"...हो ! आणि बाबा चीनहून आल्यानंतर तिचं चहाचं वेड खूपच वाढलं होतं. त्यांनी तिकडून आणलेल्या टी सेटमधून ती सारखी चहा प्यायची. त्याच्याजवळ जरी कोणी गेलं तरी जोरजोरात अंग हलवायची. झोपूनच असायची, आवाज फुटत नव्हता. पण मी आले तेंव्हामात्र माझ्याशी बोलली. ' बोचलं ग खूप ' एव्हढच म्हणत होती. नीट ऐकल्यावर समजलं.काय बोचलं, कुणी बोललं का तिला, देव जाणे!
__ हो. ये. अच्छा!"
फोन ठेवताना शाल्मलीच्या धक्क्याने टेबलावरच्या टी सेट मधला एक कप खाली पडून फुटला. चुकचुकत वळताना तिचा पाय काचेवर पडलाच. "... स्स sss बोचलं ग sss खूप...." शाल्मली ओरडली.
टेबलावरचे चारही कप तिच्याकडे टक लावून बघत होते !
प्रतिक्रिया
14 May 2022 - 8:08 am | तुषार काळभोर
??
14 May 2022 - 10:20 am | चांदणे संदीप
बेचारी शाल्ममी और खूनी कप... ऐसी हैरतअंगेज किस्से और कहानीयोंसे भरे शशक स्पर्धासें जुडे रहिए. नीट वाचिए.
सं - दी - प
14 May 2022 - 11:14 am | प्रचेतस
=))
14 May 2022 - 4:58 pm | Bhakti
हे हे :)
14 May 2022 - 10:37 am | अमरेंद्र बाहुबली
ते काही असो. शाल्मली असंही नाव असतं मुलीचं हे आज कळाले.
14 May 2022 - 11:48 am | कानडाऊ योगेशु
इतकही दुर्मिळ नाव नाही आहे हे.शाल्मली खोलगडे ह्या नावाची एक गायिका पण आहे.
आता खोलगडे हे आडनाव कसे असु शकते हा प्रश्न मला पडलाय.
14 May 2022 - 7:57 pm | अमरेंद्र बाहुबली
खी खी खी. :)
16 May 2022 - 5:40 pm | चौथा कोनाडा
खोब्रागडे असं पण आडनाव असतं
ही "गडे" आडनावाची काय सिरिज असते, कोणी जाणकार प्रकाश टाकू शकेल काय ?
16 May 2022 - 5:39 pm | चौथा कोनाडा
+१
आवडली.
तिसर्यांदा वाचली तेव्हा कळली.
(माझं आकलनः चिनी टी सेट मधला (६ कप असतात असे गृहित धरले आहे) एक कप ती जिवंत असताना फुटला. तिचा तिला (बहुधा शाल्मलीची आई असावी जी आजारी असते) ते तिला बोचलं, नंतर फोन वर ती गेल्यानंतर तिच्याबद्दल (बहुधा आई ) फोन वर सांगून झाल्यावर शाल्मलीच्या हातून कप फुटतो तेव्हा काय बोचलं हे कळतं.
दोन कप फुटले, चार राहिले, ते चारही कप टक लावून बघत होते.
चुभूदेघे.
25 May 2022 - 9:39 pm | चेतन सुभाष गुगळे
वाईट