त्यांनी हिंदीत का बोलावं?

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
11 Apr 2022 - 6:52 pm
गाभा: 

तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-diff...

या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.

आता प्रश्न असे आहेत.

१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?

२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्‍या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?

३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्‍यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?

४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?

५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2022 - 7:05 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्रात काहीच समस्या नाही. येथे मराठी भाषिक सुद्धा हिंदीत बोलून आपली राष्ट्रीय पातळी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. हिंदी ही राष्ट्रभाषा (!) आहे हे मराठी भाषिकच उच्चरवाने सांगतात. महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात हिंदी शिकणे सक्तीचे असून मराठी शिकणे ऐच्छिक आहे. येथे ५० वर्षांहून अधिक काळ वास्तव्य केलेले सुद्धा मराठी शिकत नाहीत व त्यांचे काहीही अडत नाही. तस्मात अमित शहांच्या सूचनेचे महाराष्ट्रात जोरदार स्वागत होईल.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 7:07 pm | चेतन सुभाष गुगळे

महाराष्ट्रात काहीच समस्या नाही. येथे मराठी भाषिक सुद्धा हिंदीत बोलून आपली राष्ट्रीय पातळी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. हिंदी ही राष्ट्रभाषा (!) आहे हे मराठी भाषिकच उच्चरवाने सांगतात.

ह्या विधानानुसार महाराष्ट्रात यासूचनेची गरजच नाहीये.

अमित शहांच्या सूचनेचे महाराष्ट्रात जोरदार स्वागत होईल.

अनेक मराठी जण नोकरीनिमित्त चैन्नई आणि इतर दक्षिण भारतीय शहरांत वास्तव्य करुन आहेत. तिथे त्यांची स्थानिक पातळीवर जी कुचंबणा होते ती टळेल व त्याकरिताच दक्षिण भारतात अंमलबजावणी व्हावी म्हणून मराठी माणसे या सूचनेचे स्वागत करतील.

वामन देशमुख's picture

11 Apr 2022 - 7:14 pm | वामन देशमुख

अमित शाह यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

भारतासारख्या भूभागाने आणि लोकसंख्येने मोठ्या असलेल्या देशाला एकाच भाषा असावी ही अपेक्षा तार्किक नाही.

मुळात उत्तर प्रदेशातील काही भागात बोलल्या जाणाऱ्या एका भाषेचा केंद्र सरकारने असा पुरस्कार करू नये. त्यामुळे इतर भाषकांवर अन्याय होतो.

याशिवाय, केंद्र शासनाचा नागरिकांशी होणारा संवाद, केंद्रीय स्पर्धा परीक्षा, वेगवेगळे अर्ज इ. भारतभर हिंदीत असू नयेत. त्या त्या राज्याच्या भाषेत आणि इंग्लिशमध्ये असावेत. हिंदीच्या पुरस्कारामुळे इतर भाषकांचे / स्पर्धकांचे / अर्जदारांचे नुकसान होते.

वरील बाबींसाठी राज्य भाषांना पर्याय हवा असेल तर तो इंग्लिश असणे हे तार्कीक आहे.

वरील बाबींमध्ये हिंदी भाषा वापरावी लागणे हा अन्याय असेल तो केवळ हिंदी-वेतर लोकांवर होतो, ती जर सुविधा असेल ती केवळ हिंदी लोकांनाच उपलब्ध होते.

वरील बाबींमध्ये इंग्लिश भाषा वापरावी लागणे हा अन्याय असेल तो सर्वांवरच होईल, ती जर सुविधा असेल ती सर्वांनाच सारखी उपलब्ध होईल.

---
महत्वाचे: हिंदी ही भारत देशाची राजभाषा नाही. भारत या देशाला कोणतीही राजभाषा नाही.
---

नाही, शहरी लोकांना सोय होईल.

इतर प्रादेशिक भाषांचे हळूहळू खच्चीकरण करणाचा डाव दिसतो. काही काळात "वन नेशन - वन लँग्वेज" वगैरे घोषवाक्य ऐकायला / वाचायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये.
महाराष्ट्रात मराठीचे बहुतांशी खच्चीकरण आधीच झालेले आहे - राज्य सरकार शाळांतून मराठी सक्तीचे असा कायदा असल्याचे उच्चरवाने सांगते पण प्रत्यक्षात सीबीएसई / आयसीएसई शाळांत मराठी विषय टाळला जातो. याबद्दल ना पालक काही भूमिका घेतात ना सरकार.
महाराष्ट्रात नोकरीनिमित्त आलेले हिंदी भाषक तर सर्रास म्हणतात "अरे क्यो सीखनी है मराठी हमे ?" तेव्हा राग येतो पण काही करता येत नाही कारण आपलेच इतर मराठी बांधव या हिंदी भाषकांच्या सोयीकरिता मराठी ऐवजी हिंदीत बोलू लागतात. चार-सहा जणांच्या घोळक्यात एखादा हिंदी भाषिक व बाकी सगळे मराठी असले तरी गप्पा हिंदीतून चालतात.. चुकून मराठीतून चालू झाल्यास तो हिंदी भाषिक लगेच म्हणणार "अरे यार हिंदी मे बात करो ना .. कुछ समझ नही आ रहा" मग मराठी बांधव त्याला "तो सीख लो ना मराठी - किसने रोका है" असं त्याला खडसावण्याऐवजी उलट स्वतःच "सॉरी यार .. कभी कभी भुल जाते है" म्हणत दिलगिरी व्यक्त करतात..
असो...

पण दक्षिणेकडील राज्यात हिंदीची ही डाळ शिजेल असे वाटत नाही. भाषाभिमान शिकावा तो दक्षिणेतील लोकांकडून ...

उपयोजक's picture

11 Apr 2022 - 8:45 pm | उपयोजक

चांगले निरीक्षण!

चेतन सुभाष गुगळे's picture

16 Apr 2022 - 6:57 pm | चेतन सुभाष गुगळे

पण दक्षिणेकडील राज्यात हिंदीची ही डाळ शिजेल असे वाटत नाही. भाषाभिमान शिकावा तो दक्षिणेतील लोकांकडून ...

हा एक नवीनच गैरसमज. मी शाळेत असताना त्या काळी सरसकट सर्व दक्षिण भारतीयांचा आपल्याकडे मद्रासी असा उल्लेख व्हायचा. तर तेव्हा मी एकदा वर्तमानपत्रात बातमी वाचली - पी टी उषा या खेळाडूने अश्विनी नचप्पा या आणि इतर दोन खेळाडूंबद्दल तक्रार केली होती की त्या तिघी कन्नडमध्ये बोलतात, उषाला कन्नड येत नाही म्हणून त्या मुद्दामच तसे करतात आणि कन्नड मध्ये त्या तिघी उषाची खिल्ली उडवितात, चेष्टा करतात, अपमान करतात अशी काहीशी ही तक्रार होती.

तर सांगायचा उद्देश हा की त्या चार राज्यांमध्येही प्रत्येकाला स्वतःच्या राज्याच्या भाषेचा दुराभिमान आणि इतर राज्याच्या भाषेविषयी पराकोटीचा द्वेष आहे. कावेरी पाणी प्रश्न किंवा इतर सीमाविषयक प्रश्नांनादेखील भाषिक वादाची किनार आहे. काही असे दक्षिण भारतीय नागरिक आहेत की ज्यांना एकापेक्षा अधिक दक्षिणी भाषा येतात पण सर्वच तसे नाहीत मग संवाद साधताना अडचण येते, भांडणे होतात. इंग्रजी अस्खलित येण्याइतकेही हे विद्वान नसतात पण हिंदीला विरोध करावा म्हणून आपापसात मोडक्या तोडक्या इंग्रजीत संवाद साधतात आणि पुन्हा गैरसमज भांडणे होतातच. ८० च्या दशकांत हे जास्त होते. आताशा इंग्रजी ज्ञान वाढले असल्याने इतके गैरसमज होत नाहीत पण हिंदीला विरोध म्हणून चार राज्यां नी आपसातील संवादाची भाषा इंग्रजी ठेवली आहे.

महाराष्ट्र किंवा इतर राज्यातला कोणी यांच्याकडे संवाद साधू लागला की इंग्रजी किंवा त्यांच्या स्थानिक दक्षिणी भाषेचा आग्रह धरतात. हिंदी येत असली तरी मुद्दामच बोलत नाहीत. समोरच्याची अडचण करणे हाच मुख्य उद्देश असतो.

स्वतःचं भाषाप्रेम इतकंच खरं असेल तर इंग्रजीचा देखील आग्रह धरु नये.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Apr 2022 - 7:06 pm | अमरेंद्र बाहुबली

दक्षीण भारतीय आपल्या भाषेचा आग्रह न धरता हिंदी लादून घ्यायला महाराष्ट्रा ईतके मुर्ख नक्कीच नाहीत.

चेतन सुभाष गुगळे's picture

16 Apr 2022 - 7:21 pm | चेतन सुभाष गुगळे

स्थानिक भाषेसोबत दुसरी भाषा इंग्रजी ऐवजी हिंदी करणे यात मूर्खपणा काय आहे?

प्रत्येकाला इंग्रजी शिकणे अवघड आहे त्यापेक्षा हिंदी सोपी आहे. आणि इतकंच आहे तर दक्षिणी भाषेतील चित्रपट मूळ भाषेसोबत फक्त इंग्रजीतच डब करावेत पण नाही ते तर हिंदी प्रमाणेच आता तर थेट भोजपूरीत देखील डब होतात. कारण काय तर ह्या उत्तर भारतीयांच्या खिशातून पैसे हवे आहेत तर मग त्यांच्यापर्यंत पोचायला त्यांच्या भाषेत संवाद साधायला मग या दाक्षिणात्यांचा भाषाभिमान आड येत नाही का?

बाहूबली तुमचा सिनेमा जर फक्त स्थानिक + इंग्रजी भाषेत आणला असता तर इतका प्रचंड व्यवसाय करु शकला असता का? हिंदीत असल्यामुळेच उत्तर भारतातही तो पाहिला गेला. त्यांना जर दाक्षिणात्यांचा द्वेष असता तर त्यांनी सरसकट सर्वच दक्षिण भारतीय चित्रपटांवर ते हिंदीत डब असले तरीही बहिष्कार टाकला असता.

उत्तर भारतीयांना दक्षिणी भाषांचा द्वेष नाहीये. त्यांना या भाषा शिकणे अवघड जातेय कारण त्यात विरामचिह्नांचा वापरच केला जात नाही. शिवाय गरीब उत्तर भारतीयांना इंग्रजी शिकणे देखील सुलभ आणि परवडणारे नाही त्यामुळेच त्यांची अपेक्षा इतकीच आहे की स्थानिक भाषेबरोबरच त्यांना हिंदीचाही पर्याय द्यावा (आधीच सांगितल्याप्रमाणे ते हिंदीचा आग्रह धरताहेत म्हणजे स्वतःच्या मातृभाषेचा आग्रह धरताहेत हा समज चूकीचा आहे. त्यांची मातृभाषा मैथिली / भोजपुरी किंवा इतर काही वेगळी असते. ते आपसात त्या भाषेत बोलता आणि इतरांकरिता हिंदीत बोलतात)

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Apr 2022 - 7:24 pm | अमरेंद्र बाहुबली

ऊत्तरभारतीय म्हणजे देश नाही, ऊत्तरभारतीयांच्या सोयी साठी ऊर्वरीत देशावर हिंदी लादणे मुर्खपणाचे आहे.

विजुभाऊ's picture

17 Apr 2022 - 9:45 pm | विजुभाऊ

संपूर्णपणे सहमत

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 9:57 pm | चेतन सुभाष गुगळे

दक्षिण भारतीयांच्या सोयीकरिता इंग्रजी देशावर लादणे हा आत्मघात ठरेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2022 - 10:08 pm | अमरेंद्र बाहुबली

भारतीयांच्या सोयीकरिता इंग्रजी देशावर लादणे हा देशहिताचा निर्णय ठरेल.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 11:30 pm | चेतन सुभाष गुगळे

कदापी अमान्य.

श्रीगुरुजी's picture

17 Apr 2022 - 10:31 pm | श्रीगुरुजी

आमचा फक्त हिंदी लादण्यास विरोध आहे. ज्यांना स्वेच्छेने हिंदी शिकाविशी वाटते त्यांनी शिकावी. पण हिंदी शिकणे आमच्यावर लादू नका. दोन वेगवेगळ्या भाषिकांनी फक्त इंग्लिशमध्येच बोलावे असा आमचा आग्रह नाही. आमच्या राज्यात आम्ही व्यवहारात फक्त मराठीच बोलणार.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2022 - 11:57 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

तर्कवादी's picture

16 Apr 2022 - 8:10 pm | तर्कवादी

उत्तर भारतीयांना दक्षिणी भाषांचा द्वेष नाहीये. त्यांना या भाषा शिकणे अवघड जातेय कारण त्यात विरामचिह्नांचा वापरच केला जात नाही. शिवाय गरीब उत्तर भारतीयांना इंग्रजी शिकणे देखील सुलभ आणि परवडणारे नाही त्यामुळेच त्यांची अपेक्षा इतकीच आहे की स्थानिक भाषेबरोबरच त्यांना हिंदीचाही पर्याय द्यावा

अमिताभ बच्चन वा ईतर अनेक गरीब उत्तर भारतीयांना मराठीपण शिकणे अवघड जाते का ? मराठीतर विरामचिह्ने आहेत ना ? आणि अनेक दाक्षिणात्य, गुजराथी आणि पंजाबी लोकसुद्धा मराठी शिकतात, त्यांच्या पुढच्या पिढ्या तर छान मराठीत बोलतात.. मग उत्तर भारतीयांनाच ते का जमू नये ? चला अमिताभला नाही जमलं गरीबीमुळे.. सोडून देऊ.. अभिषेक बच्चनचे तरी मराठीतील संभाषणाचे व्हिडिओ मिळतात का ? जसे पंजाबी अक्षय कुमारला , कन्नड असलेल्या गिरिष कर्नाडला , तमिळ शंकर महादेवनला चांगलं मराठी बोलता येतं मग हिंदी भाषिक उत्तर भारतीयांनाच का नाही येत ?

श्री गुगळे, तुमचे काही मुद्दे चुकीचे आहेत.
--
जेव्हा तुम्ही हिंदीचा आग्रह धरता तेव्हा उत्तर भारतीयांना (त्यात थोडेफार महाराष्टातील लोकही येतात) त्यांच्या मुळ भाषेच्या साधर्म्यामुळे एक फायदा मिळतो. त्यात पातळीला पोचायला दक्षिण भारतीयांना जास्त अभ्यास करावा लागतो, त्याला वेळ आणि श्रम लागतात. त्यामुळे समानतेच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह येते आणि उत्तर भारतीयांना एकप्रकारे सवलत मिळून प्राथमिकता मिळाल्यासारखे वाटते.

श्री गुगळे आणि इतर हिंदी समर्थक यांना प्रश्न.

  • कृपया, तुम्ही ही सवलत किंवा प्राथमिकता उत्तर भारतीयांना का मिळावी ते सांगा?
  • आणि इतरांनी त्याच पातळीला जायला अतिरीक्त प्रयत्न करुन आपला वेळ आणि श्रम का घालवावेत? यामुळे घटनेने (कलम १४) दिलेल्या समानतेच्या तत्वांचा भंग होत नाही का?
  • जे अहिंदी भाषिकांना level playing field (मराठी प्रतिशब्द काय?) कसे मिळणार? उदा. केंद्रीय लोकसेवा आयोग level playing field सर्व उमेदवारांना मिळावी म्हणुन प्रयत्न करते.
  • जर त्यांनी आपली भाषा सोडुन इतर भाषा शिकणे म्हणजे एकप्रकारे सांस्कृतिक नरसंहार नाही का?
  • भारतीय इतिहासात 'तु मुसलमान बन, तु हे मिळेल' असली उदाहरणे बरीच आहेत, आता फक्त तु हिंदी भाषिक बन, तुला हे फायदे आहेत असे असेल तर मुसलमान राज्यकर्ते आणि आताचे राज्यकर्ते यात फरक काय?

-----
आता इंग्रजीचा मुद्दा, इंग्रजी ही परदेशी भाषा असल्याने भारतात कोणालाच येत नाही. प्रत्येकाने ती स्वतः शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे जो शिकण्याचे स्वतः प्रयत्न करेल.
दक्षिण भारतीय किंवा उत्तर भारतीय हा मुद्दा गैरलागु होतो. इंग्रजी भाषेसमोर सगळी समानता आहे.
------

जेव्हा तुम्ही हिंदीचा आग्रह धरता तेव्हा उत्तर भारतीयांना (त्यात थोडेफार महाराष्टातील लोकही येतात) त्यांच्या मुळ भाषेच्या साधर्म्यामुळे एक फायदा मिळतो. त्यात पातळीला पोचायला दक्षिण भारतीयांना जास्त अभ्यास करावा लागतो, त्याला वेळ आणि श्रम लागतात.

हा एकच काय तो कामाचा मुद्दा आतापर्यंत हिंदी विरोधक / इंग्रजी समर्थकांकडून आला आहे.

उत्तर भारतीयांना (त्यात थोडेफार महाराष्टातील लोकही येतात) त्यांच्या मुळ भाषेच्या साधर्म्यामुळे एक फायदा मिळतो.

यात माझ्या माहितीप्रमाणे भोजपुरी मैथिली सारख्या भाषांसोबतच पंजाबी, हरियाणवी, राजस्थानी, गुजराती आणि काही प्रमाणात मराठी देखील धरावी लागेल. म्हणजे किमान दहा वेगवेगळ्या भाषिक मंडळींना हिंदी शिकायला कमी श्रम पडतील असा अंदाज आहे. आता तुम्ही अशी दुसरी कोणतीही भारतातील भाषा सूचवा जी शिकायला इतर दहा भाषिकांना (ज्यात दक्षिण भारतातील चार भाषा आल्या) कमी श्रम पडतील.

आपण त्या भारतीय भाषेचा विचार करु.

आता इंग्रजीचा मुद्दा, इंग्रजी ही परदेशी भाषा असल्याने भारतात कोणालाच येत नाही. प्रत्येकाने ती स्वतः शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे जो शिकण्याचे स्वतः प्रयत्न करेल.

म्हणजे भारतीय असलेल्या हिंदी भाषेला द्वितीया भाषा म्हणून प्राधान्य दिले तर भारतातले विशिष्ट दहा भाषिक पुढे जातील या कारणास्तव परकीय भाषेला हा दर्जा द्यायचा?

त्यापेक्षा ज्यांना एकापेक्षा अधिक भारतीय भाषा बोलता / लिहिता / वाचता येतात त्यांना अनुवादक किंवा इतर अशा स्वरुपाच्या नोकर्‍यांमध्ये फायदा द्यावा. हिंदी भाषिकांना दुसरी कोणतीच भाषा चांगली येत नाही या त्यांच्या कमतरतेमुळे भारतीय भाषातील अनुवादकासारख्या नोकर्‍यांमध्ये त्यांना स्थान नसणे हा एक नैसर्गिक तोटा त्यांना होईलच (नैसर्गिक फायदा तुम्ही मांडला आहेच. तोटा मी मांडला. कॉम्पेन्सेट झाले.)

हा एकच काय तो कामाचा मुद्दा आतापर्यंत हिंदी विरोधक / इंग्रजी समर्थकांकडून आला आहे.

धन्यवाद.

कृपया इतर प्रश्नांचीही उत्तरे द्यावीत.

----

म्हणजे भारतीय असलेल्या हिंदी भाषेला द्वितीया भाषा म्हणून प्राधान्य दिले तर भारतातले विशिष्ट दहा भाषिक पुढे जातील या कारणास्तव परकीय भाषेला हा दर्जा द्यायचा?

इतर उत्तरे आली की मी याचे उत्तर देईन.

श्री गुगळे आणि इतर हिंदी समर्थक यांना प्रश्न.
https://www.misalpav.com/comment/1138349#comment-1138349
--
तुमच्याकडे मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नाहीत असे मी समजावे का?
तसे असेल तर तुमच्या इतर प्रतिवादाला काहीच अर्थ राहत नाही.

चेतन सुभाष गुगळे's picture

19 Apr 2022 - 9:14 pm | चेतन सुभाष गुगळे

तुमचे पाच प्रश्न हे एकाच एकाच मुख्य प्रश्नाचे उपप्रश्न आहेत.

त्या सर्वांना मिळून

https://www.misalpav.com/comment/1138365#comment-1138365

यापेक्षा वेगळं उत्तर माझ्यापाशी नाहीये. निदान सध्यातरी ...

इंग्रजी ऐवजी हिंदी का हवी? या प्रश्नाच्या उत्तराकरिता मात्र माझ्याकडे बरेच मुद्दे आहेत, पण ते इथे मांडण्यात फारसे स्वारस्य नाही. मी टंकन श्रम घेत मराठी भाषेत इतकं लेखन करुनदेखील केवळ मी मराठी वंशाचा नाही म्हणून मला मराठी भाषेबद्दल आत्मीयता नाही असा निष्कर्ष काढला गेला व माझ्या हेतूंबाबतच शंका घेतली गेली असल्याने (हे आपल्याबद्दल नाही) इथे आता काही मांडत नाही. स्वतंत्र रीत्या आपणांस ते जाणून घ्यायचे असल्यास मला दूरध्वनीवर संपर्क करु शकता.

sunil kachure's picture

19 Apr 2022 - 10:06 pm | sunil kachure

तुम्ही मूळ मराठी नाही आहात.हा विषय च नाही.
आम्ही इथे जे व्यक्त होत आहोत ते आम्ही बिगर हिंदी भाषिक आहोत म्हणून नाही.
तर देशाची भाषिक विविधता बघून देशाला काय धोकादायक आहे ते मांडत आहोत.
भारत बहु भाषिक आहे है सत्य कधीच नाकारू नका.
एक देश एक भाषा हे सूत्र भारताला लागू होणार नाही.
हे पण सत्य मान्य करा.
भाषिक राज्य झाली नसती तर देश आज जसा दिसतो तसा नसता हे पण मान्य करा.
दिग्गज नेते होते जेव्हा एक भाषा एक राज्य हे सूत्र स्वीकारले गेले.
ते खूप विचार करून स्वीकारले गेले.

तेव्हा हिंदी ही राष्ट्र भाषा म्हणून जाहीर केली असती
आणि सरकारी सर्व व्यवहार हिंदी मधून झाला असता तर अर्ध्या भारताला हे आपला देश आहे असे वाटलेच नसते.
त्यांनी भारत स्वीकारला नसता..
एक राज्य एक भाषा हे सूत्र आणि त्रि भाषिक
पद्धत स्वीकारल्या मुळे सरकारी कारभार मातृभाषेत झाला आणि त्या मुळेच लोकांस हा माझा देश आहे असे वाटायला लागले.
.तुम्ही हिंदी भाषिक असला तर तुम्हाला देशाची भाषिक,सांस्कृतिक,रचना माहीत असती तर
अमित शाह ह्यांचे राजकीय विधान तुम्ही उचलून धरले नसते.
हिंदी cha हट्ट धरला तर इंग्लिश हीच राहिलेल्या भारताची भाषा असेल.
आणि हट्ट नी बिगर हिंदी राज्य तसेच वागतील.

चेतन सुभाष गुगळे's picture

19 Apr 2022 - 11:55 pm | चेतन सुभाष गुगळे

आणि सरकारी सर्व व्यवहार हिंदी मधून झाला असता तर अर्ध्या भारताला हे आपला देश आहे असे वाटलेच नसते.

ईग्रजीतून झाल्याने जास्त आत्मीयता वाटते? किती टक्के जनतेला? उत्स्फूर्त संवाद साधायचा म्हंटला तर या देशातील ९९ टक्के जनतेला इंग्रजीतून हे जमणार नाही. हिंदी निदान ५० टक्के जनतेला तरी नक्की जमेल.

तुम्ही मूळ मराठी नाही आहात.हा विषय च नाही.

http://www.misalpav.com/comment/1138270#comment-1138270

http://www.misalpav.com/comment/1138277#comment-1138277

http://www.misalpav.com/comment/1138298#comment-1138298

http://www.misalpav.com/comment/1138304#comment-1138304

http://www.misalpav.com/comment/1138374#comment-1138374

ह्या सर्व प्रतिसादांमध्ये माझ्या मारवाडी असण्याबद्दलचा राग दिसून येत आहे स्पष्टपणे.

श्रीगुरुजी's picture

19 Apr 2022 - 10:28 pm | श्रीगुरुजी

आपल्या मराठी भाषेच्या कौशल्याविषयी व हेतूंविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही. पुण्यातील अनेक जैन-मारवाडी माझे परिचित आहेत व ते सर्वजण येथे पूर्ण समरस झाले असून उत्तम मराठी बोलतात.

परंतु महाराष्ट्रात दोन असमान भाषिकांनी इंग्लिश ऐवजी हिंदीत संवाद साधावा हे मला मान्य नाही.

चेतन सुभाष गुगळे's picture

19 Apr 2022 - 11:15 pm | चेतन सुभाष गुगळे

परंतु महाराष्ट्रात दोन असमान भाषिकांनी इंग्लिश ऐवजी हिंदीत संवाद साधावा हे मला मान्य नाही.

परंतु भारतात दोन असमान भाषिकांनी हिंदी या भारतीय भाषे ऐवजी इंग्रजी या परकीय भाषेत संवाद साधावा भारताच्या भारतीयत्वाला शोभणारे नाही.

श्रीगुरुजी's picture

19 Apr 2022 - 11:50 pm | श्रीगुरुजी

परंतु भारतात दोन असमान भाषिकांनी हिंदी या भारतीय भाषे ऐवजी इंग्रजी या परकीय भाषेत संवाद साधावा भारताच्या भारतीयत्वाला शोभणारे नाही.

हे कोणी ठरविले? जर हिंदी भारतीय भाषा असेल तर मराठी सुद्धा भारतीय भाषा आहे. मग मराठीत का संवाद साधू नये? मला हिंदी येत नाही. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील अमराठी राज्यात मी फक्त इंग्लिश मध्येच संवाद साधू शकतो.

अवांतर - भारतातील अधिकृत १५ भाषांमध्ये इंग्लिश व गोरखा या भाषांचा सुद्धा समावेश आहे. नागालँड या राज्याची अधिकृत राजभाषा इंग्लिश आहे. त्यामुळे ही भाषा सुद्धा आता घटनात्मकदृष्ट्या भारतीय भाषा आहे.

उपयोजक's picture

20 Apr 2022 - 7:45 am | उपयोजक

परंतु भारतात दोन असमान भाषिकांनी हिंदी या भारतीय भाषे ऐवजी इंग्रजी या परकीय भाषेत संवाद साधावा भारताच्या भारतीयत्वाला शोभणारे नाही.

आत्ता तुम्ही लिहिताय त्या मराठीत ,ज्याची बाजू लावूनधरताय त्या हिंदीत आणि तुमची मातृभाषा असलेल्या मारवाडीत अक्षरश: हजारो शब्द हे अरबी , फार्सी मूळ असलेले आहेत. ते शब्द परकीय आक्रमकांच्यामुळे भारतीय भाषांमधे शिरलेत. ते शब्द वापरणं हे भारतीयत्वाला शोभणारं आहे का? नसेल तर अरबी , फार्सीमुक्त मराठीत बोलणार का आजपासून?

चेतन सुभाष गुगळे's picture

20 Apr 2022 - 10:13 am | चेतन सुभाष गुगळे

शब्द दत्तक घेणं आणि संपूर्ण वेगळी भाषा घेणं या दोन भिन्न बाबी आहेत. त्याशिवाय इंग्रजीत नुसतेच शब्द नाही तर व्याकरण, वाक्य रचना सारंच भिन्न आहे.

चेतन सुभाष गुगळे's picture

19 Apr 2022 - 11:21 pm | चेतन सुभाष गुगळे

आपल्या मराठी भाषेच्या कौशल्याविषयी व हेतूंविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही.

धन्यवाद.

पुण्यातील अनेक जैन-मारवाडी माझे परिचित आहेत व ते सर्वजण येथे पूर्ण समरस झाले असून उत्तम मराठी बोलतात.

हे का घडू शकले? कारण त्यांनी मराठी माध्यमातून १० वी पर्यंतचे शिक्षण घेतले. अर्थात याचा परिणाम म्हणून त्यांचे मराठी उत्तम झाले तरी इंग्रजी बोलणे तितकेसे अस्खलित नाही. त्यामुळे त्यांना एखाद्या अमराठी व्यक्तिसोबत इंग्रजीत संवाद साधण्यापेक्षा हिंदी सुलभ जाईल. इथे तुम्ही इंग्रजीचा आग्रह धराल तर मग ह्याच लोकांना इंग्रजी माध्यमातून १० वी पर्यंतचे शिक्षण घ्यावे लागेल परिणामस्वरुप ते इतर भाषिकांसोबत इंग्रजीतून सहज संवाद साधतील पण त्यांचे मराठी भाषा ज्ञान शून्य राहील.

हिंदी ऐवजी इंग्रजीचा आग्रह दूरगामी (लॉग टर्म) विचार करता मराठीला संपविणारा ठरेल.

चौथा कोनाडा's picture

20 Apr 2022 - 2:56 pm | चौथा कोनाडा

हिंदी ऐवजी इंग्रजीचा आग्रह दूरगामी (लॉग टर्म) विचार करता मराठीला संपविणारा ठरेल.

सहमत.

Trump's picture

21 Apr 2022 - 3:25 pm | Trump

यापेक्षा वेगळं उत्तर माझ्यापाशी नाहीये. निदान सध्यातरी ...

धन्यवाद हे मान्य केल्याबद्दल. जरी सगळे प्रश्न एकच वाटत असले तरी ते वेगवेगळे आहेत. तुम्ही आधी दिलेले उत्तर हे मुळ प्रश्नांना बगल देऊन दिले आहे. त्यामुळे ते मी स्वीकारणार नाही.
पण जर तुम्हाला मुळ मुद्द्याला उत्तर देता येत नाहीत तर बाकीच्या प्रतिवादांना अर्थ राहत नाही.

--

मी टंकन श्रम घेत मराठी भाषेत इतकं लेखन करुनदेखील केवळ मी मराठी वंशाचा नाही म्हणून मला मराठी भाषेबद्दल आत्मीयता नाही असा निष्कर्ष काढला गेला व माझ्या हेतूंबाबतच शंका घेतली गेली असल्याने (हे आपल्याबद्दल नाही) इथे आता काही मांडत नाही.

तुम्हाला झालेले दु:ख मला समजु शकते. जर तुम्ही स्वतःला मराठी समजत असाल तर तुम्ही नक्कीच मराठी आहात. जे तुम्हाला मराठी समजत नाही त्यांना तुम्ही 'मराठी (भाषिक) म्हणजे काय? ' असा प्रतिशश्न विचारायला हवा.
--

स्वतंत्र रीत्या आपणांस ते जाणून घ्यायचे असल्यास मला दूरध्वनीवर संपर्क करु शकता.

सध्या तरी त्याची आवश्यकता वाटत नाही. बघुन नंतर. धन्यवाद.

उपयोजक's picture

26 Apr 2022 - 7:32 am | उपयोजक

'मराठी (भाषिक) म्हणजे काय?

मातृभाषा मराठी असणे , घरच्या सदस्यांसोबत मराठीतून बोलले जाणे म्हणजे मराठीभाषिक असणे.

तर्कवादी's picture

26 Apr 2022 - 1:36 pm | तर्कवादी

मातृभाषा मराठी असणे , घरच्या सदस्यांसोबत मराठीतून बोलले जाणे म्हणजे मराठीभाषिक असणे.

घरात कोणती भाषा बोलली जाते - खास करुन आई वडीला व भावंडांशी ते एखाद्या व्यक्तीच्या हातात नसते. मातृभाषा याचा शब्दशः अर्थ म्हणजे आईशी वा घरात बोलली जाणारी भाषा असा घेतला जावू नये. तर प्रथम भाषा असा अर्थ घ्यायला हवा.... ज्या भाषेत तुम्ही नेहमीच विचार करता, ज्या भाषेत सहजपणे आणि उत्स्फुर्तपणे आपल्या भावना व्यक्त करता ती भाषा तुमची भाषा आहे.. जरी ती घरच्या सदस्यांसोबत बोलली जात नसेल तरीही..
मला ट्रम्प यांनी केलेली व्याख्या अधिक पटली

जर तुम्ही स्वतःला मराठी समजत असाल तर तुम्ही नक्कीच मराठी आहात

घरात मराठी बोलत नसूनही अनेकजण मनाने मराठी असू शकतात.. त्यांच्या मराठी असण्यावर शंका घेतली जावू नये. जो अभिमानाने स्वतःला "मी मराठी" म्हणवतो (म्हणजे सच्चेपणाने , मनापासून - समोरची पार्टी बघून नाही) तो मराठीच. त्याउलट घरात मराठी बोलली जात असूनही बाहेर सगळीकडे हिंदी वा इंग्लिश बोलण्यातच धन्यता वा कूलनेस मानणार्‍यांना मी तरी मराठी समजणार नाही (अर्थात त्यांनाही स्वतःला मराठी म्हणवण्यात फारसा रस नसतोच ही गोष्ट वेगळी)

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2022 - 1:37 pm | अमरेंद्र बाहुबली

कै च्या कै

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2022 - 1:43 pm | अमरेंद्र बाहुबली

कै च्या कै

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2022 - 1:44 pm | अमरेंद्र बाहुबली

घरात मराठी बोलत नाही तरी पण मराठी म्हणे.

तर्कवादी's picture

28 Apr 2022 - 10:40 pm | तर्कवादी

घरात मराठी बोलत नाही तरी पण मराठी म्हणे.

ह्या मानसिकतेमुळे तुम्ही घरात मराठी बोलले जात नाही इतक्या कारणाकरिता मराठीबद्दल मनापासून आत्मियता असणार्‍यांना दूर लोटताय.
तसेही घरात (आधीच्या पिढीशी) मराठी बोलली जात असूनही पुढच्या पिढीशी (म्हणजे मुलांशी) आवर्जुन इंग्लिश बोलणारे किंवा घराबाहेर आवर्जुन हिंदीच बोलणारे (खास करुन मुंबई/ नागपूर यासारख्या ठिकाणी) तथाकथित मराठी असूनही मराठीपासून मनाने दूर गेलेले आहेतच. तेव्हा घरात मराठी न बोलणारे पण मराठीबद्दल आत्मियता असणार्‍यांबद्दल काय दृष्टीकोन ठेवावा हे तुमचे तुम्ही ठरवा. ह्याबाबत मी अधिक चर्चा करुन इच्छित नाही. धन्यवाद.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Apr 2022 - 11:08 am | अमरेंद्र बाहुबली

मला मॅंडरीन बद्दल आत्मयता आहे. मग मी आजपासून चिनी का?

मला मॅंडरीन बद्दल आत्मयता आहे. मग मी आजपासून चिनी का?

माझ्या आधीच्या प्रतिसादात त्याचं उत्तर होतं .. पण तुमच्या हटवादीपणाला सलाम .. यापुढे या विषयावर मला वाद करायचा नाही... तुमची मनोवृत्ती तुम्हाला लखलाभ...

"ज्या भाषेत तुम्ही नेहमीच विचार करता, ज्या भाषेत सहजपणे आणि उत्स्फुर्तपणे आपल्या भावना व्यक्त करता ती भाषा तुमची भाषा आहे."

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Apr 2022 - 7:24 pm | अमरेंद्र बाहुबली

काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी मग तर्क लावला तर मला वाद घालायचा नाही म्हणून पळ काढायचा. आय डी काय तर म्हणे तर्कवादी.
नाव सोनूबाई…..

काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी मग तर्क लावला तर मला वाद घालायचा नाही म्हणून पळ काढायचा. आय डी काय तर म्हणे तर्कवादी.
नाव सोनूबाई…..

मि. बाहूबली... शब्द जपून वापरा.. मला पण व्यक्तिगत चिखलफेक करता येईल.. .. नाव बाहुबली घेतल्याने तुम्ही सर्व शक्तीमान होत नाहीत..

आणि तर्क कशाशी खातात हे तुम्हाला कळत का ? म्हणे "मी तर्क लावला" ... तर्काने प्रतिसाद देण्याची तुमची कुवत नाही ..तेव्हा उगाच नाद करायचा नाही ...

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Apr 2022 - 11:23 am | अमरेंद्र बाहुबली

साहेब ईतका तर्क लावता येतो तर ह्याच घयधाग्याच श्रिगुरूजी्नी स्वित्झक्समंड जेशाचं ऊदाहरण दिलंय की तिथे फ्रेंच किंवा जर्मन घरात सुध्दा बोलणं सक्तिचं आहे. चार चारशे वर्षे हे लोक नहाराषट्रात राहतात तरी ह्यांची मातृभाषा मराठी होत नाही, पैश्यासाठी फक्त ह्याना नराठी लागतेऱ मग बोललो नैही म्हणून काय झालं मनानी मराठी वगैरे ह्या फूकाच्या गप्पा आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Apr 2022 - 11:24 am | अमरेंद्र बाहुबली

साहेब ईतका तर्क लावता येतो तर ह्याच घयधाग्याच श्रिगुरूजी्नी स्वित्झर्लंड जेशाचं ऊदाहरण दिलंय की तिथे फ्रेंच किंवा जर्मन घरात सुध्दा बोलणं सक्तिचं आहे. चार चारशे वर्षे हे लोक महाराष्ट्रात राहतात तरी ह्यांची मातृभाषा मराठी होत नाही, पैश्यासाठी फक्त ह्याना मराठी लागते तर मग बोललो नाही म्हणून काय झालं मनानी मराठी वगैरे ह्या फूकाच्या गप्पा आहेत.

कॉमी's picture

30 Apr 2022 - 11:29 am | कॉमी

तुमच्या सर्टिफिकेटची गरज कुणाला आहे इथे बाहुबली राव ?

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Apr 2022 - 12:06 pm | अमरेंद्र बाहुबली

मी का देऊ सर्टिफीकेट?? पण युपी बिहारी मजूरांच्या सोयीसाठी देशाने हिंदी लादून घ्यावी असं मत असनार्या तुमच्यासारख्या लोकांना ही गोष्ट कळायला हवी.

कानडाऊ योगेशु's picture

29 Apr 2022 - 8:24 pm | कानडाऊ योगेशु

घरात मराठी बोलत नाही तरी पण मराठी म्हणे.

असे असु शकते आणि माझा एक गमतीशीर अनुभव आहे.
मी काम करत असलेल्या बेंगलोर स्थित कंपनीत काही फ्रेशर्स जॉईन झाले होते. त्यात मराठी मुलामुलींचाही एक ग्रुप होता. मी ही मराठी असल्याने कँटीन मध्ये ओळखपाळख झाली .एकदा त्यांच्या सोबत बसलो असताना एका दणकट तरुणाकडे बोट दाखवुन एक मुलगी म्हणाली कि सर हा पंजाबी आहे आणि मराठी मध्येच बोलतो. बोल रे मराठी असे म्हणाली आणि सगळे हसु लागले. त्या तरुणालाही कदाचित सवय असावी व ह्यावरुन अनेक विनोद ही झाले असावेत म्हणुन तो ही हसु लागला. मला म्हणाला कि मी कल्याणमध्ये लहानाचा मोठा झालोय आणि चांगले मराठी बोलतो. मी त्याला म्हणालो भारतातल्या दोन अगदी शक्तीशाली गर्जना तू अभिमानाने म्हणु शकतोस "हर हर महादेव" आणि "जो बोले सो निहाल सत श्री अकाल" ह्यावर तो फारच खुश झाला आणि म्हणाला अशी प्रतिक्रिया आता पर्यंत कोणी दिली नव्हती.
तेव्हा कोणी घरी जरी मराठी बोलत नसले तरी तो अस्सल महाराष्ट्रीयन असु शकतो.

तर्कवादी's picture

29 Apr 2022 - 8:32 pm | तर्कवादी

तेव्हा कोणी घरी जरी मराठी बोलत नसले तरी तो अस्सल महाराष्ट्रीयन असु शकतो.

अगदी बरोबर.. फार छान किस्सा.. आणि असे अनेक किस्से असू शकतात.
फार काय अनेक मुस्लिम लोक घरात भले हिंदी बोलतात पण त्यांचं मराठी बोलणंही खूप छान असतं. मला आठवतंय माझा एक जुना सहकारी होता शोएब नावाचा. सोलापूरचा होता पण त्याचे मराठी उच्चार अगदी पुणेरी वळणाचे होते. .."मला मराठी येतं" असं त्याला वेगळं सांगावंही लागत नसे तो नेहमी मराठीच बोलायचा.. आता अशा माणसाला केवळ त्याच्या घरात हिंदी बोलली जाते म्हणून अमराठी म्हणायचे का ?

चौथा कोनाडा's picture

29 Apr 2022 - 10:59 pm | चौथा कोनाडा

फार काय अनेक मुस्लिम लोक घरात भले हिंदी बोलतात

आपली राज्य /प्रदेश आणि भाषा अशी चर्चा सुरु आहे ना ? मग हे धर्माचं कुठून आलं मध्येच ?

तर्कवादी's picture

30 Apr 2022 - 12:20 am | तर्कवादी

मग हे धर्माचं कुठून आलं मध्येच ?

धर्माचं आलं नाही. फक्त घरात हिंदी बोलतात हे नमूद केलंय.. आणि घरात हिंदी बोलण्याचं कारण कदाचित (कदाचितच हं.. मी काही खात्रीशीर दावा करत नाही) त्यांचं मुस्लिम धर्मीय असणं हे असू शकेल. तरी धर्माच्या उल्लेखाकडे दुर्लक्ष केला तरी चालेल,..
हवं तर ते वाक्य असं वाचा " फार काय अनेक मुस्लिम लोक घरात भले हिंदी बोलतात" ..
आणि मग फक्त हे अनेक लोक कोणते आणि ते घरात हिंदी का बोलतात ते मात्र मला विचारु नका :)

जेम्स वांड's picture

25 Apr 2022 - 5:31 pm | जेम्स वांड

राजस्थानी अशी एकही भाषा अस्तित्वात नसून राजस्थानात बोलली जाणारी भाषा ही मारवाडी ही आहे.

उपयोजक's picture

17 Apr 2022 - 9:14 am | उपयोजक

आताशा इंग्रजी ज्ञान वाढले असल्याने इतके गैरसमज होत नाहीत

चांगलंय की मग! म्हणजे हिंदीला दूर ठेवण्यात चांगलं यश मिळवलंय द.भा नी.

हिंदी येत असली तरी मुद्दामच बोलत नाहीत. समोरच्याची अडचण करणे हाच मुख्य उद्देश असतो.

त्यांच्याशी उत्तरभारतीय हिंदीत का बोलतात? मोडक्यातोडक्या इंग्रजीत का असेना ते मदतीला तयार असतात. मग समोरच्याची अडचण करणे हा उद्देश कसा काय बुवा?

किती मराठी लोकांना शेजारच्या कर्नाटकाची कन्नड किंवा तेलंगणाची तेलुगू येते?

कपिलमुनी's picture

11 Apr 2022 - 8:48 pm | कपिलमुनी

आयटी सेक्टर मध्ये तर महाराष्ट्रात हिंदी सर्वमान्य भाषा असल्या सारखी वापरतात. चेन्नई मध्ये मात्र तमिळ आणि इंग्रजी वापरावी लागते

विजुभाऊ's picture

11 Apr 2022 - 11:51 pm | विजुभाऊ

बँक ऑफ महाराष्ट्र मधे तर हल्ली सगळा अमराठी कर्मचारीवर्ग आहे.
आपले सरकार भाषेच्या बाबतीत इतके गुळमुळीत धोरण का स्वीकारते कोण जाणे.
हिंदी भाषीकांचा इतर भाषा शिकण्यास इतका विरोध का असतो हे कोणी समजावून सांगेल का?
दुसरे म्हणजे की या हिंदी भाषिकांना इतर राज्यात कामसाठी जायला भाग पाडणारे त्यांचे नेते जनतेला राज्यात कामे नोकर्‍या का मिळत नाहीत या बाबतीत मौन धारण करतात.

उपयोजक's picture

12 Apr 2022 - 8:02 am | उपयोजक

आपले सरकार भाषेच्या बाबतीत इतके गुळमुळीत धोरण का स्वीकारते कोण जाणे.

मतांसाठी. आम्ही तुमची सोय करतो तुम्ही आम्हाला एकगठ्ठा मतदान करा असे डिल असते.

हिंदी भाषीकांचा इतर भाषा शिकण्यास इतका विरोध का असतो हे कोणी समजावून सांगेल का?

त्यांचं म्हणणं असतं की आम्ही तुमच्या राज्यात आलोय ते पैसे कमवायला. तुमची राज्यभाषा शिकत बसणं हे आमच्यासाठी जादाचं काम/डोक्याला ताप
आहे. आम्ही तो का करुन घेऊ?

राज्यभाषा न समजल्याने येणार्‍या अडचणींना हे हिंदीभाषिक कोणाच्या ना कोणाच्या मदतीने मॆनेज करतात. जसे की ज्यांची मोलकरीण किंवा दुकानात नोकर ठेवायची ऐपत आहे ते घरातली मोलकरीण दुकानातला नोकर ही स्थानिक भाषा येणारीच ठेवण्याला प्राधान्य देतात. मुंबईसारख्या मराठी लोकसंख्या कमी असणार्‍या शहरातही बहुसंख्य मोलकरणी या मराठीच का असतात हे लक्षात यावे. जे हिंदीभाषिक हातगाडीवर व्यवसाय करतात ते मराठी न समजल्याने अडचण आल्यास मराठी हातगाडीवाल्याची मदत घेतात.शेजारी कोणी मराठी व्यावसायिक असेल तर त्याच्याकडून मदत मिळवतात. वेळ मारुन नेतात. स्थानिक लोक स्वत:च या हिंदीभाषिकांच्या मदतीला तत्पर असल्याने ते राज्यभाषा शिकत नाहीत.

कानडाऊ योगेशु's picture

12 Apr 2022 - 12:27 am | कानडाऊ योगेशु

दक्षिणेतल्या सर्वसामान्य लोकांना इंग्लिश येतेच येते हा ही एक भ्रम आहे. काही वर्षापूर्वी काही कामानिमित्त चेनै मध्ये होतो तेव्हा हे जाणवले. पण एक निदर्शनाला आलेली बाब म्हणजे जिथे मुस्लिम समुदायाची दुकाने होती तिथे हिंदीमध्ये बोलणे चालुन गेले. हाच अनुभव एका सौदेंडियन मित्रानेही सांगितला हैद्राबादमध्ये असल्यामूळे उर्दूमिश्रीत हिंदी बोलु शकत होता त्यामुळे दुसर्या दाक्षिणात्य प्रदेशात गेल्यावर बाय डिफॉल्ट मुस्लीम दुकानदार किंवा स्टाफ असलेल्या दुकानातच जायचा. हिंदी ला प्रमोट करण्यामागे हाही एक उद्देश असावा म्हणजे कर्नाटकातल्या एका खेडेगावातला मनुष्य तामिळनाडु अथवा केरळामधल्या एका शहरात गेला वा ह्याच्या उलट झाले तर जी गैरसोय होईल ती हिंदीमुळे काही प्रमाणात कमी होऊ शकेल. पण हिंदी भाषिकांची अरेरावी सहन करण्यापलिकडे असते हे ही एक निरिक्षण नोंदवतो.

मुस्लिम समुदायाची दुकाने होती तिथे हिंदीमध्ये बोलणे चालुन गेले. हाच अनुभव एका सौदेंडियन मित्रानेही सांगितला हैद्राबादमध्ये असल्यामूळे उर्दूमिश्रीत हिंदी बोलु शकत होता त्यामुळे दुसर्या दाक्षिणात्य प्रदेशात गेल्यावर बाय डिफॉल्ट मुस्लीम दुकानदार किंवा स्टाफ असलेल्या दुकानातच जायचा.

हिंदी ला प्रमोट करण्यामागे हाही एक उद्देश असावा म्हणजे कर्नाटकातल्या एका खेडेगावातला मनुष्य तामिळनाडु अथवा केरळामधल्या एका शहरात गेला वा ह्याच्या उलट झाले तर जी गैरसोय होईल ती हिंदीमुळे काही प्रमाणात कमी होऊ शकेल.

हा एक फार महत्त्वाचा मुद्दा इथे मांडला गेला आहे. हिंदी विरोध करुन कोणाचं नुकसान होईल हे येथे लक्षात येते.

आकडेवारी बघितली तर हिंदी भाषिक लोक खूप मोठ्या संख्येने (प्रचंड हा शब्द अगदी योग्य आहे)बिगर हिंदी भाषा असलेल्या राज्यात स्थलांतरित झालेली आहेत.
हिंदी संपर्क भाषा असण्याचा सर्वात जास्त फायदा हिंदी भाषा असणाऱ्या लोकांना आहे.
तमिळ,कर्नाटक मध्ये,कर्नाटकी तमिळ nadu मध्ये.मराठी लोक दक्षिण भारतात गेले आहेत ते जास्त करून शिक्षित आहेत इंग्रजी जाणतात.
मोजकेच लोक अशिक्षित आहेत.
त्या मुळे हिंदी चे समर्थन करण्यासाठी दक्षिण भारतातील आपसात झालेल्या स्थलांतरित लोकांची किंवा मराठी लोक कर्नाटक मध्ये गेल्यावर काय होईल .
ही लंगडी उदाहरणे आहेत.
हिंदी भाषा संपर्क भाषा म्हणून पण बिगर हिंदी राज्यांनी स्वीकारली नाही तर.
हिंदी भाषिक पट्टा आर्थिक संकटात नक्की सापडेल.
दुर्दशा पण होवू शकते.
पण इतके प्रचंड नुकसान हिंदी न स्वीकारल्या मुळे बिगर हिंदी राज्यांचे होणार नाही.
स्थलांतरित लोकांची आकडेवारी तपासा .
पटेल हे.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 7:52 pm | चेतन सुभाष गुगळे

आकडेवारी बघितली तर हिंदी भाषिक लोक खूप मोठ्या संख्येने (प्रचंड हा शब्द अगदी योग्य आहे)बिगर हिंदी भाषा असलेल्या राज्यात स्थलांतरित झालेली आहेत.

ह्या पहिल्या मुद्द्याबाबत अनेकांना फार मोठे गैरसमज आहेत. त्यांना तिकडे खायला मिळत नाहीत म्हणून इथे येतात हा त्यातला एक. वस्तुस्थिती सर्वच ठिकाणी अशी नाही. सरकारी योजना रोहयो / मनरेगा वगैरेमुळे त्यांना पोटाला पुरेल इतके त्यांच्या राज्यांत देखील बर्‍यापैकी मिळते.

आपल्या लोकांना त्यांची जास्त गरज आहे.

मी धुळ्यात असताना आणि उर्वरित महाराष्ट्रात देखील बरेच ठिकाणी पाहिले आहे. बारा तास स्वस्तात राबू शकणारे मनुष्यबळ म्हणून आपल्या इथले उद्योजक ठेकेदारामार्फत त्यांना त्यांच्या गावी जाऊन चांगले अमिष दाखवून इथे मजूरीकरिता आणतात. २०१४ चा रेट सांगतो रुपये दीडशे फक्त + जेवण + निवासाची सोय यावर रोज बारा तास राबणारे मजूर सर्रास ठेकेदारामार्फत बिहार झारखंड छत्तीसगड उत्तरप्रदेश येथून मागविला जाई. अनेकदा तर इथे सहा महिने काम केल्यावर ते कंटाळत घरी जायची मागणी करीत तरी ठेकेदार त्यांना कधी प्रेमाने तर कधी सक्ती धाकदपटशाचा उपयोग करुन येथेच अडकवून ठेवत. पगार महिन्याच्या महिन्याला पूर्ण न देता बराचसा स्वतःकडे सिक्यूरिटी डिपॉझिटच्या नावाखाली दाबून ठेवणे ही अजून एक धूर्त खेळी असे.

तरीही मग फारच असह्य झाले तर ठेकेदाराची नजर चुकवून बाकी पगारावर पाणी सोडत ही मुले मिळेल त्या वाहनाने पळून स्वतःच्या गावी जायचा प्रयत्न करीत पण जर तेव्हा ठेकेदाराच्या तावडीत सापडले तर असह्या मार खावून पुन्हा येथेच काम करावे लागे.

हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी जवळून पाहिले आहे. या अमराठी तरुणांना तुम्ही मराठी / इंग्रजीची सक्ती करणार काय?

त्याचवेळी स्थानिक मराठी मजूर तीनशे ते साडेतीनशे रुपये रोजाने (बारा तास) मिळे + त्यांच्या वाहतूकीकरिता सिक्स सिटरची सोय करावी लागे. स्थानिक जत्रा, देवीचा सण असे काही निमित्त काढून सुट्या घेण्याची प्रवृत्ती यामूळे कामाचे फार नुकसान होई.

अशा परिस्थितीत मराठी उद्योजकाला देखील एक तर बाहेरचा मजूरच ठेवणे (त्याकरिता मनसेला खंडणी देऊन देखील) परवडते किंवा मग मराठी मजूर ठेवला तर स्वतःच्या उत्पादनाची किंमत वाढवणे भाग पडते ज्याचा परिणाम खप कमी होण्यात होतो.

sunil kachure's picture

17 Apr 2022 - 8:08 pm | sunil kachure

स्थलांतर करणाऱ्या लोकात हिंदी भाषिक लोकांचे बिगर हिंदी प्रदेशात प्रचंड प्रमाणात स्थलांतर झाले आहे.
ह्याची आकडेवारी बघा.

ह्या मुळ. विषयाला कलाटणी देवून स्वस्त मजूर,आपली गरज .
हे विषयाशी संबंधित नसलेले मुद्ध्ये पुढे करू नका.

अगदी काल परवा पर्यंत बिहार सारख्या राज्यात पगार सोडा फक्त मोजकेच अन्न देवून लोकांकडून काम करून घेतली जात होती.
बंदुकीच्या जोरावर.
स्थलांतरित झाल्या मुळे च त्यांची त्या मधून सुटका झाली हे पण सत्य आहे.

त्या मुळे आपल्या फायद्या साठी त्यांना इथे आणले ह्या वाक्याला काही अर्थ नाही.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 11:41 pm | चेतन सुभाष गुगळे

अगदी काल परवा पर्यंत बिहार सारख्या राज्यात पगार सोडा फक्त मोजकेच अन्न देवून लोकांकडून काम करून घेतली जात होती.
बंदुकीच्या जोरावर.

हे वीस वर्षांपूर्वी पर्यंत खरं होतं. नंतर परिस्थिती बदलली आहे.

विषयाला कलाटणी देवून स्वस्त मजूर,आपली गरज .
हे विषयाशी संबंधित नसलेले मुद्ध्ये पुढे करू नका.

त्या मुळे आपल्या फायद्या साठी त्यांना इथे आणले ह्या वाक्याला काही अर्थ नाही.

विषयाशी संबंध नाही कसा? आपण स्वतः आणलेल्या मजूरांना कशी काय भाषिक सक्ती करणार?

स्वस्त मजूर धंद्याकरिता फायद्याचे ठरतात म्हणून उद्योजक त्यांना ठेवतात ही वस्तुस्थिती आहे. सर्व एम आय डी सी भागात जाऊन खात्री करु घ्या. त्यांना ठेवू नये याकरिताच मनसेनी आंदोलने केलीत आणि नंतर एखादे स्क्रॅप उचलण्याचे कंत्राट किंवा मोठ्या रकमेच्या खंडणीवर सेटलमेंट केली. मी शिवसेना सोडली तेव्हा फक्त माणसे सोबत आली, शिवसेनेचे फंड्स मला मिळाले नाहीत. पक्ष वाढविण्याकरिता पैसा लागतो असे समर्थन देखील या तोडपाण्याबद्दल राज ठाकरेंनी केले होते. २००८-०९ मध्ये मी स्वतः हे रांजणगाव - कारेगाव या एमआयडीसीत आणि जवळच्या शिरूर - सुपे येथील उद्योग धंद्यांमध्ये पाहिलं आहे. ही खंडणी गोळा करण्याकरिता जी विशिष्ट माणसे मोठ्या प्रमाणात नेमली होती आता ती भोंगा प्रकरणापासून मनसेला सोडून जात आहेत.

श्री गुगळे यांचा मुद्दा बरोबर आहे. (मराठी मजुर मिळायला अवघड जाते, मिळाले तरी परवडत नाही. इतर कारणे त्यांनी वरती दिली आहेतच.)
-मजुरांचे वर्गीकरण महत्वाचे आहे. ते कुशल / अकुशल, तात्पुरते रहिवासी / दिर्घमुदतीचे रहिवासी इ. गोष्टी महत्वाच्या आहेत.
--
तात्पुरत्या आलेल्या मजुरांना मराठी शिकवण्यात व शिकण्यात काही रस नाही, ते दोन्हीबाजुने परवडणारे नाही.. व्यवहारीक मराठी आले तरी पुरेसे.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Apr 2022 - 12:05 am | अमरेंद्र बाहुबली

मराठी मजुर मिळायला अवघड जाते, मिळाले तरी परवडत नाही. कमी मजूरी देऊन मजूराला पिळून काढायचे नी बक्कळ नफा कमवायचा,वरून मजूर मिळत नाही म्हणून बोंबलायचे. असली कामे मराठी माणूस करत नाही कारण त्यालाईतरत्र कमी श्रमात चांगला मोबदला मिळतो. ह्या ऊलट कुत्र-डूकरांसारखी मानवी पैदास करून त्याना खाऊ घालणे जमत नाही म्हणून महाराष्ट्रात मजूरी करायला नी हिंदी लादायला पाठवायचे. आता ह्यात चुक कोणाची मराठी माणसाचीच का?

तुमचा उद्वेग समजला.


कमी मजूरी देऊन मजूराला पिळून काढायचे नी बक्कळ नफा कमवायचा

तो धंद्याचा नियम आहे आंइ भांडवलशाहीच तेच चालते.

तो धंद्याचा नियम आहे आहे. भांडवलशाहीत तेच चालते.

ह्या ऊलट कुत्र-डूकरांसारखी मानवी पैदास करून त्याना खाऊ घालणे जमत नाही म्हणून महाराष्ट्रात मजूरी करायला नी हिंदी लादायला पाठवायचे. आता ह्यात चुक कोणाची मराठी माणसाचीच का?

स्वखुशीने आलेले सोडाच. पण मराठी उद्योजक देखील जेव्हा त्यांना पैसे वाचविण्याकरिता इथे प्रयत्नपूर्वक बोलावून घेतात तेव्हा ती चूक कोणाची असते. चितळेंच्या म्हशी धुणारे बिहारी मजूर आहेत. आता काय यांना सक्ती केली होती का बिहारी मजूर नेमायची? यांनी मराठी माणसे का नेमली नाहीत?

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Apr 2022 - 12:44 am | अमरेंद्र बाहुबली

कारण त्याना बिहारात काम मिळत नाही म्हणून ईथे पडेल तिया मजूरात काम करतात.

कानडाऊ योगेशु's picture

23 Apr 2022 - 9:49 pm | कानडाऊ योगेशु

मराठी मजूर कमी पैशात काम करत नाहीत असे मलाही वाटत होते.पण काही वर्षांपूर्वी बंगळूरात असताना काही मजूरांचा एक ग्रुप टपरीवर चहा पित होता काही मराठी शब्द कानावर पडले म्हणुन लक्षपूर्वक ऐकले तर ते चक्क मराठी बोलत होते म्हणजे पोटासाठीची भटकंती महाराष्ट्रातुनही इतरत्र प्रदेशात होत होती/असावी.
हीच गोष्ट भिकार्यंची बंगळुरात आणि तिरुपतीला "तुम्ही मराठी आहात का?" असे विचारणारे एक गरीब बिचारे वाटणारे जोडपे व कधीतर सोबत एखादे मूल असा परिवार जवळ येत असत.संवादाला जर प्रत्युत्तर दिले तर काहीही कारण सांगुन पैशाची मागणी होत असे. हा अनुभव मुंबईत आला होता व एकदा फसलोही होतो.

sunil kachure's picture

23 Apr 2022 - 10:37 pm | sunil kachure

ठरवून ,हट्ट नी ,सत्य मान्य न करणे.
चुकीची अपुरी माहिती देवून सत्य काही वेगळेच आहे असे भासवन .
ह्यालाच च आडगेपणा म्हणतात.

मराठी लोक,कामगार,भिकारी दुसऱ्या राज्यात काम करायला जात नाहीत असा दावा कोणीच केला नाही.
मराठी लोक पण दुसऱ्या राज्यात जातात
मजुरी,किंवा नोकऱ्या करायला.

पण त्यांचे प्रमाण किती आहे?
ते बघा ना .
बिहारी आणि यूपी किंवा बाकी राज्यांची
लोक दुसऱ्या राज्यात किती कोटी आहेत
आणि मराठी लोक दुसऱ्या राज्यात किती आहेत जे मजुरी किंवा नोकऱ्या करायला गेले आहेत.
फक्त अगदी लाखात च संख्या असेल पूर्ण देशात.
आणि फक्त बिहार ची लोक जी दुसऱ्या राज्यात गेली आहेत त्यांची संख्या किती तरी कोटी आहे.
तुलना तरी होवू शकते का.

सुक्या's picture

12 Apr 2022 - 6:04 am | सुक्या

हिंदी चालत नसेल तर परदेशी असलेली इंग्रजी का चालते किंवा का चालावी?

परदेशी असलेली इंग्रजी चालते तर हिंदी का चालु नये?

या दोन्ही प्रश्नांची उत्तरे कुणी देईल का? दक्षिणेत हिंदी चालत नाही यामागे फुकाचा अभिमान आहे. आजवर कुठल्याही राज्यात ते महाराष्ट्र असो की गुजरात की ओरिसा. इथे लोक हिंदी बोलतात व तितक्याच त्या त्या राज्यांच्या बोलीभाषा बोलल्या जातात. कुठेही हिंदी चे आक्रमण दिसत नाही. राहीला प्रश्न शहरी भागात, जिथे अठरापगड लोक एकत्र येतात तिथे एक सामाइक भाषा असतेच. मग ती साईन लँगवेज का असेना. शहरी भाग म्हणजे खिचडी असते .. कुठेही जा.

गंम्मत अशी आहे .. की चेनै सारख्या ठिकाणी मोडकी तोडकी इंग्रजी बोलुन हसं करुन घेतात लोक. पण फुकाच्या अभिमनापायी दुसरी भाषा मात्र शिकणार नाहीत.

उपयोजक's picture

12 Apr 2022 - 8:12 am | उपयोजक

इंग्रजी का चालते किंवा का चालावी?

इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. ती ज्ञानभाषा आहे. ती शालेय अभ्यासक्रमांतून काढून टाकल्यास नुकसान आपलेच होईल. निव्वळ संपर्क साधणे ,कामचलाऊ संवाद साधणे याच्या बरेच पलिकडे इंग्रजी भाषेचे उपयोग आहेत. हिंदी ही ज्ञानभाषा नाही.ती निव्वळ संपर्कभाषा आहे. त्यापलीकडे या भाषेचा काडीचाही उपयोग नाही.त्यामुळे शालेय अभ्यासक्रमांतून हिंदी हाकलली तरी काहीही बिघडत नाही.

कुठेही हिंदी चे आक्रमण दिसत नाही.

डोळ्यावर पट्टी बांधून फिरता की काय?
मुंबईत हिंदी ही सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. महाराष्ट्रातल्या बाकीच्या मोठ्या शहरांचीही तीच अवस्था आहे.

चेनै सारख्या ठिकाणी मोडकी तोडकी इंग्रजी बोलुन हसं करुन घेतात लोक.

चेन्नैतल्या लोकांनी मोडकीतोडकी हिंदी बोलली तर चालेल का?

कॉमी's picture

12 Apr 2022 - 8:51 am | कॉमी

इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. ती ज्ञानभाषा आहे. ती शालेय अभ्यासक्रमांतून काढून टाकल्यास नुकसान आपलेच होईल.

हा विचार कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा नसावा. अमित शहांचे सुद्धा असे मत शंभर टक्के नसणार.

ज्ञानभाषा म्हणजे काय असते ? हिंदी ज्ञानभाषा का नाही ?
भाषेचा उपयोग संवाद साधणे हा असतो. तो हिंदीचा सुद्धा आहे.

हिंदी भाषिक लोकांनी मुंबईत येऊन राहणे म्हणजे आक्रमण समजायचे का- मग दाक्षिणात्य शहरांमध्ये- उदा चेन्नई बेंगलोर हैदराबाद- इथे मराठी लोकं नोकऱ्या करतात, ते ही आक्रमण म्हणायचे का ? (कारण दाक्षिणात्य भाषा तिथल्या मराठी लोकांनी शिकून घ्याव्यात असे कधीही कुठून ऐकायला वाचायला मिळत नाही.)

उपयोजक's picture

12 Apr 2022 - 9:52 pm | उपयोजक

ज्ञानभाषा म्हणजे काय असते

वैज्ञानिक चर्चा नेमक्या संज्ञा वापरुन करता यावी इतक्या ताकदीची भाषा म्हणजे ज्ञानभाषा. आज तांत्रिक तसेच वैद्यकिय क्षेत्रातले सर्वात कठीण अभ्यासक्रम हे इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सर्वाधिक शोधनिबंध हे इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होतात. इंग्रजीचा एकूण शब्दसाठा हा ५ लाखांपेक्षा जास्त आहे.
इंग्रजी खालोखाल जर्मन तसेच जपानी , कोरियन यांना ज्ञानभाषा म्हणता येईल. कारण या भाषांमधे उच्च तांत्रिक शिक्षण उपलब्ध तर आहेच पण त्या देशातली बहुसंख्य जनता त्या भाषांमधून स्वखुशीने तांत्रिक अभ्यासक्रम शिकायला तयार असते.

हे सगळं हिंदी भाषेबाबत होतं का? आहे का ताकद तितकी हिंदी भाषेची.

आता हिंदीची ताकद किती आहे ते एका सोप्या उदाहरणावरुन स्पष्ट करतो.
तुम्ही महाराष्ट्रात सरकारी बँकेचं नाव तीन भाषांमधे फलकावर पाहिलं असेल. ते State bank of India स्टेट बैंक ऑफ इंडिया आणि मराठीत स्टेट बँक ऑफ इंडिया असे लिहिलेले आढळेल. अता हिंदीत बैंक का? आणि मराठीत बँक असं का? तर हिंदीच्या खड़ी बोलीत ै चा उच्चार ॅ असा होतो. पण गंमत अशी की याच हिंदीच्या अवधि ,मैथिली या भाषांमधे मात्र ै याचा उच्चार ऐ असाच आहे. आठवा अनुप जलोटांचं भजन मैय्या मोरि मैं नहीं माखन खायो यात तुम्हाला मॅया असा उच्चार ऐकू येणार नाही.
थोडक्यात प्राथमिक गोष्टींमधेच हिंदीत एकवाक्यता नाही.अशी ही निव्वळ संवादापुरती असलेली , पाच गावचा पाचुंदा गोळा करुन 'बनवलेली' भाषा ज्ञानभाषा होईलच कशी?

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2022 - 9:58 pm | श्रीगुरुजी

हिंदी ही अविकसित बिमारू राज्यांची भाषा आहे. मराठी माणसे या बिमारू भाषेत बोलताना दिसली की लाज वाटते व संतापही येतो.

स्पष्टीकरणासाठी धन्यवाद.

तर्कवादी's picture

13 Apr 2022 - 2:05 pm | तर्कवादी

हिंदीमध्ये तसेही अनेक इंग्लिश शब्द वापाले जातात. मराठीप्रमाणे हिंदीत शुद्ध भाषेचा आग्रह फारसा नाही. सुशिक्षित वर्गात बोलताना जरी मराठीत इंग्लिशची भेसळ वाढली असली तरी चांगल्या दर्जाची मराठी वृत्तपत्रे , पुस्तके , काही चांगले मराठी चित्रपट व मालिका (अलिकडे मी टीव्ही चॅनेलवरील मालिका बघत नाही पण पुर्वी बघितलेल्या काही मालिका आठवतात) यामध्ये मराठी बहुतांशी शुद्ध असते. पण हिंदीत तसे नाही. हिंदी वृत्तपत्रे चुकून हाता आली तरी हातात धरवत नाहीत.. त्यातली भाषा वाचून फारसा आनंद मिळतच नाही.

हिंदीतले चित्रपटही कथा, अभिनय, तंत्रज्ञान ई मुळे बघायला आवडत असले तरी त्यातून मधूर संवादांचा , भाषेतील सौंदर्याचा आनंद अभावानेच मिळतो (फक्त चटपटीत संवादांची मात्र रेलचेल असते ) . त्याऐवजी मी असे अनेक मराठी चित्रपट सुचवू शकतो जे मला संवादांत असलेले भाषेचे नादमाधुर्य , भाषेतील अलंकारांचा उत्कृष्ट प्रयोग , भावना नेमकेपणाने व्यक्त करणारे शब्द याकरिता खूप आवडलेत...(या चित्रपटांना "मै जो कहता हू वो मै करता हू " किंवा "मैने एक बार कमिट कर दी...." छाप चटपटीत संवादांची गरज नसते )

हिंदीतली भेसळ अफाट आहे - इंग्लिश आणि उर्दु /फारसी (आणि माहित नाही अजून कोणकोणत्या भाषा असतील यात असो !!) - तजुर्बा , मद्दे नजंर , बाईज्जत बरी , इत्तेदा , इन्तेहा, बावजूद , दर्खास्त , हैसियत आणि काय काय .. असली प्रचंड भेसळ असलेली हिंदी फक्त कामचलाऊ भाषा वाटते.. मग अशी प्रचंड भेसळ असलेली भाषा दक्षिणी लोकांना शिकाविशी वाटली नाही तर त्यात काय नवल ? मला कोणतीही दक्षिणी भाषा येत नाही पण तरी माझा अंदाज आहे की त्या भाषांत भेसळ ही खूप कमी असावी ... त्या लोकांनी आपली भाषा भेसळीपासून जपली असावी.

मराठीत जसे सावरकरांनी भाषाशुद्धीकरणाचा भाग म्हणून अनेक सुलभ , कर्णमधूर असे नवीन मराठी शब्द या भाषेला दिलेत तसे काही प्रयत्न हिंदीत फारसे झाले असावेत असे दिसत नाही
खरं तर हिंदी भाषिकांनी हिंदीची उपेक्षा केली आणि अशी भेसळीची भाषा दुसर्‍यांवर लादू पाहत आहेत..

उदाहरणादाखल नवभारत टाईम्स या नावाजलेल्या वृत्तपत्रातील एका बातमीतला काही भाग खाली डकवत आहे

कर्नाटक में मंगलवार को संतोष पाटिल नाम के एक ठेकेदार ने आत्महत्या कर ली। बीजेपी का समर्थन करने वाले संतोष ने अपने सूइसाइड नोट में लिखा कि राज्य के ग्रामीण विकास और पंचायत राज मंत्री केएस ईश्वरप्पा के कारण वह आत्महत्या कर रहा है। उसने यह भी आरोप लगाया कि उससे 40 पर्संट कमिशन मांगा जा रहा है इसलिए वह परेशान है। संतोष की मौत के बाद कर्नाटक की राजनीति गरमा गई है। केएस ईश्वरप्पा विवादों में आ गए हैं। विपक्ष ईश्वरप्पा का मंत्रिमंडल से बर्खास्त करने की मांग कर रहा है। फिलहाल उडुपी पुलिस ने ईश्वरप्पा के खिलाफ एफआईआर दर्ज कर ली है।
ईश्वरप्पा ने इस मामले में सफा दी है कि 'मैं नहीं जानता कि संतोष पाटिल कौन हैं। मैंने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई से घटना की जांच करने को कहा है।' यह पहली बार नहीं है जब ईश्वरप्पा विवादों में आए हैं। वह कर्नाटक के ऐसे बीजेपी नेता हैं जो आएदिन अपने विवादित बयानों को लेकर सुर्खियों में बने रहते हैं। ईश्वरप्पा ही वह नेता हैं जिन्होंने येदियुरप्पा को मुख्यमंत्री पद से हटाने की अगुवाई की थी। हालांकि इस बार ईश्वरप्पा वह फंसते नजर आ रहे हैं

चौथा कोनाडा's picture

13 Apr 2022 - 5:29 pm | चौथा कोनाडा

असली प्रचंड भेसळ असलेली हिंदी फक्त कामचलाऊ भाषा वाटते..

याचा अर्थ तिची अर्थात संपर्क भाषा म्हणजेच युनिव्हर्सल भाषा होण्याकडे वाटचाल चालू आहे ! म्हणजेच इंग्रजी प्रमाणे.
(सध्या काही प्रमाणात आहेच)

मराठीत जसे सावरकरांनी भाषाशुद्धीकरणाचा भाग म्हणून अनेक सुलभ , कर्णमधूर असे नवीन मराठी शब्द या भाषेला दिलेत तसे काही प्रयत्न हिंदीत फारसे झाले असावेत असे दिसत नाही

सध्याच्या वेगवान आयटी काळात भाषाशुद्धीकरणाची संकल्पना कालबाह्य झाली की काय असे वाटते.

खरं तर हिंदी भाषिकांनी हिंदीची उपेक्षा केली

असं काही झालं नाही, इतर भाषिकांनी हिंदी आपलीशी करताना त्यांच्या भाषेतील शब्द देखिल मिसळले.

उदा. मराठीमुळे "वाट लगाना" हा वाक्प्रचार रुढ झाला !

... आणि अशी भेसळीची भाषा दुसर्‍यांवर लादू पाहत आहेत..

हिंदी देशपातळीवर संपर्क भाषा व्हावी या साठी गेल्या काही दशकांपासून प्रयत्न सुरु आहेत, सध्याचे केंद्र शासन "वन अमुक, वन तमुक" च्या अंतर्गत "एक देश, एक भाषा" लागू करू पहात आहे !

उपयोजक's picture

13 Apr 2022 - 5:39 pm | उपयोजक

याचा अर्थ तिची अर्थात संपर्क भाषा म्हणजेच युनिव्हर्सल भाषा होण्याकडे वाटचाल चालू आहे ! म्हणजेच इंग्रजी प्रमाणे.

हिंदीची तुलना इंग्रजीसारख्या सुंदर भाषेशी करणे हास्यास्पद आहे.

सध्याच्या वेगवान आयटी काळात भाषाशुद्धीकरणाची संकल्पना कालबाह्य झाली की काय असे वाटते.

आयटीचा काळ आला असेल तर इंग्रजीच बरी.मागास हिंदी कशाला?

श्रीगुरुजी's picture

13 Apr 2022 - 6:24 pm | श्रीगुरुजी

याचा अर्थ तिची अर्थात संपर्क भाषा म्हणजेच युनिव्हर्सल भाषा होण्याकडे वाटचाल चालू आहे ! म्हणजेच इंग्रजी प्रमाणे.

पूर्वी फक्त दक्षिणेत व काही प्रमाणात बंगालमध्ये हिंदीला विरोध होता. आता महाराष्ट्रात सुद्धा हिंदीविरोध वाढत आहे. अनेक पूर्वोत्तर राज्यांनी अमित शहांच्या हिंदी वापरण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. अनेक मराठी वाहिन्यांवर बऱ्याच उत्पादनांच्या जाहिराती आता मराठीत भाषांतर करून दाखवितात ज्या पूर्वी बहुतांशी हिंदीत असायच्या. Google, Facebook, WhatsApp अशी समाजमाध्यमे व Tata Sky, Amazon सारख्या कंपन्यांनी मराठी भाषेचा पर्याय दिला आहे.

एकंदरीत हिंदी, इंग्लिश प्रमाणे, संपर्कभाषा होण्याची शक्यता दिसत नाही. अजून काही दशकांनी स्थानिक भाषा व इंग्लिश या दोनच संपर्कभाषा असतील.

तर्कवादी's picture

13 Apr 2022 - 7:42 pm | तर्कवादी

सध्याच्या वेगवान आयटी काळात भाषाशुद्धीकरणाची संकल्पना कालबाह्य झाली की काय असे वाटते.

मराठीत डेटा साठी 'विदा' हा प्रतिशब्द अलिकडच्या काळातच शोधला गेला असावा बहुधा.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 4:25 pm | चेतन सुभाष गुगळे

खरं तर हिंदी भाषिकांनी हिंदीची उपेक्षा केली आणि अशी भेसळीची भाषा दुसर्‍यांवर लादू पाहत आहेत..

मराठीत काही वर्षांपूर्वी काहे दिया परदेस नावाची मालिका प्रसारित व्हायची. मुंबईतली एक मराठी मुलगी हिंदीभाषिक मुलाच्या प्रेमात पडते. आधी तो तिच्याशी / तिच्या कुटुंबियांशी संवाद साधतो तेव्हढेच संवाद हिंदीत होते आणि बाकी मराठी. मग पुढे त्या दोघांचं लग्न आणि नंतर ती मुलगी सासरी वाराणसीला जाते आणि त्यानंतर अख्खी मालिकाच हिंदी बनून गेली होती. मराठी वाहिनीवर हिंदी नावाची आणि जवळपास सर्वच संवाद हिंदीत असलेली आणि वाराणसी शहरात घडणार्‍या घटना दाखविणारी मालिका काही मराठी भाषा प्रेमी (व आग्रही देखील) मोठ्या कौतुकाने पाहत असत.

त्याच्याही अनेक वर्षे पूर्वी विक्रम गोखले यांनी मराठीत मुंबई दूरदर्शन वर डरनेका नही असे शीर्षक असलेली आणि अतिशय गचाळ बंबैय्या हिंदीत संवाद असलेली मराठी मालिका केली होती.

या अशा कलाकृतीच्या निर्मात्यांनी केलेल्या चूकांचा दोष भाषेकडे कसा काय जातो?

चेतन सुभाष गुगळे's picture

12 Apr 2022 - 3:01 pm | चेतन सुभाष गुगळे

इंग्रजी सारखी भारतातल्या एक टक्काही लोकांना परिणामकारकरीत्या न बोलता येणारी किंवा न समजणारी भाषा ही राष्ट्रभाषा आहे का? इंग्रजी न बोलता येणं / न समजणं हा न्यूनगंड का ठरतोय? हिंदी ला उत्तर भारतीय लोकांची प्रादेशिक भाषा समजून तिला राष्ट्रभाषा होऊ न देण्याचा अट्टाहास तर्कहीन आहे. खरे तर उत्तर भारतीय राज्यातील लोकांची प्रादेशिक भाषा हिंदी ही नाहीच. ते लोक इतर राज्यांतील लोकांना समजणे सोयीचे जावे म्हणून त्यांच्या सोबत हिंदीत बोलतात पण आपसांत ते मैथिली, भोजपुरी, मघई, बज्जिका, अग्निका, इत्यादी भाषेत बोलतात. त्यामुळे हिंदी त्यांची अंतर्राज्यीय भाषा नसून इतर राज्यांतील लोकांशी संवाद साधणारी आंतर-राज्यीय भाषा आहे. हिंदी चित्रपट देखील मुंबई व महाराष्ट्र भागात जितका पाहिला जातो तितका उत्तर प्रदेश वा बिहार येथे पाहिला जात नाही. त्यापेक्षा ते भोजपुरी चित्रपट मोठ्या संख्येने पाहतात.

पूर्वी फक्त दक्षिणेकडील राज्ये हिंदी विरोध करीत असत. आता त्यांच्या जोडीला महाराष्ट्र देखील हिंदी विरोध अगदी सरसावून करीत आहे. या विरोधामुळेच मग इंग्रजी हीच दोन राज्यांमधली संवाद साधण्याची भाषा ठरत आहे. परक्या भाषेसोबत मग संस्कृतीदेखील परकीयच होत जाते. एखादे उदाहरण द्यायचे तरी शेक्सपियरचे नाटक किंवा गॉडफादर सिनेमाचा संदर्भ दिला जातो. वि. वा. शिरवाडकरांच्या साहित्यातला किंवा राजश्री चित्रसंस्थेतील एखाद्या उत्तम दर्जाच्या (क्लासिक म्हणावं का? जास्त भारदस्त वाटेल) चित्रपटातील संवादाचा दाखला देणारा गावरान समजला जातो. त्याला देसी म्हणून हिणवले जाते.

सौंदाळा's picture

12 Apr 2022 - 3:48 pm | सौंदाळा

+१
गुगळे यांच्याशी पूर्ण सहमत आहे

चेतन सुभाष गुगळे's picture

12 Apr 2022 - 4:36 pm | चेतन सुभाष गुगळे

मराठीचं नाव घेत हिंदी विरोध करणार्‍यांना देखील शेवटी हनुमान चालिसाचाच आधार घ्यावा लागला, मारुती स्तोत्राचा नाही यातच काय ते आलं.

सौंदाळा's picture

12 Apr 2022 - 5:13 pm | सौंदाळा

हा हा हा
बरोब्बर. रच्याकने ते वसंत मोरेंचे नाराजी नाट्य परत राज ठाकरेंची भेट आणि प्रकरणावर पडदा वगैरे पण आधीच ठरवून केल्यासारखे वाटत होते.
आज ठाण्यात काय करणार आहेत बघू.

चौथा कोनाडा's picture

12 Apr 2022 - 5:34 pm | चौथा कोनाडा

परत रामदास स्वामींचा विषय निघणार, मग गुरु होते की नाही हा विषय चर्चला जाणार ...
त्या पेक्षा नकोच मराठी स्त्रोत्र, हनुमान चालीसा बरी, हिंदी भाषिक मतदार ही सोबत येणार....

उपयोजक's picture

12 Apr 2022 - 9:58 pm | उपयोजक

हिंदी ला उत्तर भारतीय लोकांची प्रादेशिक भाषा समजून तिला राष्ट्रभाषा होऊ न देण्याचा अट्टाहास तर्कहीन आहे.

हिंदी ही सगळ्या भारताची भाषा आहे का? नसेल तर मग काही राज्यांमधे बोलली जाणारी भाषा सगळ्या देशावर लादण्याचं कारण काय?

तसं पाहिलं तर देशाला जोडणारी एकच भारतीय भाषा आहे 'संस्कृत'

चौथा कोनाडा's picture

13 Apr 2022 - 12:22 pm | चौथा कोनाडा

संस्कृत काही उपयोगाची भाषा नाही असे रानरेडा यांच्या पुढील प्रतिसादावरून दिसते.

http://misalpav.com/comment/1137842#comment-1137842

संस्कृत ही संपर्कभाषा करायची असे ठरावले तरी ते व्यवहारात आणायला २००-४०० वर्षे लागतील !

कॉमी's picture

13 Apr 2022 - 1:07 pm | कॉमी

ते कसे ? भारतभर संस्कृत बोलली/लिहिली जायची का ? याबद्दल काही वाचनास असेल तर नक्की सांगावे.

चौथा कोनाडा's picture

12 Apr 2022 - 5:32 pm | चौथा कोनाडा

हिंदी चालत नसेल तर परदेशी असलेली इंग्रजी का चालते किंवा का चालावी?

परदेशी असलेली इंग्रजी चालते तर हिंदी का चालु नये?

या दोन्ही प्रश्नांचं उत्तर कधीच मिळणार नाही.
कारण ... हा उत्तर वि, दक्षिण असा वर्चस्वाचा मुद्दा आहे.

पण मी म्हणतो तुम्ही सगळे आताच का बरे जागृत झालात नाही म्हणजेइथे जे बोलत आहेत त्यांना शाळेत १० वी पर्यत शिकताना एकतर पूर्ण हिंदी किंव ५०:५० मार्कांचे हिंदी संस्कृत हे विषय घेऊनच १० वी उत्तीर्ण झाले असणार.
तेव्हा कोणालाच अगदी तुमच्या पालकांना सुद्धा मंडळला किंवा शाळेत जाऊन आम्हांला हिंदी ऐवजी तामिळ, तेलगू, असामी, बंगाली, गुजरात, वगैरे इतर आपल्या आवडीच्या भाषेची निवड करू द्या असं सांगायला हवं होतं.
नाही पक्षी असं म्हणू की तुम्ही बाल वयात होतात व तुमचे पालक जागरूक नव्हते.
पण मग आत्ता तुम्ही सर्व तुमच्या पाल्यासाठी असा आवाज उठवू शकताच की.
मग करा सुरुवात इथे गळे काढून काय होणारंय.
आणि
आता सुरुवात केलीत तरच तुमची पुढची पिढी आणि नातवंड मराठीत आणि एक दुसरी प्रादेशिक ऐच्छिक
अशी बोलणारी असेल.

सुक्या's picture

12 Apr 2022 - 7:08 am | सुक्या

आहेत .. असे खुप लोक आहेत. जी मराठी लोक हैद्राबाद / बेण्गलोर अशा ठिकाणी कामानिमित्त आहेत त्यांची मुले सर्रास मराठी / तेलुगु किंवा मराठी / प्रांतीय भाषा बोलतात .. अगदी लिहितात ही. माझ्या बरोबर अशे कित्येक मित्र आहेत जे मराठी / मारवाडी आहेत पण दुसर्‍या प्रांतात राहिल्यामुळे तिथली भाषा अगदी सुंदर बोलतात ...

माझा अजुन एक मित्र आहे .. बंगाली (घोष) आहे. लग्न मराठी मुलीशी केलं. आता तो आणी मुलं मस्त बंगाली / मराठी बोलतात ..

खरं सांगु का .. ज्या लोकांना काही प्रोब्लेम नसतो ते सुखाने राहतात .. ज्या लोकांचे पोट अशा फुकाच्या वादावर चालते त्यांना कुठेही प्रोब्लेम च दिसतो ..

उपयोजक's picture

12 Apr 2022 - 8:16 am | उपयोजक

ज्या लोकांना काही प्रोब्लेम नसतो ते सुखाने राहतात .. ज्या लोकांचे पोट अशा फुकाच्या वादावर चालते त्यांना कुठेही प्रोब्लेम च दिसतो.

ज्या लोकांना पाठीचा कणा नसतो त्यांनाच स्वभाषाभिमानही नसतो. हपापल्यागत फक्त पैसा मिळवण्याचाच उद्देश असेल तर भाषा वगैरे गोष्टी निरर्थक वाटू लागतात.

सर टोबी's picture

12 Apr 2022 - 10:50 pm | सर टोबी

प्रामाणिकपणे हे वेगवेगळे अभिमान समजून घ्यायला आवडेल. म्हणजे हे असेल अभिमान नसल्यावर काय नुकसान होतं आणि असल्यावर काय फायदा होतो असे माहिती झालं तर बरे.

आज इतक्या वर्षात अखिल भारतीय मारवाडी संमेलन भरलेलं पाहिलं नाही. पण त्यामुळे काही नुकसान झाल्याचं ऐकिवात नाही. बहुतेकांचा घरचा व्यवसाय असतो. त्यामुळे भविष्याची चिंता न करता मुलं अगदी समरसून शिकतात आणि उत्तम यश मिळवितात. बऱ्याच मारवाडी लोकांची भाषा प्रादेशिक भाषेशी सरमिसळ झाल्यामुळे इतकी धेडगुजरी झाली आहे परंतु तिचे प्रमाणीकरण वगैरे करण्याच्या फंदात कोणी पडत नाही. तरी त्यांचं उत्तम चाललं आहे.

माझा प्रश्न प्रामाणिक आहे. कुणाला डिवचन्याचा उद्देश नाही.

उपयोजक's picture

12 Apr 2022 - 11:28 pm | उपयोजक

प्रामाणिकपणे हे वेगवेगळे अभिमान समजून घ्यायला आवडेल. म्हणजे हे असेल अभिमान नसल्यावर काय नुकसान होतं आणि असल्यावर काय फायदा होतो असे माहिती झालं तर बरे.

भाषा हा सांस्कृतिक ठेवा आहे. तिच्यात फायदा का बघावा? माणूस सगळ्या गोष्टी आर्थिक फायद्यासाठीच करत असतो का?

हा जास्त करून भाषणांचा फड जिंकून हृदयसम्राट आणि विश्वगुरू होणाऱ्या मंडळींचा बनाव आहे. आपल्या भावना कशामुळेदेखील उचंबळून येतात हेच आपले मोठे दुर्दैव आहे. मला आपले उगीचच वाटले की हे अभिमान खरेच कुठे तरी उपयोगी पडतात म्हणून.

कर्नलतपस्वी's picture

13 Apr 2022 - 10:23 am | कर्नलतपस्वी

+1
जग घुमीय्या थारे जैसा दुजा न कोई ,आसे कुठलतरी गाणे आहे वाटते.

कॉमी's picture

12 Apr 2022 - 8:53 am | कॉमी

खरं सांगु का .. ज्या लोकांना काही प्रोब्लेम नसतो ते सुखाने राहतात ..

+१

उपयोजक's picture

12 Apr 2022 - 8:13 am | उपयोजक

पण मग आत्ता तुम्ही सर्व तुमच्या पाल्यासाठी असा आवाज उठवू शकताच की.
मग करा सुरुवात इथे गळे काढून काय होणारंय.
आणि
आता सुरुवात केलीत तरच तुमची पुढची पिढी आणि नातवंड मराठीत आणि एक दुसरी प्रादेशिक ऐच्छिक
अशी बोलणारी असेल.

सहमत आहे.

रानरेडा's picture

12 Apr 2022 - 7:16 pm | रानरेडा

गेली ३५ एका वर्षे तरी १०० मार्कांचे संस्कृत मराठी माध्यमातील मुलांना आठवीपासून घेता येते आणि हिंदी सोडता येते, मी आणि अनेकानी केले होते - मी ८९ च्या बॅच ला होतो = हे आपणास माहित नाही काय ?

अर्थात संस्कृत इतके बकवास , अर्थशून्य आणि निरुपयोगी मी काही शिकले नसेल. दहावीला ९० मार्क मिळण्यापलीकडे त्याचा काहीही उपयोग झाला नाही . तसे आठवीनंतर मराठी शिकून हि काही फायदा झाला नाही पण संस्कृत म्हणजे पूर्ण अडगळ

असो आता CBSE ला फ्रेंच / जर्मन असेल तर मराठी आणि हिंदी दोन्ही सोडता येते !

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2022 - 8:03 pm | श्रीगुरुजी

याचा अर्थ ७ वी पर्यंत हिंदी शिकावे लागले का?

एकही वर्ष हिंदी नाही असा एखादा अभ्यासक्रम महाराष्ट्रात आहे का?

सुरसंगम's picture

12 Apr 2022 - 10:59 am | सुरसंगम

मुळात
भाषा ही माणसाचं जीवन सहज, सुलभ आणि सजग करण्याचे साधन आहे. जीवन असह्य करून मिळवणारे साध्य नाही.
ज्याला जी भाषा लहानपणी बोबड्या बोलाने शिकवली गेली ती त्या त्या व्यक्तीची सहज येणारी बोली भाषा ठरली.
आज जे सर्व मीपबाहेरील सुद्धा मराठी भाषा आणि लिपी सुद्धा जपली पाहिजे बोलणारे कितीजण धनादेश मराठीत लिहतात बरं?
आणि जरी लिहला तरी सही रोमन लिपीत न लिहणारे टक्के किती?

कर्नलतपस्वी's picture

12 Apr 2022 - 11:31 am | कर्नलतपस्वी

भाषा हे संवाद साधण्याचे साधन.
दोन परप्रांतीय एकत्र आले आणी आपापल्या भाषेत बोलू लागले तर संवाद साधणे कठीण होते.म्हणून दोघांना येणारी आशा भाषेचा वापर केला जातो. त्यात काहीच चूक नाही.
मद्रास रेजिमेंट मधे इतर भाषीय आधीकारी सुद्धा अस्खलित तामीळ भाषा बोलतो.

त्यामुळेच जसा देश तसा वेश या न्यायाने स्थानिक भाषा शिकणे केंव्हाही चांगलेच.

जीतक्या जास्त भाषा येतील तीतके त्या त्या स्थानिक समाजात समरस होणे सोपे आसते.
भाषावार प्रांतरचना आहे हा वाद नेहमीच राहाणार.
तुम्ही माझ्या मातृभाषेचा सन्मान करा मी तुमच्या मातृभाषेचा सन्मान करेन.
मातृभाषेचा अभिमान हवाच पण दुसर्‍या भाषेबद्दल द्वेष नसावा.
बाकी ज्ञान भाषा शिकणे न शिकणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
दोन दक्षिण भारतीय एकत्र आले तर बहुतांशी आपलीच भाषा बोलतात आसे माझे निरीक्षण आहे.पण मराठी माणूस परप्रांतीय बरोबर त्याच्या भाषेत बोलतो हा त्याचा गुण आहे याचा अर्थ त्याला मराठीचा अभिमान नाही आसे मानायला कुठलाही आधार नाही.
कित्येक परप्रांतीय जे मराठी मुलखात आहेत ते सुंदर मराठी बोलतात हे पण बघीतले आहे.

बाकी राजकारण तर घालूच आहे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

13 Apr 2022 - 12:05 am | ॲबसेंट माइंडेड ...

सहमत.

कर्नलतपस्वी's picture

12 Apr 2022 - 11:34 am | कर्नलतपस्वी

भाषा हे संवाद साधण्याचे साधन.
दोन परप्रांतीय एकत्र आले आणी आपापल्या भाषेत बोलू लागले तर संवाद साधणे कठीण होते.म्हणून दोघांना येणारी आशा भाषेचा वापर केला जातो. त्यात काहीच चूक नाही.
मद्रास रेजिमेंट मधे इतर भाषीय आधीकारी सुद्धा अस्खलित तामीळ भाषा बोलतो.

त्यामुळेच जसा देश तसा वेश या न्यायाने स्थानिक भाषा शिकणे केंव्हाही चांगलेच.

जीतक्या जास्त भाषा येतील तीतके त्या त्या स्थानिक समाजात समरस होणे सोपे आसते.
भाषावार प्रांतरचना आहे हा वाद नेहमीच राहाणार.
तुम्ही माझ्या मातृभाषेचा सन्मान करा मी तुमच्या मातृभाषेचा सन्मान करेन.
मातृभाषेचा अभिमान हवाच पण दुसर्‍या भाषेबद्दल द्वेष नसावा.
बाकी ज्ञान भाषा शिकणे न शिकणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
दोन दक्षिण भारतीय एकत्र आले तर बहुतांशी आपलीच भाषा बोलतात आसे माझे निरीक्षण आहे.पण मराठी माणूस परप्रांतीय बरोबर त्याच्या भाषेत बोलतो हा त्याचा गुण आहे याचा अर्थ त्याला मराठीचा अभिमान नाही आसे मानायला कुठलाही आधार नाही.
कित्येक परप्रांतीय जे मराठी मुलखात आहेत ते सुंदर मराठी बोलतात हे पण बघीतले आहे.
हनुमान चालीसा का भीमरूपी महारूद्रा,
बाकी राजकारण तर चालूच आहे.

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2022 - 5:40 pm | श्रीगुरुजी

इंग्लिश ज्ञानभाषा असल्याने शिकलीच पाहिजे. मराठी मातृभाषा व राज्याची भाषा असल्याने शिकलीच पाहिजे. हिंदी किंवा इतर भाषा ज्यांना शिकारच्यात त्यांनी शिकाव्या, ज्यांना शिकायच्या नाहीत त्यांच्यावर शिकण्याची सक्ती अजिबात नको. जनगणनेत मी फक्त मराठी, इंग्लिश व संस्कृत या तीनच भाषा येतात असे सांगणार आहे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

13 Apr 2022 - 12:16 am | ॲबसेंट माइंडेड ...

मी मराठी आणि हिंदी येते असे लिहिणार. ज्याचे पोट इंग्रजी किंवा संस्कृतवर भरते त्याने तसे लिहावे. माझे पोट मराठी आणि हिंदीवर भरते.

सुबोध खरे's picture

12 Apr 2022 - 8:23 pm | सुबोध खरे

चेन्नई मध्ये मारवाडी ( सुवर्ण व्यावसायिक )आणि बोहरी ( मुस्लिम) ज्यांची हार्ड वेअर ची दुकाने आहेत ते अस्खलित तामिळ बोलताना मी पाहिलेले आहेत.
याचे कारण तेथील लोकान हिंदि येत नाही/ आले तरी ते बोलत नाहीत.

याउलट आपण मराठी माणसे आपसात बोलताना सुद्धा मराठीत बोलत नाही. ए एफ एम सी मध्ये माझ्या वर्गात ११ मराठी होते. त्यापैकी २ जण आपसात सुद्धा मराठी अजिबात बोलत नाहीत. जर इतर लोक अमराठी असतील तर तुम्ही सर्वाना समजावे म्हणून हिंदीत बोलता हे समजू शकतो.

माझ्या कडे येणारे अनेक गुजराती कच्छी रुग्ण माझ्याशी छान मराठीत बोलतात. (काही उच्चार चुकीचे असतील.)

याउलट शिंदे आणि भोसले यासारखी आडनावे असणारी माणसे आपल्या ४-५ वर्षाच्या मुलांशी हिंदीत बोलताना दिसतात तेंव्हा मात्र संताप येतो. आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या मुलांना मराठी अजिबात येत नाही आणि दुर्दैवाने या गोष्टीची लाज वाटण्या ऐवजी त्यांना त्याचा अभिमान वाटतो.

लष्करात असताना आम्ही आमच्या मुलांशी कटाक्षाने मराठीत बोलत असू. त्यामुळे आमची मुले इंग्रजी माध्यमात असूनही आपसात किंवा मराठी मित्रांशी व्यवस्थित माहित बोलतात. माझ्या मुलीने पंजाबी मुलाशी प्रेम विवाह केला आहे पण तो समोर असला तरी आम्ही मराठीतच बोलतो आणि आता त्याला मराठी बऱ्यापैकी समजू लागले आहे.

माझ्या मुलीला मी पंजाबी शिकून घे म्हणून मागे लागलो होतो पंरतु माझ्या जावयाला किंवा व्याह्याला पंजाबी लिहिता वाचता आणि बोलता ही येत नाही. केवळ समजते (तीन पिढ्यापासून लष्करात असल्याचा परिणाम) त्यामुळे मुलीला पंजाबी शिकणे दुरापास्त झाले आहे.

मला गुजराती समजते वाचता येते पण सराव नसल्याने बोलता येत नाही (याची खंत आहे).

आणि मी मराठी हिंदी आणि इंग्रजी जवळ जवळ ९५ % (कदाचित जास्त) शुद्ध बोलतो आणि अर्धवट हिंदी/ इंग्रजी बोलण्यापेक्षा शुद्ध हिंदी शुद्ध इंग्रजी किंवा शुद्ध मराठी बोलण्याबद्दल माझा कटाक्ष असतो.

एवं प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान जरूर बाळगावा परंतु दुसऱ्या भाषेचा दु:स्वास करण्याची आवश्यकता नाही.

मुक्त विहारि's picture

12 Apr 2022 - 8:40 pm | मुक्त विहारि

प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान जरूर बाळगावा परंतु दुसऱ्या भाषेचा दु:स्वास करण्याची आवश्यकता नाही.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

12 Apr 2022 - 10:47 pm | ॲबसेंट माइंडेड ...

तुम्हाला हिंदी भाषेचाा एवढा द्वेष का आहे हे समजेल का?

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2022 - 11:05 pm | श्रीगुरुजी

शाळेपासून सरकारी कार्यालयापर्यंत सर्वत्र हिंदी सक्तीने लादली जात असल्याने, हिदीसमोर माझ्या मातृभाषेला दुय्यम स्थान देण्याचे प्रयत्न सुरू असल्याने व हिंदीभाषिकांच्या मगरूरी आणि आडमुठेपणामुळे या भाषेविषयी चीड निर्माण होत आहे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

12 Apr 2022 - 11:53 pm | ॲबसेंट माइंडेड ...

मग तुम्ही तुमच्या मुला मुलींना मराठी शाळेत घातलत की कॅान्व्हेंट मधे की पुर्ण किंवा सेमी इंग्रजी माध्यमात?

श्रीगुरुजी's picture

13 Apr 2022 - 6:27 am | श्रीगुरुजी

मराठी शाळेत

सौन्दर्य's picture

12 Apr 2022 - 11:17 pm | सौन्दर्य

प्रत्येक भाषेचा अभिमान, सन्मान, आदर असावाच. कोणतीही भाषा हीन नाही, प्रत्येक भाषेतून ज्ञान मिळतेच.

दुसऱ्याची भाषा शिकण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे गरज. जर आपण पर प्रांतात गेलो असू आणि तेथे संवाद साधणे आपल्याला गरजेचे वाटत असेल तर ती भाषा आपण शिकतो किंवा शिकण्याचा प्रयत्न तरी करतो.

नोकरी निमित्ते गुजरातच्या खेडोपाडी फिरण्याचा संबंध आला आणि नाईलाजाने गुजराती शिकावीच लागली. त्यात गैर अथवा कमीपणा वगैरे काहीच नाही, उलट मातृभाषे व्यतिरिक्त अजून एक भाषा शिकायला मिळाली ह्याचा आनंदचं आहे.

अमेरिकेत आपले भारतीय आपली मूळ नावे बाजूला ठेवून अमेरिकन नावे अंगिकारतात. संदीपचे सँडी, राजीवचे रॉजर, सलीमच्या सॅम वगैरे, का ? तर म्हणे त्यांना आपली नावे उच्चारता येत नाहीत. मला हे पटत नाही. आपले नाव उच्चारायची जास्त गरज कोणाला आहे ह्यावरून मूळ नाव ठेवायचे का बदलायचे हे ठरत असावे. मी ज्या कंपनीत काम करत होतो तेथे अनेक मार्केटिंग कॉल्स यायचे व त्यांना आमची जास्त गरज असायची. ते माझे 'सौंदर्य' नाव खूपसे बरोबर उच्चरायचे. तेच जर मला त्यांची गरज असती तर त्यांच्या सोयीसाठी मला देखील माझे नाव 'सँडी' वगैरे करावे लागले असते.

अजून एक अनुभव - २०१५ला भारतात आलॊ होतो त्यावेळी एका नातेवाईकाचा सेल फोन टेम्पररी वापरात होतो. नक्की कोणती फोन कंपनी होती ते आठवत नाही. तर एकदा त्याच्यात काहीतरी बिघाड झाला व त्यांच्या कस्टमर केअरला फोन करावा लागला. त्यात मराठीत बोलण्यासाठी एक नंबर दाबण्याचे ऑप्शन दिले होते. तो नंबर दाबल्यावर देखील समोरून हिंदीत संभाषण सुरु झाले. मी म्हंटले मला मराठीतच बोलायचे आहे त्यावर ती व्यक्ती म्हणाली तो पर्याय उपलब्ध नाही. "जर पर्याय उपलब्ध नव्हता तर तसे फसवे पर्याय का दिलेत ?" असं विचारल्यावर ती व्यक्ती म्हणाली "ऐसा गर्व्हरमेंट का कायदा है, इसलीये वो ऑप्शन दिया है". म्हणजे ऑप्शन द्यायचे पण मराठीत बोलणारी व्यक्तीच नाही ठेवायची असा एकूण कारभार दिसला. त्या क्षणी मला जास्त गरज होती म्हणून जास्त वाद न घालता गुपचूप हिंदीत काम चालवून घेतले.

अजून एक अनुभव - २०१५ला भारतात आलॊ होतो त्यावेळी एका नातेवाईकाचा सेल फोन टेम्पररी वापरात होतो. नक्की कोणती फोन कंपनी होती ते आठवत नाही. तर एकदा त्याच्यात काहीतरी बिघाड झाला व त्यांच्या कस्टमर केअरला फोन करावा लागला. त्यात मराठीत बोलण्यासाठी एक नंबर दाबण्याचे ऑप्शन दिले होते. तो नंबर दाबल्यावर देखील समोरून हिंदीत संभाषण सुरु झाले. मी म्हंटले मला मराठीतच बोलायचे आहे त्यावर ती व्यक्ती म्हणाली तो पर्याय उपलब्ध नाही. "जर पर्याय उपलब्ध नव्हता तर तसे फसवे पर्याय का दिलेत ?" असं विचारल्यावर ती व्यक्ती म्हणाली "ऐसा गर्व्हरमेंट का कायदा है, इसलीये वो ऑप्शन दिया है". म्हणजे ऑप्शन द्यायचे पण मराठीत बोलणारी व्यक्तीच नाही ठेवायची असा एकूण कारभार दिसला. त्या क्षणी मला जास्त गरज होती म्हणून जास्त वाद न घालता गुपचूप हिंदीत काम चालवून घेतले.

कधी कधी हिंदी मनुष्यही मराठीचा पर्याय स्विकारल्यानंतर उपलब्ध नसतो. मग तसेच वाट बघत बसावे लागते, शेवटी इंग्रजी किंवा हिंदी पर्याय घ्यावा लागतो.

कंजूस's picture

13 Apr 2022 - 11:13 am | कंजूस

पण वरती सुरवातीच्या प्रतिसादांत लिहिले आहे ते बरोबर आहे. दक्षिणी राज्यांत मुस्लिम लोक खूप आहेत. खासगी बसेसवर तर हिंदी बोलणारेच कर्मचारी असतात. त्यामुळे काम होते. स्थानिक भाषा किंवा इंग्रजी येत नसल्याने काहीही अडत नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Apr 2022 - 1:02 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?"
चेन्नाई,बेंगळूरू,कोची.. दक्षिणी राज्यांतील अनेक हिंदी भाषिक दुकानदार उत्तम स्थानिक भाषा बोलतात. मारवाडी समाजातील लोक तर जेथे जातात तेथील भाषा चटकन आत्मसात करताना दिसतात. पुणे शहराबाबतही तसेच म्हणता येईल.
जे नोकर्या करण्यासाठी आपल्या राज्याबाहेर जातात त्यांना मात्र स्थानिक भाषा आत्मसात करायला वेळ लागतो. हैद्राबादमध्ये अनेक वर्षे राहुन तेलुगु बोलता न येणारे मराठी असंख्य दिसतील. बेंगळूरमध्ये २/२.५ लाख मराठी सहज असतील पण कन्नड बोलता लिहिता येणार्यांची संख्या नगण्य असेल हे खात्रीलायक सांगू शकते. दोष त्यांचा नाही. मोठ्या महानगरांमध्ये स्थानिक भाषेशिवाय तुमचे व्यवहार चालू राहू शकतात. व्यापार्/धंदा असेल तर मात्र स्थानिक भाषा आत्मसात करण्यावाचुन पर्याय नसतो. मुंबईत अमराठी दुकानदार(गुजराती/मारवाडी) मराठी उत्तम बोलू शकतात पण टॅक्सीवाले तसे मराठी बोलू शकणार नाहीत कारण बोलणे मर्यादित असते-"कुठे जायचे आहे? व बील किती झाले?" एवढेच मर्यादित असते.
हिंदीचा दुस्वास हा मुख्यतः तामिळनाडूत दिसतो कारण "आमची(च) भाषा सर्वात श्रेष्ठ व जुनी" हा दुराभिमान हे आहे. गंमत म्हणजे अनेक तामिळ, विशेष करून मुंबईतील वा अमेरिकेतील, अगदी स्पष्ट हिंदी बोलताना दिसले आहेत.

चेतन सुभाष गुगळे's picture

14 Apr 2022 - 11:12 pm | चेतन सुभाष गुगळे

+१

कुठल्याही प्रदेशातील भारतीय लोकांना आपल्या प्रादेशीक भाषांचा फुकाचा पोकळ अभिमान असतो मात्र आपल्या राज्यात आलेल्या परभाषकाने ती शिकावी, ती शिकण्याच्या सहज संधी त्याला उपलब्ध करून द्याव्यात यासाठी कुठलेही चांगले प्रयत्न करायची त्यांची तयारी नसते. मराठीसाठी गळे काढणार्‍या कुणालातरी ड्युओलिंगो सारखे एखादे मराठी शिकवणारे अ‍ॅप तयार करावेसे वाटते का? कि सरकार आपली मराठी भाषा, संस्कृती इतरापर्यंत पोचवण्यासाठी काही चांगले प्रयत्न करते?व नुसत्या पाट्या मराठीत करायला लावले की झाले? एखाद्या हिंदी भाषकाला मराठी शिकायची असेल तर एकही चांगले माध्यम उपलब्ध नाही. तीच गत तमिळची किंवा बंगालीची. राष्ट्रीय स्तरावर कुठलीही भाषा सहजपणे घरबसल्या शिकता येईल असा एक तरी उपक्रम या माहिती तंत्रज्ञानाच्या बहारीच्या काळात आहे का? वेबसिरीज, सिनेमा या माध्यमांमुळे एखादी भाषा शिकावीशी वाटते पण ते करायचे कसे? अमित शहा सुद्धा उंटावरूनच शेळ्या हाकताहेत. हिंदी शिकण्यासाठी तमिळ किंवा तेलुगुमध्ये चांगला कंटेंट उपलब्ध करून दिला तर भाषा शिकण्याची आवड असणार्‍यांना सोयीचे ठरेल. हिंदीभाषकांनीसुद्धा आपला हेका सोडून आवडीने इतर भाषा शिकायला हव्यात. उप्र, मप्र, हरयाणा इथल्या एकाभाषक जन्तेला इतर भाषा, संस्कृती याबद्दल काही माहिती कशी मिळणार? मिळाली तर फक्त स्टिरियोटाईप्स कळतील. रेमडोक्यासारखे आमची भाषा राष्ट्रभाषा, आमची भाषा नोबेलविजेत्यांची भाषा, आमची भाषा प्राचीन भाषा असले नुसते गंड पाळुन त्या भाषेचा कसला उद्धार शक्य आहे?

माझेच उदाहरण सांगतो. मला बंगाली आणि मल्याळम या भाषा शिकण्याची फार इच्छा आहे. पण पुस्तके वगळता कुठलेही चांगले माध्यम मला मिळाले नाही. संस्कृतसाठी मात्र एनपिटीएलचे नितांतसुंदर कोर्सेस फुकटात उपलब्ध आहेत ते तरी बरे.

कोरियनसारखी भाषा आज इतकी पॉप्युलर आहे, ती सहज शिकली जाते, प्रचंड कंटेंट उपलब्ध आहे आंतरजालावर तो देखिल मोफत. जर्मनसाठी गोएथे इंस्टिट्युट आहे, फ्रेंचसाठी आलियांझ फ्रान्स्वा. कुठल्या भारतीय भाषेसाठी असे व्यासपिठ उपलब्ध आहे? का फुकाचा आपल्या भाषिक वैविध्याचा डांगोरा पिटायचा?

श्रीगुरुजी's picture

13 Apr 2022 - 8:07 pm | श्रीगुरुजी

Ling-App, Shoonya, Marathi Shala, Learn Marathi, Letter2Sound (Marathi), Marathi Dictionary, uTalk Marathi अशी अनेक Apps मराठी शिकण्यासाठी उपलब्ध आहेत. परंतु महाराष्ट्रात मराठी जनतेला सक्तीने हिंदी शिकवित असल्याने परप्रांतीयांना मराठी शिकण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्यामुळे फारसे कोणी मराठी शिकत नसावे.

उपयोजक's picture

13 Apr 2022 - 10:12 pm | उपयोजक

तुम्ही फक्त तर्काने किंवा अर्धवट माहितीने लिहिले असावे अशी शक्यता आहे.

माझा आंजावरुन भाषा (हिंदी आणि मराठी) शिकवण्याचा अनुभव सांगतो.

कोणतीही भाषा शिकण्यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. पुरेसा वेळ देणे आणि चांगली स्मरणशक्ती.

मी महाराष्ट्रात राहणार्‍या तमिळ ,मल्याळी ,कन्नड ,तेलुगू भाषिकांना मराठी शिकवतो. अगदी मोफत. माझा अनुभव किंवा निरीक्षण असं आहे की लोक आपल्या रोजीरोटीला आणि कौटुंबिक गोष्टींना आधी महत्व देतात. यातून वेळ उरला तर मग जिथे पोट भरतो तिथली भाषा वगैरे शिकायला बघतात. ते सुद्धा स्थानिकांशी रोजचा संवाद अधिक सुकर व्हावा म्हणून. मराठी ही यांची राज्यभाषा आहे. ती न शिकता आपण हिंदीतून बोलून इथली राज्यभाषा शिकणं टाळतोय हे योग्य नाही असं काही त्यांना वाटून ते मराठी शिकत वगैरे नाहीत. जाता जाता सहज होण्यासारखं असेल तर शिकू मराठी. असे विचार असतात. मग इतकी तीव्र इच्छा असल्यावर त्याचे फलित काय असणार? आणि हे मी पश्चिम महाराष्ट्र आणि मुंपुठा इथे किमान ७+ वर्षांपासून राहणार्‍या दक्षिण भारतीयांबद्दल बोलतोय. ते सुद्धा सुशिक्षित द.भारतीय बरं का! झाडून सगळे द. भारतीय असेच असतात असं नाही. काही आवडीने शिकणारेही असतात. पण त्यांचे प्रमाण तुरळक असते.

सुशिक्षित हिंदीभाषिक हे मराठी शिकायला तयार असतात. पण त्याचं कारण दोन्ही भाषा संस्कृतोद्भव असणं ,दोन्हींची लिपी एकच असणं बरेचसे शब्द समान असणं या गोष्टी आहेत. या गोष्टींमुळे त्यांना मराठी शिकणं सोपं जातं. तेच यांना तमिळ किंवा मल्याळी शिकणं कठीण जातं.

महाराष्ट्रात रस्त्यावर ,हातगाडीवर व्यवसाय करणारे , रिक्षा , टॅक्सीचालक असे उत्तरभारतीय हे मराठी शिकायला सर्वात नाखुष असतात. शिकवायला कोणी तयार असलं तरी शिकण्याची फारशी कुवत नसल्याने , त्यांचं त्यामुळे फारसं अडत नसल्याने मराठी शिकत नाहीत.

दक्षिण भारतीय हे उत्तरेकडच्या भाषा हे न्यूनगंडामुळे किंवा आपण हिंदी शिकलो नाही तर मागे पडू या भितीने हिंदी शिकायचा प्रयत्न करतात. तितका न्यूनगंड बॉलीवूडचे सिनेमे आणि दक्षिण भारतात पसरलेले हिंदीभाषिक यांनी नक्कीच निर्माण केला आहे. हिंदी पट्ट्यात व्यापार वाढवू इच्छिणारे दक्षिण भारतीय लघुउद्योजक/व्यापारी किंवा केंद्र सरकारचे उत्तरेत नोकरी मिळालेले दक्षिण भारतीय कर्मचारी यांनी हिंदी शिकली तर समजण्यासारखं आहे.पण जे यात येतच नाहीत ते दक्षिण भारतीयदेखील हिंदी येत नसल्याचा न्यूनगंड आणि भिती बाळगून आहेत. हिंदीची ही दहशत नक्कीच निषेधार्ह आहे.
एक तमिळ माणूस आणि एक तेलुगू माणूस दोघांना तमिळमधून किंवा तेलुगूमधून व्यवस्थित बोलता येत असेल तर त्यांनी दोघांनाही धड येत नसलेल्या हिंदीतून का बरं बोलावं?

सुबोध खरे's picture

15 Apr 2022 - 1:06 pm | सुबोध खरे

भाषिक अस्मिता हि आपली पोळी भाजून घेण्याची चांगली सोय असल्यामुळे राजकारण्यांची अतिशय आवडती असते.

लष्करात असणारे सर्व दक्षिण भारतीय आपोआप हिंदी शिकून घेतात.

लषकरी अधिकारी ज्या रेजिमेंट मध्ये असतात त्या रेजिमेंटचे भाषा आपोआप शिकून घेतात. जसे सॅम माणेकशॉ गुरखा रेजिमेंट मध्ये होते त्यामुळे त्यांना गोरखली भाषा उत्तम येत असे.

असेच माझे तीन चार मित्र गुरखा रेजिमेंट मध्ये होते त्यामुळे त्यांना गोरखाली भाषा उत्तम येते आणि आमचा वर्गमित्र आता नेपाळ लष्कराच्या वैद्यकीय विभागाचा महासंचालक आहे त्याच्याशी छान गोरखाली भाषेत संवाद करतात

ज्या मित्रांचे पोस्टिंग पंजाब रेजिमेंट मध्ये होते ते पंजाबी शिकले ज्या अमराठी मित्रांचे पोस्टिंग मराठा किंवा महार रेजिमेंट मध्ये होते ते मराठी शिकले.

कुठेही कुणाची अस्मिता दुखावली नाही कि अहंगंड दुखावला नाही. आणि यात व्यवसाय धंदा करण्याचा किंवा पैशाचा प्रश्न नव्हता.

माझे कोची ला पोस्टिंग होणार होते तेंव्हा मी मल्याळी शिकायला सुरुवात केली होती आणि ती वाचायला यायला लागली परंतु पोस्टिंग विशाखा पटणम ला झाले आणि मी तेलगू शिकेपर्यंत( एक वर्षातच) परत गोव्याला बदली झाली. आणि मग ते राहूनच गेले याची आता खंत वाटते.

हिरानंदानी रुग्णालयात माझ्या दोन्ही सहकारी (एक मल्याळी आणि दुसरी पंजाबी) रुग्णांशी किंवा आमच्या कर्मचाऱ्यांशी उत्तम मराठी बोलत असत. आणि दोघीही जन्मापासून कोट्याधीश आहेत( एक पेडर रोड वर जन्म गेलेली आणि दुसरी हिरानंदानी मध्येच राहत असलेली).

मूळ मुद्दा मराठी बोलणे हे त्यांना कमीपणाचे वाटले नाही (बिलो डिग्निटी) किंवा यांचा इगो दुखावला नाही.

याउलट जया भादुरी सारख्या नतद्रष्ट बायका येथे बक्कळ पैसे कमावून सुद्धा मला मराठी येत नाही हे भूषण म्हणून सांगतात तेंव्हा त्यांना रस्त्यावर बडवावेसे वाटते.

याउलट जया भादुरी सारख्या नतद्रष्ट बायका येथे बक्कळ पैसे कमावून सुद्धा मला मराठी येत नाही हे भूषण म्हणून सांगतात तेंव्हा त्यांना रस्त्यावर बडवावेसे वाटते.

जया बच्चन यांनी बक्कळ पैसे कमावले आहेते हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करुन, मराठी चित्रपटांत (एक अपवाद आहे त्यांच्या मेकअपमनने जेव्हा एक मराठी चित्रपट निर्माण केला होता तेव्हा त्यात जया व अमिताभ बच्चन यांनी अतिथी कलाकार म्हणून भूमिका केली होती) नव्हे. हिंदी चित्रपटांत अभिनय ही त्यांची आवड आणि कमाईचे साधन आहे. या संबंधित एफटीआयआय ही संस्था ज्यात त्यांनी शिक्षण घेतले ती पुण्यात आहे आणि पुढे त्यांचे कार्यक्षेत्र अर्थात चित्र निर्मिती संस्था व बहुसंख्य स्टुडिओज् हे मुंबईत आहेत, म्हणजे आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण आणि व्यवसाय करण्यास त्यांना महाराष्ट्रात यावे लागले. अर्थात एनएसडी ही एक संस्था दिल्लीत देखील आहे पण तिथल्या अभिनय शिक्षणाचा बाज वेगळा आहे त्यामुळे ज्याला एफटीआयआय च्या पद्धतीचे अभिनय प्रशिक्षण हवे असेल त्याला एनएसडी हा पर्याय समर्पक असेलच असे नाही.

असो. समजा एफटीआयआय सारखी संस्था आणि विविध चित्रनिर्मिती संस्था / स्टुडिओज् यांची उभारणी जर उत्तर भारतातच केली तर उत्तर भारतीय मंडळींना येथे येण्याची गरज भासणार नाही व महाराष्ट्राच्या लोकसंख्येत अतिरिक्त भर पडून जो सोयीसुविधांवर ताण येत आहे तोदेखील येणार नाही.

अर्थात अशा वेळी बॉलीवूड महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही छापाची विधाने मराठी नेतेमंडळींकडून केली जातात त्या दुटप्पी वर्तनाचीही नोंद घ्यावीच लागेल. म्हणजे यूपीत स्टूडिओ बनवायला विरोध आणि इथल्या स्टुडिओत येऊन काम केले तर आमच्या जीवावर कमविता असे डबल स्टँडर्ड विधान करणे तार्किकतेच्या कसोटीवर टिकणारे नाही.

यातही विरोधाभास असा की जया बच्चन या कट्टर मोदीविरोधक आहेत. हिंदी आग्रह देशभर धरलाय मोदींनी (आणि आता त्यांच्या तर्फे अमित शाह यांनी). म्हणजे हिंदी आग्रहाबाबत जयाजी मोदींसोबत आहेत का? समजा तसे असेल तर हाच हिंदी आग्रह बंगालमध्येही धरण्यात आला तर जयाजींचे काय मत असेल? समजा

मुंबईत असताना मी मराठी बोलणार नाही केवळ हिंदीतच बोलेन

असा पवित्रा त्यांनी घेतला आणि कोलकात्यात गेल्यावर या महानगरात

हिंदीत कामकाज चालणार नाही प्रत्येक कोलकातावासियाला बंगाली आलेच पाहिजे

अशी उलट भूमिका घेतली तर मात्र याबाबत जया बच्चन यांचा निषेधच करावा लागेल.

चौथा कोनाडा's picture

15 Apr 2022 - 9:06 pm | चौथा कोनाडा

जया भादुरी सारख्या नतद्रष्ट बायका येथे बक्कळ पैसे कमावून सुद्धा मला मराठी येत नाही !

मुंबईत कित्येक वर्षे राहणार्‍या, बक्कळ पैसे कमावणार्‍या किंवा जेमतेम पोट भरणार्‍या बर्‍याच लोकांना मराठी येत नाही.
"हम हिंदीमें ही बात करेंगे" चा संदर्भ वेगळा होता (मला आठवते त्याप्रमाणे) त्यांनी इंग्लीश मध्ये बोलण्याला विरोध करत "हम युपीकें हैं, हम हिंदीमें ही बात करेंगे" असे विधान सहज केले होते होते तेव्हा त्याला कसलाही भाषिक, प्रादेशिक, राजकीय विखार नव्हता. "हम हिंदीमें ही बात करेंगे" हे वाक्य पकडून तिच्या विरुद्ध राळ उठवण्यात आली !

चेतन सुभाष गुगळे's picture

15 Apr 2022 - 9:35 pm | चेतन सुभाष गुगळे

ते विधान मराठी विरोधातच होते.

https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/%E0%A4%AF%E0%...

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2022 - 6:00 pm | चौथा कोनाडा

हे पण मोडतोड केलेले वृत्त वाटते.
मला आठवतंय त्या नुसार त्या समारंभात इतर लोक इंग्लीशमध्ये बोलत होते, त्या पार्श्वभुमीवर जया बच्चन तसे म्हणाल्या होत्या.
आंजावर त्या समारंभाचे कव्हरेज सापडले नाही (मला तरी... आपणास सापडल्यास नक्की द्या) सगळ्या बातम्या राज ठाकरे आणि जया बच्चनच्या वादाच्या दिसतात.

चेतन सुभाष गुगळे's picture

16 Apr 2022 - 6:09 pm | चेतन सुभाष गुगळे

तोच संदर्भ आहे. फार जुना (२००८) असल्याने कदाचित वर्तमानपत्रांच्या लिंक्स सापडणार नाही.

द्रोण चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी घडलेली घटना आहे.

https://youtu.be/-4sBKE9aVQc

व्हिडीओ २ मिनिटे १० सेकंदापुढे पाहा. सर्व स्पष्टीकरण मिळेल.

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2022 - 6:53 pm | चौथा कोनाडा

चेतन सुभाष गुगळेजी, व्हिडीओ संदर्भासाठी धन्यवाद !
पण आधीची दृष्ये त्यात दाखवली नाहीत, विशेषतः " समारंभात इतर लोक इंग्लीशमध्ये बोलत होते" हा.
बाकीचे लोक इंग्लीश मध्ये बोलत होते, हिंदी सिनेमाचे प्रमोशन आणि इंग्लीश का ? असे म्हणत "हम युपीकें हैं, हम हिंदीमें ही बात करेंगे" असे विधान सहज केले होते पण पुढे " महाराष्ट्रके लोग हमें माफ करें " या विधानाने त्यांचा घात केला. कदाचित मराठीत नीट बोलता येणार नाही म्हणून त्या असे म्हणाल्या.
असो.
या संदर्भात काही सापडले तर मी नक्की पोस्ट करेन !

चेतन सुभाष गुगळे's picture

16 Apr 2022 - 7:05 pm | चेतन सुभाष गुगळे

निदान माझ्या माहितीत (ही माहिती अर्थातच त्यावेळच्या प्रसारमाध्यमांमधूनच मिळालेली) तरी मराठी विरोध म्हणूनच त्या तसे बोलल्या होत्या. २००८ सालची गोष्ट आहे हे ध्यानात घ्या. त्यावेळी राज ठाकरे मराठी सक्ती हा विषय घेऊन एकदम फॉर्मात होते. मनसेला बस्तान बसविण्याकरिता एक विषय हवा होता आणि हिंदी भाषिक मंडळी हे सॉफ्ट टार्गेट होते.

मला वाटतं भाषा ही माणसाच्या सोयीसाठी बनवली आहे. तिला तश्याच दृष्टीने पाहावं. ज्यांना एखादी भाषा शिकण्याची आवड आहे किंवा आर्थिक इनसेंटिव्ह आहे त्यांनीच भाषा शिकावी. एखाद्याने न शिकल्यास दुसऱ्यांना दुःख होण्याचे काहीही कारण नाही.

याउलट जया भादुरी सारख्या नतद्रष्ट बायका येथे बक्कळ पैसे कमावून सुद्धा मला मराठी येत नाही हे भूषण म्हणून सांगतात तेंव्हा त्यांना रस्त्यावर बडवावेसे वाटते.

कायदा सुव्यवस्था सुशासन न्यायदान प्रक्रिया हे केवळ पुस्तकी शब्द नाहीत, त्यांचा व्यवहारात देखील उपयोग करता येतो. तितका संयम नसल्यास निषेध करण्याचे अनेक सभ्य व सुसंस्कृत मार्ग आहेत. कोणत्याही परिस्थितीत पाऊणशे वयाच्या एका महिलेला शारिरीक इजा करण्याची इच्छा होणे व ती समाजमाध्यमावर जाहीर व्यक्त करणे ही निरोगी पुरुषाची मानसिकता नाही.

मुक्त विहारि's picture

14 Apr 2022 - 11:14 pm | मुक्त विहारि

ज्याच्या हाती काठी, त्याची म्हैस

प्लासीच्या लढाईत जर, फ्रेंच जिंकले असते तर आज भारतात फ्रेंच भाषेचे वर्चस्व असते ....

मराठीसाठी गळे काढणार्‍या कुणालातरी ड्युओलिंगो सारखे एखादे मराठी शिकवणारे अ‍ॅप तयार करावेसे वाटते का?

.... हीच खरी गोम आहे. भाषा आधारित मते मिळवायची आणि राज्य हाकायचे ... जाऊ दे, आपल्याला काय करायचे आहे? .... जे ज्ञान हवे आहे, ते ज्ञान ज्या भाषेत उपलब्ध असेल, ती भाषा शिकणे उत्तम ....

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

14 Apr 2022 - 4:42 pm | हणमंतअण्णा शंकर...

( हा प्रतिसाद परभाषिक शब्द न वापरता लिहिण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात येईल )
१. सर्व भारतीय भाषा कोणत्याही प्रकारच्या आधुनिक ज्ञाननिर्मितीसाठी, ज्ञानदळणवळणासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाकडून कळत-नकळत कालबाह्य ठरविल्या जात आहेत. ( घटक- समाज, शासन-प्रशासन, माध्यमं इत्यादि )
२. व्यवहार या पातळीवर भाषा नेहमीच लवचिक राहिली आहे. ती कोणतीही भाषा असो. त्यामुळे भाषिक व्यवहार आणि व्यवहारासाठीची भाषा यांच्यातला फरक आपल्याला करावाच लागेल. दोन्हीकडून रेटा आल्याशिवाय कोणतीही भारतीय भाषा आजच्या रूपात २० वर्षांनी तग धरणार नाही.
२. मुलांना कोणत्याही भारतीय भाषेविषयी प्रेमच उत्पन्न होऊ नये अशी व्यवस्था आपण जाणीवपूर्वक उभी केली आहे. ( शिक्षणाचे माध्यम पूर्णपणे बदलणे, दरवर्षी त्याचा खेळखंडोबा करणे इत्यादि. ) भाषेचे प्रेम घेऊन कोणी जन्माला येत नाही. आज मराठी संस्थळ, माध्यमं इत्यादिंवर मराठी लेखन करणारी बहुतेक सर्वजण मराठी माध्यमातूनच शिकली आहेत. १००० मुलांना ५ विषय मराठीतून १० वर्षे शिकवल्यावर त्यातली १० मुले खुद्द 'भाषा' या गोष्टीकडे आत्कृष्ट होतात. ५ मुलांना आवर्जून साहित्य वाचावंसं वाटतं, आणि दोघा तिघांना भाषेवर असे प्रेम जडते की त्यांना भाषेतून ललित अभिव्यक्ती करावीशी वाटते.
३. (किमान उच्च शिक्षण घेतलेल्या शहरी आणि निमशहरी) लोकांना भाषेविषयी इतर अनेक गोष्टींप्रमाणे नुसताच फुकाचा 'हबिमाण', किंवा आजच्या बोलीत 'गर्व' असतो. जरासं खोदून पाहिलं तर त्याच्याखाली अनेक प्रकारचा असुरक्षितपणा, अनेक गंड-न्यूनगंड वळवळ करताना दिसतात.
४. ज्यांना कळवळा आहे अश्या सर्वच जणांना भाषिक भविष्याविषयी फारशी आशा नाही. ज्यांना कळवळा नाही पण जे चाणाक्ष आहेत ते अभिजन, आणि त्यांचा मागोवा घेत जाणारे इतर सर्व आपली मुले इंग्रजी माध्यमात घालतात. त्यापैकी कळवळाधारक परंतु 'आम्ही घरातच (बहुतेकदा क्रियापदापुरती) मराठी बोलतो' वगैरे बोलून स्वतःचे आणि इतरांचे समाधान करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. बाकीच्यांना केवळ एकच भारतीय भाषा येत असल्याने, स्वजातीय कुटुंब असलेला आणि दुसरा भाषिक पर्यायच माहित नसलेला ग्रामीण भाग ज्याने उच्च शिक्षण घेतलेलेच नाही तो मात्र आपापल्या बोलीत सेंद्रियरित्या बोलत असतो. परंतु त्यांच्यात भाषिक अस्मिताच नसते. कारण त्यांच्या रोजीरोटीला भाषिक अस्मिता पूरकही आणि मारकही नसते.
५. आमच्या रावळगुंडवाडीत ९० टक्के लोक कन्नड बोलतात, शासकीय व्यवहारांची भाषा मराठी आहे, घरांतली भाषा कन्नड आहे, लिहायची-वाचायची आणि शिक्षणाची भाषा मराठी आहे, शेतकामांतली भाषा कन्नड आहे. आध्यात्मिक व्यवहाराची भाषा मुख्यत्वे कन्नड आहे. (लिंगायत) मुसलमानीवळणाची दख्खनी बरेच लोक बोलू शकतात. गेल्या हजारवर्षात एकदाही भाषिक संघर्ष झालेला नाही. असला विचारही कोणाच्या मनात येत नाही. शासकीय व्यवहाराची भाषा म्हणून उद्या कोणी रावळगुंडवाडीमध्ये इंग्रजी/हिंदी लादली तरीही काही फार फरक पडणार नाही. कारण स्वभाषेचेच उन्नत आणि औपचारिक स्वरूप आत्ताच्या घडीला सगळ्यांनाच परके आहे त्यामुळे ती भाषा काय किंवा परकी भाषा काय?
६. मुलांची स्थिती मात्र वेगळी आहे. मुलांवर भाषिक संस्कार टीव्ही आणि आता इंटरनेट हेच घडवत आहे. जवळजवळ प्रत्येक मूल दिवसाला २ तास या सरासरीने कार्टून्स पाहतात. त्यामुळे यु-ट्यूब, मेटा या कंपन्यांचे अल्गोरिदम आणि कार्टून-मालिका मुलांची भाषिक समज घडवत आहेत. त्यामुळे भाषेविषयी प्रेम उत्पन्न व्हायला लागणारे भाषिक वैविध्य आणि समृद्धी मुलांना शिक्षणाऐवजी इंटरनेटकडून मिळत आहे. जिथे सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही.
७. जगभर सध्या जपानी भाषेची क्रेझ आहे. मुख्य कारण जपानी अ‍ॅनिमे. भारताला असा कोणताच सांस्कृतिक ठेवा निर्माण करता येत नाही. म्हणजे आपल्याकडे त्या गोष्टी नाहीत असे नाही, भरपूर आहे. योगाने जगाला भुरळ घातली आहे. आता योग, अध्यात्म इत्यादि गोष्टींची भाषा ९५ टक्के भारतीयांनाच उपलब्ध नव्हती/नाही, तर त्यांच्यामार्फत जगातले लोक भारतीय भाषांकडे का आकर्षित होतील? आणि आपण तर स्वतःच नैवेद्य सर्व्ह करतो, ह्याच्यात ते मिक्स करतो वगैरे वगैरे..
८. या सर्वांवरून आजच्या रूपातल्या भारतीय भाषा 'संस्कृतीकरणाकडे' चालल्या आहेत. म्हणजे या 'कल्ट' या रूपात नांदतील. व्यवहारात प्रयोग जवळजवळ शून्य पण अकादमिक रूपात जिवंत राहतील. व्यवहारातली भाषा अशी होईल -> स्थानिक भाषांचे क्रियापदी व्याकरण + बहुतेक इंग्रजी/हिंदी शब्द + नावाला स्थानिक शब्द + रोमन लिपी. अगदी नेमकं सांगायचं म्हणजे महाराष्ट्रात हिंदाळलेली मिन्ग्लिश बोलतील लोक काही वर्षांनी..

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 Apr 2022 - 10:44 am | माईसाहेब कुरसूंदीकर

तामिळ ही जोडणारी भाषा आहे असे रहमान म्हणाला. द हिंदू ह्या व्रुत्तपत्रात जवळपास रोज ह्या विषयावर लेख येत आहेत. "हिंदीची सक्ती नको' असे स्पष्ट मत दिले जात आहे. मराठी कलावंत नेहमीप्रमाणे कुंपणावर बसून आहेत का ? मागे एका तामिळ चेनलवर रहमान एक वाक्य हिंदीत बोलू लागला. निवेदिकेने त्याला ताबडतोब थांबवला व "हा तामिळ चॅनेल आहे. हिंदी चॅनेल नाही"असे स्पष्ट सांगितले. ही हिंमत मराठी चॅनेलवाले दाखवू शकतील्?शक्यता नाही कारण हे लोक 'विशेष मुलाखती'साठी बॉलिवूड कलावंताना अनेक्वेळा बोलवतात व हिंदीतच मुलाखत घेतात. ए बी पी माझा ह्याचे उदाहरण आहे. असो.

सर टोबी's picture

15 Apr 2022 - 10:47 am | सर टोबी

हिंदीला दक्षिणेकडील राज्य परंपरागत पद्धतीने विरोध करतायत हा समज योग्य नाही. हिंदी हि व्यवहारासाठीची भाषा आहे अशी गुळमुळीत सुरुवात करून नंतर सर्व शासकीय स्तरावर उपकृत झालेल्या सरकारी बाबूंची वर्णी लावायची असा मास्टर प्लॅन असू शकतो. अगोदरच एवढे असंवेदनशील, भंकस सरकार सत्तेवर आहे. त्यात आणखीन नोकरशाही देखील सामील झाली तर सामान्य माणसाचे हाल कुत्रं खाणार नाही.

सुबोध खरे's picture

15 Apr 2022 - 12:51 pm | सुबोध खरे

नंतर सर्व शासकीय स्तरावर उपकृत झालेल्या सरकारी बाबूंची वर्णी लावायची असा मास्टर प्लॅन असू शकतो.

उगाच काहींच्या काही.

तामिळनाडू शासनात स्थानिकांचीच भरती होते आणि त्यात तामिळ आवश्यक असते. तर केंद्र सरकारच्या कोणत्याही खात्यात कोणतीही स्थानीय भाषा अत्यावश्यक नसते.

इतकी वर्षे काँग्रेसचे सरकार हिंदी ची सक्ती करत होते तेंव्हा पासून बाबूंची वर्णी लावली होती का?

हा प्रश्न खरं तर पक्ष विरहित आहे.

राजकारणासाठी तामिळ अस्मितेचा प्रश्न पणाला लावल्यापासून हिंदी तामिळ असा संघर्ष सुरु झाला तसाच संघर्ष तामिळ आणि कन्नडिगा यांच्यात कावेरी नदीच्या पाण्यासाठी झाला.

जिथे तिथे राजकारण्यांच्या भल्यासाठी अस्मिता आड येते हेच खरे

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Apr 2022 - 11:44 am | अमरेंद्र बाहुबली

अतिशय बेदबाबदार विधान. सुशिक्षीत माणूस मोठा पदावर नसला की काय होतं ह्याचं ऊदाहरण.

सुखीमाणूस's picture

15 Apr 2022 - 8:49 pm | सुखीमाणूस

म्हणुन घटनेने निवडली आहे.
त्यामुळे अमित शहा काही नवीन विचार आणत नाहीयेत. गुलाम लोक उगीचच गळा काढत आहेत.
मुम्बैत उर्दु भवन सुरु करायचे प्रयत्न चालु आहेत ते निमुट बघायचे. मराठी आणि हिन्दी ज्या समान देवनागरी लिपी वापरतात त्याना आपापसात भान्डायला लावायचे.
हिन्दी भाषिक लोकान्ची मुम्बैत मराठी मधे न बोलण्याची दादागिरि असते तर तो त्या लोकान्चा माजोरडेपणा आहे. त्यात हिन्दी भाषेचा काहिही दोष नाही.

खालील लिखाण मला Canada मधील University च्या साइट वर मिळाले.
https://www.uottawa.ca/clmc/language-provisions-constitution-indian-union

Article 343 Official language of the Union

(1) The official language of the Union shall be Hindi in Devanagari script. The form of numerals to be used for the official purposes of the Union shall be the international form of Indian numerals.

(2) Notwithstanding anything in clause (1), for a period of fifteen years from the commencement of this Constitution, the English language shall continue to be used for all the official purposes of the Union for which it was being used immediately before such commencement:

Provided that the President may, during the said period, by order authorise the use of the Hindi language in addition to the English language and of the Devanagari form of numerals in addition to the international form of Indian numerals for any of the official purposes of the Union.

(3) Notwithstanding anything in this article, Parliament may by law provide for the use, after the said period of fifteen years, of

(a) the English language, or

(b) the Devanagari form of numerals, for such purposes as may be specified in the law.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Apr 2022 - 8:58 pm | अमरेंद्र बाहुबली

हिंदी राष्ट्रभाषा म्हणून घटनेने निवडली आहे.
अगाध ज्ञान. रचाकने अज्ञानात सुख असतं म्हणून तुम्ही तुमचं नाव सुखीमाणूस ठेवलंय का?

श्रीगुरुजी's picture

15 Apr 2022 - 10:53 pm | श्रीगुरुजी

पूर्ण चुकीची माहिती आहे. भारत या देशाला राष्ट्रभाषा नाही. हिंदी किंवा इतर कोणतीही भाषा ही भारताची राष्ट्रभाषा नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Apr 2022 - 11:09 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

16 Apr 2022 - 2:48 am | हणमंतअण्णा शंकर...

काही लोक हिंदीला अतिआत्मविश्वासाने ती राष्ट्रभाषा नाही असे इतरांना ( म्हणजे ज्यांची सर्वसाधारण समज अशी आहे की हिंदी घटनादत्त राष्ट्रभाषा आहे ) उच्चरवाने सांगतात, परंतु हे अगदी सरळसोट प्रकरण नाही. ते कसे ते पाहा -

भारताची कोणतीही राष्ट्रभाषा नाही - अचूक. अगदी बरोबर.

परंतु -

- कलम ३४३ : देवनागरी लिपीतली हिंदी ही भारतीय संघराज्याची अधिकृत राजभाषा आहे. अंक आंतरराष्ट्रीय पद्धतीचे भारतीय अंक आहेत.
- कलम ३४४ : हिंदी ह्या राजभाषेसाठी आयोग व संसदीय समितीची स्थापना केलेली आहे. ही समिती दर पाच वर्षांनी भाषेशी निगडीत प्रश्नांचा आढावा घेईल आणि जरूर ते बदल सुचवेल. त्याचबरोबर पहिल्या पाच ते दहा वर्षांत शासकीय प्रयोजनांसाठी अधिकाधिक प्रमाणात हिंदी वापरली जाईल आणि इंग्रजीच्या वापरावर निर्बंध घातले जातील.
- कलम ३५१ : ह्या कलमात हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश देण्यात आले आहेत. बहुसंस्कृती असलेल्या देशात अभिव्यक्तीचं मध्यम म्हणून सर्वांना समजेल अशारीतीनं हिंदीचा विकास करणं हे संघराज्याचं कर्तव्य आहे.

यावरून हिंदीला भारतीय संघराज्यात महत्त्वाचं स्थान आहे आणि ती जरी राष्ट्रभाषा नसली तरी तिचा (कदाचित त्या दिशेने) विकास करणे हे संघराज्याचे कर्तव्य म्हणून सांगितले आहे. [ कदाचित त्या दिशेने ] असं मी संदिग्ध बोलत आहे कारण बाकीच्या कलमांनुसार भाषा विकासाबाबत आणि धोरणांबाबत वेगवेगळे निर्णय घेण्याचे अधिकार वितरित केले आहेत..

- कलम ३४३ (२) : घटना लागू होण्यापूर्वीपासून घटना लागू होईपर्यंत इंग्रजी ज्या शासकीय प्रयोजनासाठी वापरली जात होती तशीच ती भारतीय संघराज्यात सर्व अधिकृत कारणांसाठी पुढची १५ वर्षं अधिकृत भाषा म्हणून वापरली जाईल.
- कलम ३४३ (२) : प्रशासकीय कोणत्याही प्रयोजनासाठी इंग्रजीच्या जोडीस हिंदीचा(!) वापर करायचा असेल, तर तसा तो राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे करता येईल.
- कलम ३४३ (३, ४) : घटना लागू झाल्यापासून १५ वर्षांनंतर ठराविक क्षेत्रात इंग्रजीच्या किंवा देवनागरी अंकांच्या वापरासाठी संसद कायदा करू शकते.
- कलम ३४४ : प्रथम ५ वर्षांनी आणि मग १० वर्षांनी भाषा विषयी प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात येईल. तीस जणांची समिती अहवाल तयार करून आयोगाकडे पाठवेल. आयोगाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती योग्य वाटेल तिथे बदल करण्याचे अध्यादेश काढतील.
- कलम ३४९ : संसदेमध्ये कोणालाही भाषेसंबंधी काही बदल सुचवायचे असतील तर ते आयोगाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनेच सुचवता येतील.
- कलम ३४८ : सर्वोच्च आणि सर्व उच्च न्यायालयामधली सर्व कारवाई संसदेच्या पुढील आदेशापर्यंत इंग्रजीत होईल. संसदेत मांडायची विधेयके, पारित केलेले नियम, अधिनियम, विधेयके इंग्रजीत प्रसिद्ध होतील.

ज्या पद्धतीने कायदा, संविधान आणि त्यातल्या दुरुस्त्या, त्यांना भविष्यात न्यायालयात दिली जातील ती आव्हाने यांचा आधीच सखोल अभ्यास करून अमितभाईंनी (अर्थात टीमने) कलम ३७० रद्द केले, ते पाहता अमितभाई हिंदीच्या राष्ट्रभाषा होण्याचा मार्ग कायदेशीर विनासायास करू शकतात यावर मी विश्वास ठेवतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Apr 2022 - 11:56 am | अमरेंद्र बाहुबली

पण अधिकृतरीत्या हिंदी राष्ट्रभाषा नाही हेच दिसतेय.राजभाषा असेल. प्रत्येक राज्याची स्वतची अशी अधिकृत “राज्यभाषा” आहे.

अमितभाई हिंदीच्या राष्ट्रभाषा होण्याचा मार्ग कायदेशीर विनासायास करू शकतात यावर मी विश्वास ठेवतो.
अमितभाईने बिमारू राज्ये नी तियाला गुजरात जोडून वेगळं राष्ट्र मागून घ्यावे नी त्याला हिंदी राष्ट्रभाषा करावी. ईतर राज्यांच्या माथी बळजबरीने हिंदी मारू नये. देशातील एकमेव हुशार राज्य असेल तर तामीळनाडू त्यानी हिंदीला सरळ लाथाडले. तरी त्याना काही फरक पडला नाही ऊत्तरोत्तर तामीळनाडू विकासच करत आहे.

श्रीगुरुजी's picture

16 Apr 2022 - 12:18 pm | श्रीगुरुजी

ज्या पद्धतीने कायदा, संविधान आणि त्यातल्या दुरुस्त्या, त्यांना भविष्यात न्यायालयात दिली जातील ती आव्हाने यांचा आधीच सखोल अभ्यास करून अमितभाईंनी (अर्थात टीमने) कलम ३७० रद्द केले, ते पाहता अमितभाई हिंदीच्या राष्ट्रभाषा होण्याचा मार्ग कायदेशीर विनासायास करू शकतात यावर मी विश्वास ठेवतो.

कलम ३७० रद्द करणे आणि हिंदी राष्ट्रभाषा करणे यात महद्अंतर आहे. ३७० वे कलम रद्द करण्यास बहुसंख्य भारतीयांचा पाठिंबा होता. परंतु त्यांच्या दृष्टीने ती प्राथमिकता नव्हती. त्यामुळे ते कलम लादणारा व रद्द न करणारा पक्ष वारंवार सत्तेत येऊ शकला. परंतु त्याचमुळे भाजपने हे कलम रद्द केल्यानंतर अत्यंत क्षीण विरोध झाला.

हिंदी ही राष्ट्रभाषा करण्याचा निर्णय झाला तर अनेक राज्यातून विरोध होईल. त्याचा भाजपला निवडणुकीत तोटा होईल. भाजप कर्नाटक पाठोपाठ तेलंगणात बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात आहे. तेथे भाजपला फटका बसू शकतो. महाराष्ट्र, बंगाल व ईशान्येकडील राज्यातही विरोध होईल. मुळात हिंदी भाषिक राज्यात भाजप बराचसा संतृप्त झाला असल्याने निवडणुकीत तेथे अधिक फायदा होणार नाही. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हा निर्णय टिकणार नाही. त्यामुळे अमित शहा हे धाडस करणार नाहीत. केले तर पस्तावतील.

ते पाहता अमितभाई हिंदीच्या राष्ट्रभाषा होण्याचा मार्ग कायदेशीर विनासायास करू शकतात यावर मी विश्वास ठेवतो.

करु देत ना राष्ट्रभाषा.. केंद्र सरकारच्या कामकाजाची अधिकृत भाषा हिंदी असेल तर मान्यही करु.. पण म्हणून अन्य भाषा संपवायच्या का ? अन्य भाषा बोलायच्या नाहीतच का ?
हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही हा कायदेशीर वाद काही काळ बाजूला ठेवू .. त्याचा कायदेशीर कीस पाडून काय आहे ते कायदेपंडित सांगतीलच.. आणि हिंदी राष्ट्रभाषा आहे म्हणून प्रत्येकाने जबरदस्तीने हिंदीच बोलली पाहिजे याला काय अर्थ ? स्थानिक भाषा बोलायच्या /शिकायच्या नाहीत ? उद्या हे अमित शहा स्थानिक भाषेतून शिक्षण मग, स्थानिक भाषेतील संस्थळांचा देशातील वापर (यात मिसळपावपण आले हं) , स्थानिक भाषेतीलप्रसार माध्यमे, वृत्तपत्रे आणि सरतेशेवटी स्थानिक भाषेतून बोलायलाही बंदी घालतील.. स्थानिक भाषेतून बोलणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरवतील.. मग हिंदी राष्ट्रभाषा आहे म्हणत हे सगळं पण चालवून घ्यायचं का ? स्थानिक भाषांचं अस्तित्वच नको आहे का हिंदी भाषकांना ?

श्रीगुरुजी's picture

16 Apr 2022 - 6:29 pm | श्रीगुरुजी

मुळात जेथे अनेक भाषा बोलल्या जातात व कोणतीही भाषा निम्म्याहून कमी जनता बोलते अशा देशात एखादी विशिष्ट भाषा "राष्ट्रभाषा" म्हणून का हवी आहे? समजा हिंदीला राष्ट्रभाषा केले तर भारतीय जनतेने काय करणे अपेक्षित आहे? सर्व भारतीयांनी हिंदी शिकायची, सर्व शिक्षणाचे माध्यम हिंदी करायचे, सर्वांनी एकमेकांशी हिंदीत बोलायचे, सर्व वाहिन्या/प्रकाशने/पुस्तके/वृत्तपत्रे इ. फक्त हिंदीतच असणार असे काही करायचे आहे का? म्हणजे ६० टक्क्यांहून अधिक असलेल्या अहिंदी जनतेने आपली भाषा ओंकारेश्वरावर दहन करून टाकायची आणि हिंदीभाषिकांना काहीच करावे लागणार नाही.

तर्कवादी's picture

16 Apr 2022 - 7:16 pm | तर्कवादी

हिंदीच्या सक्तीला विरोध आहे तो याच कारणामुळे... खरंतर हिंदी भाषिक अनेक राज्यात आहेत. ते तिथली स्थानिक भाषा शिकत , त्या भाषेबद्दल आदर व आपुलकी दाखवत हळूहळू स्थानिकांच्या मनातही हिंदीबद्दल आस्था निर्माण करु शकतात.. पण "आमचीच भाषा ही श्रेष्ठ" या गंडात असलेले बहुसंख्य हिंदी भाषिक (काही सन्माननीय अपवाद नक्कीच असतील) हे करु शकणार नाहीत म्हणून सक्ती करण्याची वेळ येते..

चेतन सुभाष गुगळे's picture

16 Apr 2022 - 6:41 pm | चेतन सुभाष गुगळे

केंद्र सरकारच्या कामकाजाची अधिकृत भाषा हिंदी असेल तर मान्यही करु.. पण म्हणून अन्य भाषा संपवायच्या का ? अन्य भाषा बोलायच्या नाहीतच का ?

स्थानिक भाषेतून शिक्षण मग, स्थानिक भाषेतील संस्थळांचा देशातील वापर (यात मिसळपावपण आले हं) , स्थानिक भाषेतीलप्रसार माध्यमे, वृत्तपत्रे आणि सरतेशेवटी स्थानिक भाषेतून बोलायलाही बंदी घालतील.. स्थानिक भाषेतून बोलणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरवतील.. मग हिंदी राष्ट्रभाषा आहे म्हणत हे सगळं पण चालवून घ्यायचं का ? स्थानिक भाषांचं अस्तित्वच नको आहे का हिंदी भाषकांना ?

स्थानिक विरुद्ध हिंदी असा रंग देऊ नये. हिंदी विरुद्ध इंग्रजी असे ते आहे. दोन भिन्नभाषिक लोकांनी परस्पर संवाद साधण्याकरिता इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे आवाहन आहे.

यात सक्ती नाही. स्थानिक भाषेची गळचेपी तर अजिबात नाही. दोन मराठी भाषिकांनी मराठीत बोलू नये किंवा दोन तमिळ भाषिकांनी तमिळमध्ये बोलू नये असे सांगत नाहीयेत अमित. फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहे.

आपली स्थानिक भाषा + एक अजून एक भाषा (ज्यांना आपली स्थानिक भाषा येत नाही त्यांच्यासोबत दैनंदिन व्यवहारात संवाद साधण्याकरिता) अशा दोन भाषा येणे गरजेचे असेल तर ही दुसरी भाषा शिकायला सोपी अशी कोणती आहे? अर्थातच हिंदी. इंग्रजी तरी प्रयत्नपुर्वक शिकावी लागती तरी परिणामकारकरीत्या बोलता येत नाही ती नाहीच. जे हिंदी चित्रपट / दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम (मनोरंजन + वृत्त) पाहतात त्यांना हिंदी शिकावी लागतच नाही. आपोआपच येते. मला शाळेत फक्त ५ वी ते ७ वी हे तीनच वर्षे हिंदी हा एक १०० गुणांचा विषय होता. तरीही मी सहजपणे इतरांसोबत हिंदीत संवाद साधू शकतो.

५ वी १० वी इंग्रजी हा १०० गुणांचा विषय आणि पुढे महाविद्यालयात सर्वच विषय इंग्रजी भाषेतून शिकलो तरी इतरांसोबत इंग्रजीत संवाद साधताना एक अवघडलेपण वाटते. एकेक शब्द मनात अनुवाद करुन मग मनातल्या मनात काळ बरोबर आहे की नाही हे ठरवत वाक्य जुळवत बोलावे लागते आणि तरीही चूका होतात. हिंदीत बोलताना कितीही चूका केल्यात तरीही अपराधीपण वाटत नाही.

इंग्रजी बोलताना एक जरी चूक झाली तरी आपल्याला फाशीची शिक्षा होईल इतके प्रचंड अपराधीपण वाटते. एक तर इंग्रजीतले ते हॅव बीन / हॅड बीन असे परफेक्ट टेन्स धरून एकूण बारा काळ, मग आता आपण प्रेसेन्ट परफेक्ट मध्ये बोलायचे की सिंपल पास्ट मध्ये की पास्ट परफेक्ट मध्ये की पास्ट कंट्यूनिअस की पास्ट परफेक्ट कंट्यूनिअस हा घोळ काही केल्या संपत नाही. पॅसिव्ह व्हॉईस / इंडायरेक्ट स्पीचमध्ये तर अजूनच दडपण येते. उच्चारांबाबत तर नवीनच गोंधळ दिसतो आहे. पूर्वी आम्ही कॉस्च्यूम, शेड्यूल, कोच असे शब्द उच्चारायचो आता तेच म्हणे कॉस्ट्यूम, स्केड्यूल, काऊच असे उच्चारले जातात. इतकंच उच्चारांकरिता वापरले जाणारे इंग्रजी शब्द प्रोनाउंन्सिएशन आणि अ‍ॅक्सेंट यांच्या उच्चारातही अनेक ठिकाणी तफावत आढळते.

दक्षिण भारतीय लोकांचं एक बरं आहे ते चूकीचं इंग्रजीही सर्रास बोलतात आणि ते देखील प्रचंड आत्मविश्वासाने. त्यांचे इंग्रजी शब्दांचे उच्चार हा तर स्वतंत्र ग्रंथाचा विषय होईल.

हां इंग्रजी ही लेखनाकरिता बरीच सुलभ भाषा आहे असे खात्रीने म्हणता येईल. विशेषतः आता लॅपटॉप वर टायपिंग करायचं असतं तेव्हा तर स्पेल चेक ग्रामर चेक आणि डिक्शनरी सोबत असताना तर अगदीच विल्यम शेक्स्पीअर इतकं नाही तरी शशी थरूर यांच्या तोडीचं इंग्रजी देखील अनेक भारतीय लोक लिहू शकतात.

समोरच्याला आपला मुद्दा समजेल आणि तो आपल्याला उचित प्रतिसाद पाठवेल व तोही पुन्हा आपल्याला समजेल इतपत कार्यालयीन इंग्रजी वाचन लेखन बहुतेक सर्व डेस्क जॉब असणार्‍या नोकरदार मंडळींना येत असावं असा अंदाज आहे.

नोकरीकरिता अर्ज, वस्तू खरेदी करिता चौकशी - प्रत्युत्तरात माहितीपत्रक दरपत्रक कोटेशन, त्यानंतर पुढे कस्टमर कंप्लेंट - रिझोल्यूशन याकरिता करावं लागणारं रिटन कम्यूनिकेशन इंग्रजीत फारच सुलभ आणि विनासायास होतं.

हेच हिंदीत करायचं म्हंटलं तर प्रचंड कटकटीचं होईल.

आणि तोंडी करायचं ठरलं तर नेमकं उलट म्हणजे इंग्रजीत अवघड आणि हिंदीत तूलनेने सुलभ. स्थानिक भाषिक अर्थातच सर्वोत्तम पण अनेकदा मी वस्तू महाराष्ट्रात वापरतोय आणि कंपनीचं हेड ऑफिस बेंगलोरमध्ये आहे अशा वेळी मला कन्नड येत नाही आणि विक्रेत्याला मराठी येत नाही तर इंग्रजीपेक्षा बोलायला मला हिंदी सोपी पण जर तो इंग्रजी किंवा कन्नडमध्येच बोला असं अडून राहिला तर मग मी तोंडी ऐवजी लेखीचा आग्रह धरेल. कारण इंग्रजी बोलताना चूका होऊ शकतात आणि मग पुढे त्याचा परिणाम अपेक्षित सोल्यूशन मिळण्यात होऊ शकतो. लेखीमध्ये इंग्रजीत चूक होण्याची शक्यता तूलनेने कमी आहे.