चित्र-कथा गुंफण

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
31 Aug 2022 - 12:39 pm
गाभा: 

नमस्कार मित्रांनो !
सर्वांना गणेशोत्सव आणि मिपा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
या धाग्याद्वारे एक उपक्रम चालू करतो आहे. अनेकांच्या सहकार्याने तो पुढे चालू ठेवता येईल.
खाली एक चित्र दिले आहे. त्यावरुन आपल्याला एक काल्पनिक दीर्घकथा लिहायची आहे. कथेची सुरुवात मी करून देतो. त्यानंतर आपल्यातील कोणीही ती पुढे चालू ठेवू शकतो. एका चित्रावरून कथा लांबवण्याची मुदत 48 तास ठेवूया. त्यानंतर अन्य कोणी सभासद नवे चित्र देईल आणि पुढची कथा सुरू करून देईल. कथा आपण वाटेल त्या प्रकारे आणि आपापल्या शैलीत पुढे नेऊ शकता. कथेतील मजकूर चित्रावर आधारित असावा.

सर्वांचे या उपक्रमात स्वागत !
चित्र १

ok

........ आज त्याचे लक्ष सारखे मनोऱ्यावरील घड्याळाकडे होते. तशा त्याने आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक परीक्षा दिल्या होत्या आणि स्पर्धाही जिंकल्या होत्या. परंतु आजची कसोटी काही वेगळीच होती. तिने त्याला साडेचार वाजताची वेळ दिली होती. तेव्हा ते दोघे इमारतीच्या त्या ठराविक कोपऱ्यात भेटणार होते. तिला तिच्या पूर्वायुष्यातले एक मोठे गुपित त्याला सांगायचे होते. ते ऐकल्यानंतर पुढे काय होणार आहे याची मात्र कोणालाच कल्पना करता येत नव्हती......

चला तर,
यापुढे गोष्ट लांबवत न्या.....

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

31 Aug 2022 - 2:10 pm | विजुभाऊ

कशाला?

प्रसाद गोडबोले's picture

31 Aug 2022 - 2:32 pm | प्रसाद गोडबोले

बाकी मराठी साहित्य आणि सीरीयल्स मधील सारखे सारखे तेच तेच लग्न , प्रेमप्रकरणं , नातेवाईक, अन त्यांच्या नसत्या कटकटी पाहुन पाहुन कंटाळलो आहे.
आता तुम्ही कथेची सुरुवात त्याच तशाच काहीशा नोटवर केली असल्याने सध्या तरी काहीही लिहायची इच्छा नाही.

तुर्तास वाट पहात आहे .

बघु कोणी काही वेगळा टर्न देतो का कथेला !!

तिला तिच्या पूर्वायुष्यातले एक मोठे गुपित त्याला सांगायचे होते. ते ऐकल्यानंतर पुढे काय होणार आहे याची मात्र कोणालाच कल्पना करता येत नव्हती......

तो अधीर होऊन तीच्या समोर गेला............ तो समोर दिसताच ती दुरूनच म्हणाली यु यू यू यू..... प्रेमभरली ही हाक ऐकून तो आणखीन जवळ आला ....

( दिला की नाही यू टर्न.....)

तर्कवादी's picture

31 Aug 2022 - 4:26 pm | तर्कवादी

अभिनव उपक्रम कुमारजी
एक सूचना कराविशी वाटते की या कथेच्या अनेकविध शाखा आणि आवृत्त्या बनवू म्हणजे सुरुवात तुम्ही केली तिच ठेवून त्यावर येणारे विस्तार विविध शाखांतून/ आवृत्त्यातूंन करु.

उदा:

........ आज त्याचे लक्ष सारखे मनोऱ्यावरील घड्याळाकडे होते. तशा त्याने आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक परीक्षा दिल्या होत्या आणि स्पर्धाही जिंकल्या होत्या. परंतु आजची कसोटी काही वेगळीच होती. तिने त्याला साडेचार वाजताची वेळ दिली होती. तेव्हा ते दोघे इमारतीच्या त्या ठराविक कोपऱ्यात भेटणार होते. तिला तिच्या पूर्वायुष्यातले एक मोठे गुपित त्याला सांगायचे होते. ते ऐकल्यानंतर पुढे काय होणार आहे याची मात्र कोणालाच कल्पना करता येत नव्हती......

या तुमच्या सुरुवातीला १ म्हंटले तर

तो अधीर होऊन तीच्या समोर गेला............ तो समोर दिसताच ती दुरूनच म्हणाली यु यू यू यू..... प्रेमभरली ही हाक ऐकून तो आणखीन जवळ आला

विजुभाउंनी केलेला हा विस्तार १.१ शाखा म्हणता येईल. आता ज्याला १.१ शाखेवरच पुढे विस्तार करायचा तो १.१.१ असा विस्तार करेल. एखाद्याला १.१ हवंय पण १.१.१ नकोय तो १.१.२ असा विस्तार करेल.. आणि
पण ज्याला विजुभाउंनी केलेला विस्तार नको असेल तो १.२ अशी शाखा बनवून विस्तार करेल..

तर्कवादी's picture

31 Aug 2022 - 4:27 pm | तर्कवादी

झालेच तर एकच प्रतिसादक एकापेक्षा जास्त शाखाही बनवू शकेल

कुमार१'s picture

31 Aug 2022 - 4:30 pm | कुमार१

वरील सर्वांना धन्यवाद.

या कथेच्या अनेकविध शाखा आणि आवृत्त्या बनवू

>>

काहीच हरकत नाही. आपापल्या इच्छेनुसार विविध मार्गांनी गोष्ट पुढे नेता येईल.