ह्या दोन बातम्यांमध्ये एवढा विरोधाभास का आहे?

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in काथ्याकूट
27 Dec 2022 - 10:03 pm
गाभा: 

नोंद : 'चर्चा' ह्या लेखन प्रकाराखाली दीलेले हे खालील आवाहन, सुचना वाचली आहे. व ते लक्षात ठेऊन लिहत आहे.

केवळ कुठल्यातरी बातमीचा दूवा (लिंक) देवून याविषयी तूमचे मत काय? असे प्रश्न विचारू नये. त्याचर्चे बाबत तुम्ही गंभीर आहात किंवा किमान तुम्ही त्याबाबत विचार करताय हे लोकांना कळल्यास त्यांना त्याचर्चेत सहभागी व्हायला आवडेल.

नमस्कार मिपाकरांनो,
मी विओन (WION) ह्या युट्युबवरील बातमी देणा-या चॅनलचा फॅन आहे म्हणजे मला ते चॅनल फार आवडते. त्यातल्या पल्की शर्मा ह्या आता ते चॅनल सोडुन गेल्या. झी न्युजचे एडीटर सुनील चौधरी (अकाली सफेद केस असणारे) हे ह्या चॅनलचे ही एडिटर आहेत असे मध्ये वाचनात आले होते. मुख्य एडिटर कि ज्युनिअर की संपादकीय हे ह्या धाग्याच्या स्कोपच्या बाहेर आहे व काही महत्वाचे नाही.
महत्वाचे हे आहे की कुठे कुठली बातमी दीली जात होती. तर मी बोलतोय त्या ह्य खालील विओनवरच्या बातम्या:

https://www.youtube.com/watch?v=JXQIGh-4i14&ab_channel=WION

https://www.youtube.com/watch?v=PABFUzK34LQ&ab_channel=WION

ह्या गुणी विओन चॅनेलला त्या भाड-गुणी गुगल कंपनीने ईतर बातमी देणा-या चॅनल्सबरोबर युक्रेन-रशिया युध्दादरम्यान बॅन केले होते. तेव्हा पल्की शर्मांचा 'आयकॉन' आणि वरती एक स्लोगन असा ट्वीट माझ्यासारख्या भावना असलेल्या व्यक्तीने ट्विटर वर फिरवला(?). ती बातमी व ती ईमेज पुढील बातमीत दीसते : https://www.wionews.com/india-news/ukraine-war-coverage-youtube-backs-do...

आणि त्याला ईतका पाठींबा मिळाला की ईतर सर्व चॅनल्स बॅनच, बंदच राहीली. पण गुगलला त्या प्रचंड पाठींब्यापुढे झक मारुन मघार घ्यावी लागली, हरावे लागले. आणि आमच्या पल्की मॅडम पुन्हा विओनवर अवतरल्या. आणि आता त्यांचा वारसा ईतर व्यक्ती त्याच जोमाने चालवत आहेत हे बघुन उर भरुन येतो, हे सांगणे मला अतिशयोक्ती नाही वाटत.
ते असो, तर ह्या दोन बातम्या बघुन ईतर कोणाच्याही, अगदी आपल्याही होतील अशा माझ्या भावना, समजुत झाल्या. त्या खालीलप्रमाणे:
i. गेल्या वेळेला अगदी ह्याचप्रमाणे चायनाबद्द्ल बातम्या येत होत्या पण त्यावेळी २ ते ३ महीन्यांनी भारतात कोरोना आला. ह्यावेळी चायनाचा आकडा त्याहीपेक्षा मोठा आहे व ह्या बातम्या मी गेल्या १५ ते २० दीवसांपासुन बघत आहे, मग ह्यावेळी सुध्दा? पुन्हा?? कारण चीनमधली सध्याची स्थिती खुपच भयानक वाटत आहे, अगदी पहिल्यापेक्षा (ह्या भावना ह्यां बातम्यामुळे तयार झाल्या, ते साहजिकच आहे.)
ii. ह्या बातम्या विओनवरच्या आहेत ह्याला सिरीयस घेउन पुढच्या कामांबद्दल निर्णय बदलावे का? काही एक, दोन महीन्यांकरता?

म्हणजे एवढ्या गंभीरपणाने मी ह्या बातम्यांचा विचार करत होतो. कोणीही जी व्यक्ती सतर्क आहे ती असा विचार करेल, अश्या बातम्या विओनसारख्या गुणी चॅनेलने दील्या असल्याने. पण तेव्हाच........
अंड सडले की त्याचा जो दुर्गंध येतो व अशा घाण उपमा ज्यांना खर म्हणजे चांगल्या ठरतील त्यापेक्षा खालच्या दर्जाचेही न्युज मिडीया असते हे मला आठवले. अश्या काही चॅनल्सना अ‍ॅडब्लॉकर चिटकवुन बघु लागलो. तर हे टपकले;

https://www.youtube.com/watch?v=7G-63oIHry0&ab_channel=ABPMAJHA

हेभीपी म्हाजावर वरच्या अर्थाची बातमी ऐकली तेव्हा खरच खुप घाण शब्द तोंडात आले. नको तिथे सकारात्मकता पसरवणे, म्हणजे फसवणुक करणे अस मला वाटत, कळत व समजत. कोणाचे भले करणे ह्याला नाही बोलत. आता फक्त ही बातमी ज्यांनी बघितली त्यांच्या व माझ्या विचारांत, म्हणण्यात फरक असणार हे पण साहजिकच आहे.

कृपया ह्या दोन बातम्यांमधील विरोधाभास कोणी स्वानुभवाने, विश्वासु (विओनसु) माहीतीने,आकलनावर आधारलेल्या ज्ञानाने देऊ शकेल काय?

प्रतिक्रिया

ह्या बातमीमधली ३ ते १० मिनिटे सबटायटल्स ऑन करुन नीट लक्ष देऊन, वाचुन समजुन घ्या. साउथ कोरीया, जपान व ब्राझील मध्ये कोरोना पुन्हा सुरु झाला सुध्दा आहे (दीनांक २७ डिसेंबर २०२२). आता रे काय कारायचं? मी तर लवकर चिकन खाउन घेतो. :-)))))

ठराविक बातम्या देतच नाहीत किंवा एखाद्यावर भर देतात. अशी कित्येक उदाहरणे आहेत. त्यामुळे दोन तीन विरोधी चानेल्स पाहा.

साहना's picture

28 Dec 2022 - 3:47 pm | साहना

तृष्णा - भाग ५

चीन मधील बातम्यांना जास्त गांभीर्याने घेऊ नका. कालच एका अमेरिकन परिसंवादात ट्रम्प ऍडमिन मधील एक व्यक्ती आणि चीन रशिया विशेषज्ञ ह्यांच्यातील संवाद ऐकायला मिळाला. चिनी अध्यक्ष चि ह्यांची महत्वाकांक्षा होती कि आगामी काही वर्षांत चीन अमेरिकेहून कितीतरी जास्त सुसज्ज आहे असे सिद्ध करणे. ट्रम्प ऍडमिन मधील व्यक्तींनी एक किस्सा सांगितला कि ते जेंव्हा चीन मध्ये होते तेंव्हा चि च्या भेटीनंतर ते चिनी प्रीमियर (आमचे राष्ट्रपती जसे फोटोला तोंड आणि हाराला गळा म्हणून असतात त्या प्रकारचे पद ) ह्यांच्या औपचारिक भेटीसाठी गेले. ली केकोन्ग ह्यांनी साधी सोपी चर्चा करायचे सोडून एक भले मोठे भाषण देऊन चीन ला अमेरिकेची अजिबात गरज नसून, अमेरिकेची लायकी चीन ला फक्त शेत माल विकायची आहे असे सांगितले. त्या संवादानंतर ट्रम्प ह्यांनी "किमान शेतमाल तरी तुम्हाला विकू शकतो ह्याचा अमेरिकेला आनंद आहे" असे म्हटले आणि सर्व अमेरिकेन दल त्यावर हसले.

तात्पर्य हे कि चिनी महत्वाकांक्षा आणि चिनी ताकत ह्यांतील खरी तफावत कोविड मुळे जगजाहीर झाली. कोविड रोखण्यात चीनला अपयश आले आणि त्यानंतर लस निर्माण करण्यात अपयश आले. त्याशिवाय कोविड रोखण्यासाठी चिनी यंत्रणेने ज्या पद्धतीने काम केले त्यामुळे देशांत असंतोष माजला. त्या तुलनेत सर्व लोकशाही देशांनी कितीही वाद घातला तरी कोविड ला मात दिली.

चिनी अध्यक्ष चि ह्यांच्या मते कोविड मुळेच चिनी यंत्रणेच्या त्रुटी जगजाहीर झाल्या. त्यामुळे त्यांच्या चमच्यानी त्यांना झिरो कोविड ची युक्ती दिली आणि त्यातून त्यांच्या मर्यादा आणखीन उघड्या पडल्या.

चीन मध्ये वैद्यापेक्षा रोग बरा हि परिस्थिती आहे आणि त्यांत विविध महत्वाकांक्षा असलेले पार्टी पदाधिकारी विविध प्रकारच्या बातम्या पसरवत आहेत. त्यामुळे नक्की कुठली बातमी सत्य हे आम्हाला काळाने मुश्किल आहे.

पण आपण ह्या प्रतिसादाला तॄष्णा - ५ हे नाव का दीले आहे? मी आपल्याला त्याचा पुढचा भाग कधी येईल, कधी येईल असे प्रतिसादात किंवा खरड मध्ये विचारणार होतो. मी वेगळा प्रतिसाद लिहुन लेखांना दाद दीली पण ह्याबाबत नाही लिहले कारण ईतर सदस्यांनी आधिच पुढच्या भागाबद्दल विचारले होते व आपण काहीच प्रतिक्रीया दीली नव्हती.
होय पण तृष्णा - भाग ४ खाली 'क्रमशा;' नव्हते. पण ती कथा अधुरी राहीली आहे त्याला काहीतरी शेवट द्या असे सांगवस वाटते. मला ती कथा, शब्दमांडणी, त्यातली नावे, वर्णने खुप खुप आवडली होती. कितीतरी दीवसांनी ईथे अशा दर्जाचे, उंचीचे लिखाण झाले व वाचायला मिळाले. त्यासाठी आपले धन्यवाद.
कृपया आपण तृष्णा - भाग ५ लिहुन त्या कथेला एक चांगला(?) शेवट द्या. प्लीज.

ईथे, ह्या लेखाशी तृष्णा - भाग ५ चा संदर्भ, सबंध काय हे समजण्या ईतका मी आर्ट्समध्ये हुशार नाही.

शानबा५१२'s picture

30 Dec 2022 - 8:24 am | शानबा५१२

half of the passengers test positive

https://www.youtube.com/watch?v=7YXTmnyiiQE

हे काय आता सीरीयस नाही? गेल्यावेळीसुध्दा चायनाने व्हायरस पसरवायची सुरुवात ईटलीमधुन केली होती.