हे भारतीयांनो

तिमा's picture
तिमा in काथ्याकूट
14 Dec 2008 - 10:41 am
गाभा: 

हे भारतीयांनो,
मुंबईच्या दहशतवादी हल्यानंतर तुम्ही जो आक्रोश, आदळआपट आणि तमाशा चालवला आहे तो बघून तुम्हाला जग हसत आहे.
मेणबत्त्या लावणे, मानवी साखळी तयार करणे, नेत्यांवर आगपाखड करणे, रोज पाकिस्तान सरकार तुमच्यासाठी काय करते यावर डोळे लावून बसणे, रोज त्या 'कसाब' बाळाचा फोटो पेपरांत जागोजागी छापणे असे करुन काहीच साध्य होणार नाहीये.
तुम्ही रोज किती जबाबदारीने वागता त्याचा प्रामाणिक आढावा घ्या. एवढे सगळे झाले तरी,
रहदारीचे नियम तोडणे, कायदा फक्त इतरांसाठी आहे असे समजणे, लांच देणे व घेणे, चकाट्या पिटणे हे सर्व आहे तसेच चालू आहे.
मग यापुढे तुम्ही सुरक्षित रहाल, सरकार काही करेल, हा हल्ला शेवटचाच असेल असे भाबडे विचार तुम्ही कसे करु शकता ?
अमेरिकेत पुन्हा हल्ला झाला नाही आणि तुमच्या देशांत वारंवार असे हल्ले होतात आणि होतच रहाणार याची कारणे वर लिहिलेल्या तुमच्या संवयींमधेच आहेत असे तुम्हाला नाही वाटत ?

प्रतिक्रिया

एकलव्य's picture

14 Dec 2008 - 12:58 pm | एकलव्य

आपण म्हणता आहात ती दुर्दैवाने अतिशयोक्ति नाही.

हे ही वाचा - http://www.esakal.com/esakal/12142008/Specialnews8B4ED6463E.htm

विनायक प्रभू's picture

14 Dec 2008 - 12:59 pm | विनायक प्रभू

वरील सवयी मधील कुठली सवय तुम्ही सोडली

तिमा's picture

15 Dec 2008 - 8:34 am | तिमा

वरीलपैकी एकही संवय मला नाहीये हो, त्याबाबतीत मी माझ्यासारख्या अल्पसंख्यांकांमध्येच मोडतो. अशा संवयींवर मी कायम टीका करतो म्हणूनच मला 'माणूसघाणे' म्हणतात. चकाट्या जरुर पिटतो पण कामाच्या जागी नाही.

विनायक प्रभू's picture

15 Dec 2008 - 10:30 am | विनायक प्रभू

१५ ऑगस्ट ला मेडल साठी योग्य उमेदवार

भडकमकर मास्तर's picture

14 Dec 2008 - 2:43 pm | भडकमकर मास्तर

थँक्यू काका

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सुधारक's picture

14 Dec 2008 - 9:41 pm | सुधारक

पोलीस खात्याने कासबाळ लीला वर्णन केल्या आहेत त्या तद्दन खोट्या आहेत. पोलीस स्वतःची कातडी वाचवायला जे काही करायला लागेल ते करतील. मरायच्या निर्धाराने यात पडलेले कासब बाळ असे घडाघडा बोलेल हे मला पटत नाही. सध्या नार्को टेस्ट हे नवीन खूळ आले आहे. दिसला गुन्हेगार की दे त्याला टेस्ट. घ्यायला हवी होती ती शस्त्रे घेण्यात आम्ही कमी पडलो हे नवे मुख्यमंत्री काहीतरी तोंडात चघळत बोलत होते हे आज संध्याकाळच्या बातम्यात ऐकले तेव्हा शिसारी आली.