सप्टेंबर २०२२ हा महिना सुरू झाला असल्याने ताज्या घडामोडींचा नवा धागा काढत आहे.
पहिली स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलात सामील
पहिली स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सामील झाली आहे. हे संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. 40 हजार टन विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता असलेल्या जगातील सहा निवडक देशांच्या पंक्तीत भारत सामील झाला आहे. (उर्वरित पाच देश अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि इंग्लंड आहेत.)
भारतीय नौदलाच्या स्वतःच्या संस्थेच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने या युद्धनौकेची रचना (डिझाइन) केली आहे. तर बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड कंपनीनं ही युद्धनौका बांधली आहे. 20,000 कोटी रुपये खर्चून बांधलेली ही युद्धनौका 15 मजली इमारतीइतकी उंच आहे. INS विक्रांतची लांबी 262 मीटर, उंची 59 मीटर आणि रुंदी 62 मीटर इतकी आहे. जहाजाचे वजन सुमारे 45000 टन आहे.
INS विक्रांत युद्धनौकेवर 88 मेगावॅट क्षमतेच्या चार गॅस टर्बाइन बसवण्यात आल्या आहेत आणि तिचा कमाल वेग 28 नॉट्स इतका आहे. विक्रांतने गेल्या वर्षी 21 ऑगस्टपासून सागरी चाचण्यांचे अनेक टप्पे यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. INS विक्रांतमध्ये 76% स्वदेशी घटक आहेत. आयएनएस विक्रांतवर 20 लढाऊ विमाने आणि 10 हेलिकॉप्टर तैनात असतील.
महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे या युद्ध नौकेचे पहिले कमांडिंग ऑफिसर होण्याचा मान मराठी माणसाला मिळाला आहे. त्यांचे नाव आहे कमोडोर विद्याधर हारके. हारके हे मूळचे अहमदनगरचे रहिवासी आहेत. हारके यांच्या नियुक्तीने मराठीजनांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
प्रतिक्रिया
3 Sep 2022 - 3:16 pm | Trump
श्री मयु,
श्री गुरुजींनी तुमच्या आधी क्रमांक लावला. नवीन सदस्य धागा काढत आहेत, ते पाहुन आंनद झाला. तुम्ही भाग २ चा धागा काढा.
ताज्या घडामोडी - सप्टेंबर २०२२ (भाग १)
https://www.misalpav.com/node/50619