ठाणे ' मिपा ' कट्टा

श्रीयुत संतोष जोशी's picture
श्रीयुत संतोष जोशी in काथ्याकूट
14 Dec 2008 - 6:30 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,
ठाण्याला एखादा ' मिपा कट्टा ' आयोजित करावा असे फार दिवसांपासून मनात आहे.
सर्वांची अनुमती असेल तर दि. २८ / १२ / २००८ रोजी सायंकाळी चालेल का ?
स्थळ :
'लक्ष्मी केशव कार्यालय' खोपट ठाणे (प.)
बाकी इतर प्रोग्राम नंतर ठरवता येतील .

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

14 Dec 2008 - 6:32 pm | विनायक प्रभू

कट्टा सात्विक का असात्विक ते कळवा
अंमळ असात्विक वि.प्र.

श्रीयुत संतोष जोशी's picture

14 Dec 2008 - 6:36 pm | श्रीयुत संतोष जोशी

कसाही .
जमलेली मंडळी जे ठरवतील ती पूर्व .

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

चन्द्रशेखर गोखले's picture

14 Dec 2008 - 6:43 pm | चन्द्रशेखर गोखले

आम्ही परळ्कर आलो तर चालेल का..? खुप दिवसा पासुन तात्या आणि मंडळीं ना भेटायची ईच्छा होती म्हणुन विचारतो..? आलो तर किती वाजता...?

चन्द्रशेखर गोखले's picture

14 Dec 2008 - 6:43 pm | चन्द्रशेखर गोखले

आम्ही परळ्कर आलो तर चालेल का..? खुप दिवसा पासुन तात्या आणि मंडळीं ना भेटायची ईच्छा होती म्हणुन विचारतो..? आलो तर किती वाजता...?

श्रीयुत संतोष जोशी's picture

14 Dec 2008 - 6:53 pm | श्रीयुत संतोष जोशी

अहो गोखले साहेब ,
मी ठाणे मिपा कट्टा लिहिले म्हणजे मी ठाण्याला राहतो म्हणून.
संपूर्ण भारतातील आणी भारताबाहेरील सुद्धा मिपा सदस्यांचे हार्दिक स्वागत.

वेळ : दु. ४.०० ते रात्री कितीही .

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

सखाराम_गटणे™'s picture

14 Dec 2008 - 7:49 pm | सखाराम_गटणे™

मी पण येयीन

>>'लक्ष्मी केशव कार्यालय' खोपट ठाणे (प.)
पत्ता थोडा पुन्हा देता का?

----
सखाराम गटणे

सर्वसाक्षी's picture

14 Dec 2008 - 7:59 pm | सर्वसाक्षी

कट्टा अवश्य आयोजित करा, काही मदत होण्यासारखी असेल तर करायला आवडेल. मी २५ पासून बाहेर जात आहे, पण २८ ला संध्याकाळी परत येत आहे तेव्हा नक्की येईन.

विसोबा खेचर's picture

14 Dec 2008 - 8:22 pm | विसोबा खेचर

उत्तम कल्पना आहे, कृपया सगळ्यांनी अवश्य येण्याचे करावे...

तात्या.

टारझन's picture

14 Dec 2008 - 8:36 pm | टारझन

तात्या मी पण येऊ का ? पण हल्ली माझ्या मर्कटलिलांनी रागावल्यामुळे आपण मला मारणार तर नाही ना ?
बहुदा २३ ला आम्ही मुंबैत लैंडवू ...

- (तात्या मारतो की काय च्या भितीत) टारुबाळ
(छ्या ह्या सह्यांच्या विडंबणाची खोड कशी मोडावी बरं ? )

विसोबा खेचर's picture

15 Dec 2008 - 1:29 am | विसोबा खेचर

तात्या मी पण येऊ का ? पण हल्ली माझ्या मर्कटलिलांनी रागावल्यामुळे आपण मला मारणार तर नाही ना ?

अरे नक्की ये.. :)

अनामिका's picture

15 Dec 2008 - 1:27 am | अनामिका

लक्ष्मी केशव कार्यालय म्हणजे प्रताप च्या समोरचे का?
"अनामिका"

देवदत्त's picture

15 Dec 2008 - 1:29 am | देवदत्त

मी ठाण्यातच आहे. जमल्यास मी ही येईन. काय ते नंतर कळवतो.

कशिद's picture

15 Dec 2008 - 2:00 am | कशिद

मी पण येऊ का ?

अंतरंग....'s picture

15 Dec 2008 - 8:56 am | अंतरंग....

मी मिपा वर नवीन आहे कोणाला ओळखत नाही,
पण आले तर चालेल का ?,
मी नौपाड्यातच राहतो,

प्रभाकर पेठकर's picture

16 Dec 2008 - 12:44 pm | प्रभाकर पेठकर

पण आले तर चालेल का ?,
मी नौपाड्यातच राहतो,

हा प्रकार कळला नाही.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

अमोल केळकर's picture

15 Dec 2008 - 9:30 am | अमोल केळकर

मला ही यायला आवडेल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विसोबा खेचर's picture

15 Dec 2008 - 10:20 am | विसोबा खेचर

सगळ्यांनी अवश्य या.

नक्की येणार असणार्‍यांनी येथे कन्फर्म करावे..

तात्या.

धमाल मुलगा's picture

15 Dec 2008 - 10:44 am | धमाल मुलगा

मी पण येतोय....असं टंकायला निघालो आणि तारीख पाहिली... तारखेवरुन वार पाहिला... :( रविवार!!!!
छ्या: म्हणजे मी संध्याकाळपर्यंत पुण्यात असणार...रात्री पावणेअकराच्या दरम्यान आमची यश्टी वंदनाच्या थांब्यावर येणार....त्याच्या पुढे कोणि भेटू शकेल काय? :?

विनायक प्रभू's picture

15 Dec 2008 - 3:37 pm | विनायक प्रभू

एखाद्या रविवारी ३ तास सर्व कामे आधी आटोपली म्हणुन काय बिघडते.

आम्ही नक्की येऊ.

मन्जिरि's picture

15 Dec 2008 - 11:36 am | मन्जिरि

जरा वेळ्-टाइम निशित कराल का?

मदनबाण's picture

15 Dec 2008 - 2:14 pm | मदनबाण

जमल्यास मी पण येईन.. :)

(ठाणेकर)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

फक्त संदीप's picture

15 Dec 2008 - 4:31 pm | फक्त संदीप

:)] जमल्यास मी पण येईन.. :D :D

(नवी मुंबईकर.............................)
डिझाईनींगच्या विचारात गढुन गेलेला SANDEEP

स्वाती दिनेश's picture

15 Dec 2008 - 5:01 pm | स्वाती दिनेश

अरे वा, संतोष.. कट्ट्याचे संयोजन तू "उत्तम"च करणार यात शंका नाही, कट्ट्याला शुभेच्छा!!
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Dec 2008 - 7:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वातीताई आणि संतोषराव, "मेन्यू काय बरं असेल" हा विचार करुन बरीच लाळ गळली! :-)

क्रुपया ५ नन्तर ठेवावे ही विन् न्ती
प्ली जज ज ज ज
~ वाहीदा

पद्मश्री चित्रे's picture

16 Dec 2008 - 9:41 am | पद्मश्री चित्रे

त्याच दिवशी ऑफीस ट्रेनिंगसाठी पुण्याला जात आहे..
पुन्हा कधीतरी..

Is it a new year Blast Party ??
याला मराठित काय म्हणतात ते येत नाही तेव्हा शमस्व !
~ वाहीदा

विनायक प्रभू's picture

16 Dec 2008 - 7:38 pm | विनायक प्रभू

ब्लास्ट मंजे काय?

मनस्वी's picture

16 Dec 2008 - 8:22 pm | मनस्वी

नववर्ष धमाका संमेलन

पुण्यातले लोक खास गाडी करुन येऊ शकतात.

शक्यतो कट्टा सकाळीच ठेवावा. दिवसभर भरगच्च कार्यक्रम असुद्या.

सुनील's picture

16 Dec 2008 - 7:39 pm | सुनील

पुण्यातले लोक खास गाडी करुन येऊ शकतात
नक्कीच! आणि हो, गाडीचे न जमल्यास पदयात्रा करीत येऊ शकतात. ;)

पुणेकरांचे स्वागत!!!!

सुनील ठाणेकर

डिस्क्लेमर - हा प्रतिसाद कोणत्याही अर्थाने गांघीवादावरील भाष्य समजू नये!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.