अरबी समुद्रावर टेहळणी

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in काथ्याकूट
3 Apr 2022 - 12:07 pm
गाभा: 

भारतीय नौदलाच्या हवाई शाखेत नव्या तुकडीचा – आयएनएएस 316 (INAS 316) समावेश गेल्या 29 मार्चला करण्यात आला आहे. या तुकडीत सागरी टेहळणी करणाऱ्या P-8I या दीर्घपल्ल्याच्या विमानांचा समावेश आहे. गोव्यात दाभोलिममध्ये असलेल्या नौदलाच्या हवाईतळावर (आयएनएस हंसा) ही तुकडी तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे अरबी समुद्राची अधिक प्रभावीपणे टेहळणी करणे शक्य झाले आहे. भारतीय नौदलात सध्या एकूण 12 P-8I विमाने सामील करण्यात आलेली आहेत.

किनाऱ्यापासून दूरपर्यंत उड्डाण करून टेहळणी करण्याची क्षमता असलेले P-8I विमान पाणबुडीविरोधी अत्याधुनिक युद्धप्रणालीने सज्ज आहे. या विमानांचा भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वापरकर्ता आहे. हिंदी महासागरीय क्षेत्रात अलीकडील काळात घडत असलेल्या विविध घडामोडींमुळे भारताच्या सुरक्षेसमोर आव्हानं निर्माण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर P-8I विमाने भारतीय नौदलाची टेहळणी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवत आहेत. भारतासाठी हिंदी महासागर सामरिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा असल्यामुळे त्यात होणाऱ्या प्रत्येक हालचालीबाबत जागरूक राहणं गरजेचं झालेलं आहे. विमानाचा वेग अन्य वाहतूक साधनांपेक्षा जास्त असल्यामुळे ते दूरवरच्या प्रदेशापर्यंत कमीतकमी वेळेत पोहचू शकते. विमानाच्या या वैशिष्ट्यामुळे भारतीय नौदलाला P-8I विमानाच्या मदतीने दूरवरच्या प्रदेशावर टेहळणी करणे, तिथून निर्माण होणारे धोके त्वरित ओळखणे, एखाद्या प्रदेशातील हालचाली टिपून त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यांच्याबाबत तितक्याच त्वरेने योग्य तो निर्णय घेणे शक्य होते. P-8I विमानांवर बसवलेल्या विविध यंत्रणांच्या मदतीने ही कार्ये झटपट पार पाडता येतात.

‘हिंदी महासागरातील मुख्य नाविकशक्ती’ या नात्याने या क्षेत्रात सुरक्षा, शांतता आणि स्थैर्य राखण्याची मुख्य जबाबदारी भारतीय नौदल पार पाडत आहे. त्या कार्यातही P-8I महत्वाची भूमिका बजावत आहेत. भारतीय नौदलाचा हिंदी महासागरातील दबदबा वाढवण्यात या विमानांची मदत होत आहे. ही विमाने ओमान, सेशल्स, मॉरिशस यांसारख्या देशांनाही रसद आणि त्यांच्या सागरी क्षेत्राची टेहळणी अशा कारणांनी भेटी देत आहेत.

भारतीय नौदलासाठी अमेरिकेच्या Boeing कंपनीकडून 8 P-8I विमाने खरेदी करण्यासंबंधीचा करार जानेवारी 2009 मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर भारतीय नौदलाच्या गरजांनुरुप घडवलेल्या या विमानांपैकी पहिले विमान डिसेंबर 2012 मध्ये भारताकडे सुपूर्द करण्यात आले होते. त्या करारात आणखी 4 विमाने खरेदी करण्याचाही पर्याय ठेवण्यात आला होता. त्या 4 विमानांच्या खरेदीसाठीचा 1 अब्ज अमेरिकन डॉलर किंमतीचा करार जुलै 2016 मध्ये करण्यात आला होता. त्यानुसार भारतीय नौदलाला मिळालेल्या त्या 4 विमानांचा समावेश नव्या तुकडीत (316) मध्ये करण्यात आला आहे.

P-8I हे विमान सतत दहा तास हवेत उडत राहू शकते. मोहिमेवर असताना या विमानात जहाजभेदी हार्पून ब्लॉक-2 ही क्षेपणास्त्रे, MK-54 हे पाणतीर (torpedo), पाणसुरुंग (Depth Charges), Rockets इत्यादी शस्त्रसामग्री बसवली जाते. या विमानावर बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक रडार संवेदकांच्या मदतीने शत्रुच्या हालचाली लक्षात आल्या की, त्या विरोधात तातडीने कारवाई करता येते. या साधनसामग्रीबरोबरच या विमानावर अत्याधुनिक संवेदक, संपर्क यंत्रणा आणि अन्य साधनेही बसवलेली आहेतच. त्याचबरोबर या विमानावर स्वसंरक्षणासाठीही काही यंत्रणा बसवलेल्या आहेत. त्यामुळे शत्रूच्या इंफ्रारेड क्षेपणास्त्रांपासून याला स्वत:चा बचाव करता येतो. या सगळ्या शस्त्रसाठ्यासह उड्डाण करताना याचे वजन सुमारे 85 टन भरते.

ताशी 789 किलोमीटर वेगाने उडणाऱ्या P-8I चा पल्ला 1,200 सागरी मैलांपर्यंत (2,222 किलोमीटर) आहे. आपल्या मोहिमेच्यावेळी प्रत्यक्ष लक्ष्याच्या ठिकाणी चार तास टेहळणी करत उडत राहण्याची याची क्षमता आहे. या विमानाच्या संचालनासाठी 9 कर्मचाऱ्यांची गरज असते. याच्या कॉकपीटमध्ये बसवण्यात आलेल्या IFF यंत्रणेच्या मदतीने रडारवर दिसणारे लक्ष्य कोणत्या प्रकारचे आहे, म्हणजे मित्र आहे की शत्रू, ते जलदगतीने ठरवता येते. यावरच्या Raytheon APY-10 या टेहळणी रडारच्या मदतीने हे विमान कोणत्याही प्रकारच्या हवामानात, दिवसा आणि रात्रीही प्रभावीपणे कार्यरत राहू शकते.

Link
https://avateebhavatee.blogspot.com/2022/04/blog-post_3.html

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

3 Apr 2022 - 12:27 pm | Nitin Palkar

अतिशय छान माहिती. संरक्षणाच्या बाबतीत आपण अधिकाधिक सुसज्ज होत आहोत ही नक्कीच दिलासा देणारी बाब आहे.

पराग१२२६३'s picture

3 Apr 2022 - 10:59 pm | पराग१२२६३

धन्यवाद

नगरी's picture

3 Apr 2022 - 3:11 pm | नगरी

पराग मी तुझा पंखा आहे

पराग१२२६३'s picture

3 Apr 2022 - 10:58 pm | पराग१२२६३

धन्यवाद.

आकाशात दिसलेल्या अग्निशलाका आणि सापडलेले काही अवशेष (जे आठ किलो जड गोळे/ सिलिंडर, दहा फूट आकाराची धातूची रिंग अशा स्वरुपाचे आहेत) हे घडून दोन दिवस होताहेत. लोकच अंदाज लावताहेत. एलियन मीम्स, जोक्स यांचा पूर आहे. पण अधिकृत गंभीर फारसे निवेदन दिसले नाही. केवळ चंद्र्पूरसारख्या आडभागातल्या गावात पडले म्हणून का? ते घातक नाही का?
अगदी जे काही तज्ञ मते व्यक्त करताहेत त्यांचाही टोन "उपग्रहाचे अवशेष.. बाकी काही नाही.. त्यात कही विशेष नाही.." असा भासला.

गर्दीच्या जागी, मिल्ट्री लोकशनला किंवा व्हिआयपी घरांच्या आवारात पडला असता तर इतके सहज घेतले गेले असते का?

की कोणाच्या टेहळणीत हे आलेलेच नाही? की आलेय पण "बडे बडे देशोंमें ऐसे छोटे छोटे पार्टस गिरते रहेते है" टाईप बेपर्वा अप्रोच आहे?

अधिकृत इस्रो, सरकार, डिफेन्स यांजकडून काही प्रकटन आले असल्यास वरील प्रतिसाद बाद समजावा.

तुषार काळभोर's picture

4 Apr 2022 - 11:27 am | तुषार काळभोर

किमान

  • 'काहीतरी' आकाशातून पडलं आहे, आम्ही शहानिशा करत आहोत.
  • असं काहीही झालेलं नाही, तो व्हिडिओ खोटा आहे/आपल्या भागातील/देशातील नाही.
  • आम्हाला असं काही 'डिटेक्ट' झालेलं नाही.

असं काहीतरी निवेदन राज्य/केंद्रशासन्/लष्कर्/इस्रो अशा शासकीय स्रोताकडून आलं असतं, तर अशी संदिग्धता राहिली नसती.

किंवा
कदाचित 'ते' काय होतं, हे माहिती असावं, पण जनतेने 'पॅनिक' होऊ नये, म्हणून शांतता पाळली जात असेल.

किमान असं/ यापैकी काहीतरी प्राथमिक निवेदन तरी हवं होतं .. कुडन्ट अग्री मोअर.

कदाचित 'ते' काय होतं, हे माहिती असावं, पण जनतेने 'पॅनिक' होऊ नये, म्हणून शांतता पाळली जात असेल.

अरे देवा.. असंही असेल??

तुषार काळभोर's picture

4 Apr 2022 - 12:03 pm | तुषार काळभोर

असायला काहीही असू शकतं! :)

शुद्ध कॉन्स्पिरसी थियरी :
आपलं मिसाइल 'चुकून' पाकिस्तानात जाऊ शकतं. तिथे ते निर्जन स्थळी 'नुकसान न करता' पडतं. पाकिस्तान्/चीन्/अमेरिका कोणीच काही म्हणत नाही.
पण....
चीनच्या उपग्रह प्रक्षेपकाचे काही भाग 'चुकून' निर्जन स्थळी 'नुकसान न करता' विदर्भात पडतात. आपली शासकीय यंत्रणा काहीच म्हणत नाही.

अळी मिळी गुप चिळी!

शाम भागवत's picture

4 Apr 2022 - 11:28 am | शाम भागवत

अधिकृत इस्रो, सरकार, डिफेन्स यांजकडून काही प्रकटन आले असल्यास वरील प्रतिसाद बाद समजावा.

मी पण त्याचीच वाट पाहातोय.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Apr 2022 - 10:37 pm | अत्रुप्त आत्मा

छान माहिती.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

5 Apr 2022 - 10:56 am | ॲबसेंट माइंडेड ...

लेख आवडला.

निनाद's picture

5 Apr 2022 - 11:07 am | निनाद

माहिती चांगली आहे. ही विमाने तशी तूलनेने अगदी नवीन आहेत (२००९) त्यामुले तंत्रज्ञानही नवेच आहे.

नॉर्थरोप ग्रुमन MQ-४C ट्रायटन UAV हे P-8I या सागरी गस्ती विमानांना पूरक म्हणून वापरले जाऊ शकतील असे दिसते. असे झाले तर भारत आधुनिक तंत्र वापरणारा देश ठरेल यात शंका नाही. सागरी शोध आणि बचाव मसागरींसाठी ही हे ड्रोन्स उपयोगी आहेत.

सुबोध खरे's picture

6 Apr 2022 - 7:19 pm | सुबोध खरे

RQ-4A Global Hawk: The $220 mn drone

याची किंमत भयंकर महाग आहे एकाची किंमत १६५० कोटी आहे.

https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/rq-4a-global-hawk...

आणि पोसायडॉन P ८ I ची किंमत ३०० कोटी आहे.

Why India, Japan Continue To Reject American Global Hawk Drones?

https://eurasiantimes.com/why-india-japan-continue-to-reject-american-gl...

सुबोध खरे's picture

6 Apr 2022 - 7:20 pm | सुबोध खरे

आणि पोसायडॉन P ८ I ची किंमत ३००० कोटी आहे असे वाचावे.