महाराष्ट्र"विलास"

विकास's picture
विकास in काथ्याकूट
9 Dec 2008 - 7:43 pm
गाभा: 

नारायण राणे तसेच वृत्तपत्रीय विश्लेषणातून कालपर्यंत असे ऐकून होतो की अशोक चव्हाण जरी नवीन मुख्यमंत्री म्हणून "बसवले" असले तरी रीमोट कंट्रोल अजूनही विलासरावांच्या हातातच आहे. आज त्याची खात्री पटली. महाराष्ट्र सरकारचे अधिकृत संकेतस्थळ अजुनही विलासराव देशमुख हेच जनतेचे लाडके नेतृत्व आहे असे मानते... अथवा अनाभिषिक्त राजा असे मानत असावे...

त्याहूनही गंमत म्हणजे म.टा. तील बातमी प्रमाणे, chiefminister@maharashtra.gov.in हा इ-मेल पत्ता न वापरता नवीन मुख्यमंत्री अधिकृत पत्ता म्हणून ashokchavanmind@rediffmail.com असा पत्ता वापरणार आहेत! याचा अर्थ त्यांना त्यांच्या इमेलवर कोणी नजर ठेवेल अशी भिती वाटते का? अर्थात त्याला हे असे उत्तर योग्य आहे का हा अजून एक वादाचा मुद्दा आहे.

पण तरी देखील अशोक चव्हाणांनी इ-मेल पत्ता दिला आहे, त्याचा वापर करून सर्वांनी नक्कीच संपर्क साधला पाहीजे असे वाटते.

प्रतिक्रिया

शंकरराव's picture

9 Dec 2008 - 8:01 pm | शंकरराव

www.maharashtra.gov.in वरिल 'डेटा अपडेट' नसेल केला,
chiefminister@maharashtra.gov.in email चा password अजून अशोकरावांना मिळालेला नसेल असे मानून चालावे का?

सुनील's picture

9 Dec 2008 - 8:14 pm | सुनील

कार्यालयीन कामाकरीता कर्मचार्‍यांना जसा त्यांचा अधिकृत इ-मेलच वापरावा लागतो, खाजगी (जी-मेल वगैरे) वापरता येत नाही, तसेच मुख्यमंत्र्यांनीदेखिल स्वतःचा खाजगी इ-मेल, सरकारी कामाकरीता वापरणे योग्य नाही, असे वाटते. बाकी त्यांनी त्यांचा रेडीफचा इ-मेल वैयक्तिक कामाकरीता जरूर वापरावा (किंबहुना वैयक्तिक कामाकरीता तोच वापरावा!).

बाकी, मंत्र्यांच्या इ-मेल्सना मंत्री स्वतः उत्तरे देतात की त्यांचे पीए?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऍडीजोशी's picture

9 Dec 2008 - 8:18 pm | ऍडीजोशी (not verified)

अरे हे दळभद्री राजकारनी महिने च्या महिने सरकारी क्वॉर्टर्स सोडत नाहीत. पासवर्ड सारख्या फुटकळ गोष्टींकडे लक्षही देणार नाहीत.