गाभा:
नमस्कार , माझी कन्या सध्या पुण्यामध्ये फर्स्ट इयर बीबीए करतेय. २ वर्षानंतर कॅट साठी किंवा नामांकित बी स्कूल मध्ये एमबीए साठी प्रवेश घेण्यासाठी तयारी कशी करावी आणि दोन वर्ष्यामध्ये आणखी काय काय कोर्स करता येईल कि जेणेकरून पुढील करिअर मी मध्ये उपयोगी पडतील जसे कि .. भाषा , ऍडव्हान्स एक्सेल , इंग्लिश स्पिकिंग, डिजिटल मार्केटिंग . पुण्यामध्ये मध्ये कॅट साठी चांगले क्लास कोणते आहे आणि निवड कशी करावी. बीबीए फायनास मध्ये करण्याचा विचार सुरु आहे सोबत बँकिंगची तयारी करता येईल का सध्या वेळ असल्याने तयारी आतापासून करावयाची आहे , तरी कृपया मार्गदर्शन करावे
प्रतिक्रिया
16 Jan 2023 - 5:58 pm | चौथा कोनाडा
मटा / सकाळ सारखी प्रतिथयश दैनिके कॅट संदर्भात दरवर्षी मार्गदर्शनासाठी सेमीनार आयोजित करत असतात, त्यात नामवंत वक्ते, मार्गदर्शक आणि क्लासेस येत असतात त्याचा नक्की उपयोग होईल.
हे कदाचित उपयोगी असू शकेल: कॅटसाठी मार्गदर्शन
16 Jan 2023 - 7:15 pm | श्रीगुरुजी
तुमची कन्या प्रथम वर्ष बीबीए करतीये म्हणजे ती २०२५ मध्ये बीबीए होईल. म्हणजे नोव्हेंबर २०२४ मध्ये होणारी कॅट, डिसेंबर २०२४/जानेवारी २०२५ मध्ये होणाऱ्या सिंबायोसिसच्या स्नॅप, NMIMS च्या NMAT, झेविअरची XAT व त्याच कालखंडात होणाऱ्या MAT, CMAT अश्या विविध शिक्षणसंस्थांच्या विविध प्रवेश परीक्षा तिला देता येतील, जेणेकरून २०२५ मध्ये सुरू होण्याची नवीन शैक्षणिक वर्षात तिला एम बी ए सुरू करता येईल. महाराष्ट्र सरकारची एम बी ए साठी स्वतःची वेगळी सीईटी आहे जी साधारणपणे मे-सप्टेंबर या कालावधीत होते व त्याच शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र सरकारची मान्यता असलेल्या शिक्षण संस्थेत एम बी ए साठी प्रवेश मिळतो.
एम बी ए अभ्यासक्रम असणाऱ्या शेकडो शिक्षणसंस्था आहेत. प्रत्येक शिक्षणसंस्था स्वतःची वेगळी प्रवेश परीक्षा घेते. अश्या किमान २० प्रवेश परीक्षा मला माहिती आहेत कारण मागील वर्षी माझी मुलगी याच प्रक्रियेतून गेली होती.
कॅट परीक्षा दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी असते. त्या परीक्षेच्या तयारीसाठी साधारणपणे १ वर्ष आधी म्हणजे आदल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये बहुतेक नामवंत प्रशिक्षण संस्था प्रशिक्षण वर्ग सुरू करतात. तुमच्या मुलीला नोव्हेंबर २०२४ मध्ये कॅट द्यायची असेल तर नोव्हेंबर/डिसेंबर २०२३ मध्ये प्रशिक्षण सुरू करावे लागेल. या परीक्षेच्या तयारीसाठी अंदाजे १ वर्ष पुरेसे आहे. त्याहून जास्त काळ प्रशिक्षणाची आवश्यकता नाही.
प्रवेश परीक्षेत आवश्यक पर्सेंटाईल मिळाल्यास नंतरची पायरी म्हणजे Group Discussion, Personal Interview and Writing Ability test. याचाही प्रशिक्षणात समावेश असतो. ही प्रक्रिया साधारणपणे फेब्रुवारीत सुरू होऊन पुढील ३-४ महिने सुरू असते व प्रत्येक शिक्षणसंस्थेची स्वतःची वेगळी प्रक्रिया असते. परीक्षा शुल्क, पुढील प्रक्रियेचे शुल्क, प्रशिक्षण शुल्क यास बराच खर्च येतो.
पुण्यात Career Launcher, IMS, TIME या चांगल्या प्रशिक्षण संस्था आहेत.
मिपा सदस्य क्लिंटन यांनी IIM (Ahmadabad) मधून एम बी ए केलंय. ते IMS मध्ये गेस्ट कोच आहेत. त्यांच्याशी संपर्क साधल्यास ते संपूर्ण माहिती देऊ शकतील.
17 Jan 2023 - 7:27 pm | चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद.
मीच तो. या आय.डी वर व्य.नि करा. मग माझा नंबर देतो आणि पुढचे फोनवरच बोलू.
19 Jan 2023 - 1:13 pm | चौथा कोनाडा
भारीच की !
अजून कोणकोणते आयडी आहेत ?
20 Jan 2023 - 4:24 pm | rain6100
माहितीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद , आपण आपल्या मुलींसाठी कोणती कॉलेज निवडली होती आणि बॅकअप कोर्स कोणते केले होते? जर्मन किंवा स्पॅनिश भाषा शिकण्याचा फायदा काय होईल . तुम्ही या प्रवासातून गेल्यामुळे आपले अनुभव सांगावे व दोन वर्षात चांगली तयारी कशी करता येईल याबद्दल मार्गदर्शन करावे
17 Jan 2023 - 12:41 pm | राजेंद्र मेहेंदळे
प्रतिसादातुन चांगली माहिती समजली.
मला ईंजिनीयरिंगबद्दल असेच डिटेल्स मिपाकरापैकी कोणी देउ शकेल काय? (आय आय टी सोडुन)
आत्ता १२ वी सायन्सला असणारे पी सी एम चे विद्यार्थी बोर्ड परीक्षेसाठी ७५ टक्के मिळवायच्या खटपटीत आहेत (कारण नियम सारखे बदलत आहेत, कधी म्हणतात सी ई टी आणि बोर्ड परीक्षेला ५०/५० वेटेज तर कधी दुसरेच आही). ही परीक्षा फेब्रुवारीत होईल. त्यानंतर महाराष्ट्रातील ईंजिनीयरिंगच्या अॅडमिशनसाठी सी ई टी द्यावी लागेल. तसेच कट ऑफ च्या मार्कांसाठी तसेच राज्याबाहेरच्या कॉलेजसाठी जे ई ई द्यावी लागेल.यात एन आय टी वगैरे आले. बिटस कॉलेजसाठी बिट सॅट द्यावी लागेल आणि ईतर काही कॉलेजच्या आपापल्या प्रवेश परीक्षा असतील. (उदा. व्ही आय टी) तर
---महाराष्ट्रातील् किवा बाहेरची चांगली ईंजिनीयरिंग कॉलेजेस कोणती?
---विषय नक्की ठरवुन कोणतेही कॉलेज निवडावे की चांगल्या कॉलेजामध्ये कोणताही विषय मिळाला तर घ्यावा? उदा. सी ओ ई पी/वालचंद मध्ये अॅडमिशन मिळाल्यास कोणताही विषय चालेल का कंप्युटर्/ईलेक्ट्रॉनिक्स ला अॅडमिशन मिळाल्यास कोणतेही कॉलेज चालेल?
---मेकॅनिकलमध्ये बी ई नंतर काय संधी आहेत? विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्रात--
--ईंजिनीयरिंग बी ई साठी बाहेर च्या देशात जावे का नंतर मास्टर्स साठी?
--ईंजिनीयरिंग सोडुन बारावी सायन्स नंतर काय करता येईल? बी एस सी+एम एस सी? बी सी ए+एम सी ए? किवा अजुन काही?
अॅडव्हान्समध्ये धन्यवाद!!