शशक'२०२२ - बाप

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2022 - 5:13 pm

शेताततला लाखाचा माल मार्केटला पोहोचू शकला नाही, खराब झाला. गेले लाख वाया, पण बाप महत्वाचा होता. बापासाठी एवढं करायला नको?

रात्री दोन वाजता बापाने छाती धरली, हार्टेटॅक! वेळीच दवाखान्यात पोहोचवले म्हणून डाॅक्टरांनी भरभरून शाबासकी दिली.
कामधंदा बूडवून गेले आठ दिवस दवाखानाच्या फरशीवर झोपतोय, खायला काय तर गाडीवरचा वडापाव, रात्रीअपरात्री केव्हीही नर्स यादी देतेय औषध आणायला, आपला बापच तो, ईतकं करायला नको?
नातेवाईक येताहेत पहायला, त्यांची विचारपूस,चहापाणी, जेवन, नाश्ता, सर्व पहायचं.
बाप ठणठणीत झालाय आता, ईतकं करूनही त्याचा एक शब्द बोचला, लागलाच म्हणा ना, परवा आत्या आली होती, तिच्याशी बोलताना ऐकलं
“शहरातल्या पोराने वेळीच पन्नास हजार पाठवले म्हणून वाचलो, नाहीतर….”

प्रतिक्रिया

नहर's picture

23 May 2022 - 11:40 pm | नहर

+१

धनावडे's picture

23 May 2022 - 11:51 pm | धनावडे

+१

आनंद's picture

24 May 2022 - 3:12 pm | आनंद

+१

छान खरी व्यथा खूप आवडली. +1

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 10:01 pm | चेतन सुभाष गुगळे

बिनधास्त पहिला नंबर देऊन टाका.

काड्यासारू आगलावे's picture

1 Jun 2022 - 12:58 pm | काड्यासारू आगलावे

बाप ह्या कथेविषयी:-
खरं तर ही आमची घरातीलच कथा. मी पुण्यात नोकरील असतो लहान भाऊ गावी. ही कथा जन्मली त्याच्या सुपीक डोक्यातून. आमचे शेत वगैरे काही नाही. सुरूवातीला मी कथा लिहून त्याला दाखवली पण त्याला ती आवडली नाही. गावाकडच्या मूलाचं लाखाचं नूकसान हवंच असं त्याचं म्हणणं. मग कथानक दोन वेळा बदलवून त्याच्या कडून तपासून घेतलं, त्याला पुर्ण आवडली नी मग त्याने प्रकाशीत करायला परवानगी दिली.
मला ही कथा ईतकी आवडली नव्हती. पहीली येईल हे तर आजिबातच वाटलं नव्हतं. त्यापेक्षी “नवाकाळ“ ही कथा जास्त प्रसिध्द होईल असं वाटलेलं. नवाकाळ ने सुरूवातीला आघाडी ऊघडलेली पण ससा कासवाच्या कथेतील सस्या सारखी मध्येच झोपली. अनेकांना बाप ही कथा भावली. पण ह्या कथेला दुसरी बाजू देखील आहे. नवाकाळ प्रसिध्द केली नसती तर शहरातील मुलाची बाजूही लिहीनार होतो.

श्वेता२४'s picture

8 Jun 2022 - 5:50 pm | श्वेता२४

वाचायला आवडेल

तर्कवादी's picture

8 Jun 2022 - 6:10 pm | तर्कवादी

पण ह्या कथेला दुसरी बाजू देखील आहे

हो. दुसरी बाजू असायला हवीच ना. मलाही सुचलं दुसर्‍या बाजूचं कथानक.. पण मुळ कथा तुमची असल्याने तुमचा हक्क पहिला. मात्र जर तुम्ही लिहिणार नसाल तर मात्र मला सांगा, मी लिहीन माझ्या मनातली कथा.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Jun 2022 - 7:59 pm | अमरेंद्र बाहुबली

हा आयडी ब्लाॅक करण्यात आलेला दिसतोय. दुसरी बाजू कशी येणार?

तर्कवादी's picture

9 Jun 2022 - 11:40 am | तर्कवादी

ओह..
ठीक आहे. दुसरा आयडी घेवून ते येतील लवकर आणि कथा प्रसिद्ध करतील अशी आशा करु..