गाभा:
माझ्या चष्म्याचा नंबर तसा कमी आहे (दोन्ही डोळ्यांचा -२.७५). परंतु आता चष्मा वापरून कंटाळा आला आहे आणि नंबर पूर्णपणे घालवण्यासाठी लेसिक सर्जरी करून घ्यायचा विचार करतोय. वय चाळीशीच्या आसपास आहे. अजून जवळचा चष्मा लागला नाही. या वयात सर्जरी करून नंबर घालवता येईल का? असल्यास कृपया लेसिक सर्जरी करणारे पुण्यातले चांगले डॉक्टर सुचवा.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
16 Jun 2022 - 7:20 am | श्रीगुरुजी
पुण्यातील NIO या नेत्र रूग्णालयात सर्व नेत्रतज्ज्ञ उत्तम आहेत.
16 Jun 2022 - 7:25 am | बाजीगर
https://g.co/kgs/U6Lkuz
17 Jun 2022 - 7:00 am | कर्नलतपस्वी
मोहम्मद वाडी,हडपसर पुणे.
17 Jun 2022 - 7:01 am | कर्नलतपस्वी
मोहम्मद वाडी,हडपसर पुणे.
17 Jun 2022 - 6:44 pm | योगी९००
https://www.nioeyes.com/
डॉ. केळकरांचे National Institute of Ophthalmology येथे मी १९९५ ला चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी हे केले होते. त्यावेळी ही टेक्नॉलॉजी नवीन होती. डॉ. मिसेस चांदोरकर व डॉ. सावरकर अश्या दोन तिथे काम करणार्या डॉ. नी माझी सर्जरी केली होती. नंतर त्या दोघांनीही दुसरीकडे स्वतःचे सेंटर सुरू केले असे ऐकले होते. त्यांचा शोध लागला तर तेथेही जाऊ शकता. चांगले स्किलफुल डॉक्टर्स आहेत.
17 Jun 2022 - 6:47 pm | योगी९००
https://www.facebook.com/Dr-Madhuri-Chandorkar-100707265129281
डॉ. चांदोरकर फेसबूक वर मिळाल्या. त्यांना contact करून माहिती घेऊ शकता.
20 Jun 2022 - 1:52 pm | पराग१२२६३
पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर तुकाराम पादुका चौकात medilaser नावाचं डोळ्यांवर लेसर उपचार करणारे अद्ययावत केंद्र आहे. मी स्वतः तिथं उपचार करून घेतलेला आहे. अनुभव खूप चांगला आहे.
21 Jun 2022 - 4:22 pm | राजेंद्र मेहेंदळे
आमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे ही शस्त्रक्रिया साधारण २०-२५ च्या दरम्यान ,म्हणजे नंबर स्थिर झाल्यावर करावी. म्हणजे जास्त वर्षे त्याचा फायदा घेता येतो. तुमचा लांबचा नंबर मायनस आहे की प्लस आहे त्यावरही काहीतरी गणित असते. कारण वाचायचा नंबर(चाळीशी) हा प्लस असतो. तेव्हा ही सर्जरी करणारे तज्ञ काहीतरी गणित करुन असे करतात की ऑपरेशन केल्यावर जास्त दिवस फायदा मिळत राहिल.
पण अखेर काही वर्षांनी तसाही वाचायला वेगळा नंबर लागणार. त्यापेक्षा लेन्सेस वापरुन बघा असे सुचवतो. बाकी तुमचे डॉक्टर काय ते सांगतीलच.
21 Jun 2022 - 5:34 pm | श्रीगुरुजी
कोंढवा/मार्केटयार्ड या भागात जीवनस्पर्श आय क्लिनिक हा एक चांगला पर्याय आहे.