सोन्याची शिर्डी

जुना अभिजित's picture
जुना अभिजित in काथ्याकूट
2 Jan 2008 - 10:30 am
गाभा: 

एका धनाधिशाने शिर्डीवाल्या साईबाबाला सोन्याचं सिंहासन दान/भेट दिलं किंवा अर्पण केलं आणि भक्तांच्या मनमंदिरात वसणारा फकिर सिंहासनस्थ झाला. आजच्या सकाळमध्ये संपूर्ण गाभाराच सोन्याच्या पत्र्याने मढवून टाकण्याचा मानस एका भक्ताने व्यक्त केला आहे.

मागे एक शेर वाचला होता शाहजहान ने ताजमहाल बनाकर गरिबोंकी मोहब्बत का मजाक उडाया असा काहीतरी अर्थ होता. तसंच काहीतरी आता वाटतंय. रेड्डीने सोनेका पत्रा लगाकर गरीबोंके बाबा का और भक्तीका मजाक उडाया.

जाउदे तिच्यामारी आपल्या खिशातून थोडेच गेले पैसे?

असो..कुणाला काही म्हणायचं आहे का?

अभिजित

प्रतिक्रिया

धोंडोपंत's picture

2 Jan 2008 - 11:31 am | धोंडोपंत

हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी कुठे किती पैसा द्यावा हे ठरविण्याचा किंवा देणे हे योग्य कि अयोग्य हे ठरविण्याचा अधिकार कुणालाही नाही.

प्रत्येक व्यक्तिचा काही भावना आणि श्रद्धा असतात. त्यानुसार दानधर्म केल्याने त्याला समाधान लाभत असते.

वरील पैसे हे त्या गृहस्थांनी इनकम टॅक्सला दाखवलेले पैसे आहेत. त्यामुळे हा काही काळ्यापैशाचा विनियोग नव्हे.

दुसरेही एक गृहस्थ दिनांक १० जानेवारी रोजी शिर्डी संस्थानाला १०० कोटी रुपये देणार आहेत. त्या १०० कोटींतून संस्थानाच्या १४ एकर जागेवर एक उत्तम भक्तनिवास उभारावे अशी त्यांची इच्छा आहे. त्या भक्तनिवासातील १५ टक्के खोल्या गोरगरीब जनतेसाठी राखीव असाव्यात आणि ३० टक्के खोल्या इतर भक्तांना अत्यल्प दरात उपलब्ध व्हाव्यात, अशी त्यांची अट आहे आणि संस्थानाने ती मान्य केली आहे.

यावर नकारात्मक भाष्य करण्यासारखे यात काहीही नाही. जीवनात त्यांना बाबांच्या कृपेची प्रचिती आली, म्हणून हे गृहस्थ अशा स्वरूपाचे दान करण्यासाठी पुढे आले, हे वास्तव आहे. त्याचे स्वागतच करायला हवे.

बाबा मालिक !!!

आपला,
(बाबा का बंदा) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

जुना अभिजित's picture

2 Jan 2008 - 1:12 pm | जुना अभिजित

दुसरेही एक गृहस्थ दिनांक १० जानेवारी रोजी शिर्डी संस्थानाला १०० कोटी रुपये देणार आहेत. त्या १०० कोटींतून संस्थानाच्या १४ एकर जागेवर एक उत्तम भक्तनिवास उभारावे अशी त्यांची इच्छा आहे.

ऍब्सोल्युटली ग्रेट. सोन्याच्या पत्र्यापेक्षा कितीतरी पट बरे नाही का?

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

देवदत्त's picture

2 Jan 2008 - 8:33 pm | देवदत्त

त्या १०० कोटींतून संस्थानाच्या १४ एकर जागेवर एक उत्तम भक्तनिवास उभारावे अशी त्यांची इच्छा आहे. त्या भक्तनिवासातील १५ टक्के खोल्या गोरगरीब जनतेसाठी राखीव असाव्यात आणि ३० टक्के खोल्या इतर भक्तांना अत्यल्प दरात उपलब्ध व्हाव्यात, अशी त्यांची अट आहे आणि संस्थानाने ती मान्य केली आहे.
एकदम मस्त.. :)

इनोबा म्हणे's picture

2 Jan 2008 - 5:12 pm | इनोबा म्हणे

एका धनाधिशाने शिर्डीवाल्या साईबाबाला सोन्याचं सिंहासन दान/भेट दिलं किंवा अर्पण केलं आणि भक्तांच्या मनमंदिरात वसणारा फकिर सिंहासनस्थ झाला. आजच्या सकाळमध्ये संपूर्ण गाभाराच सोन्याच्या पत्र्याने मढवून टाकण्याचा मानस एका भक्ताने व्यक्त केला आहे.
साईबाबांसारख्या संताला (फकीर)सोन्याच्या सिंहासनापेक्षा हृदयात स्थान देणे महत्वाचे आहे.खरं म्हणजे ज्या संतांनी धन विषासमान मानले त्यांना सोन्याच्या सिंहासनावर बसवणारे महामुर्ख असले पाहिजेत्.सिंहासन दान करणार्‍यापेक्षा भक्तांची गैरसोय दूर करणारा खरा दानी म्हटला पाहिजे.

शिर्डी संस्थानाने सुद्धा श्रद्धेचा 'बाजार' मांडण्यापेक्षा 'पावित्र्य' जपण्यावर भर द्यायला हवा.

||जिसको राखे साई | मार सके ना कोई ||

देवदत्त's picture

2 Jan 2008 - 8:36 pm | देवदत्त

तुमच्याशी ९९% सहमत.
(१% शेवटचे वाक्य सोडून ||जिसको राखे साई | मार सके ना कोई ||)

विसोबा खेचर's picture

2 Jan 2008 - 6:36 pm | विसोबा खेचर

माझ्या मते कुणी कुणाला किती देणगी द्यायची, कशा स्वरुपात द्यायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे....

साईराम!

आपला,
(साईभक्त) तात्या.