कसाबला आणखी जगायचंय

अन्वय's picture
अन्वय in काथ्याकूट
9 Dec 2008 - 7:30 pm
गाभा: 

मुंबईत 26 नोव्हेंबरच्या रात्री बेछूट गोळीबार करून अनेकांचे जीव घेणारा दहशतवादी महंमद अझमल अमीर कसाब मरणाच्या भीतीने हादरला आहे. आता तो क्षमायाचना करीत असून, मला आणखी जगायचंय, माझ्या आईला मला पाहायचंय, अशी विनवणी त्याने पोलिसांनी केली आहे.
मुंबईतील हल्ल्यावेळी कसाबला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आहे. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याने काही महत्त्वपूर्ण खुलासेही पोलिसांसमोर केले आहेत. चौकशीदरम्यानच तो कधी रोजच्या जेवणात मटणाची मागणी करतो, तर कधी रोज अमिताभ बच्चनचा एक चित्रपट पाहण्याची इच्छा बोलून दाखवतो. आता त्याने पाकिस्तानमध्ये असलेल्या आई-वडिलांना पत्र लिहिण्याची परवानगी मागितली आहे. त्याला पत्र लिहिण्याची परवानगी देता येईल की नाही, यासंबंधी सरकारकडून कायदेशीर बाबी तपासण्यात येत आहेत.
पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या सांगण्यावरून कसाब स्वतःच्या जिवावर उदार झाला आणि अन्य दहा दहशतवाद्यांबरोबर मुंबईत आला. त्यांनी निष्पाप लोकांचे बळी घेतले. आता भारतातील तुरुंगाची "हवा' खाल्ल्यानंतर कसाबचा "विवेक' जागा झाला आहे. "मला माफ करा, "लष्करे तैयबा'ने माझी दिशाभूल केली, हे मला घरच्यांना सांगायचे आहे.' "माझ्या आईकडे मला जायचंय,' असे त्याचे म्हणणे आहे. आता बोला.

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

9 Dec 2008 - 8:06 pm | महेश हतोळकर

पश्चाताप खरा असेलही. पण प्रायश्चित्तही तितकेच महत्वाचे आहे. प्रायश्चित्तानंतरच शुद्धी झाली असं म्हणता येईल.

विकास's picture

9 Dec 2008 - 8:15 pm | विकास

दहशतवादी अथवा तत्सम टोळी युद्धातील पकडलेले गंभिर गुन्हेगार जेंव्हा काही जाहीरपणे बोलतात तेंव्हा त्यातून ते काही गुप्त संदेश ("कोडेड मेसेज") ते बाहेर त्यांच्या समर्थकांना आणि म्होरक्यांना पाठवत असतात. अर्थात हे तपासणी करणार्‍या पोलीसांना माहीत असते. ते दुधखुळे नसतात....

त्याच बरोबर जे काही कसाब बोलतोय म्हणून बाहेर येत आहे, ते स्वत: कसाब काही पत्रकार परीषद घेऊन सांगत नाही आहे. त्यामुळे त्याच्या नावाने काय सांगीतले जावे हे ठरवून पोलीस पण काही बातम्या उठवत असतील तर आश्चर्य वाटायला नको.

थोडक्यात या असल्या बातम्यांमधे सत्याचा अंश किती हे कळायला किमान नजीकच्या भविष्यात तरी काही मार्ग नाही...

झकासराव's picture

9 Dec 2008 - 8:30 pm | झकासराव

+१
हेच म्हणतो.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

ऍडीजोशी's picture

9 Dec 2008 - 8:16 pm | ऍडीजोशी (not verified)

मला आणखी जगायचंय, माझ्या आईला मला पाहायचंय, अशी विनवणी त्याने पोलिसांनी केली आहे.

हे ऐकून ते भिकर** मनवतावादी त्याला वाचवायला आले तर त्यांना बांबू ठोकला पाहिजे.

टायगर's picture

10 Dec 2008 - 10:22 am | टायगर

तेच म्हणतो मी
पण बांबू नको, दांडू ठोकू बरं क!

सुनील's picture

9 Dec 2008 - 8:17 pm | सुनील

कसाबचे वकीलपत्र घ्यायचे नाही असा ठराव मुंबईच्या वकीलांनी केला असल्याचे वाचले. असे असल्यास, कोर्ट एखाद्या सरकारी वकीलावर तशी सक्ती करू शकते का?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विकास's picture

9 Dec 2008 - 8:23 pm | विकास

कसाबचे वकीलपत्र घ्यायचे नाही असा ठराव मुंबईच्या वकीलांनी केला असल्याचे वाचले. असे असल्यास, कोर्ट एखाद्या सरकारी वकीलावर तशी सक्ती करू शकते का?

माझ्या माहीतीप्रमाणे सर्वप्रथम कोर्टाला (म्हणजे न्यायाधिशाला), या प्रसंगासंदर्भात कसाबला विचारावे लागेल की त्याला वकील हवा आहे का नको. तो जर नको म्हणाला तर प्रश्न सुटला (न्यायाधिशाला कोणवकील सक्ती करावी लागणार नाही). पण तो जर वकील हवा असे म्हणाला, तर त्याला सरकारी वकील मिळेल. त्यातही मग त्याने स्वतःला दोषी असे जाहीर केले पण त्यातील कारणांसाठी खटला चालू केला तर एक संभवते आणि उद्या तो म्हणू लागला की "तो मी नव्हेच" तर अजुन तमाशा चालू राहील...

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Dec 2008 - 8:31 pm | बिपिन कार्यकर्ते

मला वाटते, कोर्ट अशी सक्ती अपवादात्मक परिस्थितीत करू शकत असेल. समान संधी हे न्यायदानाचे एक प्राथमिक सूत्र आहे. आणि जगाला दाखवायला का होईना असा वकिल देणं आवश्यक ठरेल.

मला खरी काळजी हीच आहे की आता तपास, खटला वगैरे किती लांबणार. आणि त्या नराधमाला काय शिक्षा होणार. काहीच भरवसा नाही. :(

बिपिन कार्यकर्ते

आपला अभिजित's picture

9 Dec 2008 - 8:43 pm | आपला अभिजित

हा विषय इथे टाकता आला असता का?

सुनील's picture

9 Dec 2008 - 8:59 pm | सुनील

आपण डेटाबेस नॉर्मलायझेशनचे काम करीता का?

ह घ्या (हे लिहायला विसरलो!)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सखाराम_गटणे™'s picture

9 Dec 2008 - 8:59 pm | सखाराम_गटणे™

मराठी खाटीकाला कसाब हा पर्यायी शब्द आहे.

एक म्हण पण आहे
'कसाबाला गाय धार्जीन'

विकास's picture

9 Dec 2008 - 9:01 pm | विकास

कसायाला गाय धार्जिणी

वेताळ's picture

9 Dec 2008 - 9:58 pm | वेताळ

पाकडे कसाई ला कसाब म्हणत असावेत. कारण कसाब चा बा कसाई आहे म्हणे.
वेताळ

भडकमकर मास्तर's picture

9 Dec 2008 - 10:09 pm | भडकमकर मास्तर

काही चॆनल त्याचे नाव कासव असे दाखवत होते...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ब्रिटिश's picture

11 Dec 2008 - 2:03 pm | ब्रिटिश

जेआयला त्या भडव्याला जगाला द्या,हगाला द्या, मटन खावाला द्या, आमीताब दाकावा, भारत दर्शन करवा आनी सगला झायल्यावर हारतूरे देऊन पाकीस्तान ला पोचवा

भी**** साले

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

धमाल मुलगा's picture

11 Dec 2008 - 2:38 pm | धमाल मुलगा

येव्हढा एकच प्रतिसाद जब्बरा वाटला बॉ!!!

हाण रे दादूस! लै खास..लै खास!!!

JAGOMOHANPYARE's picture

11 Dec 2008 - 9:06 pm | JAGOMOHANPYARE

अतिरेकी सापडला तर, ज्या चौकात त्याने गोळीबार केला तिथेच त्याला फाशी द्यायची आणि सगळ्या जगात त्याचे टेलिकास्ट करायचे असा कायदा करायला हवा....

कलंत्री's picture

11 Dec 2008 - 10:14 pm | कलंत्री

आपली कल्पनाही स्तुत्यच आहे. अशा जिवंत अतिरेक्यांना मृत निष्पाप लोकांचे कुटुंबिय, त्याच्यावर आधारित असलेले लहान मुले, म्हातारे आईबाप इत्यादी दाखवावेत. शक्य असल्यास अशा लोकांबरोबर राहण्याची सक्ती करावी.

"दुष्मन" ( राजेश खन्ना) चित्रपटाची कथाही अशाच प्रकारची आहे.

अतिरेक्याच्या मृत्यूची जैय्यत तयारी करावी .. टेलेकास्टची सोय करावी ... त्याला गांधीवादा चे डोस पाजावेत. आणि सत्कार करून सोडून द्यावे. ह्यामुळे त्याच्यातला आतंकवादी मरेल त्याचे हृदयपरिवर्तन तर होईलच, पण बाकी तिकडचे अतिरेकी अश्रू ढाळून शस्त्र टाकून देतील .आणि अशा प्रकारे गांधीवादाचा विजय होईल.

सुचना: हे दृष्य पाहून ,आतंकवाद ट्राय करायला अजुन काही लोक्स पुढे आले तर तो केवळ अपवाद समजावा.

- टारात्मा गांधी
(आम्हाला हलकेच घ्या, नाही तर जड जाईल)

मैत्र's picture

12 Dec 2008 - 2:17 pm | मैत्र

टारानंद महाराज फुल फॉर्मात आहेत :)
- टारात्मा गांधी
(आम्हाला हलकेच घ्या, नाही तर जड जाईल) =)) =)) :)) :))

हे लै आवडलं ....

टैत्र ... ( ह्यां काय जमला नाय बॉ) 8}

कलंत्री's picture

12 Dec 2008 - 8:42 pm | कलंत्री

आपल्या कल्पनांचा मी आदर करतो. परंतु आपल्या हातातून नेमके काय घडले आहे हे जेंव्हा माणसाला दिसते तेंव्हा त्याचे सर्व मुखवटे गळुन पडतात.

अतिरेकाकडे वळणारे लोक भावनेच्या भरात एखादी कृती करतात. त्यामुळे मृत्यु ही त्यांना खरी शिक्षा नाही. पश्चाताप, पतितभावना हीच खरी शिक्षा आहे.

अर्थात आपला कायदा आणि न्यायालये ही सक्षम आहेतच.

दुष्मन चित्रपट खरोखरच पहावा.

विकास's picture

11 Dec 2008 - 11:54 pm | विकास

त्याला ऐन गर्दीच्या वेळेस छत्रपती शिवाजी टर्मिनसवर सोडा. लोकशाही म्हणजे काय ते त्याला जगलावाचला तर कळेल नाहीतर किमान मरता मरता कळेल...

उदय सप्रे's picture

12 Dec 2008 - 2:10 pm | उदय सप्रे

अशा लोकांना फाशी ही शिक्षा सौम्य वाटते.याला व्हॅक्क्यूम केलेली एक पिशवी घेवून त्यात गळ्यापर्यंत बंद करावा , छत्रपती शिवाजी टर्मिनस वर ऐन मोक्याच्या ठिकाणी ठेवावा , जाता येता सगळ्यांनी त्याच्या तोंडावर थुंकण्यापासून ते थोबाडीत देण्यापर्यंत काहीही करावे , आणि ज्यादिवशी तो आपोआप अन्नपाण्यावाचून तडफडून मरेल , त्यादिवशी ही पिशवी पाकिस्तान्च्या सीमा रेषेवर नेवून ठेवावी (दुर्गंधी यायला लागल्यानंतर).
किंवा अरब देशातील कायद्याप्रमाणे याची भर चौकात मान तोडावी आणि याचे लाईव्ह टेलिकास्ट पाकिस्तानला करावे !

पाकिस्तानला वठणीवर आणायचे असेल तर एक नामी उपाय आहे - सिंधू नदीचे पाणी बंद करावे , भडव्यांचा माज ताबडतोब उतरेल , पण या आपल्या हिंदू देशात आपणच अल्पसंख्यांक झालो आहोत !

एक विनंती - जमल्यास सर्वांनी यावेळी १९६९ च्या कायद्याप्रमाणे "४९-०" पध्दतीने मतदान करावे - म्हणजे मतदानाला जायचे - एक फॉर्म भरायचा आणि त्यात लिहायचे "मी कुणालाही मत देवू इछ्हित नाही !" , म्हणजे मग जर एखादा उमेदवार १०० मतांनी जिंकत असेल आणि अशी "४९-०" मते १०० पेक्षा जास्त असतील तर त्या उमेदवाराची आणि त्याबरोबरच सगळ्या इतर उमेदवारांची उमेदवारी जप्त होते.
सगळीकडे नाहि तर किमान जिकडे नालायक आणि अंगुठाछाप उमेदवार असतील तिथे तरी हे आपण नक्किच करू शकतो ! म्हणजे परिक्षेला जायचे पण पेपर कोरा देवून यायचे !