गणपाभौ ची पाकृ वाचून-वाचून काल व्हेज बिर्याणी (?) बनवण्याचा प्रयत्न केला. आज गणपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आणि पाकृ बद्दल धन्यवाद म्हणून हा प्रतिसाद...
पयले हॅप्पि वाला बड्डे गणपा...
गणपाच्या हातचे मासे/मटण/चिकण..वगैरे वगैरे खाऊन तृप्त झालेला पशा आणि गणपा
पाकृ टाकायचा प्रयत्न नव्हता त्यामुळे काही फोटो काढायचे राहुन गेले. तसेही लेखातले फोटो बघुन या प्रतिसादातील फोटो कोण बघणार
व्हेज बिर्याणी बनवायची असल्यास इथे टिचकि मारा https://www.misalpav.com/node/11872
माझ्या पाकृ चे काहि फोटो
१) तांदुळ भिजत ठेवणे
२) कापा कापी आणि फोटो साठी व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न (हिरव्या मिरच्या मिसिंग इन फोटो)
३) इतर साहित्य..
४) भाज्या शिजवुन घेणे
५) दम देण्याची तयारी..
प्रतिक्रिया
3 Oct 2022 - 9:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान हो प्रशांतसेठ. व्हेज- बिरयानी भारी उतरली आगे. अजून येऊ द्या पाकृत्या.
बाकी, एकापेक्षा एक पाककृती करून मिपाचं पाककृती दालन समृद्ध करणा-या गणपासेठला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
3 Oct 2022 - 9:55 am | प्रचेतस
एक नंबर, जोरदार, दमदार. प्रशांतशेठचे पाकृ दालनात पदार्पण केल्याबद्द्ल अभिनंदन. मिपागुरु गणपा यास वाढदिवसाच्या शुभेच्छा.
गणपाच्या हातचे इनोवेटिव पदार्थ पुष्कळदा खायचा योग आलाय, खुद्द प्रशांतच्या हातचे बार्बेक्यू पनीर खाल्लेय. अहाहा.
पहिला फोटो कुठल्यातरी छुप्या कट्ट्याचा दिसतोय. आम्हाला नेत नै ना तुम्ही :)
3 Oct 2022 - 10:02 am | ज्ञानोबाचे पैजार
गणपा शेठ ह्यापी बड्डे,
आणि प्रशांतसरांचे नव्या दालनात स्वागत
पैजारबुवा,
3 Oct 2022 - 10:24 am | श्वेता व्यास
पाकृ आवडली, करून बघणार.
3 Oct 2022 - 12:09 pm | कर्नलतपस्वी
गणपाभौ, वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पुण्यातच आहात असे वाटते ,ओळख होईलच.
प्रशांतभौ,दिवाळीनंतर बिर्याणी कट्टा होऊन जाऊ द्या.
3 Oct 2022 - 2:57 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
3 Oct 2022 - 3:03 pm | सौंदाळा
गणपाभाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रशांतसेठची लॉकडाऊनमधे पुर्वी पण एक पाककृती आली आहे त्यामुळे ते आता या विभागात तितकसे नवखे नसावेत. ;)
3 Oct 2022 - 5:19 pm | सस्नेह
गणपाभौला वाढदिवसाच्या आणि पशाभौ ला पाकृ पदार्पणाच्या लै लै शुभेच्छा!!