गाभा:
नमस्कार मित्रहो,
मी सुट्टीसाठी घरी भारतात जात आहे. मल कस्ट्मच्या नियमांबाबत थोडी माहिती हवी होती.
माझ्या मनात काही शंका आणि प्रश्न आहेत.
१) छोट्या छोट्या भेटवस्तु जसे की फ्रेम, किचेन, या गोष्टी पण कस्टम ड्युटीमध्ये मोडतात का?
२) वैयक्तिक वापरातील लॅपटॉप, कॅमेरा, आय पॉड जे इथे जपानमध्ये खरेदी केले आहे त्यावर कस्टम ड्युटी भरावी लागेल का?
३) एकुण किती रकमेपर्यंत कस्टम ड्युटी भरावी लागत नाही?
४) जर कस्टम ड्युटी भरावी लागली तर ती किती असते आणि कोण्त्या चलनात भरता येते ?
धन्यवाद,
आपला
गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
अवांतर : खरेतर काही लोकांना पत्र टाकुन ही माहिते विचारली होती. उगाचच वायफळ धागा नको असे वाटले होते, पण नंतर कळाले की बर्याचजणांना याची माहिती नाही.
ती व्हावी यासाठी हा चर्चा प्रस्ताव.
प्रतिक्रिया
14 Dec 2008 - 5:41 pm | सर्वसाक्षी
मास्तर,
आपले स्वागत असो:)
आपल्या प्रश्नांची उतरे देण्यचा प्रयत्न करतो.
१) छोट्या छोट्या भेटवस्तु जसे की फ्रेम, किचेन, या गोष्टी पण कस्टम ड्युटीमध्ये मोडतात का?
- कायद्याने मोडतात. अर्थात अशा किरकोळ वस्तू सहसा मोजल्या जात नाहीत मात्र एखाद्या अधिकार्याने नडायचेच म्हटले तर तो प्रयेक वस्तू मोजू शकतो'
२) वैयक्तिक वापरातील लॅपटॉप, कॅमेरा, आय पॉड जे इथे जपानमध्ये खरेदी केले आहे त्यावर कस्टम ड्युटी भरावी लागेल का?
- १ लॅपटॉप आणता येतो आणि तो शुल्कमुक्त रकमेत मोजला जात नाही. कॅमेरा, आयपॉड किती नवे वा जुने आहेत? अर्थात आपण ते सुट्टीसाठी येताना आणले व जर ते परत नेणार असाल तर पारपत्रावर नोंद करुन आणा, परत नेण्याच्या बोलीवर ती शुल्कमुक्त आणता येतात मात्र जाताना ते परत नेले नाहीत तर शुल्क भरावे लागेल. एक अनाहुत सल्ला - कॅमेरा वगैरे वस्तू आणण्याआधी इथे तिची किंमत विचारुन ठेवा. अनेकदा अनेक वस्तू इथे त्याच किमतीत मिळतात वा दोन पैसे स्वस्त मिळतात.
३) एकुण किती रकमेपर्यंत कस्टम ड्युटी भरावी लागत नाही?
- रुपये २५००० किमतीपर्यंत शुल्क भरावे लागत नाही. या रकमेत १ लॅपटॉप, २०० सिगारेट्स व दोन लिटर दारुचा समावेश नाही. ते सगळे अतिरिक्त शुल्कमुक्त.
४) जर कस्टम ड्युटी भरावी लागली तर ती किती असते आणि कोण्त्या चलनात भरता येते ?
- चलनाची गरज नाही, विजा/ मास्टर चलतात. अर्थात रोखीने भराचे असले तर आपल्या चलनाव्यतिरीक्त बहुधा अमेरिकन डॉलर चालतात, बाकी चलनाविषयी माहिती नाही.
14 Dec 2008 - 7:48 pm | गणा मास्तर
धन्यवाद तुम्ही एकदम चांगली माहिती दिली.
एक अनाहुत सल्ला - कॅमेरा वगैरे वस्तू आणण्याआधी इथे तिची किंमत विचारुन ठेवा. अनेकदा अनेक वस्तू इथे त्याच किमतीत मिळतात वा दोन पैसे स्वस्त मिळतात.
१०० % खरे आहे.
माझे स्वागत का केले ते कळाले नाही .
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
14 Dec 2008 - 8:01 pm | सर्वसाक्षी
अहो भारतात येत आहात म्हणुन स्वागत केले, चुकलो असेन तर क्षमा करा.
14 Dec 2008 - 8:59 pm | कलंत्री
आपले स्वागत आणि स्वगताबद्द्ल लोक किती घाबरतात ते? तसे आम्हीही भारतात राहुन सर्वसाक्षींना घाबरतोच म्हणा हवे तर...
15 Dec 2008 - 6:15 am | गणा मास्तर
अहो क्षमा कसली सर्वसाक्षीजी.....
मल वाटले तुम्ही मला मिपावर नवीन समजलात की काय?
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
15 Dec 2008 - 10:31 am | अंतरंग....
छोट्या छोट्या भेटवस्तु मधे माझ्यासाठी काय आणले आहे हो मास्तर?