळवून भारतातल्या बँकेचे व्यवहार करता येतात. बाकी फोन वत्सप वापरून करता येतात.
कोरियन मंडळी वात्सप ऐवजी ककाव टॉक वापरतात तेही वापरणे बरे पडते.

युनिव्हर्सल अडप्तर प्लग घेऊन जाणे चांगले, तिथेही मिळतो. पण लॅपटॉप आणि मोबाईल असे दोन नेहेमी वापरावे लागतात, एकतरी घेऊन जावे.

हल्ली शाकाहारी लोकांना खायला काही तरी मिळणे तुलनेने सोपे झाले आहे. मिश्र आहारी असाल तर प्रश्नच नाही.

बाकी प्रवासाला शूभेच्छा! तिथले फोटू वैगेरे टाकून भटकंती बद्दल सांगा.

१. मोठी चेक इन बॅग घेऊन जा
२. तुम्ही साधारणतः महिनाभरासाठीच जात आहात त्यामुळे तुम्ही खालील गोष्टी नक्कीच घेऊन जाऊ शकता -
साधरणतः ३ किलो तांदूळ, शक्यतो १ किलो मूग डाळ, अर्धाएक किलो अर्धी लाल मसूर डाळ (या डाळी कूकरशिवाय शिजतात), मॅगी मसाल्याची पाकिटे, तूर डाळ हवी असल्यास तशी रेडि टू कूक पाकिटे , इतर पदार्थांची रेडि टू कूक पाकिटे उदा. परंपरा, एम्टीआर, चितळे अशा ब्रँड्स्ची पाकिटे, घरचा मसाला, जरूरीपुरते जिरे-मोहरी, फरसाण-भडंग इत्यादी. तेल, भाज्या कोणत्याही मार्टमध्ये किंवा किराणा दुकानांमध्ये स्वस्त मिळतात. शिवाय तिकडे चोवीस तास उघडी असणारी कन्विनियन्स स्टोअर्स असतात. तिथे ऐन वक्ताला सगळ्या गरजेच्या गोष्टी मिळतात.
३. कपडे - कपडे लवकर घाण होत नाहीत त्यामुळे शर्ट-पँट अगदी दोन जोड सुद्धा पुरेसे आहेत. परंतु थंड प्रदेशांत वेशभुषेची सगळ्यात कार्यक्षम पद्धत म्हणजे - लेयरिंग, किंवा कांदेपद्धत. याचे फायदे अनेक असतात.. इनडोअर सगळीकडे हीटर असतात त्यामुळे बाहेरचे कपडे पटकन काढता येतात आणि हवे तितके अंगावर ठेवता येतात. शिवाय तिथे कपडे स्वस्त नाहीत त्यामुळे खालील वस्त्रे भारतातूनच न्यावीत-
१. दोन ते तीन जोड थर्मल-जोड - जॉकीचे लोकरी किंवा सुती थर्मल उत्तम ( वरचे खालचे दोन्ही प्रत्येक दोन नग)
२. दोन जोड नेहमीचे शर्ट पॅंट. पँट शक्यतो जीन्स
३. दोन चांगले स्वेटर/जाड स्वेटशर्ट्स, किंवा पुलोव्हर्स. शक्यतो एक/दोन स्वेटर आणि एक जाड पुलोव्हर घ्या. जर थंडी जास्त असेल तर ते एकावर एक घालायला अजिबात बिचकायचे नाही.
४. एक गरम वींडचीटर. हे मात्र आतमध्ये गरम अस्तर असलेले आणि बाहेरून वॉटरप्रूफ असलेले हवे.. हे तुम्हाला थंडीत, हलक्या पावसात भारतातही वापरता येते. त्यामुळे हे थोडे जास्त दर्जाचे घेतले तरी त्याचा भारतात उपयोग होतोच.. वुडलँड, वाईल्डक्राफ्ट अशा भारतीय ब्रँडची जॅकेटस उत्तम मिळतात.
५. जाड, आतून मऊ अस्तर असलेली लोकरी टोपी आणि गळ्याभोवतीचा मफलर. माकड्टोपी वगैरे घेऊ नका. ते फार बेंगरूळ दिसते.
६. सहा ते सात जोड जाड मोजे ( पुन्हा एकावर एक घालायला बिचकायचे नाही )
७. अजिबात लवकर घसरणार नाहीत असा तळवा असलेले बूट ( जर बर्फ असेल तर हम्खास घसरतातच) त्यामुळे तळवा जितका अँटीस्किड असेल तितका चांगला. बूट सुद्धा वॉटर रेझिस्टन्ट असेल तितका बरा. एकदम वुडलँड, पाणी शोषून घेणारा कातडी नको. आतून अस्तर असलेला विंटरबूट किंवा स्नोबूट असे अमॅझॉनवर सर्च करून बघा. जर तापमान -२० पर्यंत खाली उतरत असेल तर नद्या, नाले यांच्या सानिद्ध्यातल्या भागात जाऊ नका. पायाची हातांची बोटे गोठतात.
८. लक्षात ठेवा.- जितके जास्तीत जास्त लेअरिंग करता येतील असे स्वेटर, पुलोव्हर्स, जॅकेटस घ्या..उदा. सब झिरो थंडीत - अंतर्वर्स्त्रे + थर्मल्स( जास्त थंडी असेल तर एकावर एक) + शर्टपँट + स्वेटर/पुलोव्हर + जॅकेट असा वेश करावा. एकच एक मोठाले विंटर जॅकेट भारतात परत उपयोगी नसते आणि ते प्रॅक्टीकलही नसते.
९. कपडे धुण्यासाठी सगळीकडे शक्यतो मशीन्स अस्तातच. परंतु हॉटेल्समध्ये सुद्धा ड्रायर वेगळे आणि कॉमन अस्तात. तिथे कॉइन्स टाकून तुम्हाला कपडे ड्राय करता येतात.
१०. एक छत्री अवश्य घ्या.
११. गरम हातमोजे घ्या. हे तिकडे घेतले तरी चालतील. भारतात इन्सुलेटेड हातमोजेदेखील मिळतात. खूपदा मोबाईल बाहेर वापरावा लागतो तेव्हा हातमोज्यांची कटकट होते. तरीही ते उपयोगी आहेत.
१२. कोणत्याही धातुच्या गोष्टीला हात लावण्यापूर्वी थोडी काळजी घ्या. विशेषतः बेसिनचे नळ इत्यादी. गरम कपड्यांमुळे सगळीकडे स्टॅटिक चार्जचे चट्चट छोटे छोटे शॉक बसतात!!

४. प्रसाधने - लॅक्मे किंवा निविया बॉडी लोशन/मिल्क(अंघोळीनंतर हे अंगाला भरपूर चोपडावे), शाम्पू/कंडिशनर/तेल, बॉडी वॉश, नेहमीचे टूथपेस्ट+ब्रश आणि तुमची नेहमीची 'साधने'
५. एकतरी युनिव्हर्सल अ‍ॅडॅप्टर प्लग हा हवाच हवा.
६. आंतरराष्ट्रीय इंटरनेट पॅक मारावा. शक्य असेल तिथले वायफाय वापरावे.
७. सोलच्या आसपास असाल तर कोणत्याही कन्विनियन्स शॉप मध्ये, मेट्रो स्टेशनांवर ट्रॅव्हल कार्ड मिळतात. त्यांना टी मनी कार्ड म्हणतात. किंवा एखाद्या जुन्या सहकार्‍याचे तसले कार्ड घेऊन ते रिचार्ज करून घ्यावे. रिचार्ज करण्याची मशीन्स सगळे कडे उपलब्ध असतात. कोणत्याही कन्विनियन्स शॉपमध्ये सुद्धा रिचार्ज करून मिळते. याचा उपयोग सगळीकडे चालतो. बस, टॅक्सी, मेट्रो इत्यादी इत्यादी.. बसमध्ये जाताना समोरून आत जावे आणि जाता येता कार्डरीडरवर कार्ड दाखवावे. सोल मेट्रोरिजन मध्ये अ ते ब या दोन जागांमधले अंतर आणि वेळ या दोघांचे गणित घालून तुमचे तिकीट आपोआप कापले जाते. त्यामुळे प्रवास कसाही केला तरी किंमत बदलत नाही. त्यामुळे असे कार्ड लवकर हस्तगत करणे उत्तम.
८. याँगसन मार्केटमध्ये आपले निगोशिएशन्स स्किल पणाला लावून नवीन मोबाईल, हार्ड डिक्स, कॅमेरे इत्यादी घ्यावेत. निगोशिएशन्स करायला कचरू नये. इतर टुरिस्ट मार्केट मधून फारसे काही खरेदी करू नये. काही अंडरग्राऊंड शॉपिंग सेंटर असतील तर तिथे स्वत दुकाने बघूनच खरेदी करावी.
९. सोलमधली काही फिश मार्केट अप्रतिम आहेत..अनेक हॉटेल्स स्वस्त आणि खूप चवदार नॉनव्हेज अन्न देतात. आपल्या कोरियन सहकार्‍यांशी मैत्र वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत तुम्ही रोज दुपारचे जेवण अशा ठिकाणी घेऊ शकता. सहकार्‍यांसोबत, वरिष्ठांसोबत सोजू पिताना काही कस्टमस असतात त्यांचा आदर तुम्ही ठेवलात तर त्यांना खूप आनंद होतो. तुम्ही नॉनव्हेज नाही आहात पण मत्स्याहार करण्याचा जर तुम्हाला साक्षात्कार झालाच तर या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. ( काय एकेकाचे नशीब असते! ओरितांग सारखे बदकाचे प्रचंड चविष्ट स्ट्यू तुमच्या पुढ्यातल्या टेबलावरच शिजवून देणारे बैठी व्यवस्था असलेले अनेक रेस्टॉरंट्स, हजारो बार्बेक्यू हॉटेलं, एकाहून एक माशांचे प्रकार, उत्तम दर्जाचे बीफ, जागोजागी मिळणारे गोडसर फ्राईड चिकन, हजारो प्रकारांची नूडल्स सुपे, सोजू आणि साके, जिन्रो, कास सारख्या बीयर्स नुसत्या आठवणींनीच व्याकूळ झालो! ). शक्यतो नो फिश, नो मीट असे सांगावे लागते. जर तुम्ही एकदम कडक शाकाहारी असाल एका कागदावर हे लिहून प्रिंट काढून ठेवा आणि दाखवा-

저는 채식주의자입니다. 육류와 해산물을 먹지 않기 때문에 채식주의 식단을 찾고 있습니다.

먹지 못하는 것들:

육류 (소, 돼지, 닭, 양 등)

육류로 우려낸 육수나 국물

해산물 (생선, 굴, 조개, 랍스터, 오징어, 새우 등)

해산물이나 어패류로 우려낸 육수나 국물

먹을 수 있는 것들:

사찰음식 (विहारातले/साधुंचे जेवण)

우유, 치즈 등 유제품

१०. काही गोष्टी सोलमध्ये करता येतात त्या अशा - नानाविध मार्केट पालथी घालणे, एखादा नवीन ४डी सिनेमा पाहणे
११. धन्यवाद म्हण्णे, रांगेत उभे राहणे, अगदी चिटपाखरूही नसलेल्या रस्त्यावरदेखील ट्रॅफिक सिग्नल न तोडता रस्ता न ओलांडणे, नम्र असणे, म्हातार्‍या टॅक्सी ड्रायव्हरांशी संवाद साधणे (तरूण लोक खूप स्वमग्न असतात), इथे तिथे थुंकी, पिचकार्‍या न मारणे या गोष्टी तुम्हाला सांगायला लागणार नाहीत याची मला खात्री आहे तरीही हे वाचणार्‍या इतर लोकांसाठी मुद्दामहून सांगावेसे वाटते.

१२. टॉयलेट पेपरची सवय नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही. बहुतेक कोरियन ढुंगण पुसण्यापेक्षा धुणेच पसंद करतात. त्यामुळे शक्यतो सगळीकडे इलेक्ट्रिक टॉयलेट सीट्स अस्तात. ते सीट गरम राखतातच परंतु, गरम पाणी, गरम वाफ इत्यादी गोष्टी अस्तातच. त्यामुळे कोणतेही बटण दाबण्यापूर्वी आधी फक्त एकदा नीट तपासून घ्या! नाहीतर दोन फूट उडाल!! (परंतु जिथे पाण्याची व्यवस्था नाही तिथे मात्र कागदाने ढुंगण पुसून कागद फ्लश करावा. कागद डस्टबीन मध्ये टाकू नये ही सुद्धा आगावू सूचना). सगळीकडे अतिशय स्वच्छ सुलभ शौचालये असतात. तिथे जर ऐच्छिक पैसे असतील तर आवर्जून थोडे पैसे टाका. मॅप मध्ये तुम्हाला जवळची शौचालये जरूर दिसतात.

१३. गुगल मॅपनुसार प्रवास करावा. मेट्रो, बसेस इत्यादी.. मॅपमध्ये मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडण्याचे किंवा प्रवेशण्याचे गेट नंबर दिलेले असतात त्यानुसारच जावे. कधी कधी गेट लांबवर असतात.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

19 Jan 2023 - 6:28 pm | हणमंतअण्णा शंकर...

जवळ जवळ सगळीकडे फ्लोअर हिटींग असते. त्याचा नॉब कुठे आहे याची खात्री करून घ्या. हॉटेलांमध्ये इनफ्लोअर हिटिंग शक्य्तो केंद्रिय पद्धतीने नियंत्रित करतात त्यामुळे काळजी नसावी. एखादी स्लीपर/सपाता जरूर घ्या.

नावातकायआहे's picture

20 Jan 2023 - 3:10 am | नावातकायआहे

नुसत्या आठवणींनीच व्याकूळ झालो!
सांगप्साल
बिमिंभाप
बिंभाप
सांग्प्सथाल
बुल्गोगी

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Jan 2023 - 7:19 am | राजेंद्र मेहेंदळे

उपयुक्त माहिती. विशेषतः #१२ वाचुन भावुक वगैरे झालो. मला टॉयलेट पेपर वापरायला अजिबात आवडत नाही. कुठल्याही देशात मी पाणीच वापरतो. :)

चौकस२१२'s picture

20 Jan 2023 - 7:22 am | चौकस२१२

त्यामुळे शक्यतो सगळीकडे इलेक्ट्रिक टॉयलेट सीट्स अस्तात. ते सीट गरम राखतातच परंतु, गरम पाणी, गरम वाफ इत्यादी गोष्टी अस्तातच. त्यामुळे कोणतेही बटण दाबण्यापूर्वी आधी फक्त एकदा नीट तपासून घ्या! नाहीतर दोन फूट उडाल!!

हे वाचून एक वात्रट विनोद आठवला ....
फक्त उडालं असे नाही तर "इतरही इजा " होऊ शकते एवढेच सांगतो ...

या बाबतीतीतील चीन मधील एक अनुभव .. त्यातील शॉचालयात लिहिलेले मी प्रथम गमतीने "चिनी पद्धतीचे हुकेलेल इंग्लिश " म्हणून सोडून दिले होते नांतर त्यातील तर्क समाजाला आणि गोम लक्षात आली

कमोड च्या "शीटवर " एक प्लास्टिक चे आवरण होते एकदा जणू पायमोजा.. आणि पाटी होती कि " "तुमचा कार्यभाग संपल्यावर फ्लष तर कराच पण नंतर हिरवे बटन दाबा / परंतु एकदा "बसलात " कि मात्र हे हिरवे बटन दाबू नका ! काय कळत नव्हतं हे आधी आणि नंतर असे का ते !
मी सूचना पाळली ... आणि मग लक्षात आला कि "बसलेले असताना " जर चुकून हिरवे दाबले तर काय झाले असते .. ते बटन हे प्लास्टिक चा पायमोजा बदलून पुढील स्वच्छ मोजा सरकत यावा म्हणून होते ... चुकीचं वेळेस दाबले असते तर चांगली कातडी सोलली गेली असती
असो ... अजून तरी येथे तरी असली ऍडव्हान्स शॉचालये फारशी नाहीत त्यामुळे बरे आहे म्हणायचे ...

भटकंतीच्या तंबू बदलही माहिती हवी आहे.

तैवान कोरिया आणि इंडोनेशिआ देशांत "बुद्धिस्ट टेम्पल फूड" असे विचारले असता शाकाहारी जेवण मिळते. कोरियांत तर बुद्धिस्ट देवळांत सुद्धा जेवण दिले जाते आणि ते चांगले सकस आणि शाकाहारी असते. एका कागदावर त्यांच्या भाषेंत लिहून न्या. तुम्ही राहतअसाल तिथे जवळ एखादा बौद्ध विहार आहे तर पाहून घ्या चांगले जेवण मिळेल.

चौकस२१२'s picture

20 Jan 2023 - 7:25 am | चौकस२१२

तैवान कोरिया आणि इंडोनेशिआ देशांत "बुद्धिस्ट टेम्पल फूड" असे विचारले असता शाकाहारी जेवण मिळते.
शोधली तर अशी शुद्ध शाकाहारी बुद्ध उपहारगृहे हि मिळतात " त्यातील मेनू हा दिसायला मांसाहारी असतो पण सर्व पदार्थ हे सोया किंवा ग्लूटेन पासून बनवलेले असतात अर्थात तेथील चवीने .

साहना's picture

21 Jan 2023 - 12:42 pm | साहना

टोफू

विंजिनेर's picture

23 Jan 2023 - 12:26 pm | विंजिनेर

कोरियात मुरलेल्या मिपाकराचा प्रतिसाद पाहून मीच १०-१२ वर्षं मागे गेलो. अचूक आणि विस्तृत प्रतिसादाबद्दल हबिणंदण..
जाता जाता - हॉटेल आणि कंपनीचा पत्ता कोरियन (हांगूल) भाषेत लिहून त्याची प्रिंटाआउट जवळ ठेवणे - टॅक्सी ड्रायवरला दाखवायला हमखास उपयोगी पडेल

कंजूस's picture

23 Jan 2023 - 2:27 pm | कंजूस

माझ्याकडे दोन आहेत.
एक ट्रावल गाईड २०१३मधले आहे.

विअर्ड विक्स's picture

26 Jan 2023 - 7:53 pm | विअर्ड विक्स

धन्यवाद. भटकंती झाली तर लेख टंकायचा जरूर प्रयत्न करेन

विअर्ड विक्स's picture

26 Jan 2023 - 8:54 pm | विअर्ड विक्स

१. काटा चमचा सहज उपलब्ध होईल का हॉटेलात ? स्टिक ने खाता येत नाही
२. covid गाईडलाइन शोधल्या , विशेष काही दिसल्या नाहीत अपवाद चीन paasenger . isolation वगैरे आहे का ?