गाभा:
आपल्या मिपाचे लाडके व्यक्तिमत्व प्रा.डॉ. दिलीप बिरुटे यांचे साहित्य संमेलनातील भाषण. उत्स्फूर्त, मुद्देसूद आणि खणखणीत विचार मांडल्याबद्दल सरांचे अभिनंदन. ते मिपाच्या अगदी पहिल्या दिवसापासून मिपाच्या प्रवासात सहभागी आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे.
प्रतिक्रिया
24 Apr 2022 - 1:10 pm | कुमार१
प्रा. डॉ यांचे अभिनंदन.!!
आपल्या संकेतस्थळाचा उल्लेख केलेला विशेष आवडला
24 Apr 2022 - 1:41 pm | गवि
हो. मिसळपाव, ऐसी, मनोगत, मायबोली अशा सर्वांचा उल्लेख केलाय आवर्जून. तेही वेळेची मर्यादा असताना.
अतिरंजित वगैरेबद्दलही रोखठोक बोललेत. विशेष म्हणजे उत्स्फूर्तपणा. इतकी नावे आणि संदर्भ लागोपाठ देणे म्हणजे अभ्यास दांडगा.
24 Apr 2022 - 1:35 pm | तुषार काळभोर
मराठवाड्यातील साहित्य संमेलन आणि प्रा डॉ स्वतः साहित्य परिषदेचे सदस्य आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून एखादा धागा, वृत्तांत येईल असे वाटले होते. पण त्यांनी स्वतः थेट साहित्य संमेलनात भाषण केले, ही सुखद बातमी आहे.
प्रा डॉ सरांचे हार्दिक अभिनंदन!!
24 Apr 2022 - 1:39 pm | प्रचेतस
भाषणात मिपाकर गवि संजोपराव, रामदासकाका ह्यांचाही उल्लेख आल्याने भरून आले आहे.
24 Apr 2022 - 1:49 pm | कॉमी
सरांचे अभिनंदन.
24 Apr 2022 - 1:49 pm | Trump
धन्यवाद.
बिरुटेसरांचे थेट भाषण ऐकुन मजा आली.
--
भाषण करण्याचा आत्मविश्वास व शैली आवडली.
24 Apr 2022 - 2:08 pm | कंजूस
जाणते राजे.
24 Apr 2022 - 4:50 pm | Bhakti
अभिनंदन!
बिरूटे सरांचा अभ्यास,बोलण्याची शैली खुप छान आहे.
24 Apr 2022 - 4:50 pm | Bhakti
अभिनंदन!
बिरूटे सरांचा अभ्यास,बोलण्याची शैली खुप छान आहे.
24 Apr 2022 - 5:20 pm | सुरसंगम
बिरटे सरांचे मनापासून अभिनंदन!
वल्लीदा यांनी वर म्हटल्याप्रमाणे मिपाकर गवि संजोपराव, रामदासकाका ह्यांचाही उल्लेख केल्याबद्दल खरच खूप बरं वाटलं पण त्याच बरोबर अजून एक मीपकर श्री. गंगाधर मुटे यांचाही उल्लेख करायला हवा होता असं वाटलं.
24 Apr 2022 - 7:02 pm | धर्मराजमुटके
छान संवाद ! आवडला.
मिपाकर श्री. गंगाधर मुटे यांचाही उल्लेख करायला हवा होता ह्याला अनुमोदन. त्यांच्याशी इथल्या बरेच जणांचे सुर जुळले नव्हते पण त्यांच्या लेखनात प्रामाणिकपणा आणि तळमळ होती हे जाणवायचे. अर्थात बिरुटे सरांकडून त्यांचा उल्लेख अनावधाने राहून गेला असेल त्यामुळे त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही.
अवांतर : गविंचे शेतीविषयक लेखन कदाचित माझ्याकडून वाचायचे राहून गेलेले दिसते. कोणी दुवा देऊन दूवा घेता का ?
24 Apr 2022 - 7:19 pm | गवि
नाही हो. त्यांना एकूण मराठी संकेतस्थळांवर लिहिणारे काही लोक अशा अर्थाने नावे उल्लेखायची असावीत. पण शेतकरी हा केन्द्रस्थानी विषय असल्याने बोलण्याच्या ओघात मिक्स झाले असावे. बोलण्याच्या ओघात अस्मादिकांस शेतात मुक्काम करविला असावा. उगीच लिन्का शोधत बसू नये. तसेही रामदासकाका आणि सन्जोपराव यांच्या पंगतीला शेतातही बैठक जमणे सन्मानाचेच __/\__
धन्यवाद.
27 Apr 2022 - 12:55 am | कपिलमुनी
@गवि -- आता शेतीवर एक फर्मास लेख येउच द्या !!
24 Apr 2022 - 7:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गंगाधर मुटे हे शेतकरी चळवळीतलं मोठं नाव आहे. आणि नवलेखकांना घेऊन शेतीविषयकच विषय घेऊन संकेतस्थळ चालवणे, शेतीविषयक उपक्रम राबविणे, नव्या लेखकांना प्रोत्साहन देणे असे साहित्यिक उपक्रम कायमच करीत असतात. पहिले शेतकरी साहित्य संमेलन वर्ध्याला झाले तेव्हा मला त्यांनी मराठी साहित्यातले शेतकरी चित्रण असेच काही तरी विषयावर बोलावले होते. पुढे ऑनलाईन संमेलनासही मी वक्ता म्हणून उपस्थित होतो, त्यांचे आणि माझी विचारांची देवाण-घेवाण कायम असते. पण, काल गडबडीत त्यांचं नाव विसरुन गेलो. शेतकरी संघटनेचे नेते. शरद जोशीसाहेबांचा उल्लेख केला तेव्हा त्यानंतर त्यांची साहित्यविषयक चळवळ पुढे नेणारे म्हणून गंगाधर मुटे यांचे नाव घ्यायचेच होते, अनावधानाने राहूनच गेले. :(
-दिलीप बिरुटे
24 Apr 2022 - 7:52 pm | गवि
तुम्हाला वेळ संपल्याने ज्या खाणाखुणा आणि इशारे होत होते त्यामुळे बरेच काही आवरावे लागले आणि लक्ष विचलित झाले असे जाणवले. त्या ओघात राहून गेले असू शकेल.
24 Apr 2022 - 7:05 pm | माहितगार
प्राडॉ सरांच्या अभिनंदनीय सखोल भाषणातून झालेला विषय परिचय खूप भावला. मी सर्वच मंचांच्या वेळेवरील बंधने सैल असण्याच्या बाजूचा आहे प्राडॉ सरांना याच विषयावर अजून ऐकणे नक्कीच आवडले असते. सोबत मराठी आंतरजालावरील साहित्याचा साहित्य म्हणून व साहित्यिकांचा साहित्य संमेलनात आवर्जून उल्लेख उलेखनीय आहेच.
24 Apr 2022 - 7:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वांनी केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे.
-दिलीप बिरुटे
24 Apr 2022 - 8:09 pm | हणमंतअण्णा शंकर...
हा परिसंवाद आहे असं गृहीत धरून मला पडलेले इतर प्रश्न -
१. मागच्या भल्या मोठ्या पडद्याचा वापर काही भंगार कविता आणि अॅग्रोवनछाप व्हिडिओ लूपवर प्ले करून काय फायदा? अशा स्क्रीनचा सुयोग्य (डोळ्यांना सुखकारक आणि चांगल्या ग्राफिक डिझायनरला हाताशी धरून) वापर करून आपले मुद्दे व्यवस्थित मांडता आले असते ते कोणाच्याच कसं डोक्यात येत नाही?
२. समकालीन राजकीय मौखिक मराठीची सगळ्यांनाच भीषण लागण झालेली आहे. 'याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून याठिकाणी अशाप्रकारचं त्याठिकाणी त्यासंदर्भात'!! कसं सोडवायचं हे ग्रहण? दुर्गा भागवत यांनी कित्येक वर्षांपूर्वीच सांगून ठेवलं होतं की वाणीशास्त्रावर मराठीत काहीही मेहनत घेतली जातच नाही, मौखिक मराठी पुढे जाऊन भयंकर रूप धारण करणार आहे ( उच्चारण शुद्धाशुद्ध वगैरे असं मी म्हणत नाही, बोलताना एकंदरीत कसं बोलावं, ठहराव, वाक्यांची सांधेजोड, रिपीटिशन कसं करावं इत्यादी, आपला भाषणाचा पीच, टेम्पो, नाद कसा सांभाळायचा, आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक फिजीकल मर्यादा काय आहेत, त्या उणिवा कशा भरून का इत्यादी. प्राध्यापकांना हे कितपत शिकवलं जातं हे माहित नाही). हे बिरुटे सरांना उद्देशून नाही, एकंदरीतच अशा परिसंवादांमध्ये हे सगळं अगदी प्राथमिक दर्जावर सुरू असतं.
३. भाषणाच्या सुरुवातीला आपण प्रत्येक वेळेस सगळ्या मान्यवरांची नावं का उगाळत बसतो? नशीबानं कमी मान्यवर आहेत हे बरं नाहीतर एरवी प्रत्येकजण तेच रिपीट करून सगळ्यांचीच किमान २० मिनिटं तरी वाया जातात. आणि ते आभार मानण्याचं दळण दळायची अजूनही काय हौस आहे लोकांना? नुसती नावं घेऊन आभार मानल्यावर काय साध्य होतं? म्हणजे आभारप्रदर्शनात सगळ्यांची नावं घेत अजूनएक पाचदहा मिनिटं टाईमपास!!
४. साहित्यसमेलनांमधली वेळापत्रकं पाहिली. दीडदीड तासांचे काटेकोर नियोजन केलेलं असतं. आणि अर्थातच हे काहीकेल्या अजिबातच पाळलं जातच नसणार!! तरीही असं वेळापत्रक का आखलं जातं? वेळेबाबत आपण इतके फाजील कसे काय असतो आपण? राजकीय सभांचं ठीक आहे. पण चांगली शिकली सवरलेली लोकं एकत्र येऊन ही उशीरांची भातुकली का खेळत बसतात? बर्याच ठिकाणी बफर वेळ नसतो. ज्या लोकांना आमंत्रित केलं आहे त्यांना वेळेचे अजिबातच भान नसते.
बिरुटे सरांच्या भाषणाविषयी -
१. सर्व प्रथम काहीप्रमाणात विद्यासहित बोलल्याने अभिनंदन. (बरेच लोक्स नुसतीच अंदाजे क्वांटिटी सांगून सामान्य विधानं करत बसतात)
२. 'शेतकर्यांचे चित्रण' हा विषय घेतला आहे तर 'शेतकरी' या एन्टिटीची व्याख्या काय ठरविली आहे?
मी ही टेक्निकली शेतकरी आहे. माझंही काही एक विकत घेतलेलं, वडिलोपार्जित, मातॄकोपार्जित शेत आहे. ते आम्ही टाइमपास म्हणून कसतो तरी आमचे शेतीविषयक प्रश्न आहेत उदा. उत्पन्न खर्चाचा मेळ नाही, कुशल मनुष्यबळ नाही, ओपन मार्केट नाही इत्यादी इत्यादी. निमशहरी भागात जवळजवळ प्रत्येकाच्या नावावर थोडीफार शेती असतेच. म्हणजेच सगळे अल्पभूधारक शेतकरी असतात. शहरी लोकांचे फार्म्स पण असतात. तर मग विषयाला अभिप्रेत असलेला शेतकरी कोण आहे?
ज्याची पूर्ण उपजिविका शेतीवर अवलंबून आहे तो उत्पादक हीच भूमिका प्रामुख्याने जगणारा? भारतीय शेतकरी हा अनेकपदरी शेतकरी असतो. तंबाखूची शेती करणारा शेतकरी, ती विकत घेणारा अडत्या आणि त्याची सप्लायचेन ते संभाजी-विडीचा मालक हे सगळेच तंबाखूच्या शेतीवर अवलंबून असतात. आणि या सप्लायचेन मधल्या प्रत्येक घटकाची स्वतःची वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या प्रकारची शेती असते हा भाग वेगळाच! म्हणजे केवळ शेतकरी असून चालत नाही, त्याचा सप्लायचेन मधला रोल आणि त्याची फक्त उत्पादनावरती अवलंबून असलेली उपजिविका यानांच महत्त्व असलेला शेतकरी म्हणजे विषयाला अभिप्रेत असलेला शेतकरी म्हणावे लागेल.
मग -
ह्या सगळ्यांना कोण विचारतो? म्हणजे विषयाला 'अभिप्रेत' असलेला शेतकरी हा किती लहान सबसेट आहे? मग त्याला का इतकं महत्त्व द्यायचं? मग 'शेतकरी' शब्दाची व्याप्ती वाढवावी लागणार! अशा सगळ्या शेतकर्यांना 'आडव्या रेषा' मानू ..यांना जाती-पाती, धर्म, लिंग, आर्थिक स्थिती, पर्यावरणीय स्थिती ( खोर्यातली, दुष्काळी, समुद्रकिनार्यावरची अशा ) या उभा रेषांनी छेद दिल्यावर जी मेश तयार होते ती खरेतर मेस आहे!!
३. अशा मेसचे खरे चित्रण काय खोटे चित्रण काय दोन्ही सारखेच!! कसला वास्तववाद आणि कसली कल्पकता!! कुणा लेखकाचे ढुंगण इतके ब्रॉड आहे जो या सगळ्या मेशवर अंडी उबवून साहित्यिक पिल्ली प्रसवेल?
< इतरही काही प्रश्न आहेत ते सविस्तर मांडतो >
तोवर हा मेन्यू पाहून तोंडाला पाणी आणि मायमराठीच्या साहित्यिक भविष्याबद्दल विचार करून फेस सुटला आहे हे नमूद करून रजा घेतो.
24 Apr 2022 - 8:24 pm | धर्मराजमुटके
महाराष्ट्राखेरीज इतर शेतकर्यांचे माहित नाही पण बंगाली गरीब शेतकरी अजून आदिम काळात जगतो आहे. एक गुंठा शेत असेल तर अर्ध्या गुंठ्यात मत्स शेती आणि उरलेल्यात भात असा सरळ हिशोब असतो. (ही प्रत्यक्ष बघीतलेली परिस्थिती १० वर्षांपुर्वीची आहे. आता कदाचित बदल झालेला असू / नसू शकतो.)
24 Apr 2022 - 8:20 pm | धर्मराजमुटके
एक महत्वाचा प्रश्न विचारायचा राहिला तो म्हणजे फक्त तुम्हालाच मिपा, मायबोली नावाचे जालावरचे साहित्य माहित होते की अन्य वक्त्यांना पण ऑनलाईन जगात काहितरी चालतं याची माहिती होती ? वक्त्यां / श्रोत्यांपैकी किती जणांना ही नावे माहिती होती याचा काही तपशील बोलण्याचालण्यातून हाती लागले काय ?
24 Apr 2022 - 8:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वक्त्यांशी या विषयावर बोलणे झाले नाही आणि श्रोत्यांशीही. बाकी, संकेतस्थळावील अनेक कवी, गझलकार यांचा साहित्य संमेलनात सहभाग असतो.
-दिलीप बिरुटे
24 Apr 2022 - 8:53 pm | अमरेंद्र बाहुबली
अभिनंदन सर.
24 Apr 2022 - 9:17 pm | कंजूस
त्यात बरीच भाषणे आहेत.
डॉ प्रा बिरुटे यांचे भाषण 02:40:30 ते 02:56:16 वेळेत पाहता ऐकता येईल.
-------------
विविध समारंभांचे चित्रिकरण करून देणारे व्यावसायिक लोक किंवा समारंभांतील लोकांचे नातेवाईक असाच एक भला मोठा विडिओ काढून एकच डिजिटल फाईल देतात. पण त्याचे अर्धा पाऊम तासांचे तुकडे करून दिले तर फार बरं होईल.
8 Nov 2024 - 7:43 pm | Madhugandha
साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची लिंक मिळेल का
25 Apr 2022 - 7:42 am | सुरसंगम
हणमंत आण्णा तुम्ही लईच सगळ्या बाजूने विचार करता की राव मानलं तुम्हाला.
कंकाका त्यात नि. गोऱ्हे यांचं भाषण म्हणजे चिवसेनेने असं केलं तस केल हा चिवचिवाट फुकट अर्धा तास वाया गेलाय.
तेवढा एखादा वक्ता भाषण करू शकला असता.
25 Apr 2022 - 8:30 am | जेम्स वांड
अजून चित्रफीत बघितलेली नाही पण एकंदरीत जंगी कार्यक्रम झालेला दिसतोय, थोडी उसंत मिळाली कामातून का निवांत बघणार भाषण प्राध्यापक साहेबांचे.
भाषणाबद्दल प्राध्यापक साहेबांचे अभिनंदन आणि मिपा/मिपाकर/मिपाकरांचे लेखन किंवा एकंदरीत जालीय मराठी साहित्यिक घडामोडींचा उल्लेख केल्याबद्दल आभार.
💐 💐 💐
25 Apr 2022 - 8:32 am | जेम्स वांड
मेनू लैच जोरदार आहे, किमान हा मेनू वाचून तरी मला
"आपण निष्काम साहित्यसेवा धंद्यात का पडलो नाही ?"
हा प्रश्न कायम पडत राहणार आता
🤣 🤣 🤣 🤣
25 Apr 2022 - 10:25 am | ज्ञानोबाचे पैजार
वाक्या वाक्याला त्यांची तळमळ जाणवत होती. भाषणात त्यांनी सादर केलेली शेतकरी साहित्याची जंत्री त्यांच्या सखोल अभ्यासाची साक्ष देते. ही जंत्री खरेतर कितीतरी मोठी असावी पण वेळे आभावी ती सगळी नावे त्यांना तिथे घेता आली नसावी. पण या विषयावर त्यांनी इथे एखादा प्रदिर्घ लेख जरुर लिहावा ही आग्रहाची विनंती.
मिपाचा झेंडा साहित्यसंमेलनातही रोवला गेला याचा सार्थ अभिमान वाटला.
रच्याकने :- जाता जाता त्यांनी कथा कथनाला मारलेला बाण मात्र अनावश्यक होता असे वाटले.
पैजारबुवा,
25 Apr 2022 - 10:44 am | सौंदाळा
बिरुटे सर छानच बोलला आहात.
हणमंतअण्णा यांचा प्रतिसाद पण आवडला.
25 Apr 2022 - 12:28 pm | कंजूस
श्रोता म्हणून १) कोकण साहित्य संमेलन ,ठाणे येथे पूर्ण संमेलनात हजर राहण्याची संधी मिळाली आणि ते कायमचे आठवणीत राहील. २) डोंबिवली अ भा मध्ये चार पाच तास काढलेत।
दोन्ही ठिकाणी जेवण अप्रतिम होते. कार्यक्रमही आवडले.
कथाकथन,कवितावाचन यामध्ये दहापैकी आठ जणांचे संपू नये असे वाटणारे होते पण नियोजक घंटी वाजवून वेळ संपत आल्याची सूचना देत तेव्हा वाईट वाटायचं. वक्त्यांना वेळ अपुरी पडायची आणि महत्त्वाचे मुद्दे राहून गेल्याची रुखरुख जाणवायची.
नारळीकर चांगले वक्ते आहेत. दिलेला विषय सोडून कधीच बाहेर जात नाहीत आणि मराठी भाषणात इंग्रजी शब्द आणत नाहीत. पण उगाच खटाटोपही न करता पायरीपायरीने अंतिम गाठतात. पण नशिबाने ते मागच्या संमेलनात येऊ शकले नव्हते.
संमेलनाचे सूत्रधार तिकडचीच मराठी बोलत होते हे आवडले.
'पुणेकर' बिरुटे सर दिसतात कशे,बोलतात कशे हे पाहण्याची संधी मिळाली.
हणमंतअण्णाही चांगले लिहितात. त्यांनी मिपावर अधिकाधिक लेखन करावे ही विनंती.
25 Apr 2022 - 12:33 pm | चौथा कोनाडा
व्वा, प्राडॉ सर, मिपाकर म्हणुन एकदम भारी वाटलं !
प्रा डॉ सरांचे हार्दिक अभिनंदन!!
25 Apr 2022 - 12:44 pm | अनिंद्य
प्रा डॉ बिरुटे सरांचे हार्दिक अभिनंदन !
मराठी संस्थळांचे, डिजिटल लेखनाचे स्थान अधोरेखित केल्याबद्दल अनेक आभार.
ही विधा वर्धिष्णू होतच राहणार आहे.
25 Apr 2022 - 1:28 pm | बेकार तरुण
अभिनंदन.
25 Apr 2022 - 1:44 pm | तुषार काळभोर
यंदा कुठल्याही वृत्तपत्रात्/वाहिनीवर दरवर्षी असते तशी साहित्य संमेलनाविषयी चर्चा, बातमी दिसली नाही. पहिल्या दिवशी शरद पवार यांच्या भाषणाची बातमी आली, तेव्हा कळलं की साहित्य संमेलन सुरू झालंय!
सद्यस्थितीत राजकीय बातम्यांच्या धुळवडीत साहित्य संमेलन हरवलं, की उद्गीरला असल्याने बाजूला पडलं? की मध्ये दोन वर्षे खंड पडल्याने, म्हणावी तेवढी उत्सुकता नव्हती?
की एकूणच जनतेचा/वाचकांचा/रसिकांचा वाचनातील/संमेलनातील रस कमी झाला असावा? (की वाचक/रसिकच कमी झालेत?)
25 Apr 2022 - 2:14 pm | निनाद
मराठी संस्थळांचे आणि एकुण लेखनचा लेखाजोगा उत्तम मुद्देसूद मांडल्याबद्दल प्रा. डॉ. बिरुटे सरांचे हार्दिक अभिनंदन!
25 Apr 2022 - 2:16 pm | sunil kachure
महाराष्ट्र साहित्य संमेलन म्हणजे विद्वान लोकांचं विचार ऐकण्याची सुवर्ण संधी.
पण भारतीय हिंदी मीडिया तर मूर्ख च आहे मराठी मीडिया नी पण त्याची दखल घेतली नाही..अतिशय फालतू विषयावर २४, तास गुऱ्हाळ चालू असते
Dr बिरुटे ह्यांचे विचार खरोखर उत्तम आहेत
महत्वाचे म्हणजे ते अनैसर्गिक नाहीत त्यांना समाज विषयी तळमळ आहे.
अभिनंदन बिरुटे sir.
आणी धन्यवाद पण .
तुम्ही तळमळी ने समजतील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न मांडले.
Thanks so much.
25 Apr 2022 - 4:00 pm | ॲबसेंट माइंडेड ...
अभिनंदन प्रा. डॉ. दिलीप बिरुटे.
25 Apr 2022 - 4:02 pm | मित्रहो
अभिनंदन
छान पद्धतीने विचार व्यक्त केले. वर उल्लेख आल्याप्रमाणे गंगाधर मुटे यांचा उल्लेख आला असता तर आणखीन छान झाले असते.
25 Apr 2022 - 6:21 pm | गामा पैलवान
प्राडॉ,
भाषण जाम आवडलं. साहित्य वास्तवदर्शी असून पुरस्कारार्थ नसावं, हा आग्रह मनापासून पटला. वास्तवाचं म्हणाल तर शेतकरी कोणास म्हणावं हा हणमंतअण्णांचा प्रश्नंही मनांत येतोच.
अर्थात, या प्रश्नाचं उत्तर काहीही असलं तरी शेतकऱ्याच्या वास्तवाची प्रखरता तसूभरही कमी होत नाही. माझ्या मते सरकारी धोरणं शेतीस अनुकूल नसल्याने शेतकऱ्याच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. तुमच्या भाषणांत तुम्ही म्हणालात की १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर शेतकरी वर्गात एक समाधानाची लहर पसरली होती. याचं कारण की शासकीय धोरणं आता अनुकूल होतील हा दिलासा मिळाला होता. पण अर्थात, ते झालं नाही आणि शेतकऱ्याच्या व्यथा तशाच राहिल्या.
असो. तुमच्या भाषणासहित अन्य विचारांचा एखादा लेख बनवावा म्हणून सुचवेन.
आ.न.,
-गा.पै.
25 Apr 2022 - 7:04 pm | मदनबाण
बिरुटे सरांचे भाषण आवडले. साहित्यातील शेतकरी या विषयावर छान आढावा घेतला आहे. गाथा सप्तशती पासुन मिसळपाव डॉट कॉम पर्यंत सगळ्यांचा ढांडोळा घेतला आहे. सर्व मराठी संकेत स्थळांची भरभराट होऊन उत्तम विषयांवर भर पडत राहावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Harrdy Sandhu - Bijlee Bijlee ft Palak Tiwari | Jaani | BPraak | Arvindr Khaira | Desi Melodies
26 Apr 2022 - 1:45 am | गामा पैलवान
हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर,
तुमचा इथला संदेश मनोमन पटला. एकंदरीत शेतकरी कोणास म्हणावं व त्या आधारावर शेतकरी साहित्याची वर्गवारी कशी करायची ही कूटं सोडवायला पाहिजेत.
अर्थात, सोडवली नाहीत तरी वास्तवाचा दाह तितकाच राहतो. माझ्या मते सरकारी धोरणं कृषीची पार वाट लावताहेत. कशी ते ठाऊक नाही. मी शेतकरी नाही व शेतीतलं काही कळंत नाही. पण जे काही वाचलंय त्यावरून वाटतं की शासनाला आस्थापनी शेती ( = कॉर्पोरेट फार्मिंग ) आणायचं आहे. हे चांगलं की वाईट हा भाग वेगळा. पण हे जर आणायचं झालं तर स्वालंबी शेतकरी नावाची जमात नाहीशी झाली पाहिजे.
शेतकरी देशोधडीस लागावा याकरताच जणू सरकारी धोरणं राबवली जातात की काय अशी शंका येते. शिवाय वैचारिक गोंधळही भरपूर आहे. कसा ते सांगतो. एकीकडे म्हणायचं की भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि दुसरीकडे अर्थव्यवस्थेत शेती व कृषी हे तृतीय श्रेणीचे विभाग ( = tertiary sectors ) म्हणून जाहीर करायचं. प्राथमिक श्रेणीचे विभाग म्हणजे उद्योगधंदे. ठीके. आता मग प्राथमिक श्रेणीवर अवलंबून असलेले ते द्वितीय श्रेणीचे व्यवसाय ( = secondary sectors ) होणार. परत एकदा ठीके. पण मग शेती, बागायती, कृषी हे तृतीय श्रेणीत का म्हणून? यावर कोणाकडेही कसलंही उत्तर नाही. फार काय देशपातळीवर केंद्र शासनात कृषी नावाचा विभागही नाही ( आता कदाचित असेल ). जगाच्या दृष्टीने भारतीय लोकं त्याच्यू ठरतात. कृषीप्रधान देश म्हणवतात आणि कुठल्याशा अर्थशास्त्रीय नियमानुसार कृषीची अक्षम्य हेळसांड करतात.
हे कुठेतरी बदललं पाहिजे. माझ्या मते कृषीचं जे उत्पन्न नाशवंत असतं ते लगेच टिकाऊ पदार्थांत रुपांतरीत करायची सोय शेताजवळ व्हावी. त्यातून कृषीउत्पन्नाधारित उद्योगधंद्यांची साखळी निर्माण होईल. आणि यथावकाश कृषी तृतीय श्रेणीतनं मूलगामी अशा प्रथम श्रेणीत येईल.
आ.न.,
-गा.पै.
26 Apr 2022 - 7:59 am | श्रीगुरुजी
प्रथम विद्यावाचस्पती प्राध्यापक श्री. बिरूटे यांचे भाषणाबद्दल अभिनंदन करतो. त्यांचे भाषण उत्कृष्ट आहे.
एकीकडे म्हणायचं की भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि दुसरीकडे अर्थव्यवस्थेत शेती व कृषी हे तृतीय श्रेणीचे विभाग ( = tertiary sectors ) म्हणून जाहीर करायचं. प्राथमिक श्रेणीचे विभाग म्हणजे उद्योगधंदे. ठीके. आता मग प्राथमिक श्रेणीवर अवलंबून असलेले ते द्वितीय श्रेणीचे व्यवसाय ( = secondary sectors ) होणार. परत एकदा ठीके. पण मग शेती, बागायती, कृषी हे तृतीय श्रेणीत का म्हणून?
भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा आता जेमतेम १४% राहिला आहे. पहिला वाटा अर्थातच सेवा क्षेत्राचा म्हणजे ५०% हून अधिक आहे. त्यामुळेच शेतीचा समावेश तृतीय श्रेणीत असावा.
26 Apr 2022 - 3:01 am | पुंबा
हणमंतअण्णांचा प्रतिसाद खुप आवडला. विशेषत: सार्वजनिक बोली मराठीची जी अवनती झाली आहे तिसंबंधीचे त्यांचे मुद्दे चिंतनीय वाटले. बिरूटेंच्या भाषणातले मुद्दे आवडले. आसाराम लोमटे, कृष्णात खोत, रा रं बोराडे, सदानंद देशमुख असे काही मोजकेच लेखक शेतकर्यांचे पांग साहित्यातून थोडे तरी फेडताहेत असे वाटते.
26 Apr 2022 - 7:11 am | उगा काहितरीच
बिरुटे सर,
आपली वक्तृत्वशैली आवडली.
26 Apr 2022 - 7:41 am | श्रीरंग_जोशी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मराठी आंतरजालाचे जुणे जाणते सदस्य आपले बिरुटे सर यांना उत्तम कामगिरी बजावताना पाहून खूप अभिमान वाटला. एखाद्या व्यक्तिचा फोटो पाहिल्यास मी मनात त्या व्यक्तिचा आवाज कसा असेल याचा अंदाज बांधत असतो. बिरुटे सरांच्या बाबतीत तो अंदाज सपशेल चुकला. सरांच्या आवाजातला गोडवा भाषणाची सुरुवात ऐकल्यावर लगेच जाणवला.
भाषणातून सरांचा व्यासंग जाणवला. परिसंवादाचा विषय पाहता अन सरांनी विस्ताराने मांडलेला मराठी आंतरजालाचा उल्लेख पाहता गंगाधर मुटे यांचे नाव येईल असे मलाही वाटले होते. अर्थात स्व. शरद जोशी यांचे सहकारी कार्यकर्ते यांचा उल्लेख असल्याने अप्रत्यक्षपणे त्यांचा उल्लेख झाला आहेच.
यंदाच्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात इतरही मिपाकरांनी हजेरी लावली असावी अशी अपेक्षा आहे.
अवांतरः 'डिजीटल मीडिया प्रेमी मंडळी' ही संस्था ‘मराठी सोशल मिडिया संमेलन’आयोजित करत असते. दुसरं सोशल मीडिया संमेलन २९ एप्रिले ते १ मे दरम्यान सावित्रीबाई विद्यापीठ पुणे येथे होणार आहे. ज्यांना रस आहे त्यांनी अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्यावी.
26 Apr 2022 - 9:40 am | प्रचेतस
बिरुटे सरांचे भाषण एकदम दमदार जोरदार झाले, मुद्देही नेमकेपणाने उपस्थितांपर्यंत पोचले गेले.
वास्तविक प्रा. डॉ. दिलीप बिरुटे सरांचा चळवळ्या, प्रस्थापितविरोधी स्वभाव बघता त्यांनी खरेतर विद्रोही साहित्य संमेलनात उपस्थिती लावायला हवी होती असे वाटून गेले पण त्यांनाही ह्या प्रस्थापितांच्या संमेलनात सामिल व्हावे असे वाटले यातच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यश आहे असे म्हणावेसे वाटते.
26 Apr 2022 - 12:49 pm | कंजूस
आँ?
मिपाकर प्रस्थापितच असतात ना?
26 Apr 2022 - 11:58 am | टर्मीनेटर
बिरूटे सरांचे भाषण आणि हनुमंतअण्णांचा प्रतिसाद, दोन्ही आवडले 👍
सरांची वक्तृत्वशैली आणि भाषणात घेतलेले मुद्दे, सांख्यिकी छानच.
अभिनंदन प्रा डॉ !
26 Apr 2022 - 1:39 pm | बिपीन सुरेश सांगळे
बिरुटे सर ,
अतिशय उत्तम , दमदार , जोरदार भाषण , देहबोली न मुद्दे ,
खूप खूप अभिनंदन !
26 Apr 2022 - 1:39 pm | बिपीन सुरेश सांगळे
श्रीरंग
उत्तम पोस्ट
आभार
26 Apr 2022 - 1:40 pm | बिपीन सुरेश सांगळे
कोणी या कार्यक्रमासाठी येत असेल तर कळवा ,
ठरवून भेटू
26 Apr 2022 - 2:02 pm | प्रसाद गोडबोले
पहिल्याच वाक्यावर दिल जिंकलंत सर !
हाच तर्क मोदीसमर्थक , हिंदुहितवादी , परंपराप्रिय लेखकांच्या लेखनाबाबतही सत्य आहे हे आपल्या लक्षात येईल तो मराठी साहित्याच्या दृष्टीने सुदिन असेल , मिसळपाव दृष्टीने एक्स्ट्रा पाव असेल !
बाकी साहित्यात शेतकर्यांचे चित्रण तरी होते आहे पण मध्यमवर्गीय नोकरदार माणसांचे काय ? त्यांचं दु:खं कोण मांडतंय ? त्यावर कोण परिसंवाद घेतंय ? ऑफिसमधील टेंशन्स आणि स्त्रेस् , बॉसची कटकट, गळेकापु कॉर्पोरेट स्पर्धा , ऑफिसबाहेर प्रवासात होणारा मनःस्ताप , रस्त्यात थांबुन थांबुन चिरीमिरी छापणरे आ.टी.ओ. , वाढती महागाई, राज्य आणि केंद्राच्या भांडणात केंद्राने पेट्रोल वरील टॅक्स कमी केले तरी राज्याचे वाढीव टॅक्स भरत पिळवटुण निघणारा सामान्य बाईकवाला आणि मोजक्या ५-६% इतक्या अत्यल्पसंख्य टॅक्स पेयर्स ना ओरबाडुन इनकम टॅक्स वसुल करणारी अन त्याचा काडीमात्रही लाभ त्यांना उपलब्ध्द करुन न देणारी सरकारी व्यवस्था , ह्यावर कोण बोलत आहे ? कोण साहित्य लिहित आहे ? कोण कादंबर्या लिहित आहे ?
नोकरदार माणसाचा आक्रोश मुका आहे ! ५-६% अन तेही विखुरलेल्या मतदार संघात असलेल्या ह्या अतियल्पसंख्य नोकरदार लोकांच्या वेदना कोण लिहिणार ? कोणाला दिसततच नाहीत त्या . कारण ते पाहायला कोणालाच नाय डोळें !
असो.
तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे ||
अवांतर : बाकी काहीही म्हणा पण एकसुध्दा शाई फेक वगैरे न झाल्यामुळे ह्यासाहित्यसंमेलनाला काही मजा आली नाही बुवा =))))
26 Apr 2022 - 6:24 pm | मुक्त विहारि
सहमत आहे....
26 Apr 2022 - 2:13 pm | सस्नेह
प्रा. डॉ. सरांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार __/\__
स्नेहा
26 Apr 2022 - 5:59 pm | गामा पैलवान
श्रीगुरुजी,
माझाही हाच तर्क होता. आता यातनं काय दिसतं ते बघूया.
कृषिप्रधान देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेती फक्त १४% वाटा देते , याचा अर्थ शेतीचं बहुतांश उत्पादन बांधावरच फस्त केलं जातंय. हा उंबरठा शेती कधी ओलांडणार? यासाठी काही धोरणं आखली गेलेली दिसंत तरी नाहीत. यावर जाणकारांनी अधिक प्रकाश टाकायला हवाय.
यातनं आजूनेक प्रश्न उपस्थित होतो. जर शेतीचं बरचसं उतपन्न बांधावरच फस्त होतंय, तर शहरं का फुगताहेत? शहरं कधीच आकर्षित करंत नाहीत. गावाकडची हलाखी नेहमी माणसांना गावापासनं दूर शहराकडे लोटंत आली आहे. यावर कोणी म्हणेल की भारताची लोकसंख्या सतत वाढते आहे. पण मग शहरांत बऱ्यापैकी खायला मिळतं. म्हणजेच वाढत्या लोकसंख्येची भूक भागवायला अन्नोत्पादन पुरेसं आहे. पण ते गावाकडे शेतात मात्र होत नाही. मग नेमकं होतं कुठे?
भारत खरंच कृषिप्रधान देश आहे का? भारतातली बहुतेक शेती कोरडवाहू म्हणजेच पावसावर अवलंबून आहे. पाऊस चांगला पडला तर त्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था बाळसं धरते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. याचा अर्थ भारत हा कृषिप्रधान देश धरायला हरकत नाही. पण मग उपरोक्त प्रश्नांची संगती कशी लावायची?
कुठेतरी काहीतरी जबरदस्त वैचारिक गफलत आहे.
आ.न.,
-गा.पै.
26 Apr 2022 - 7:10 pm | जुइ
सरांचा दांडग्या आभ्यासाचा भाषणात प्रत्यय येतो.
बादवे निवेदकांनी त्यांच्या नावात पुणेकर असे का संबोधले असावे?
27 Apr 2022 - 12:29 am | Trump
श्रोत्यांनी वेळीच सावध होऊन मनाला लाऊन न घेण्यासाठी.
27 Apr 2022 - 3:21 pm | सोत्रि
प्राडॉ,
झक्क जमून आलंय भाषण, फर्मास एकदम!
- (एकदा बिरूटेसरांची भेट थोडक्यात चुकलेला) सोकाजी
27 Apr 2022 - 3:31 pm | असंका
प्राडॉ. बिरुटे सरांचे हार्दिक अभिनंदन आणि मिपाचे नाव वाढवल्याबद्दल अनेक धन्यवाद!!
27 Apr 2022 - 5:12 pm | स्वधर्म
भाषण अजून ऐकायचे आहे, पण प्रतिक्रिया पाहता छान झाले असणार. विषयही रोचक आहे.
27 Apr 2022 - 9:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आदरणीय जालमित्र गविसेठ. कौतुकाबद्दल आभार. एका मोठ्या लेखकाने कौतुक धागा काढावा, याचा मोठा आनंद आहे. मिपाकरांनी केलेल्या कौतुकाबद्दल मनापासून आभारी आहे. अ.भा.मराठी साहित्य संमेलनात सहभागी होऊन बोलता आलं. विचार मांडता आले. अशा विचारपिठावर बोलतांना बरीच तयारी आणि मग बोलतांना बरंच राहुन जातं, राहुन गेलं. बरंच सुटलं. असं बोलता आलं असतं. ही भर घालता आली असती, वगैरे. अजुन परफेक्ट वगैरे. अजुन शिकतोय. शिकायचं आहे, पण एकदा विचार मांडून झालं की झालं. पण, व्यक्तिगत मला संमेलनातल्या सहभागाबद्दल स्वत:ला आनंद झाला. ते एक मोठं समाधान आहे.
मिपाकरांसोबत तर मिपाच्या जन्मापासून आहे, त्यामुळे मिपाकरांच्या कौतुकाचा आनंद आहे. खरं तर, एकेकाचा नामोल्लेख करून उपप्रतिसाद वाढवता येतील. सर्वांनीच केलेले कौतुक ख़ास आहे, मनापासून आवडलं. तहेदिलसे शुक्रिया. मिपाच्या अन्य धाग्यामधे तु-तू, मै मैं असूनही कौतुक केलं त्या मिपाकर दोस्तांच्या ज़िंदादिलीबद्दलही मनापासून आभार. अशा कौतुक धाग्यातही मनामनाचं ओझं घेवून मनात अढ़ी ठेवून, कडु तोंड करून यावे लागले. अशा मिपाकरांचेही आभार.
आपलं सर्वांचं प्रोत्साहन, प्रतिसाद वाचून खुप आनंद झाला. आपले प्रतिसाद अजुन चांगलं बोलायला, अजुन चांगली तयारी करायला. अजुन परफेक्ट व्हायला मदत करतील यात मनात शंका नाही. आभार...!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
29 Apr 2022 - 2:50 pm | माहितगार
काय हे प्राडॉसंर, मनात ठेवून, कडु तोंड वगैरेही तुमच्या कुणा मराठी टिकाकाराच्या बाबतीत असेल तर तश्या टिकाकारांना शिंगावर जरुर घ्या. पण काही मनमोकळे टिकेचे सूर येऊनही तुमचे, तुकोबा ते तात्या संस्कृतीतील मिपाकर टिकाकार मनामनाचं ओझं वगैरे घेऊन जगत असावेत हा आरोप पुन्हा पडताळण्याची आवश्यकता असावी असे मनापासून वाटते.
तुकोबा ते तात्यां शिवाय मनमोकळ्या टिकेची परंपरा तुमच्या मराठवाड्यातील कुरुंदकर ते श्रॉफ सरस्वतीभूवनवाले अशीही याही देही याही डोळा याही कान पाहिली ऐकली आहे. कोकण, मराठवाडा विदर्भ पुणेरी टिकांच्या पद्धती वेगवेगळ्या असतील पुर्वीच्या पिढीतले कुरुंदकर असतील नव्या पिढीतले राजन खान वेगवेगळ्या भागतून असतील आपपर भाव न बाळगता टिका हा मराठी संस्कृतीला जागणारी मनापासून सहसा मनात न ठेवणारी असते आणि मिपाचे आपण संस्थापना पासूनचे पाईक आहाते तेव्हा हेवेसानल म्हणून तुम्हीही मनाला लावून घेऊ नये असे वाटते.
1 May 2022 - 12:53 pm | प्रसाद गोडबोले
=))))
कसलं कौतुक , कसली अढी अन कसलं कडु तोंड !
सगळे तुमचेच विद्यार्थी आहेत सर .
तुमचा हा प्रतिसाद पहा : http://www.misalpav.com/comment/1135514#comment-1135514 पाच पैकी चार राज्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवला , अन जिथे भाजपाला विजय मिळण्याची आशा खुद्द भाजपालाच नव्हती तिथेही काँग्र्समुक्त भारत ह्या भाजपाचा विचाराचा विजय झाला , असे असताना तुमची शब्द रचना पहा >>> लॉकडाऊनमुळे झालेले जनतेचे झालेले हाल, वाहती प्रेते, वाढती महागाई, याचा म्हणावा तसा तितका फटका भाजपाला बसलाच नाही,असे निकाल पाहता म्हणता येत नाही.
=))))
ह्याला म्हणतात अढी अन कडु तोंड !
जे पेराल तेच उगवते , येवढं कळण्या इतपत तरी शेतीतील ज्ञान आहे आम्हाला #मीशेतकरी
बाकी सर्वत्र राजकारण आणायला आम्हाला आवडत नाही पण साहित्य संमेलन हे राजकीय कुस्तीचाच आखाडा आहे हे हे आम्हाला नाशिक मध्ये काय झालं त्यावरुनच कळलेलें आहे . तस्मात , असोच .
पुढील भाषणासाठी शुभेच्छा =))))
28 Apr 2022 - 8:42 pm | सन्जोप राव
धागा उशीरा पाहिल्यामुळे प्रतिसादही उशीरा देतो आहे.
बिरुटेसरांचे हार्दिक अभिनंदन आणि माझा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल आभार.
28 Apr 2022 - 9:20 pm | सुरिया
अभिणंडण बिरुटे सर.
सर तसे चांगलेच आहेत. आमच्या मोदीकांकांना कैतरी म्हणत असतात सारखे, नाहीतर तसे चांगलेच आहेत ते.
आता गवि कौतुक करतात त्यांचे म्हणजे बघा. त्यांना तरी कोण आहे एकमेकाशिवाय. सतत मिपाध्यास घेतलेली माणसे ही.
नजर लागावी अशी मैत्री खरोखर त्यांची. कीपीटप.
29 Apr 2022 - 8:51 am | Jayant Naik
खूप आवडले. आपले अतिशय अभिनंदन.
29 Apr 2022 - 10:55 am | चांदणे संदीप
प्रा. डॉ. सर, अभिनंदन!
कमीत कमी वेळात अतिशय मुद्देसूद भाषण केलेत. आवडले.
मला एकदा या विषयावर आपणाशी चर्चा करायची आहे. ;) लोल!
सं - दी - प
29 Apr 2022 - 3:00 pm | माहितगार
केळीच्या सालावरून पाय घसरलेल्या मराठी लोकांवरच हसावे तसे ' मोकलाया दाही दिशा'ला क्षणा क्षणाला हसणार्या मिपामित्रमंडळी पैकी कुणी, वरील एका प्रतिसादात आलेल्या मेनुकार्डवर एक साधी प्रतिक्रीयाही अद्याप कशी काय दिलेली नाही .
29 Apr 2022 - 5:23 pm | प्राची अश्विनी
अरे वा! फार अभिमान वाटला सर तुमचा. आणि खूप सारं कौतुक.
29 Apr 2022 - 8:02 pm | ब़जरबट्टू
आपले भाषण आवडले प्रा. डॉ. सर. अभिनन्दन आणि धन्यवाद पण शेतकरी मुद्दे मान्डल्याबाबत
4 May 2022 - 11:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वांचे मनापासून आभार...! :) _/\_
-दिलीप बिरुटे