शशक'२०२२ - आई होताना

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
19 May 2022 - 8:01 am

समईची ज्योती नीट करत ,राजेशच्या फोटोसमोर दीपा शांत बसली होती.डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या .संसाराचे सुखाचे क्षण त्या भरल्या डोळ्यांतून तरारत होते.सगळ सगळं मागं पडलं होतं.
साधा खोकला झाला तरी कासावीस होणारा राजेश करोनाच्या राक्षसापासून स्वतः ला नाही वाचवू शकला.त्या भयानक पहिल्या लाटेत राजेश आयसीयूत दाखल झाला.नंतर शेवटचं त्याला ती भेटूही शकली नाही.
पदरात आठ वर्षांचा विराज..एकत्र कुटुंबात सगळं निभावून जाईल अशी आशा होती...पण तिच्या सासूबाईंनी वेगळाच निर्णय घेतला होता.

"पप्पा आले" विराज दाराकडे धावला.दीपाने अलगद स्मित करत डोळे पुसले.
दीपाच्या आयुष्याची दुसरी घडी त्यांनी घातली​ होती.
लेकीला कुंकू लावून तिची ओटी भरली...सासू आता पुन्हा आई झाली होती.

प्रतिक्रिया

निनाद's picture

19 May 2022 - 9:44 am | निनाद

छान +१

श्वेता२४'s picture

19 May 2022 - 11:03 am | श्वेता२४

+१ लेकीला कुंकू लावून तिची ओटी भरली...सासू आता पुन्हा आई झाली होती.
ह्रदय हेलावणारी कथा.

चौथा कोनाडा's picture

19 May 2022 - 12:25 pm | चौथा कोनाडा

+१

अतिशय सुंदर! ❤️

तुषार काळभोर's picture

19 May 2022 - 1:09 pm | तुषार काळभोर

टिपीकल वपु पठडीतील आहे, पण तरी आवडली.

Bhakti's picture

19 May 2022 - 2:04 pm | Bhakti

+१
आजुबाजुला​च अशी चार घर आहेत, आपल्या परीनं त्या पुढं चालल्या आहेत पण अशी आई मिळणं भाग्यच!

सिरुसेरि's picture

19 May 2022 - 5:08 pm | सिरुसेरि

+१

प्रमोद देर्देकर's picture

19 May 2022 - 10:59 pm | प्रमोद देर्देकर

खूप सुंदर संकल्पना.

+१

सौन्दर्य's picture

19 May 2022 - 11:03 pm | सौन्दर्य

छान कथा

डाम्बिस बोका's picture

20 May 2022 - 12:15 am | डाम्बिस बोका

+१

मोहन's picture

20 May 2022 - 10:35 am | मोहन

+१

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 7:43 pm | चेतन सुभाष गुगळे

सूनेचा पुनर्विवाह करुन देणारी सासू. काहीतरी नावीन्य आणा की...