गाभा:
नमस्कार,
मी गेल्या 4 वर्षांपासून ईआरपी मध्ये काम करीत आहे. स्वत:चा व्यवसाय करीत असताना (स्वत:च तयार केलेली सिस्टीम तीन ठिकाणी राबविण्यात आली आहे) आर्थिक गुंतवणूक करण्याची क्षमता नसल्यामुळे सध्या सॅप च्या ABAP/BIW चा कोर्स करण्याविषयी विचार करीत आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार कोर्सची फी ही रू. 150000/- पेक्षा जास्त आहे(पुण्यात). तरी असा कोर्स केल्यानंतर त्यात नोकरीविषयक संधी व कोर्सविषयक इतर माहिती मिपाकरांना असल्यास द्यावी ही विनंती. ही मोठी गुंतवणूक करणे योग्य आहे का?, पुढे नवीन असताना नोकरीच्या संधी कितपत आहेत/पगार वगैरे, कामाचे स्वरूप इ.
धन्यवाद.
चैतन्य कुलकर्णी.
प्रतिक्रिया
12 Dec 2008 - 10:16 pm | केदार
चैतन्य,
ते दिड लाख रु सॅपच्या शिक्षन देनार्या इंन्स्टिट्यूटचे नाहीत. बरोबर. कारण सॅप अडिच ते तिन लाख घेते. इतर संस्थेत एवढे पैसे देउ नका.
बि डब्लू ला सध्या खुप महत्व आहे. तूम्ही त्याचाही विचार करु शकता. पण गुंतवनूक करन्यापेक्षा मी असे म्हणेन की ज्या कंपनीत सॅप इम्पीमेंट केले आहे त्या कंपनीत नौकरी करने फायदेशीर ठरेल. मी गेले ८ वर्षे सॅप मध्ये काम करत आहे, पण सुरुवातीला कुठलेही शिक्षन घेतलेले नाही. (ऑफकोर्स सर्वच जन वेगवेगळे असतात).
तुम्ही मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षन घेतले तर कदाचित तूम्हाला सुरुवातीला ६ ते ८ लाख रु मिळन्याची शक्यता आहे. आणि नंतर तो वाढतच जाणार ह्यात वाद नाही. पण सध्या मार्केट प्रंचड पडलेले आहे ह्याचाही विचार करुनच निर्नय घ्या. अबाप पेक्षा मी तूम्हाला बि डब्लू कडे जाण्याचा सल्ला देईन.
मुंबईला जिनोव्हेट नावाची संस्था सॅप चे ट्रेनिंग देते व बेंगलोरला सॅप लॅब्ज.
जिनोव्हेटचा पत्ता
Address:
2nd Floor, ‘A’ Wing, Phoenix House,
Senapati Bapat Marg,
Lower Parel (W),
Mumbai-400 013
Email:
kiran@genovate.com
fabian@genovate.com
गुगल केल्यावर सॅपचा पत्ता पण मिळेल.
22 Dec 2008 - 12:58 pm | उदय
माझ्याकडे एस.ए.पी. च्या बी.डब्ल्यू. ट्रेनींग च्या पी.डी.एफ आहेत. तुला हव्या असतील तर मी पाठवू शकेन.
22 Dec 2008 - 3:45 pm | विजुभाऊ
तुम्हाला नक्की काय करायचे आहे ते कळाले नाही. तुमचे ब्याकग्राउन्ड ई आर पी चे आहे तर मग प्रोग्रामिन्ग मधे जायचा विचार का करताय. फंक्षनल कोर्सेस करुन लगेच जोब मिळणे अवघड आहे. सध्या प्रत्येक कम्पनी अनुभव बघते. अनुभवासाठी एखाद्या लहान कम्पनीत वर्शभर काम करुन नन्तर जॉब मिळू शकेल.
अबाप केले तर सुरुवातीस साधारण दोन ते तीन लाख इतकेच पॅकेज मिळू शकेल्.पण त्यासाठी ही थोडा अनुभव असने गरजेचे आहे
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
29 Dec 2008 - 9:04 pm | नितिन थत्ते
तुम्हि पूर्वी कोणते डोमेन काम केले आहे का?
तुमच्या एकूण ब्याकग्राऊण्ड वरून तुम्हि प्रोग्राम्मिन्ग मध्ये जाने उत्तम.
परन्तु कमी फी चा कोर्स मात्र करू नका. पैसे फुकट जातील. अनुभव हवाच.
सध्या परिस्थिती एकुणात गम्भीर असल्यमुळे इन्वेस्ट करू नये.
नितिन