दोन प्रश्न आहेत, कृपया सहाय्य करावे.

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in काथ्याकूट
6 Dec 2022 - 3:40 pm
गाभा: 

खुप दीवसांनी इथे लिहत आहे. सर्वांना नमस्कार. दोन प्रश्न होते, ते खालीलप्रमणे:

१) चुकीचे लोन एक्सेपेरीयन रीपोर्टवर येणेबाबत :
मला मध्ये, गेल्या महिन्यात एक लोन हवे आहे का म्हणुन फोन आला. आयडीएफसी फर्श्ट बँकमधुन. मी माझी माहीती सांगितली, बोलणारा व्यक्ती अनुभवी वाटला. व मी जस्टडायलमध्ये केलेल्या चौकशीचा हा रिस्पोन्स असावा असे वाटले.मी मा़झी माहीती दीली. पॅन कार्ड, आधार कार्ड विचारल्याचे आठवत नाही. ते मला बोलले की आमचा ऑफीसर तुम्हाला भेटायला येईल. नंतर पुन्हा कॉल आला की तुमच्या ईथे आमची शाखा नाही आहे. तेव्हा मी बोललो होय माझ्याही पाहण्यात आपली बँक कधी आली नाही ईथे.
नंतर दोन चार दीवसांनी मी माझा एक्सेपेरीयन रीपोर्ट सहज चेक केला त्यात आयडीएफसी फर्श्ट बँक मध्ये माझ्या नावावर ५००/- (पाचशे) रुपयांचे लोन दाखवत आहे. पाचशे रुपयांचे लोन कुणीही घेत नाही. व आयडीएफसी फर्श्ट सारखी बँक असे लोन देणारही नाही पण ह्यामुळे माझा क्रेडीट स्कोर कमी झाला आहे.
असे कुणाबरोबर झाले आहे का? ह्यावर जलद उपाय काय असावा?

२) अन्नासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ :
ही योजना मराठा समाजासाठीच असुन ह्यात कर्जाचा परतावा दीला जातो. म्हणजे जर मी उद्योगासाठी कर्ज घेतले तर मी त्याचा हफ्ता बँकेत भरायचा व ह्यांना कळवायचे मग हे तेवढाच हफ्ता आपल्या खात्यात जमा करतात. म्हणजे बिनव्याजी कर्ज. अट आहे जास्तीत जास्त १२% व पाच वर्षांसाठी.
ही योजना कींवा हे मंडळ सांगितल्याप्रमाणे खरच परतावा देतात का? कुणाला ह्याचा काही अनुभव आहे का?

प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.धन्यवाद.

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

6 Dec 2022 - 5:31 pm | सस्नेह

क्र. १ साठी
सर्व तपशील व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडून banking ombudsman कडे तक्रार करा.
crpc@rbi.org.in या ईमेलवर.
रिझर्व्ह बँकेच्या या साईटवर तक्रारी संदर्भात माहिती मिळेल.
https://m.rbi.org.in//Scripts/Complaints.aspx

शानबा५१२'s picture

6 Dec 2022 - 8:28 pm | शानबा५१२

नमस्कार सन्सेह,
आपला प्रतिसाद कॉपी पेस्ट करुन सेव केला आहे. मला हे माहीती नव्हते, एका वेगळ्या कामात असल्याने हा उगीच त्रास झाला आहे. एक फॅमिली मेम्बर हाच प्रॉब्लम सॉल्व्ह करण्यासाठी मुंबईला काल गेले आहेत. त्यांवरती ह्यापेक्षा खुप जास्त किंमतीचे कर्ज ह्याच बँकेकडुन दाखवले जात आहे. आपल्या नावावरुन आपण मिपावरचे जुने सदस्य आहात हे आठवले.
प्रतिसादासाठी धन्यवाद, मी हे करुन बघतो.

धर्मराजमुटके's picture

6 Dec 2022 - 7:01 pm | धर्मराजमुटके

प्रश्न क्र. १ : तुम्ही कोणत्या शहरात राहता ? ओला किंवा उबेर ची सेवा वापरता काय ? ओलाचे मला वाटते त्याप्रमाणे आयडीएफसी बँकेबरोबर करार आहे. ओला मनी पोस्टपेड मधे मला २००० चे क्रेडीट मिळते ते क्रिसिल आणि एक्सेपेरीयन वर कर्ज म्हणून दिसते. यात ओलाचे नाव न आयडीएफसी बँकेचे नाव दिसते.
तुम्हाला कोणत्या कंपनीने अशी सुविधा दिली असेल तर ते तपासा.

प्रश्न क्र २ :
माझ्या माहितीप्रमाणे यात तुम्ही नियमित कर्जफेड करत असाल तर व्याज परत मिळते. ही योजना खरी आहे व माझ्या दोन मित्रांनी याचा लाभ घेतलेला आहे. मात्र सध्या महामंडळाकडून बरेच जणांची व्याज रक्कम परत येणे बाकी आहे. मात्र आपण आपला कर्जाचा हप्ता नियमित भरावा. सरकारी नियमांमुळे परतावा मागे पुढे होऊ शकतो मात्र आपण त्या भरवशावर राहून कर्ज परतफेड करण्यास टाळाटाळ केल्यास आपला क्रेडीट स्कोअर खराब होईल.

शानबा५१२'s picture

6 Dec 2022 - 8:49 pm | शानबा५१२

नमस्कार धर्मराजमुटके,

१) मी आता गावाला राहतो, ईथे आता कोरोनामध्ये ईंटरनेट आले आहे. :-) ओला, उबर मी फक्त बाहेरुन बघितली आहे, अस अरजंट काम करायची वेळ शहरात असतानाही कधीच नाही आली. पण आपण जे सांगितलेत त्यावर विचार करुन बघेन, ईतर बँकेने आधीच खुप चिटींग केल्याने मी आता आधार कार्डने ट्रानझ्याकशन करतो.
पण माझे आयडीफसी मध्ये अकाउंट नाही आहे, आपले आहे का? माझे जिथे अकाउंट आहे तिथुन झाले असते तर त्याला अर्थ होता. पण हे काय?

२) खात्री केल्याबद्द्ल धन्यवाद. "आता थोडे प्रॉब्लम आहेत पण ही योजना कधीच बंद झाली नाहीये" असे त्या समवयन्कांकडुन कळले होते. आपल्याशी ही खुप दीवसांनी संपर्क झाला.
ह्या योजानांचा खुप फायदा होतो पण ह्याची माहीती कुणाला सहज मिळत नाही, मी एका साता-याच्या व्यक्तीशी पहील्यांदा फोनवर बोलत असताना मला हे कळले. मला त्यांच्या नंबर नाबार्डच्या वेबसाईटमधल्या एका पीडीएफ फाईलमधुन मिळाला होता.
अवघे धरु सहाय्य ते जे बोलतात ते बोलावसे वाटतेय.

धन्यवाद धर्मराजमुटके.

ओलाचे नाव न आयडीएफसी बँकेचे नाव दिसते.

+1

फ्लिपकार्ट , अमेझोन किंवा अन्य pay later स्कीम्स घेतल्यास असे दिसू शकते किंवा दिसेलच.

शक्यतो फुटकळ स्कीम टाळाव्या (जर क्रे. रिपोर्टवर एण्ट्री नको असेल तर)

चौथा कोनाडा's picture

9 Dec 2022 - 6:56 pm | चौथा कोनाडा

शक्यतो फुटकळ स्कीम टाळाव्या

+१

अगदी.
असे मोह टाळण्यात मला बहुतांशी यश येते. फुकटचा ताप पदरी पडत नाही.

आमच्या फॅमिली मेम्बरचे खुप जास्त किंमतीचे आहे व त्यांनीसुध्दा कधी आयडीएफसी मधुन लोन घेतले नाहिये, आमचे कोणाचे त्या बँकेत अकाउंटच नाही. मी जस्टडायल मध्ये फोन वर जोरजोरात ओरडुन राग घालवला आहे पण रीपोर्ट तर तसाच आहे. माझा स्कोर रीपोर्टमध्ये पैकीच्यापै़की हवा होता पण ह्या चिंटिंगमुळे कुठे बिनधास्त जाता येत नाहिये.
पगार घेत बसलेत ^*%%^((!

चौथा कोनाडा's picture

9 Dec 2022 - 8:33 pm | चौथा कोनाडा

शक्यतो फुटकळ स्कीम टाळाव्या

+१

अगदी.
असे मोह टाळण्यात मला बहुतांशी यश येते. फुकटचा ताप पदरी पडत नाही.

धर्मराजमुटके's picture

6 Dec 2022 - 9:08 pm | धर्मराजमुटके

पण माझे आयडीफसी मध्ये अकाउंट नाही आहे, आपले आहे का? माझे जिथे अकाउंट आहे तिथुन झाले असते तर त्याला अर्थ होता. पण हे काय?
माझे आयडीएफसी मधे अकाऊंट नाही मात्र ओला चे ते अधिकृत आर्थिक पतपुरवठादार आहे म्हणून बहूधा त्यांचे नाव येते.
असाच प्रकार पेटीएम पोस्टपेड वापरणार्‍यांच्या बाबतीत आहे. पेटीएम पोस्टपेड सुविधा वापरत असल्यास त्यांचा आर्थिक पतपुरवठादार आहे त्यांचे नाव क्रेडीट स्कोअर मधे दिसते.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची अधिक माहिती येथे आहे.

शानबा५१२'s picture

6 Dec 2022 - 9:26 pm | शानबा५१२

हे सर्व जरा सीरीयस व न समजण्यासारखे होत चालले आहे. ७,८ दीवसांपुर्वी मी एका बँकेत भाषण ठोकुन आलो आहे. माझे काम वसईच्या जनता सहाकारी बँकेत झाले. अगदी लगेच. खुप फ्रेंडली बँक आहे. आपणा सर्वांना ती बँक व विशेषता: वसई ईस्टची नवघर रोड ब्रँच सुचवेन.

आपल्या प्रश्नांची उत्तरं मजजवळ नाहीत, त्यामुळं त्याबद्दल काही बोलणं अनुचित आहे.

पण अनुभवानं सांगतो, कोणत्याही ऑनलाईन कर्जाच्या भुलय्यात न पडणे सगळ्यात इष्ट. सध्या यात खूप फ्रॉड प्रकार वाढलेत. सावकारी, माफियांचाही बराच सुळसुळाट आहे. थोडे डॉक्युमेंटेशनचे कष्ट वाचवायला आपण यांच्या फंदात पडतो आणि आणिक त्रास ओढवून घेतो. डॉक्युमेंटेशन आपल्यासाठीच चांगलं आहे असा विचार करून कर्जासाठी प्लॅनींग करावं, म्हणजे आपला त्रास कमी होतो.

- आपल्या घराजवळची कोणतीही नॅशनलाईज्ड बँक बघावी आणि तिथं स्वत: जाऊन कर्जाविषयी चौकशी करावी.
सर्व सरकारी योजनांसाठी स्टेट बॅंक उत्तम असते, फक्त त्यांची योग्य ती ब्रँच शोधावी लागते, जसं अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ब्रँच वेगळी असते.
- जर सोनं असेल तर गोल्ड लोन ओव्हरड्राफ्ट हाही एक चांगला पर्याय आहे, पण तेही अशा नॅशनलाईज्ड बॅकेतूनच. थोडं कर्ज कमी मिळेल पण सोनं नीट राहिल याची एक खात्री असते.
- पीपीफ मधून देखील कर्जाऊ रक्कम काढता येते, काही अटींसह.

शानबा५१२'s picture

6 Dec 2022 - 10:35 pm | शानबा५१२

नमस्कार राघव,
आपणही ईथले जुने सदस्य आहात, मला आठवते. आपण लिहलेत ते खरे आहे, माझे कोरोनात अशा फसवणुकीमुळे खुप नुकसान झाले आहे. मी आत सर्व डॉक्युमेंट्स संपुर्ण व परफेक्ट तयार ठेवतो. :-) पण ज्या बँकेत माझे खातेच नाही त्यांनी मला पाचशे रुपयाचे कर्ज माहीती नसताना द्यावे हे काही समजले नाही.
आपला प्रतिसाद समजला, आता मी सर्वाना सुचवेन फक्त पतसंस्था, स्थानिक संस्था ह्यांच्याकडे वळा. बँकेकडुन माझ्याबरोबर कोरोनमध्ये झालेली व आता काही दीवसांपुर्वी झालेली फसवणुक पिक्चरमध्ये सुट होईल अशी आहे.
कर्ज घेऊन व ते फेडुन खुप आर्थिक प्रगती करणारे सर्वानींच पाहले असावेत, मी पण जर तसा प्रयत्न करत असेन तर त्यात काहीही गैर नाही. आपल्या सर्व मिपाकरांना खुप खुप शुभेच्छा.

>>बँकेकडुन माझ्याबरोबर कोरोनमध्ये झालेली व आता काही दीवसांपुर्वी झालेली फसवणुक पिक्चरमध्ये सुट होईल अशी आहे.

या विषयावर सविस्तर लिहा ही विनंती!

शानबा५१२'s picture

7 Dec 2022 - 1:15 pm | शानबा५१२

ते खुप जास्त खासगी होऊन जाईल पण आहे खुप ईंटरेस्टींग. आज बघेन जमले तर लिहेन, लिहताना मलाच त्रस होईल. मला काही जुन्या सदस्यांच्या अकाली मृत्युंबद्दल लिहायचे होते, चर्चा म्हणुन. आश्चर्य वाटतं की अस का व्हावं!