(सिंह कधी रागीट असतो का ?)

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
13 Jul 2022 - 12:19 am
गाभा: 

नुकतेच श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी नुतन संसदभवनावर बसवण्यात येणार्‍या अशोकचिन्हाचे उद्घाटन केले. त्या चिन्हचे ट्विटर वर पाहण्यात आलेले हे फोटो >>

महुआ मोईट्रा ताईंनी ट्विट केलेला हा फोटो : ताई पुढे जाऊन सत्यमेव जयते चा संघमेव जयते इथवर प्रवास पुर्ण झालेला आहे असेही म्हणाल्या !
>>>

4

हा वायेसार ने ट्विट केला फोटो :
>>>

4

एक रुपाया दंड फेमस प्रशांत भूषण म्हणाले - "From Gandhi to Godse; From our national emblem with lions sitting majestically & peacefully; to the new national emblem unveiled for the top of the new Parliament building under construction at Central Vista; Angry lions with bared fangs.
This is Modi's new India!"

हा विकिपेडीयावर सापडलेला सारनाथ चा मुळ फोटो :
>>>
4

एकुणच सगळा टिवटिवाट पाहुन देशहिताचे काही ज्वलंत प्रश्न उभे रहातात >>>
खरेच सिंह कधी रागीट असतो का ? सिंह कधी मस्युलर , पिळदार स्नायु असलेला, बलदंड असतो का ? की गर्जना करणारा सिंह म्हणजे हिंदुत्ववादी अन गप्प बसलेला सिंह सेक्युलर असे असते ना ? राष्ट्रचिन्हावरचा सिंह कसा प्रेमळ असायला हवा , त्याच्या चेहर्‍यावर बकरीच्या सारखा करुण भाव असायला हवा , त्याचे सुळे तर अजिबात दिसता कामा नयेत. उलट लॅब्रॅडोर कसं जीभबाहेर काढुन लाळ घोटतं अन कधीही येऊन चाटेल असे वाटतं तसे काहीसे भाव असायाला हवेत सिंहाच्या चेहर्‍यावर !

आम्हाला तर वाटते कि राष्ट्रचिन्हावरील सिंह असा असायला हवा >>>

4

तुम्हाला काय वाटते ?

;)

प्रतिक्रिया

सुक्या's picture

13 Jul 2022 - 1:45 am | सुक्या

नावडतीचे मीठे अळणी ..

खरे दुखणे .. मोदींनी त्याचे अनावरण केले .. आणी आम्हाला नाय बोलावले हे आहे.
गांधीजी चे सिंव्ह अगदी कोमल , शांतता प्रिय , अहिंसावादी वगेरे वगेरे होते ...
मोदीनी त्यांना हिंसक केले ..
कलियुग आहे हो कलियुग ... देश बुडवला पार .. मोदीने ..
(छाती पिटणारी स्मायली)

चौथा कोनाडा's picture

13 Jul 2022 - 5:33 pm | चौथा कोनाडा

गांधीजी चे सिंव्ह चरख्यावर सुत कताई देखील करत असत असं ऐकण्यात आलं होतं !

ससा किंवा कोल्हा करायचा काय त्याचा?

बघतोस काय रागाने? ओव्हरटेक केलंय वाघाने.. असा काहीतरी प्रसंग झाला असेल, म्हणून चिड्ला असेल.

शिवाजी होळगे's picture

13 Jul 2022 - 8:52 am | शिवाजी होळगे
शिवाजी होळगे's picture

13 Jul 2022 - 8:52 am | शिवाजी होळगे
प्रचेतस's picture

13 Jul 2022 - 9:07 am | प्रचेतस

हा सुळे विचकलेला कार्लेचा सिंह बघा

a

प्रसाद गोडबोले's picture

13 Jul 2022 - 12:14 pm | प्रसाद गोडबोले

श्या , कसले उग्र हिंदुत्ववादी संघी सिंह आहेत हे . =))))

प्रसाद गोडबोले's picture

13 Jul 2022 - 12:36 pm | प्रसाद गोडबोले

श्या , कसले उग्र हिंदुत्ववादी संघी सिंह आहेत हे . =))))

श्वेता व्यास's picture

13 Jul 2022 - 10:22 am | श्वेता व्यास

खिक्क. विरोध करायला काहीच नाही का म्हणून असे निरर्थक मुद्दे काढतात.

विवेकपटाईत's picture

13 Jul 2022 - 12:04 pm | विवेकपटाईत

काल नवभारत टाइम्स हिन्दी चॅनल वर मूर्तिकार देवरे यांची मुलाकात पाहिली. त्यांना हे काम सरकार ने नव्हे तर संसद भवन निर्माण करणार्‍या कंपनी ने दिले होते. त्यांनी सुरूवातीला म्हंटले एकच मोनालिसा कुणाला रोगी, कुणाला सुंदर आणि कुणाला रागीट दिसते. हा ज्याचा त्याचा दृष्टीकोण आहे. बाकी त्यांनी मूर्तीची छोटी प्रतिकृती वेगवेगळ्या अंगलने दाखवून मुलाकात घेणार्‍या पत्रकारचे समाधान केले. मूर्तीत कुठलाच बदल केलेला नाही. फक्त आकार मोठा आहे. बाकी विरोध करून जनतेचा रोष ओढवून आपल्याच पायावर कुडळ मारण्याचे कार्य विरोधी पक्ष व्यवस्थित करत आहे. भाजप प्रेमी ही खुश सिंह हा 'दहाड' मारणारा आहे.

जेम्स वांड's picture

13 Jul 2022 - 12:39 pm | जेम्स वांड

दिसत नाही

स्वधर्म's picture

13 Jul 2022 - 3:03 pm | स्वधर्म

आधीचे (मूळ) सिंह आणि नवीन प्रतिकृती यात फरक दिसतो आहे. नवीन सिंहांचे जबडे अधिक वासलेले, त्यामुळे अधिक आक्रमक दिसत आहेत.
मूळ चिन्ह प्रमाण मानूनच प्रतिकृती करण्याचा विरोधकांचा मुद्दा असावा. हवे तसे बदल करू नयेत., हे राष्ट्रध्वजाच्या बाबतीत तर अत्यंत कटाक्षाने पाळले जाते व बदल करून वापरल्यास कायद्याने शिक्षाही असावी कदाचित.
बाकी आक्रमकता आपल्या सीमेवर पाहिजे, संसदेवरील चिन्हात असणे पुरेसे नाहीच.

विवेकपटाईत's picture

13 Jul 2022 - 3:50 pm | विवेकपटाईत

कुठलाही बदल नाही आहे. फक्त अप्रचार आहे.

कपिलमुनी's picture

13 Jul 2022 - 3:56 pm | कपिलमुनी

आपल्याला शिल्प कलेतले काय पेट्रोल ते डॉलर सगळे कळते म्हणणाऱ्या भक्तांडा ना काय सांगावे?

आम्हा महाराष्ट्रातील शिल्पकारांच्या उन्नतीसाठी सुरू केलेला एक व्हॉटसअॅप ग्रुप आहे. त्यावर शिल्पकार सुनील देवरेसुद्धा आहेत. त्यांना मी राजचिन्हच्या शिल्पाबाबत काही प्रश्न विचारले होते.
●सारनाथच्या मूळ शिल्पाची रेप्लिका बनवायची होती की सिंह करण्यासाठी काही फ्रीडम दिलं होतं?

शिल्पकार सुनील देवरे सरांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं आहे की त्यांनी सारनाथ येथे सापडलेल्या स्तंभशीर्षाची रेप्लिका बनवली आहे. किंवा तेच शिल्प मुख्य रेफरन्स आहे.
कोणतेही आर्टिस्टिक एक्सप्रेशन्स किंवा शिल्पस्वातंत्र्य घेण्याचा प्रयत्न केलेला नाही

■आता मुख्य आक्षेप

◆मुख्य शिल्पाचे डोळे मोठे असून ते नाकपुडीच्या अगदी थोड्या वरच्या रेषेपर्यंत आहेत. नव्या शिल्पात रागीट भावामुळे भुवया आक्रसल्या आहेत त्यामुळे कपाळाच्या मधोमध पडलेल्या वळ्या या मुख शिल्पात कुठेही नाहीत.

◆एकूण मुख्य शिल्पाची सिमेट्रीकल आयाळ असून ती एखाद्या पॅटर्न प्रमाणे कोरलेली आहे अगदी जे नव्या शिल्पात रियलिस्टिक करण्याचा प्रयत्न वाटतो

◆जेंव्हा तुम्ही शिल्पाचा आकार अतिभव्य बनवता तेंव्हा पर्सपेक्टिव्हनुसार हेड मोठं करावं लागतं. पण इथे ते आहे त्याच्यापेक्षा पण लहान झालंय.
डोक्याच्या दोन्ही बाजूला भरपूर आयाळ नसून पण भरपूर प्रमाणात आयाळ दाखलेली आहे जी पार पायापर्यंत वाढलेली आहे.

◆सारनाथचं स्तंभशीर्ष त्याच्या झिलईसाठी प्रसिद्ध आहे. मग ते मातीकामात तर सहज शक्य होतं. (मेटल कास्टिंग करताना तो परिणाम आला नाही तरी ते घासून बफिंग करू शकतो)

◆शिल्पाचे वेगवेगळे भाग जोडलेले एवढे स्पष्ट दिसत आहेत की ते घासून लेव्हल करण्याचे कष्ट ही घेतले नाहीत. हे खटकलं नाही का शिल्पकाराला आणि ते काम अप्रुव करणाऱ्या टीमला?

◆पायावर एवढ्या घोड्यासारख्या शीरा दाखवण्याचं नेमकं प्रयोजन काय?

◆खालचे घोडा आणि बैल (हत्ती आणि सिंह पलीकडल्या बाजूला आहेत) हे ज्या पद्धतीने मुख्य शिल्पात कोरले आहेत त्यासारखे नव्या शिल्पात अजिबात दिसत नाहीत. बैलाचा पुढच्या दोन पायांपैकी एक सरळ आणि एक हवेत का आहे? त्याचे खुर असे जाडे भरडे का केले आहेत हे न कळणारे आहे
(मुख्य शिल्पात किती व्यवस्थित खाली टेकलेला पाय आहे.) या साध्या गोष्टी एक शिल्पकार म्हणून लगेच नजरेत भरतात.
खरंतर मातीकामातच एवढे दोष आहेत की ते यावर काम करणाऱ्या अधिकारी वर्गाने अप्रुव्ह कसे केले हे कोडं आहे.

आपलं राजचिन्ह जसं असायला हवं तसं ते झालं आहे का?
अजिबात नाही.
एखाद्या गणपतीच्या सिंहासनाचा सिंह करावा तसा काहीसा तो सिंह मला स्वतःला वाटतो. अशोक स्तंभावरचा सिंह नक्कीच नाही.

ज्या शिल्पकामाचा आदर्श सांगितला गेला पाहिजे ते कामंच सदोष असेल तर आपण भारतीय, शिल्पकलेचा नेमका काय वारसा सांगणार आहोत?

राजकीय लोकांना त्या आडून मोदींवर टीका करायची असेल किंवा अजून काही, त्याच्याशी आपल्याला देणे घेणे नाही. जे स्पष्ट दिसतं आहे ते बोलायला हवं.
कारण शेवटी हा चौकातल्या एखाद्या शिल्पाचा विषय नसून संसदेवर लागणाऱ्या राजचिन्हाचा थोडक्यात देशाचा विषय आहे.

(हे आक्षेप घेतल्यावर सकाळपासून अनेक ज्येष्ठ शिल्पकारांचे आणि शिक्षकांचे मला फोन आले. त्यांनी तर हे शिल्प तिथे लागण्याच्या ताकदीचं आणि लायकीचं नाही. ते खरंतर उतरवून नवं बसवणं गरजेचं आहे इथवर मतप्रदर्शन केलं आहे)

फेसबुक पोस्ट जिथे फोटो सहीत हे बदल बघू शकता

भूषण वैद्य ज्येष्ठ शिल्पकार , मुंबई

प्रसाद गोडबोले's picture

13 Jul 2022 - 4:43 pm | प्रसाद गोडबोले

है शाब्बास !

आता कशी मजा आली . सगळेच एकाच बाजुने बोलणारे असल्यावर काय मजा येत नाही . मला वाटलेले की दुसरेच मिपाप्रसिध्द मोदीद्वेष्टे येऊन आपली प्रतिसाद मौक्तिके मांडतील पण ह्या वेळी तुम्ही चान्स मारलात ;) पण असो हरकत नाही.

पण मुळातच सिंहा सारखा आक्रामक , हिंसक, असहिष्णु , परधर्मीय प्राण्यांचे लिटरली लिंचिंग करणारा प्राणी राष्ट्र चिन्हावर असणे हे मुळात किती अयोग्य ह्यावर बोला तुम्ही .
शिवाय त्या चिन्हाखालील वाक्य सत्यमेव जयते हे देखील कोणतातरी मनुवादी उपनिषदातील आहे म्हणे. एवढंच कशाला , स्गळ्याच प्रमुख राष्ट्रीय संस्थांची घोषवाक्ये मनुवादी सनातनी संकृत ह्या मृतभाषेतुन घेतलेली आहेत . अहो एवढेच कशाला चक्क सुप्रीम कोर्टाचा मोट्टो - हा महाभारतील श्लोकातुन उचलेला आहे यतः कृष्णस्ततो धर्मो यतो धर्मस्ततो जयः। होय होय तोच कृष्ण ज्याला महात्मा फुलेंनी लंपट व्यभिचारी अन बाळबोध कृष्णाजी असे म्हणले आहे तो ! आता बोला !

एकुणच हे सगळे गांधीना अपेक्शित धर्मनिरपेक्षतेला अन गंगा जमना तहजीबला शोभणारे नाही.

हे बीभत्स रागीट सिंह हटवा पण त्याच सोबत बाकीचेही सारे हटवले पाहिजे !!

तुम्हाला काय वाटते ?

कपिलमुनी's picture

13 Jul 2022 - 7:52 pm | कपिलमुनी

हां श्लोक इकडून उचलला, तो मोटो तिकडून उचलला..
मग श्लोक , मोटो मधले शब्द बदलले आहेत की आहे तसेच वापरले आहेत ??
मुळात जर प्रतिकृती असेल तर मूळ शिल्पा बरहुकूम हवी..

त्यात बदल जाणीवपूर्वक केलाय की ती चूक आहे?
भारत सरकारने कुठेही हे बदल जाणीवपूर्वक केलेत असे म्हणले नाही ..

फक्त सिंह च नव्हे तर शिल्पात इतरही चुका आहेत.. फेसबुक पोस्ट वाचली तर त्यात फोटो सहीत उदाहरणे आहेत..

यात मोदी वगैरे काही संबंध नसून सरकार ने नेमलेल्या माणसा कडून झालेली चूक रेटून नेत आहेत एवढाच आहे

श्रीगुरुजी's picture

13 Jul 2022 - 8:33 pm | श्रीगुरुजी

मूळ शिल्पात बदल केलेत हे कोणी ठरविले? मत प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते.

ही शिल्पकाराची मुलाखत वाचा. म्हणजे डोक्यात प्रकाश पडेल.

https://www.google.com/amp/s/www.lokmat.com/national/did-you-change-the-...

कपिलमुनी's picture

13 Jul 2022 - 9:38 pm | कपिलमुनी

स्वतःची चूक मान्य करणार आहे का तो?
भक्ताड !!

श्रीगुरुजी's picture

13 Jul 2022 - 10:02 pm | श्रीगुरुजी

लॉजिक आणि आपला दुरूनही संबंध नाही हे आधीच लिहिले आहे.

Bhakti's picture

13 Jul 2022 - 5:25 pm | Bhakti

अरेच्चा!
खरच की फेसबुकवरील शिल्प तज्ञांचे हे मुद्देही बरोबर आहेत.
रिकामा उद्योग म्हणून या गोंधळाकडे ओम इग्नोराय नमः केलं होतं.पण नक्कीच मुळ सारनाथ स्तंभ अधिक देखणा आहे,ही कलाकृती त्याच्या खुप कमी वाटतेय.

खरच की फेसबुकवरील शिल्प तज्ञांचे हे मुद्देही बरोबर आहेत.
रिकामा उद्योग म्हणून या गोंधळाकडे ओम इग्नोराय नमः केलं होतं.पण नक्कीच मुळ सारनाथ स्तंभ अधिक देखणा आहे,ही कलाकृती त्याच्या खुप कमी वाटतेय.

शुभावि's picture

14 Jul 2022 - 11:22 am | शुभावि

पण एवढी भव्यदिव्य मुर्ती घडवताना इतर शिल्पकारांचे मत विचारात घेत नाहीत का? हे तर टिम वर्क असेल ना?

श्रीगुरुजी's picture

14 Jul 2022 - 11:30 am | श्रीगुरुजी

इतरांचे मत विचारात घेतले की नाही हे कोण सांगणार?

फेसबुक वरील फरक दाखवणारे फोटो पाहिले. शिल्पकार यांच्या म्हणण्याप्रमाणे मोठ्या आकारामुळे पहाण्याच्या कोनामुळे फरक दिसतो हे बरोबर आहे पण मुळ कलाकृती आणि नवीन शिल्प यात फरक दिसतोच आहे.
मूळ कलाकृति अतिशय सुबक, सुरेख आणि उत्कृष्ट कलेचा नमुना आहे.
नवीन बनवलेली कलाकृती ओबडधोबड बनवलेली दिसते. सिंहाचे डोळे निश्चितच वेगळे आहेत , आयाळ वेगळी आहे. पायाचे जॉईंट दिसताहेत.
हत्तीचे पाय कसेतरीच बनवले आहेत. इतरही फेसबुक वर दाखवल्या प्रमाणे कामात सुबकता नाहीय.
त्यामुळे नवीन राजचिन्ह मुळ स्तंभाप्रमाणेच आहे ह्या हे शिल्प घडवणार्‍या शिल्पकारांच्या म्हणण्यात तथ्य दिसत नाही.

आक्रमकता आपल्या सीमेवर पाहिजे, संसदेवरील चिन्हात असणे पुरेसे नाहीच.

ऑ , महात्मा गांधीचा देश आहे ना हा ? मग आक्रमकता वैगेरे कसे काय बोलु शकता तुम्ही ?
बाकी तुम्हाला आक्रमकता आपल्या सीमेवर पाहिजे अस म्हणता तर आता पर्यंत झालेल्या (एक सोडुन) सर्व युद्धात भारतीय सैन्याने
केलेल्या पराक्रमानंतर सुद्धा भारतीय सैन्याच्या आक्रमकतेवर तुम्हाला शंका आहे ?

आता तुम्ही म्हणाल मला अस नव्हत म्हणायच, आक्रमकता ही नेत्यात असायला हवी !

ईतिहासात अशी फुसकी आक्रमकता काँग्रेसचे नेते खुप दाखवत आलेले आहेत. जसे की मणि शंकर अय्यर ज्यांनी पाकिस्तानात जाऊन मोदी विरुद्ध पाकिस्तानची मदत मागीतली होती. "मोदी को हटाके हम को वहा बिठाओ" अस पाकिस्तानला विनवणार्या मणिशंकर अय्यरच्या मते भारतातील सरकार पाकिस्तानातले राजकारणी ठरवत असावेत. त्याच्या अश्या समजाला कारणीभुत हामिद अंन्सारी नावाचा महा हलकट माणुस असावा. त्याने केलेले काळे कारनामे अखेर पाकिस्तानच्या पत्रकाराकडुनच ऊघड झाले. पुर्व उपराष्ट्रपती हामिद अंन्सारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पाकिस्तानचा पत्रकारा नुसरत मिर्झाला भारतात आमंत्रण दिले होते. तब्बल ७-८ वेळा हा पत्रकार भारतात येऊन रेकी करुन माहिती गोळा करुन पाकिस्तानातल्या आय एस आय च्या आकाला देत असे.
सर्व साधारण पाकिस्तानच्या नागरीकाला भारताच्या व्हीजावर ३ शहरांना भेट देता येते, पण पुर्व उपराष्ट्रपती हामिद अंन्सारी यांनी विषेश
निमंत्रण दिलेल्या ह्या पाकिस्तानी पत्रकाराला मात्र ७ शहर भेट द्यायची मुभा होती.

क्लिंटन's picture

13 Jul 2022 - 6:10 pm | क्लिंटन

हामिद अन्सारीला काय बोलायचे ते बोला पण आमच्या मणीशंकर अय्यरना काही बोलायचे नाही हा. आतापर्यंत दोनदा आयत्या वेळेस मणीशंकर अय्यरने पचकून आपल्या बाजूला भरपूर मते फिरवली आहेत- २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकींच्या पूर्वी मोदींना 'वो चायवाला' म्हणून आणि २०१७ मध्ये जड गेलेली गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आलेला असताना मोदींना 'वो नीच आदमी' असे म्हणून. मी तर मणीशंकर अय्यरचा म्हणूनच मोठ्ठा पंखा आहे. त्यांनी वयाची ८० पार केली आहेत. त्यांनी सेंच्युरी मारावी या शुभेच्छा कायमच आहेत.

डँबिस००७'s picture

13 Jul 2022 - 7:03 pm | डँबिस००७

म णि शंकर अय्यर एका साईडला तर दुसर्या साईडला दस्तुर खुद्द रा गा.

ह्या दोघामुळेच भाजपा आज सत्तेत टिकुन आहे.

सिम्हामध्ये आक्रमकता आणि गर्जना करतानाचा आविर्भाव हवाच कारण मूळ कल्पना ही धर्मचक्रप्रवर्तणाची आहे. गौतम बुध्दांन शाक्यसिम्ह किंवा नरसिंह संबोधले आहे आणि ह्या धर्म चक्र प्रवर्तनाची द्वाही चारी दिशांना गर्जना करून सांगितली जात आहे. मूळ अशोक स्तंभ शीर्षात वर ३२ आरे असलेले धर्मचक्र ही होते. बुद्ध ३२ महामानवाच्या लक्षणानी परिपूर्ण होते त्याचे e द्योतक आहे. तेव्हा सिंह आक्रमक हवेतच. पण मूळ शिल्पावर मथुरा आणि गांधार शिल्प शैली चा प्रभाव असलेने ते सिंह रियालिस्तिक पद्धतीने घडवलेले नाहीयेत. सिंहाच्या मिशा पण बुध्दाच्या चूनिदार वस्त्राप्रमाने समांतर रेघांनी दाखवल्या आहेत. सिंहाच्या हसऱ्या चेहऱ्या चा पण भास होतो. पण ह्या शैलीत शिल्पात आयाळ, केस, स्नायू किंवा रक्त वाहिन्या (शिरा) अशा रियलिस्तिक पध्दतीने दाखवल्या जात नसत.
मूळ शिल्प वेगळ्या शैलीत घडवले गेले होते. हे आधुनिक शिल्प वास्तववादी शैलितले वाटते आहे इतकाच तो फरक.
ह्यावर फारसा वाद विवाद करण्याची ही गरज नाहीये.
आयपीएस ऑफिसर ह्यांचे एम्बेलम, गाड्या वरचे स्टिकर किंवा टेबलावर ठेवलेले शो पीस मधले अशोक स्तंभाचे चिन्ह पाहता ओरिजिनाल पेक्षा वेगळ्या प्रचंड व्हरायत्या पाहायला मिळतील.

या सिंहाबद्दल विश्वप्रवक्ते संजयजी राउतजी जोवर बोलत नाहीत तोवर मिडीया दखल घेणार नाही.

गामा पैलवान's picture

13 Jul 2022 - 5:20 pm | गामा पैलवान

मार्कस ऑरेलियस,

कुणाला तरी भारतातला सिंह मवाळच दिसायला हवाय. त्यांना इथे लंडनात ट्रफाल्गर चौकात सिंह बसवलेत ते मात्र सुळे दाखवीत डरकाळी फोडतांना दाखवलेले चालतात.
https://i.imgur.com/YjF1gAg.jpeg

( काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ते हाटील, यकदम वक्के च्या चालीवर )

काय तो शिंव्ह,
काय ती आयाळ,
काय तो जबडा,
विकराळ भोक्के

आ.न.,
-गा.पै.

चौथा कोनाडा's picture

13 Jul 2022 - 5:39 pm | चौथा कोनाडा

काय तो शिंव्ह,
काय ती आयाळ,
काय तो जबडा,
विकराळ भोक्के

😃

श्रीगुरुजी's picture

13 Jul 2022 - 5:51 pm | श्रीगुरुजी

या दोन शिल्पात रंग हा मुख्य फरक दिसतोय. बाकी बहुतांशी साम्य आहे. जी प्रकाशचित्रे दिसत आहेत ती अगदी समान अंतरावरून, समान उंचीवरून व समान कोनातून घेतली तर अजिबात फरक दिसणार नाही.

ही दोन्ही प्रकाशचित्रे समान अंतरावरून घेतली आहेत असे दिसत नाही. डाव्या बाजूचे प्रकाशचित्र काहीसे लांबून घेतल्यासारखे दिसते. तसेच ते काहीसे उभे खेचल्याने उभट व बारीक वाटत आहे.

तस्मात या दोन प्रकाशचित्रांवरून तुलना करता येत नाही.

एक उदाहरण देतो. वंदेमातरम् हे प्रख्यात गीत अगदी प्रथम एका चित्रपटात समाविष्ट केले होते. ते लता मंगेशकरांनी गायले होते. नंतर ते अधिकृतरित्या संसद. विधीमंडळ, विद्यालये अशा ठिकाणी एका वेगळ्या चालीत ऐकविले जाते किंवा गायले जाते. १९९७ मध्ये संगीतकार रेहमान यांनी हेच गीत अजून एका वेगळ्या चालीत प्रदर्शित केले. नवीन चालींना कोणीही विरोध केला नाही व नवीन चाली मूळ चालीपेक्षा भ्रष्ट किंवा वाईट आहेत असे कोणीही म्हणत नाही.

समजा हे नवीन शिल्प मूळ शिल्पापेक्षा काहीसे वेगळे वाटत असेल (ते वेगळे आहे का हे अजून सांगता येत नाही), तरीसुद्धा एवढा कांगावा कशासाठी करायचा याचा विचार करावा.

क्लिंटन's picture

13 Jul 2022 - 6:04 pm | क्लिंटन

समजा हे नवीन शिल्प मूळ शिल्पापेक्षा काहीसे वेगळे वाटत असेल (ते वेगळे आहे का हे अजून सांगता येत नाही), तरीसुद्धा एवढा कांगावा कशासाठी करायचा याचा विचार करावा.

कांगावा कशासाठी काय? मोदींच्या सरकारचा तो निर्णय आहे ना? एवढे एक कारण विरोध करायला पुरेसे नाही का?

सुबोध खरे's picture

13 Jul 2022 - 7:55 pm | सुबोध खरे

हायला

तुम्हाला सिंह हवाय कि बोकड.

श्रीलंका सिंगापूर यांच्या चिन्हावर असलेले सिंह सुद्धा दात दाखवणारेच आहेत. श्रीलंकेचा तर हातात तलवार घेतलेला आहे.

इराण इथिओपिया अफगाणिस्तान केनिया सारख्या असंख्य देशांच्या ध्वजावर सिंह आहेत .

त्यातला कोणताही सिंह बायकोच्या ताटाखालचं मांजर असल्यासारखा नाहीये

कपिलमुनी's picture

13 Jul 2022 - 7:55 pm | कपिलमुनी

अधिकृत गाणे उदा जण गण मन असेल किंवा इतर कोणतेही ते सरकारी कार्यक्रमात ए आर रेहमान वाले व्हर्जन वाजवतत की सरकार मान्य??

कर्नलतपस्वी's picture

13 Jul 2022 - 6:25 pm | कर्नलतपस्वी

शिल्पावर भाष्य करणे माझ्या आखत्यारीत नाही पण मला एकच कळते जर संसदेत आक्रमकता आसेल तर सीमेवर सुद्धा आक्रमकता येईल. नाहीतर सोम्या गोम्या कडून दगड गोटे,गोट्या आणखीन काही खाऊन गप्प बसावे लागेल. बाकी चालू द्यात.

कलाकृती अमान्य झाली तर ??
(( आता शिल्प स्विकृत होऊन जागेवर बसले आणि अनावरणही झाले ते सोडा.)) पण तसे झाले नसते तर यासाठी शिल्पकार इंन्शुरन्स काढतील. कमीतकमी ओतीवकाम,धातू ,वेळ याचे पैसे मिळतील.

इरसाल's picture

13 Jul 2022 - 9:50 pm | इरसाल

ज्यांना तो सिंह आक्रमक वाटतोय, त्यांनी त्या सिंहाच्या तोंडात गवताची पेंडी धरली आहे असे कल्पावे.(मनातल्या मनात).
आणी एवढाच कळवळा असेल तर कोर्टात केस करावी कोणी अडवलेय??????

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Jul 2022 - 11:30 pm | अमरेंद्र बाहुबली

रागीट सिंह पाहून चीन घाबरेल असं मोदींजींना वाटलं असावं. :₹)

गामा पैलवान's picture

14 Jul 2022 - 1:44 am | गामा पैलवान

सर्वात विनोदी सिंह पहायचे असतील तर खाली दाखवलेले इंग्लंडचे रॉयल आर्म्स बघावेत.

https://i.imgur.com/xvViDtX.jpeg

हे सिंह आहेत म्हणून सांगावं लागतं. अन्यथा त्या दाढीवाल्या लांबुळक्या मांजरी वाटतात.

-गा.पै.

साहना's picture

14 Jul 2022 - 1:56 am | साहना

दगडी सिंहांची तोंडे हा देशांतील सर्वांत चिंताजनक आणि वादग्रस्त विषय असेल तर देश सुस्थितीत आहे असे वाटते. भूषण सारखी मंडळी जी गाढवांना आणि डुकरांना आपले नेते मानतात त्यांनी सिंह ह्या प्राण्यांसंबंधी न बोललेले बरे.

ह्याच्या उलट HPMSNMJ ह्यांचे चमचे. फोटोत म्हणे ४ नाही तर ५ सिंह आहेत. ह्यांचे चालले असते तर चिन्ह खालचा बैल काढून तिथे HPMSNMJ ह्यांचे तोंड लावले असते.

लंडन च्या सिंहाची कथा :

लंडन वस्तुसंग्रहालयाच्या बाहेर जो सिंह आहे त्याची कथा मनोरंजक आहे. ब्रिटिश सरकारने भारतातून एक सिंह लंडन मध्ये आणला. आणि शिल्पकाराला दिला. पण समुद्री प्रवास आणि लंडन चे हवामान इत्यादी ने तो मेला. पण शिल्पकाराने हि बातमी सरकारला दिली नाही. सिंहाच्या जागी एक मांजर बसवले आणि शिल्प पूर्ण केले.

त्यामुळे त्या सिंहाचे पंजे मांजरा सारखे आहेत. [१]

[१] https://www.mylondon.news/news/gruesome-story-behind-trafalgar-square-21...

गामा पैलवान's picture

14 Jul 2022 - 10:47 pm | गामा पैलवान

साहना,

मांजरपंजा सिंहांचं तथ्य / गुपित इथे सांगितल्याबद्दल आभार! :-)

आ.न.,
-गा.पै.

शिल्पा वर भाष्य करण्याएवढे ज्ञान मजजवळ नाही. पण तरीही काही गोष्टी खटकतात.
1 शिल्प सुरेख नाही खुप खरखरीत दिसत आहे.
2.अशोकचक्राचा रंग निराशावादी भासतो.
3. आयाळिवरील केसांची नक्षी विचित्र दिसते.
4.सिंह धष्टपुष्ट न दिसता Pedigree चे pet food खाल्ल्यासारखा दिसतो आहे.

गुजरात राज्यातील Statue of Unity अधिक उठावदार आणि स्मुथ दिसतो.

जर सामान्य नागरिकाला या गोष्टी खटकत आहेत तर हे शिल्प अनुमोदित करणार्‍यांना लक्षात येऊ नये का?
बाकी मोदींना लक्ष करण्याचे काम चालुद्या....
हत्ती चालतो तर कुत्रे भुंकतात

सुक्या's picture

14 Jul 2022 - 11:32 pm | सुक्या

4.सिंह धष्टपुष्ट न दिसता Pedigree चे pet food खाल्ल्यासारखा दिसतो आहे.
लै बेक्कार हसलो याला. म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला? Pedigree चे pet food खाल्ल्यावर धष्ट्पुष्ट होत नाही काय? आणी सिंह कधीपासुन पेट फुड खायला लागला ??? Pedigree चे pet food खाल्लेला सिंह तुम्ही कुठे पाहीला ?

खुसपट काढायचेच तर काहीही मुद्दा चालतो हे मात्र खरे ... म्हणजे बघा "2.अशोकचक्राचा रंग निराशावादी भासतो." हे पण एक कारण आहे. आशावादी व निराशावादी रंग पण असतात?

उपमा अलंकार या आणि इतर भाषा सौंदर्याचा आपण आस्वाद घेतलेला दिसत नाही.
पण कमीतकमी पेट फुड खाल्लेले पाळीवप्राणी तरी पाहिले का?

आणि रंगांचे म्हणाल तर जरा गुगळे बाबाला. विचारा की. उष्ण , शीत रंग असतात.

खुसपट अधिकारी लोकांच्या कामातली आहे मोदींच्या नाही.

स्वप्निल रेडकर's picture

14 Jul 2022 - 7:20 pm | स्वप्निल रेडकर

खर तर काही समर्थकांची पंचाईत असते नेहमी.
बाबरी पाडल्यावर कसे आमचे निडर नेते ,कट्टर हिंदुत्व वगैरे छाती थोपटून घेतात समर्थक पण ती पाडणारे कोर्ट मध्ये शेपूट घालून आम्ही तिथे नव्हतोच आमचा काही संबंध नाही हे पटवून देतात.

गोध्रा दंगलीत शेठ नि बरोबर बदला घेतला ,कसे तेच हिंदुह्रिदय सम्राट आहेत ,"त्यांची"कशी जिरवली म्हणून भक्त मंडळी नाचत असतात आणि कोर्टात शेठ चा काहीच हात नव्हता हे सिद्ध करून झाल्यावर सुप्रीम कोर्ट ने म्हटलंय म्हणजे बरोबर असणार , करावा लागतो असा गनिमी कावा अशा पळवाटा .

या अशोक स्तंभ शिल्पा बद्दल तेच.भक्त मंडळी आता कसा सिंह बरोबर वाटतोय,त्याचा पवित्रा बदलला ,सिंह डरकाळी फोडतच असतो ,हि नवीन भारताच्या आक्रमक पॉलिसीज आणि आत्मविश्वासाची निशाणी आहे वगैरे वगैरे आत्ममग्न.
त्या उलट एक केंद्रीय मंत्री सांगताहेत कि काही बदल नाही केलाय , फक्त पर्स्पेक्टिव्ह मुळे सिंह आक्रमक दिसताहेत,आर्टिस्ट स्वतः सांगतोय कि आम्ही फक्त रिप्लिका बनवलीय(ती जरा हुकलीय) कुठल्याही डोळे नीट असलेल्या माणसाला दिसेल कि पर्स्पेक्टिव्ह पेक्षा प्रपोर्शन मध्ये बदल झालेले आहेत .

उद्या तिरंग्याचा रंग बदलून भगवा केला तरी त्याच्या समर्थनात पण असेच धागे निघतील आणि हुशार समर्थक ते बरोबर आहे हे पण पटवून देतील .

श्रीगुरुजी's picture

14 Jul 2022 - 9:17 pm | श्रीगुरुजी

बाबरी पाडल्यावर कसे आमचे निडर नेते ,कट्टर हिंदुत्व वगैरे छाती थोपटून घेतात समर्थक पण ती पाडणारे कोर्ट मध्ये शेपूट घालून आम्ही तिथे नव्हतोच आमचा काही संबंध नाही हे पटवून देतात.

त्या नेत्यांनीच पूर्ण योजना आखून बाबरी पाडली होती. परंतु तेवढे पुरेसे नव्हते. त्याच जागेवर श्रीराममंदिर बांधणे हे अंतिम उद्दिष्ट होते. एकदा आधीचे मुख्य काम पूर्ण केल्यानंतर पुढील काम करण्यासाठी न्यायालयाच्या कचाट्यात अडकण्याची गरज नव्हती. ते काम कोणी पार पाडले हे सर्व जगाने पाहिले होते. अर्थात आपल्या घरातून बाहेर पाऊलही न ठेवता आम्हीच हातोडे मारून बाबरी पाडली असे सातत्याने सांगणारे लबाड बोकेही जगाने पाहिले आहेत.

गोध्रा दंगलीत शेठ नि बरोबर बदला घेतला ,कसे तेच हिंदुह्रिदय सम्राट आहेत ,"त्यांची"कशी जिरवली म्हणून भक्त मंडळी नाचत असतात आणि कोर्टात शेठ चा काहीच हात नव्हता हे सिद्ध करून झाल्यावर सुप्रीम कोर्ट ने म्हटलंय म्हणजे बरोबर असणार , करावा लागतो असा गनिमी कावा अशा पळवाटा .

त्यात कसल्या पळवाटा? विरोधकांनी आणि अनेक तथाकथित निधर्मी संघटनांनी जंग जंग पछाडूनही मोदींना दंगल प्रकरणात अडकविता आले नाही. भारतात न्यायालये असल्याने तुम्हाला कोणी न्यायालयात खेचले तर तुम्हाला कायदेशीर मार्गानेच तुमची बाजू मांडावी लागते.

त्या उलट एक केंद्रीय मंत्री सांगताहेत कि काही बदल नाही केलाय , फक्त पर्स्पेक्टिव्ह मुळे सिंह आक्रमक दिसताहेत,आर्टिस्ट स्वतः सांगतोय कि आम्ही फक्त रिप्लिका बनवलीय(ती जरा हुकलीय) कुठल्याही डोळे नीट असलेल्या माणसाला दिसेल कि पर्स्पेक्टिव्ह पेक्षा प्रपोर्शन मध्ये बदल झालेले आहेत .

रेप्लिका हुकलीये असे शिल्पकाराने सांगितलेले नाही. मूळ साडेतीन फूट उंचीची प्रतिमा २१ फूट उंचीची केल्यावर सर्व बाजू त्या प्रमाणात वाढतातच. एखादे चित्र झूम केल्यावर ते मूळ चित्रापेक्षा जरा वेगळे दिसते. तसेच तुम्ही ज्या कोनातून प्रतिमा पाहता त्या कोनानुसार फरक दिसतो हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. एखाद्याचा फोटो अगदी समोरून काढणे आणि स्टुलावर उभे राहून काढणे यात फरक असतो. मूळ व्यक्ती तीच असली उंचीवरून काढलेल्या फोटोत तीच व्यक्ती बुटकी वाटते. तसंच इथेही आहे.

स्वप्निल रेडकर's picture

14 Jul 2022 - 7:25 pm | स्वप्निल रेडकर

आणि बाकी कसलं नसल तरी बीजेपी ला या गोष्टी साठी श्रेय द्यावच लागेल कि कसं विरोधक आणि सामान्य माणसाला फालतू मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवायचं. हे त्यांना पक्के कळलेलं आहे ,
बाकी वाढत चाललेली बेरोजगारी,महागाई,रुपयाचं अवमूल्यन ,चीनच्या कुरापती,पत्रकारांवरच्या कारवाया हे असले फालतू विषय कशाला डोक्यात येतील म्हणा.

स्वप्निल रेडकर's picture

14 Jul 2022 - 7:25 pm | स्वप्निल रेडकर

आणि बाकी कसलं नसल तरी बीजेपी ला या गोष्टी साठी श्रेय द्यावच लागेल कि कसं विरोधक आणि सामान्य माणसाला फालतू मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवायचं. हे त्यांना पक्के कळलेलं आहे ,
बाकी वाढत चाललेली बेरोजगारी,महागाई,रुपयाचं अवमूल्यन ,चीनच्या कुरापती,पत्रकारांवरच्या कारवाया हे असले फालतू विषय कशाला डोक्यात येतील म्हणा.

स्वप्निल रेडकर's picture

14 Jul 2022 - 7:25 pm | स्वप्निल रेडकर

आणि बाकी कसलं नसल तरी बीजेपी ला या गोष्टी साठी श्रेय द्यावच लागेल कि कसं विरोधक आणि सामान्य माणसाला फालतू मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवायचं. हे त्यांना पक्के कळलेलं आहे ,
वाढत चाललेली बेरोजगारी,महागाई,रुपयाचं अवमूल्यन ,चीनच्या कुरापती,पत्रकारांवरच्या कारवाया हे असले फालतू विषय कशाला डोक्यात येतील म्हणा.

रंगीला रतन's picture

14 Jul 2022 - 7:36 pm | रंगीला रतन

आता एकच गोष्ट तुम्ही ३ वेळा सांगितली म्हंजे हेच सत्य असणार. त्रिवार सत्य :=)

सुबोध खरे's picture

14 Jul 2022 - 7:56 pm | सुबोध खरे

गोबेल्स नावाचा एक माणूस काही तरी म्हणाला होता ना कि खोटं परत परत सांगितलं कि खरं वाटायला लागतं

श्रीगुरुजी's picture

14 Jul 2022 - 8:02 pm | श्रीगुरुजी

खरं आहे.

आपल्या तिरंगी ध्वजाचं चित्र किंवा प्रतिमा पाहिली तर काही चित्रात/प्रतिमेत तो ध्वज पूर्ण सपाट दिसतो, तर काहींमध्ये त्याचे आडवे टोक मुडपल्यासारखे दिसते (वाऱ्याने फडकतोय असा आभास निर्माण करण्यासाठी). मग ही दुसरी प्रतिमा म्हणजे मूळ ध्वजाच्या प्रतिमेची तोडफोड असते का?

मोदीद्वेषाची उबळ असह्य झाली की असले फालतू वाद सुरू केले जातात.

गामा पैलवान's picture

14 Jul 2022 - 10:44 pm | गामा पैलवान

स्वप्निल रेडकर,

तुमच्या मते संसदेवरील सिंहमुद्रा हा फालतू विषय दिसतो आहे. असू द्या. फक्त तो भाजपने सुरू केलेला नाही. बस इतकंच.

आ.न.,
-गा.पै.

तिमा's picture

15 Jul 2022 - 8:35 am | तिमा

सिंहांच्या बाबतीत नि:पक्षपातीपणे बघितले तर असे दिसते की ही प्रतिकृती मूळ मूर्तिसारखी जमलेली नाही, मूळ कलाकृतीतला आत्मा हरवला आहे, असं म्हणण्याइतका फरक नक्कीच आहे.
पण ते मोदींनी वा भाजपाने मुद्दामहून सांगून करुन घेतले असेल असे वाटत नाही.
आक्षेप घेऊन ती नव्याने बनवण्याचा आग्रह धरणार्यांना एकच सवाल आहे, पुन्हा दुसर्‍या कोणी केलेली मूर्ति हुब्बेहुब मूळ मूर्तिसारखी होईल याची खात्री काय?
तिसरा खर्चाचा मुद्दा, पण तो तुलनेने गौण आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2022 - 11:24 pm | अत्रुप्त आत्मा

@सिंहांच्या बाबतीत नि:पक्षपातीपणे बघितले तर असे दिसते की ही प्रतिकृती मूळ मूर्तिसारखी जमलेली नाही, मूळ कलाकृतीतला आत्मा हरवला आहे, असं म्हणण्याइतका फरक नक्कीच आहे. - ++++++++++ 1111111 प्रचंड सहमत . आणि एवढेच खरे आहे .
बाकी सर्व टनाटनी आणि फुरोगामी या दोना जुळ्या भावंडांचा निरर्थक आत्मकुंथकपणा !

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Jul 2022 - 11:31 am | अमरेंद्र बाहुबली

+१ आत्मासर.
पण काय आहे मोदींच्या प्रत्येक कृतीचं समर्थनच करायचं असं काही लोकांनी ठरवलंय. त्यांच्या वर ईलाज नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jul 2022 - 10:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>सिंहांच्या बाबतीत नि:पक्षपातीपणे बघितले तर असे दिसते की ही प्रतिकृती मूळ मूर्तिसारखी जमलेली नाही, मूळ कलाकृतीतला आत्मा हरवला आहे, असं म्हणण्याइतका फरक नक्कीच आहे.

सहमत आहे. विषयच संपला.

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

21 Jul 2022 - 11:39 am | प्रसाद गोडबोले

धन्यवाद सर !
तुमच्याच प्रतिसादाची वाट पहात होतो !

ख्या ख्या ख्या
k

आग्या१९९०'s picture

15 Jul 2022 - 9:26 am | आग्या१९९०

, पुन्हा दुसर्‍या कोणी केलेली मूर्ति हुब्बेहुब मूळ मूर्तिसारखी होईल याची खात्री काय?
चीनला करायला द्या. हुबेहूब होईल आणि पैसेही कमी लागतील.

डँबिस००७'s picture

15 Jul 2022 - 10:20 am | डँबिस००७

चीनला करायला द्या.

मग तुम्ही म्हणायला मोकळे की चीन ला मुर्ती बनवायला दिली, ईथे भारतात काय बनत नव्हती ?

आग्या१९९०'s picture

15 Jul 2022 - 11:13 am | आग्या१९९०

देशातील कलाकारांच्या मर्यादा स्पष्ट झाल्याने आता चीनला काम दिले तरी आक्षेप घेणार नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Jul 2022 - 8:28 pm | अमरेंद्र बाहुबली

त्याला टक्केवारीने काम दिले असेल तर तो तरी काय करनार?? भारतात सर्वंच खात्यात भ्रष्टाचार चालतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jul 2022 - 6:30 pm | अमरेंद्र बाहुबली

मोदी सरकारला सुप्रिम कोर्टाने थोबाडले. मुर्तीत दुरूस्तीचे आदेश.

क्लिंटन's picture

26 Jul 2022 - 10:26 am | क्लिंटन

मिपावर खोटेनाटे पसरवले जाऊ नये या उदात्त हेतूने जिथेतिथे पिंका टाकणारे अ.बा--

मोदी सरकारला सुप्रिम कोर्टाने थोबाडले. मुर्तीत दुरूस्तीचे आदेश.

याचा पुरावा द्या. आणि तसा पुरावा तुमच्याकडे नसेल तर जिथेतिथे जाऊन कबुतराप्रमाणे घाण करणे बंद करा.

श्रीगुरुजी's picture

26 Jul 2022 - 1:31 pm | श्रीगुरुजी

फेकाफेकीचे पुरावे असतात का?

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jul 2022 - 1:33 pm | अमरेंद्र बाहुबली

तुम्हालाही पाठवलाय गुरूजी चेक करा कायप्पा.

जर व्हाटसअ‍ॅपवर ऐकएकाला पुरावे पाठावायचे असतील तर तर ती प्रतिक्रीया तिथेच लिहायची ना. येथे कशाला सार्वजनिक ठिकाणी लिहायची?

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jul 2022 - 3:15 pm | अमरेंद्र बाहुबली

एबापा माझा चॅनल वरील विडीओ ईथे कसा अपलोड करू ते सांगा.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jul 2022 - 1:32 pm | अमरेंद्र बाहुबली

याचा पुरावा द्या. आणि तसा पुरावा तुमच्याकडे नसेल तर जिथेतिथे जाऊन कबुतराप्रमाणे घाण करणे बंद करा.
एबीपी माझाची बातमी आहे, तो विडीओ माझ्याकडे आहे. मिपावर विडीओ अपलोड करायची सोय नसल्याने मी तो विडीओ तुम्हाला कायप्पावर पाठवलाय. चेक करा. आणखी कुणाला हवा असल्यास मला आपला नंबर व्यनि करा.

क्लिंटन's picture

26 Jul 2022 - 1:38 pm | क्लिंटन

मला काही तो व्हिडिओ मिळालेला नाही.

कोर्टात त्या सिंहांविरोधात पी.आय.एल दाखल झाली आहे अशी बातमी आली होती. https://www.news18.com/news/india/pil-in-sc-against-national-emblem-atop... कोर्टात पी.आय.एल दाखल होणे आणि कोर्टाने सरकारला ते सिंह बदलायचा आदेश देणे एकच का? उगीच आपले काहीतरी.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jul 2022 - 1:59 pm | अमरेंद्र बाहुबली

तुम्ही मला ब्लाॅक केलंय बहुतेक. ते हटवा नी मला मॅसेज करा. पाठवतो.

श्रीगुरुजी's picture

26 Jul 2022 - 2:01 pm | श्रीगुरुजी

(१) न्यायालयात एखादी याचिका दाखल करणे आणि-(२) न्यायालयाने केंद्र सरकारला थोबडवले व मूर्तीत बदल करण्याचा आदेश दिला . . . हे दोन्ही समान आहे हे फक्त मॉंटेसरी पातळीवरचा मुलगा समजेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jul 2022 - 2:22 pm | अमरेंद्र बाहुबली

विडीओ नीट पाहीला का? पुन्हा पहा.

श्रीगुरुजी's picture

26 Jul 2022 - 2:54 pm | श्रीगुरुजी

कधीतरी बुद्धी वापरायचा प्रयत्न करा.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jul 2022 - 3:15 pm | अमरेंद्र बाहुबली

हा काय प्रकार आहे गुरूजी? पुरावा देऊनही तुम्ही असं करताय?

श्रीगुरुजी's picture

26 Jul 2022 - 3:32 pm | श्रीगुरुजी

ती ४-५ सेकंदांची एका वाहिनीवर "झटपट १००" अंतर्गत सांगितलेली एक ओळ हाच ढळढळीत अंतिम पुरावा आहे, असे मॉंटेसरी पातळीवरचा मुलगा सुद्धा मानणारे नाही.

मुळात त्या वाहिनीची विश्वासार्हता किती, न्यायालयाने तसा खरोखरच आदेश दिला असेल तर फक्त ४-५ सेकंदात एक ओळ सांगून ते कसे मोकळे झाले, इतर कोणत्याही भाषेतील एकाही वाहिनीवर किंवा एकाही वृत्तपत्रात याचा उल्लेख का नाही, न्यायालयाने हा आदेश खरोखरच दिला आहे का . . . असे विचार डोक्यात येतच नाहीत की बुद्धीला झेपत नाहीत?

असल्या एक ओळीच्या निराधार वक्तव्याला अजूनही ढळढळीत पुरावा समजत राहणे हा कशाचा कळस आहे हे आपल्याला समजणार नाही, पण बुद्धीचा वापर करणाऱ्यांना नक्की समजते.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jul 2022 - 3:57 pm | अमरेंद्र बाहुबली

तुमच्या घरी सकाळ पेपर येतो. त्यात मी एखादी बातमी वाचली ती बातमी खरी आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही लोकमत, पुण्य नगरी, देशदूत, लोकसत्ता, दैनिक जागरण, बांगला समाचार, सनातन प्रभात, पान्श्चजन्य, तरूण भारत, महाराष्ट्र टाईम्स, ईंडीयन टाईम्स, टाईम्स ओफ ईंडीया असे सर्व पेपरचा रतीब लावनार नाहीत ना?? बरोबर?

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jul 2022 - 3:59 pm | अमरेंद्र बाहुबली

सुधारीत.

तुमच्या घरी सकाळ पेपर येतो. त्यात तुम्ही एखादी बातमी वाचली ती बातमी खरी आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही लोकमत, पुण्य नगरी, देशदूत, लोकसत्ता, दैनिक जागरण, बांगला समाचार, सनातन प्रभात, पान्श्चजन्य, तरूण भारत, महाराष्ट्र टाईम्स, ईंडीयन टाईम्स, टाईम्स ओफ ईंडीया असे सर्व पेपरचा रतीब लावनार नाहीत ना?? बरोबर? तसंच आहे हे पण. ईतरांची बुध्दी काढण्याआधी थोडा सारासार विचार करत चला गुरूजी.

प्रसाद_१९८२'s picture

26 Jul 2022 - 3:06 pm | प्रसाद_१९८२

हे दोन्ही समान आहे हे फक्त मॉंटेसरी पातळीवरचा मुलगा समजेल.
--
😂 😂

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jul 2022 - 3:11 pm | अमरेंद्र बाहुबली

तुम्ही मला कायप्पा वर मॅसेज पाठवा. मी तुम्हाला टेक्स्ट केलाय पहा.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jul 2022 - 3:14 pm | अमरेंद्र बाहुबली

मला काही तो व्हिडिओ मिळालेला नाही तुम्हाला मुळात पुरावा पहायचाच नाहीये. तसं नसतं तर तुम्हा एव्हाना मला मॅसेज करून पुरावा पाहीला असता. तसं असेल तर कृपया हा विषय ऊगाळने बंद करा किंवा मला वाट्सअप सा मॅसेज करू पुरावा घ्या.

येथे प्रतिक्रिया दिले आहे तर पुरावे येथेच द्या.
तिकडची धुणी येथे धुवु नका.

श्रीगुरुजी's picture

26 Jul 2022 - 3:41 pm | श्रीगुरुजी

हसू नका.

तो पुरावा म्हणजे झटपट १०० बातम्या अंतर्गत ४-५ सेकंदात एका वाहिनीवर वाचलेली एक ओळ. यांच्यासाठी ती एक ओळ हाच अंतिम ट्रकभर भक्कम पुरावा. विश्वात इररत्र कोठेही इतर पुरावा आढळणार नाही. अश्या एका ओळीवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्याची कीव सुद्धा येत नाही.

प्रति श्री संपादक मंडळ,
श्री अमरेंद्र बाहुबली सकृतदर्शनी मिपाचा वापर खोट्या गोष्टी परवण्यासाठी करत आहेत आहेत. अनेकांनी मागुनही कोणताही पुरावा सादर करत नाहीत. कृपया त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jul 2022 - 3:54 pm | अमरेंद्र बाहुबली

पुरावा सादर केलाय ह्याचा पुरावा म्हणजे श्रिगुरूजींचा वरील प्रतिसाद. एक धागा ऊडूनही तुमचं खोटं बोलणं काही थांबत नाहीये.

नव्या संसदभवनावरील तथाकथित रागीट सिंह कायद्याचे उल्लंघन करत नाहीत असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हे सिंह तिथे बसविल्यानंतर बराच गदारोळ झाला आणि ते सिंह बदलायचे आदेश सरकारला द्यावेत या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्या याचिका न्यायालयाने नाकारल्या आहेत.

https://www.livelaw.in/top-stories/lion-statute-atop-new-parliament-buil...

आग्या१९९०'s picture

30 Sep 2022 - 7:11 pm | आग्या१९९०

रागीटपेक्षा बेढब वाटत होता सिंह. याचिका नाकारल्या हे योग्यच केले.

सुबोध खरे's picture

1 Oct 2022 - 10:07 am | सुबोध खरे

अरेरे

चीनलाच द्यायला हवी होती सिंह बनवायची ऑर्डर

म्हणजे कसा ऐटदार दिसला असता सिंह

श्रीगुरुजी's picture

30 Sep 2022 - 7:58 pm | श्रीगुरुजी

राफेल, न्यायाधीश लोया, श्रीराममंदिर भूमीपूजन अश्या अनेक प्रकरणात याचिका करून वारंवार तोंडावर आपटूनही मोदीद्वेष्टे सुधारायला तयार नाहीत. आता पुन्हा एकदा तोंडावर आपटले. पण म्हणून हे सुधारण्याची शक्यता शून्य. पुन्हा एकदा अत्यंत फालतू प्रकरणावर रान उठवून हे सर्वोच्च न्यायालयात जातील आणि पुन्हा एकदा जोरदार तोंडावर आपटतील.

प्रसाद गोडबोले's picture

1 Oct 2022 - 3:27 pm | प्रसाद गोडबोले

मोदीद्वेष्टे सुधारायला तयार नाहीत

+१

हाच मोदी शहांचा मेजर प्लस पॉईंट आहे. त्यांना जे विरोधक आहेत ते सगळेच बावळटा सारखे नॉन इश्शु चे इश्शु कसे काय करतात देव जाणे.
त्या महुआ मोईत्रांना बोलताना ऐकलं की हसवं की रडावं हेच कळत नाही =))))

असो. हे असेच चालु राहिल्यास मोदी शहा २०२४ मध्ये अजुन एक निर्णायक विजय संपादन करतील ह्यात शंका नाही.

प्रचेतस's picture

1 Oct 2022 - 5:32 pm | प्रचेतस

ते सगळं ठीक आहे पण मूळ सारनाथच्या शिल्पाशी तुलना केली असता हे शिल्प सुमार आहे हे तुम्हालाही मान्य करायला हरकत नाही :)

"संपुर्ण दिल्लीत मेट्रो सोडली तर भारतीयांनी काय बांधले?"," जे काही आहे ते मोघल आणि ब्रिटिशांनी बांधलेले आहे" अस म्हणणार्या ल्युटिंयंस लोकांना "सेंट्रल व्हीस्टा" प्रकल्पाने जबरदस्त चपराक बसलेली होतीच, त्यावर "राजपथाचे" नाव "कर्तव्य पथ" करुन ब्रिटीश व नंतर आलेल्या कॉंग्रेसच्या राजवटीचा अस्त झालेले आहे हे कळल्याने ल्युटिंयंस लोकांना वेदना असह्य झाल्या.

"सिंव्हाचे शिल्प" कोणा कोणाला "क्रुर हिंस्र" वैगेरे भासु लागलेला आहे हे जर बघितले तर त्या त्या लोकांची मोदी घ्रुणा प्रकर्शाने आठवते.

प्रसाद गोडबोले's picture

2 Oct 2022 - 11:22 am | प्रसाद गोडबोले

हे शिल्प सुमार आहे हे तुम्हालाही मान्य करायला हरकत नाही

काय संबंध ? मुळ शिल्पकार सुनिल देवरे ह्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की शिल्प आहे तसे हुबेहुब बनवण्याचा प्रयत्न केला आहे, सदर काम त्यांना टाटा प्रोजेक्ट मार्फत मिळालेले आहे . देवरेंची जात शोधुन काढण्याचे कॉन्ट्रॅक्ट बारामतीला पाठवले आहे त्यावर उत्तर आले की ठरवु शिल्प सुमार आहे की कसें =))))

आणि मुळात सिंह हिंसकच असतो , किंबहुना असायला पाहिजे. इतके वर्ष सिंव्हाला मुळमुळीत दाखवण्याचा प्रकार चालला होता तो सुमार आणि अभद्र होता.

अँगल आणि पर्स्पेक्टिव्ह खुप मॅटर करतो. वैदिक धर्मीयांवर टॅक्स लाऊन बौध्द धर्माचा प्रचार असला जिझिया प्लस इन्क्विसीशन पराक्रम करणार्‍या चंडअशोकाचे चिन्ह आहे ते हे आपण कदापि विसरता कामा नये !

आपल्याला खुप शिकायचे आहे ह्या अशोकाकडुन !

चौथा कोनाडा's picture

2 Oct 2022 - 6:01 pm | चौथा कोनाडा

आणि मुळात सिंह हिंसकच असतो , किंबहुना असायला पाहिजे. इतके वर्ष सिंव्हाला मुळमुळीत दाखवण्याचा प्रकार चालला होता तो सुमार आणि अभद्र होता.

सिंव्ह मुळमुळीत आणि अभद्र होता. इतक्या दशकात कुणालाच कसे जाणवले नाही ? /strong> स्लीपले होते का हे लोक ?

सिंव्हाची संतुष्ट मुद्रा देखील असते !

LION123rte

शिल्प सुमार आहे याची कलावंतांमध्ये खुप चर्चा झाली आहे. अपार्ट फ्रॉम पक्ष, गटतट, कलावंतांना मोठा आवाज लाभू शकला नाही !
(तटी: मी गुलाम अथवा भक्त नाही )

रात्रीचे चांदणे's picture

2 Oct 2022 - 7:04 pm | रात्रीचे चांदणे

कदाचित हे शिल्पं फार मोठ्या आकारामध्ये असल्यामुळे ते दुरून चांगलं दिसेल तर जवळून जरा सुमार दिसत असेल, हा फक्त माझा अंदाज आहे.

प्रसाद गोडबोले's picture

3 Oct 2022 - 10:22 am | प्रसाद गोडबोले

आजकाल - लोकांच्या लक्षात येत नाहीये की मी खुप बेसीक , अगदी मुलभुत विचार करतोय हेच मला कळात नाही.
प्रत्येक प्राणीमात्राचा , प्रत्येक माणसाचा एक स्थायीभाव असतो . त्याचा स्टॅच्यु बनवायचा असेल तर त्याच स्थायी भावातील बनवला पाहिजे ना , अन्य भावातील बनवुन काय उपयोग ?
अगदी सोप्पे उदाहरण घ्या , भारतात सगळ्यात जास्त स्टॅच्यु गांधींजींचे असतील त्यात बहुतांश वेळा ते चरखा चालवताना किंव्वा काठीघेउन कोठेतरी पायी चालताना असे दाखवलेले असतात , असे का ? आता त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्रात माझे सत्याचे प्रयोग मध्ये लिहिलेले आहे की ब्रह्मचर्याचे प्रयोग करताना ते अन्य मुलींसोबत नग्न अवस्थेत झोपलेत , अशा स्वरुपातील एकही पुतळा कोठेही बसवलेला का दिसत नाही ?

आणि बाकी कसेही असेल पण चंड अशोकाला हे व्यवस्थित कळत होते , सारनाथ च्या सिंहाचे मुळ चित्र इथे उपलब्ध्द आहे तब्बल ७ एम.बी आहे , नीट झूम करुन पहा, तुम्हाला सिंहाचे सुळे दिसतील, आक्राळविक्राळ आयाळ दिसेल , पायावरच्या नसा दिसतील , जबड्यातुन बाहीर आलेली जीभही दिसेल.
:
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/3/38/Sarnath_capital.jpg

s

हे इतके सोप्पे लॉजिक तर्कशास्त्र लोकांच्या का लक्षात येत नसावे ? पाळीव लॅब्रॅडोर सारखा सिंह दिसावा ही अपेक्षाच का असावी ? उगाचच काहीही होय.

श्रीगुरुजी's picture

3 Oct 2022 - 10:34 am | श्रीगुरुजी

+ १

तिरंगा ध्वजाचे चित्र सुद्धा कधी अगदी सरळ, तर कधी फडफडत असल्याने काही ठिकाणी मुडपलेल्या स्वरूपातक्षव मुडपलेल्या जागी गडद काळसर रंगात, तर कधी एखाद्या वर्तुळात दाखविलेले असते. पण म्हणून ते मूळ प्रतिमेशी विसंगत नसते.

वामन देशमुख's picture

3 Oct 2022 - 11:14 am | वामन देशमुख

आता त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्रात माझे सत्याचे प्रयोग मध्ये लिहिलेले आहे की ब्रह्मचर्याचे प्रयोग करताना ते अन्य मुलींसोबत नग्न अवस्थेत झोपलेत , अशा स्वरुपातील एकही पुतळा कोठेही बसवलेला का दिसत नाही ?

लॉल!

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Oct 2022 - 12:58 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा अशक्य प्रतिवाद आहे, वाचल्यावरच मी ठार मेलो होतो,
पैजारबुवा,

आग्या१९९०'s picture

3 Oct 2022 - 1:20 pm | आग्या१९९०

ब्रह्मचर्याचे प्रयोग करताना ते अन्य मुलींसोबत नग्न अवस्थेत झोपलेत , अशा स्वरुपातील एकही पुतळा कोठेही बसवलेला का दिसत नाही
आवरा. हास्यास्पद तुलना करत आहात. मुळात तुम्हाला कलाकृतीला घेतलेला आक्षेपच कळला नाही.

ह्या शिल्पाच्या तुलनेविषयक प्रश्न शिल्पाचा नाही, मानचिन्हाचा आहे हा लेख वाचनीय आहे.

प्रसाद गोडबोले's picture

3 Oct 2022 - 2:04 pm | प्रसाद गोडबोले

ओ वल्ली सर , कशाला ऊडता तीर स्वत्:च्या गाडीत घेताय =))))
ह्या प्रतिसादात तुम्ही म्हणताय की >>>

ह्या शिल्पाच्या तुलनेविषयक प्रश्न शिल्पाचा नाही

अन वरील तुमच्याच प्रतिसादात तुम्ही म्हणालात की >>>

पण मूळ सारनाथच्या शिल्पाशी तुलना केली असता हे शिल्प सुमार आहे

एकीकडे स्वतःच तुलना करताय अन दुसरीकडे म्हणताय की तुलना करण्याच्या प्रश्न नाही. =))))
ये क्या रे , घोडा चतुर घोडा चतुर, एक पे रहना , एक तो घोडा बोलना या तो चतुर बोलना =))))

ह. घ्या. कितीही सेक्युलॅरिझमचा आव आणण्याचा प्रयत्न केलात तरी तुम्ही "त्यांच्या" लेखी छुपे छद्म सनातनीच राहणार आहात =))))

प्रचेतस's picture

3 Oct 2022 - 2:34 pm | प्रचेतस

प्रिय मार्कस सर,
माझा प्रतिसाद आपण नीट बघावा, यात मी त्या लेखाची लिंक हे त्या लेखाचे पूर्ण नाव टाकून दिले आहे ते लाल अक्षरात हायपरलिंक केले आहे :). आपण ती लिंक उघडून पाहिली असता आपल्याला ते सहज लक्षात यावे.

श्रीगुरुजी's picture

3 Oct 2022 - 2:18 pm | श्रीगुरुजी

मला हा लेख निष्पक्षपाती वाटत नाही. किंमतीची अनावश्यक तुलना, पायथ्याची अनावश्यक तुलना, स्तंभाच्या उंचीची अनावश्यक तुलना, कोट्यवधी रूपये खर्च करूनही शिल्प फसले हा शिल्प स्वतः न पाहता निव्वळ प्रसिद्ध झालेल्या प्रकाशचित्रांवरून काढलेला निष्कर्ष, शिल्पकाराने कोणाशी सल्लामसलत केली नाही हे गृहीतक इ. वाचल्यानंतर असे दिसते की हा लेख काही गृहीतके, अनावश्यक उल्लेख व शिल्प न पाहताही काढलेले निष्कर्ष यावर आधारित आहे.

जे नुसत्या डोळ्याला दिसते ते स्पष्टच आहे, मूळ अशोकाच्या सिंहस्तंभाशी तुलना करता हे नवीन शिल्प ओबडधोबड आहे हे सहज समजते.