नॉन फिक्शनल साहित्य हवे आहे. व्हॉइसओव्हर आर्टीस्ट पण हवेत..

विनिता००२'s picture
विनिता००२ in काथ्याकूट
2 Aug 2022 - 9:59 am
गाभा: 

नमस्कार लेखक मित्र-मैत्रिणींनो,

'सुचेतस आर्टस' आपले स्वागत करत आहे एका नवीन उपक्रमात…

आपण चांगले नॉन फिक्शनल साहित्य लिहीत असाल...(किंवा लिहीण्याची इच्छा असेल).....म्हणजे मोटीव्हेशनल, माहीतीपर, मराठी साहित्यातील विभूतींवर, लेखकांवर इत्यादी जसं की त्यांचे जीवनचरित्र, एखाद्या विषयावरची स्टेप बाय स्टेप माहीती..... तर आपण आपले स्वलिखित साहित्य आम्हांला देऊ शकता. प्रकाशित असेल तरी चालेल...पण ऑडिओ बनलेले नकोत.

निवड झालेल्या साहित्याचे ऑडिओबुक बनेल अगदी मोफत! ( साहित्याचे मानधन मिळेल.) ...आणि नामांकित पॉडकॉस्टवर त्याचे प्रसारण होईल.....!

अट एकच....साहित्य दर्जेदार हवे.......आवड असेल तुम्ही व्हॉईसओव्हर पण देऊ शकता......पण सिरियसली काम करायची तयारी हवी! (अटी लागू)

लगेच संपर्क साधा…

विनिता - ७७०९०७३००८

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

2 Aug 2022 - 10:28 am | मुक्त विहारि

केला आहे ...

जेम्स वांड's picture

2 Aug 2022 - 10:49 am | जेम्स वांड

सुरस उपक्रम आहे, काही संकल्पना आहेत मनात, आपण details व्य नि करू शकलात तर ह्या उपक्रमात नक्कीच सहभागी व्हायला आवडेल, शिवाय साईड हसल पद्धतीने अर्थार्जन पण होणार असेल तर ऑफर नक्कीच आकर्षक आहे, आपण detail कळवाल अशी अपेक्षा.

क्लिंटन's picture

2 Aug 2022 - 11:04 am | क्लिंटन

अरे वा. उपक्रमाला शुभेच्छा.

मला भारताचे राजकारण आणि अर्थकारण यावर लिहायला आवडेल. पण एकसलग पुस्तक वगैरे लिहायला लागणारा संयम आणि चिकाटी माझ्याकडे नाही. वेगवेगळ्या assorted गोष्टींचा समावेश चालणार असेल तर मला लिहायला आवडेल.

विनिता००२'s picture

2 Aug 2022 - 6:33 pm | विनिता००२

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद्द द

अर्थकारण चालेल...उदा.दाखल एखादा लेख मेल केलात तर बरं होईल.

विनिता००२'s picture

2 Aug 2022 - 11:07 am | विनिता००२

एक विनंती आहे...मला फोन कराल तर सविस्तर बोलता येईल..मेसेज मधे फार वेळ जातो...धन्यवाद

टर्मीनेटर's picture

2 Aug 2022 - 1:35 pm | टर्मीनेटर

उपक्रमासाठी भरघोस शुभेच्छा!

साहित्याबद्दलची माहिती तशी स्पष्ट आहे पण व्हॉइसओव्हर विषयी धाग्यात थोडी अधिक माहिती दिली असती तर बरे झाले असते असे वाटते.
कारण,

"आवड असेल तुम्ही व्हॉईसओव्हर पण देऊ शकता......पण सिरियसली काम करायची तयारी हवी! (अटी लागू)"

असं लिहिलंय.
तर ह्या अटी काय आहेत? तसेच रेकॉर्डिंग स्वतः करून पाठवायचे आहे की त्यासाठी विशिष्ठ ठिकाणी हजर राहावे लागेल अशा गोष्टी इथेच स्पष्ट केल्यात तर त्यासाठी इच्छुकांना आपण अटी/शर्तीच्या चौकटीत बसतो की नाही/त्या पूर्ण करू शकतो की नाही हे फोन करण्या आधीच ठरवता येईल आणि तुमचाही त्याच त्याच गोष्टी आलेल्या कॉलवर प्रत्येकाला सांगण्यासाठी लागणारा वेळही वाचेल तसेच "लगेच संपर्क साधा" हे वाक्य वाचून वाचकांचा ही एक निव्वळ जाहिरात असल्याचा गैरसमजही होणार नाही!

असो, नवीन नवीन काहीतरी करून पाहण्याचा छंद आहे, त्यामुळे अद्याप कधी केला नसलेला 'व्हॉइसओव्हर' चा प्रयोग करून बघायला मला नक्की आवडेल. पण ऑडिओबुक साठी माझा आवाज योग्य आहे की नाही ह्याची मला खरंच कल्पना नाही त्यामुळे फोनवर रेकॉर्ड केलेला माझा आवाज कसा येतो हे समजण्यासाठी नमुन्याखातर खाली दोन छोट्याशा ऑडिओ क्लिप्स देत आहे, त्यावर तुमचा (तुमच्या सवडीने, अजिबात घाई नाही) जो काही अभिप्राय येईल त्यावर फोनवर संभाषण करावे की नाही हे ठरवता येईल आणि आपला वेळही वाचेल!

धन्यवाद 🙏

विनिता००२'s picture

2 Aug 2022 - 6:37 pm | विनिता००२

धन्यवाद
व्हाईसओव्हर साठी वयाची अट नाही..भाषा उच्चार नीट हवेत. कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करावी लागतात. आपला आवाका ओळखून काम घेता येतील.
लहान मुले ते वृध्द सर्व आवाज चालतील. फक्त कामाची मागणी असेल तो आवाज निवडला जाईल.
कामे ऑनलाईन चालतात..सराव मिटींग असतात, थोडे शिकावे लागेल. ते मी शिकवेनच...घरीच शांत वेळी रेकॉर्डींग करु शकाल..

तुमचा आवाज छान आहे. चालेल

कंजूस's picture

2 Aug 2022 - 1:36 pm | कंजूस

कोणत्या वयोगटातला धरला आहे?

विनिता००२'s picture

3 Aug 2022 - 1:23 pm | विनिता००२

सर्व वयोगटातील