मिरची भजी

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
20 Sep 2022 - 8:52 pm

च
पाऊस तर काही जायचं नाव घेत नाही तेव्हा म्हटलं जे करायचे राहिले आहे.. ते मिरचीचे भजे आज करावे. अगदी झणझणीत!!!

साहित्य:
सात आठ कमी तिखट मिरच्या
एक छोटी वाटी तांदळाचे पीठ
एक मोठी वाटी डाळीचे पीठ
जिरे ओवा, हिंग हळद चवीपुरतं मीठ हवा असेल तर खायचा सोडा

मिरचीसाठी सारण- बारीक चिरलेली कोथिंबीर, गरम मसाला.

कृती:

पहिल्यांदा मिरच्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात आणि मध्ये चिरून त्यातील बिया काढून घ्याव्यात.

चिरलेल्या मिरच्या मीठ चोळून बाजूला ठेवाव्यात.

आता सारण साठी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात थोडासा डाळीचे पीठ हळद गरम मसाला तिखट एकत्र करावे आणि हे सारण मिरचीच्या आत भरावे व मिरची थोडीशी दाबून बंद करावी.

मिरची तळण्यासाठी ज्याप्रमाणे आपण भजाचे पीठ भिजवतो त्याप्रमाणे डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, जिरे, ओवा, हळद एकत्र पाणी टाकून भिजवावे हवे असेल तर किंचित सोडा टाकावा.

मिरची डाळीच्या पिठात घोळवून घेऊन गरम गरम तेलात खरपूस होईपर्यंत तळून घ्यावी.

ज्यांना तिखट खायची सवय नाही त्यांनी या मिरचीच्या भज्यांचा पोळीबरोबर स्वाद घ्यावा.

प्रतिक्रिया

उग्रसेन's picture

20 Sep 2022 - 9:15 pm | उग्रसेन

मिरची भज्यामुळे पोट गुबारुन जाते म्हणून
आमची गंगुबाई अज्याबात डाळीचं काय करीत नाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Sep 2022 - 8:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त. अजून येऊ द्या. वेगवेगळ्या पाकृत्या.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

21 Sep 2022 - 8:59 am | तुषार काळभोर

एकदम कड्डक!

श्वेता व्यास's picture

21 Sep 2022 - 11:25 am | श्वेता व्यास

वाह, तोंपासु :)

टर्मीनेटर's picture

21 Sep 2022 - 11:30 am | टर्मीनेटर

झकास 👍

नागनिका's picture

21 Sep 2022 - 12:24 pm | नागनिका

अमच्याइथे आंध्रभजी मिळतात. मिरचीचे पोट फाडून त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ मिश्रित मसाला घालतात आणि ही मिरची पिठात घोळवून तळतात.

Bhakti's picture

21 Sep 2022 - 12:29 pm | Bhakti

होय होय कालच सर्च करतांना हे नाव वाचलं :)
आणि सारणात ओलं खोबरंही वापरू शकता.
मिरच्या लांबीने फार मोठ्या होत्या, तेव्हा काही मिरच्या मधोमध‌ चिरून तळल्या.

सुरिया's picture

21 Sep 2022 - 3:14 pm | सुरिया

सोलापूर वगैरे भागात जिथे तेलुगुभाषिक वस्ती आहे तिकडे ही भजी मिळतात, आंध्र भजी किंवा गुंटूर भजी म्हणतात. मिरच्या जरा मोठ्या असतात. मिरचीत चिंचेच्या कोळाचे सारण भरले जाते. भज्याचे पीठ जरा जाडसर असते पण टेस्ट काय म्हण्ता...अहाहाहा.
नुसती मिरची भजी ही सुभानल्ला. हाहाहूहू करत खायला जी मजा येते त्याला तोड नाही.

नागनिका's picture

21 Sep 2022 - 5:18 pm | नागनिका

मिरचीसहित खायची असतात आंध्रभजी

A
आज हे खोबरं,चिंच-गूळ सारण करून पाहिले.चव चांगली होती पण चिंच गूळ पेक्षा न वापरलेले अधिक चांगले होते.

Bhakti's picture

21 Sep 2022 - 12:30 pm | Bhakti

धन्यवाद मंडळींनो|
पण शुद्धलेखनाचे फारच हाल‌ केलेत राव मी :(
इडिटचा पर्याय पाहिजे होता.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Sep 2022 - 12:55 pm | ज्ञानोबाचे पैजार

तोंपासु,
मिरची भजी असे नुसते कोणी म्हटले तरी तोंडाला पाणी सुटते,
इथेले फोटो पाहुन बादली घेउन बसावे लागले.
खवय्यांकरता फक्त एक सुचवणुक :- कमी तिखट मिरची न घेता तिखटच मिरची घावी आनि बिया अजिबात काढून टाकू नयेत.
पैजारबुवा,

रंगीला रतन's picture

21 Sep 2022 - 3:50 pm | रंगीला रतन

+२१०९२०२२

श्वेता२४'s picture

21 Sep 2022 - 1:17 pm | श्वेता२४

तों.पा.सु

कर्नलतपस्वी's picture

21 Sep 2022 - 3:00 pm | कर्नलतपस्वी

सेहेचाळीस वर्षापुर्वी राजस्थानी मिर्चीबोंडा आणी मावा कचोडी दोघी जणीशी प्रेम झालं होते ते आजतागायत कायम आहे.

जमल्यास आठवण डकवतो.

विवेकपटाईत's picture

21 Sep 2022 - 3:42 pm | विवेकपटाईत

मस्त. आवडली.

विवेकपटाईत's picture

21 Sep 2022 - 3:42 pm | विवेकपटाईत

मस्त. आवडली.

MipaPremiYogesh's picture

21 Sep 2022 - 8:10 pm | MipaPremiYogesh

एकदम तोंपासु . भजी फुलण्यासाठी काय करावे लागते. विकतच्या भजी एकदम मस्त फुगलेली असते

मंडळी खुप खुप आभार!!!