कोकण ट्रिप

Primary tabs

विदर्भनिवासी's picture
विदर्भनिवासी in भटकंती
26 Mar 2022 - 5:40 pm

नमस्कार ,
एप्रिल मध्ये सहकुटुंब कोकण ट्रिप करायचा विचार सुरु आहे .. कोकणात कधीही गेलेलो नसल्याने आणि मुलांनी पण समुद्र पाहीला नसल्याने साधारण कोल्हापूर वरून दर्शन घेऊन पूर्ण चार दिवस कोकण मध्ये फिरायचा प्लॅन आहे .. एप्रिल मध्ये साधारण वातावरण कसे असते आणि सर्वात चांगले बीच कोणते आहे परत येताना गणपतीपुळे वरून पुणे किंवा अहमदनर वरून शिर्डी करून परत विदर्भात येणार आहे तरी राहण्याची ठिकाण .. खरेदी.. हापूस कुठे मिळतील . चांगले रोड आणि काय खबरदारी घ्यावी याचे मार्गदर्शन करावे. धन्यवाद

प्रतिक्रिया

कंजूस's picture

26 Mar 2022 - 6:52 pm | कंजूस

चार दिवस म्हणजे फारच कमी आहेत।
बहुतेक स्वत:च्या वाहनाने फिरणार असाल त्यामुळे बऱ्याच जागा वाटेतच पाहता येतील.
कोकणचे विडिओज पाहा म्हणजे काय आहे आणि काय नाही याची कल्पना येईल. कोकणातले बरेच किनारे म्हणजे पाण्यात उतरण्यास धोकादायक आहेत. स्थानिक लोकांना विचारूनच उतरा.
हॉटेल्स : त्यांचा रेट बऱ्याचदा रुमवर ( रुमचे भाडे ) नसून प्रति व्यक्ती दोन जेवणे,एक नाश्ता ,दोन चा आणि आंघोळीसाठी गरम पाणी (!) असा असतो. किंवा ते खात्री करा. याप्रमाणे आयोजन करावे. एखादे जेवण बाहेर घेतल्यास काय हेही विचारा.

प्रवास आणि राहाणे - एखाद्या हॉटेलवर सकाळी लवकर तयार होऊन नाश्ता करून आठच्या आत निघावे प्रवास आणि वाटेतली एक दोन ठिकाणे ( हॉटेलवाल्याकडून माहिती घेऊन) पाहात आणि बारा एक पर्यंत ( शंभर ते दोनशे किमि)दुसऱ्या एका गावच्या हॉटेलात मुक्काम टाका. संध्याकाळी त्या गावचा समुद्र आरामात पाहावा.

घाटमार्ग :
कोल्हापुरातून तीन, (कुडाळ,सावंतवाडी, रत्नागिरी)

महाबळेश्वरातून एक, ( चिपळुण,गुहागर भाग)

पौडफाटा मुळशी धरणमार्गे एक, (श्रीवर्धन, दिवेआगर)

लोणावळा खोपोली पेण एक(अलिबाग, रेवदंडा.)

बाकी आंबे हे दक्षिण कोकण ते उत्तर कोकण असे एप्रिलपासून जूनपर्यंत तयार होत जातात. पिकलेले आंबे बाजारात थोडेथोडे घेणे उत्तम.

((सध्या बसेस बंद असल्याने रिक्षावाल्यांसाठी राजापुरची गंगा रोज वाहते.))

लई भारी रोड ट्रीप होणार!
चिक्कार फोटो काढा, घाई करू नका, पॅकेज ट्रीप सारखं 'पुढे chala' करू नका, चार दोन जागा कमी दिसल्या तरी चालतील. आणि ट्रीप झाल्यावर भरगच्च वृत्तांत मिपावर नक्की टाका.
समुद्रकिनारा पाहणे, अनुभवणे याला प्राधान्य असल्याने जास्त वेळ समुद्रावर घालवा. दिवसा प्रवास, दुपारनंतर रात्रीपर्यंत समुद्रकिनारा आणि रात्री हॉटेलवर मुक्काम करता येईल. एप्रिल असल्याने मनसोक्त आंबे खा. मुलं बरोबर असल्याने निवांत शांत किनाऱ्यावर बोअर होऊ शकतात. प्रसिद्ध किनारे पाहा, तिथे मुलांचा वेळ चांगला जाईल.

आणि परत एकदा फोटोंसह भरगच्च वृत्तांत टाका. कोकण ट्रीप विषयी वाचताना नेहमीच काहीतरी नवीन गवसतं!

नागपूर - भुबनेश्वर/पुरी रेल्वेने जाणे अधिक स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. ( दुपारी दोन ते सकाळी सात)
( माझे मत.)

सिरुसेरि's picture

27 Mar 2022 - 12:17 am | सिरुसेरि

निवळी किंवा हातखंबे च्या फाट्यावर हापुस आंबे चांगले मिळतील . अनेक प्रवासी या फाट्यावर गाडी थांबवुन आंबे खरेदी करतात .

विदर्भनिवासी's picture

27 Mar 2022 - 9:27 am | विदर्भनिवासी

सगळ्यात चांगले बीच कोणते या आहे

कंजूस's picture

27 Mar 2022 - 10:18 am | कंजूस

पण उत्तर भागाकडे रेवदंडा वगैरे बीच काळे आहेत. दक्षिणेचे पांढरे. पण जिथे वाटर सपोर्ट्स असतात तिथे खोल पाणी असते. थोडाच भाग बरा असतो. चांगला उतार असणारे बीच डुंबायला चांगले.
कुडाळ तालुक्यात देवबाग, भोगवे, निवती एके काळी गाजलेले पण आता समुद्राने किनारा खाल्ला आहे. ( Konkanheartedgirl channel पाहा. मराठीत)
(Visa2 explore channel konkan playlistपाहा.हिंदी)

काही बीचेस चांगले आहेत पण जोडसोयी ( हॉटेले वगैरे) नसल्याने जात नाहीत. रत्नागिरीच्या पुढेमागे भाट्ये,अरे वारे आहे. पण हॉटेल्स महाग वाटतील.

एप्रिल मेमध्ये सकाळी आठ साडेआठनंतर संध्याकाळी पाचपर्यंत ऊन फार असते.
विडिओ पाहा, कल्पना येईल.

चौथा कोनाडा's picture

28 Mar 2022 - 5:12 pm | चौथा कोनाडा

तुम्ही कोल्हापुरहून कोकणात उतणार आहात तर तुम्हाला येतायेता गुहागर बीच बेस्ट पडेल.
ग'पुळेचा बीच डुंबण्यासाठी धोकादायक आहे !

beahc kolm124

वर्षामागून वर्षे जात आहेत तसतशी कोंकणात सर्वच किनार्यांची वाट लागत आहे. रत्नागिरी किनारा एकेकाळी स्वच्छ सुंदर असे. पर्यटन वाढीस लागणे चांगले पण प्रदूषण शतगुणित, आणि प्रशासन पुरेसे पडत नसल्याने गर्दी म्यानेज होत नसावी. अगदी ग.पुळेचेही लोणावळा, बुशी डॅम होईल की काय असं वाटतं. लोक अक्षरश: पदार्थ खाऊन प्लास्टिक प्लेट्स, पिशव्याही उचलत नाहीत. आता महाराष्ट्र किनारपट्टी रेकमेंड करवेनाशी झालीय. त्यातल्या त्यात अगदी दक्षिणेला मोचेमाड वगैरे निर्जन बीच उरले आहेत.

गणपतीपुळे बीचच्या धोकादायकपणाबद्दल अंशत: सहमत. पोहता येत नसणार्याला बळेच ओढून आत नेले तर हा धोका अधिक. काही सेफ जागा आहेत. त्या स्थनिकच सांगू शकतील.

आताशा एकूण तिकडे जाणे कमी झालेय वरील कारणांमुळे. त्यामुळे अद्ययावत माहिती देऊ शकणार नाही.
मालवण वेन्गुर्ला साईड नार्थ गोवा मान्ड्रे, मोर्जीपर्यंत विचार करा.

कर्नाटक पर्यटन विभाग आपल्याहून फार उत्तम आहे. नार्थ कर्नाटक बीचेसही ट्राय करु शकता.
सहलीसाठी शुभेच्छा.

सौंदाळा's picture

28 Mar 2022 - 6:22 pm | सौंदाळा

दक्षिणेला मोचेमाड वगैरे निर्जन बीच उरले आहेत

सागरेश्वर वेन्गुर्ला, मोचेमाड, आरवली, शिरोडा आणि रेडी अप्रतिम किनारे आहेत. अजुनही सुंदर आहेत. बहुसंख्य पर्यटक मालवण पर्यंत येतात आणि नंतर डायरेक्ट गोव्यात जातात त्यामुळे या मधल्या पट्ट्यात पर्यटक जवळपास नसतात त्यामुळे इकडे जायला बरं वाटतं.

गवि's picture

28 Mar 2022 - 6:28 pm | गवि

अगदी सहमत.

उरले आहेत म्हणजे चांगले टिकले आहेत अशा अर्थानेच म्हटले होते

सरिता बांदेकर's picture

28 Mar 2022 - 10:09 pm | सरिता बांदेकर

छान प्लॅन आहे. कोल्हापूरला वूडलॅंड हॅाटेल चांगले आहे. फोन करून बूक करा.
तिकडून रत्नागिरी आणि गणपतीपुळे करता येईल. रत्नागिरीत थिबा पॅलेस पण छान आहे. त्यामुळे दोन दिवस सहज जातात. मग गणपतीपुळे, पावस पण छान आहे.
कोकणातली गांवं तशी किमीमध्ये बघितली तर जवळ वाटतात पण घाट रस्ता असल्याने वेळ जास्त लागतो.
आंबा, फणसच्या जोडीला ओल्या काजूची ऊसळ आवर्जून खा.
रातांबे ज्यापासून कोकम बनवतात ते पण खा.

+91 91751 61954

यानंबरवर तुम्ही वूडलॅंड बूक करू शकता.
मी आहे आता कोल्हापूरला. हे हॅाटेल चांगलं आहे.

नाटक,कथा कादंबऱ्यांत पेंडसे, दळवी,कांबळी यांनी मांडलेलं कोकण सुंदरच आहे. पण नायगावकर म्हणतात तसं " निसर्ग सुंदरच पण मध्ये झाडं येतात."

श्वेता२४'s picture

29 Mar 2022 - 11:57 am | श्वेता२४

विसा टू एक्सप्लोअर नावाचे यूट्यूब चॅनेल आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी कोस्टल महाराष्ट्रची ट्रीप केली आहे त्याचे भाग पाहा. तुम्हाला तूमचे नियोजन करण्यासाठी ते अगदी उपयोगी पडेल. काय पाहावे, कुठे राहावे, कसे जावे व काय खावे या सगळ्याची मस्त माहिती मिळेल त्यात.

सावंतवाडीला थांबून रेडीचा गणपती, तिराकोल किल्ला, आरवलीचा वेतोबा, महाराष्ट्राची हद्द पार करून गोव्याचा अरंबोल बीच पाहून परत सावंतवाडी. नंतर वेंगुर्ला, खवणे बिच ,निवती, भोगवे बिच, सिंधूदुर्गचा किल्ला इ.
खालील लिंक वर वाचू शकता
तळ कोंकण २०१८ : भाग १
तळ कोंकण २०१८ : भाग 2

वेळणेश्वरचे MTDC रिसॉर्ट छान आहे. येथील बिच व मंदिर खूप सुंदरआहे. हेदवीचे दशभूजा गणेश मंदिर, जयगडचा किल्ला पाहता येईल.
खालील लिंक वर वाचू शकता
वेळणेश्वर २०२०

या प्रतिसादातल्या प्लानशी अत्यंत सहमत. तुम्ही एक्सपर्ट प्रवासी आहात.

वेळणेश्वर यात बसवणे कठीण आहे.

तळकोंकण आणि उत्तर गोवा एका ट्रिपमधे उत्तम होऊन जाईल.

कपिलमुनी's picture

30 Mar 2022 - 7:36 am | कपिलमुनी

कोल्हापूर हून तुम्ही चिवला बीच ला जा, तिथे तिथे जवळपास चिवला, देवबाग , त्सुनामी आयलंड, तारकर्ली , सिंधुदुर्ग किल्ला हे बघण्यासारखे आहे. यामध्ये २ पूर्ण दिवस जातील नंतर दोन ऑप्शन आहेत, गोव्याकडे किंवा रत्नागरीकडे येणे , रत्नागिरीस अलात तर येताना विजयगड, कुणकेश्वर , पूर्णगड करून गणपती पुळे मुक्कामी यावे मग दर्शन घेऊन रत्नागिरीला यावे

king_of_net's picture

31 Mar 2022 - 9:04 pm | king_of_net

+++ ११११११

कंजूस's picture

30 Mar 2022 - 9:47 am | कंजूस

गोवा ट्रिप करणे.

पाटलांचा मह्या's picture

30 Mar 2022 - 7:40 pm | पाटलांचा मह्या

तुम्ही जर प्रथमच कोकणात जात असाल तर मी म्हणेन एकाच बिच वर जा आणि मनसोक्त समुद्र अनुभवा. जास्त जागा, मन्दिरे फिरत बसू नका. एप्रिल मध्ये जात आहात, अतिशय ऊन असतं. त्यामुळे दिवसाचा प्रवास टाळा. कोकणात रात्री प्रवास करणे संयुक्तिक नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी राहा आणि एन्जॉय करा. महत्वाच म्हणजे एसी हॉटेल बुक करा. आंबे कुठूनही घेऊ शकता.

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2022 - 12:16 pm | चौथा कोनाडा

तुम्ही जर प्रथमच कोकणात जात असाल तर मी म्हणेन एकाच बिच वर जा आणि मनसोक्त समुद्र अनुभवा. जास्त जागा, मन्दिरे फिरत बसू नका. एप्रिल मध्ये जात आहात, अतिशय ऊन असतं. त्यामुळे दिवसाचा प्रवास टाळा. कोकणात रात्री प्रवास करणे संयुक्तिक नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी राहा आणि एन्जॉय करा. महत्वाच म्हणजे एसी हॉटेल बुक करा. आंबे कुठूनही घेऊ शकता.

+१, महत्वाचे


दुर्लक्ष न करण्याजोगे !

कंजूस's picture

31 Mar 2022 - 12:30 pm | कंजूस

आपण एकटे जात नाही. बरोबर कुटुंबातील तीन चार जण असतात. प्रत्येकाच्या सुचवण्या आणि इच्छा. मग काय होते धावपळ.

सुबोध खरे's picture

31 Mar 2022 - 8:11 pm | सुबोध खरे

एकाच बिच वर जा आणि मनसोक्त समुद्र अनुभवा.

आपला सल्ला योग्य असला तरीही विदर्भातून ७००-८०० किमी वरून येणाऱ्या माणसासाठी हा कितपत व्यवहार्य आहे हि शंका आहे.

कारण एवढा प्रवास करून सहकुटुंब यायचं आणि एकच समुद्र किनारा पाहून परत जायचं.

दिवसा प्रवास टाळा हे काही पटलं नाही. तुमची गाडी वातानुकूलित असेल तर बाहेरच्या वातावरणाचा आपल्यावर परिणाम होत नाही.

नुकताच मी जोधपूर आणि जैसलमेर दौरा केला तेंव्हा उत्तम वातानुकूलन असेल तर दिवस प्रवास सुद्धा त्रासदायक होत नाही. उलट बाहेरील देखावे उत्तम दिसतात शिवाय दिवस मोठा असल्याने बऱ्याच गोष्टी पाहून होतील.

बाकी मंदिरे किती पाहावी हे आपल्या श्रद्धेवर आणि आपल्याला वास्तुकलेमध्ये किती रस आहे यावर अवलंबून आहे.

कोकणात अनेक मंदिरे अतिशय सुंदर आणि वास्तुकलेचा नमुना म्हणून पाहावीत अशी आहेत.

https://shrikanchanhotels.com/top-7-famous-temples-in-konkan-you-must-vi...

हरिहरेश्वर, कुणकेश्वर, गणपतीपुळे, श्री क्षेत्र परशुराम, श्री केशवराज (आसूद) (या मंदिरापेक्षा तेथे जाण्याचा रस्ता अतिशय निसर्गरम्य आहे).

https://www.tripadvisor.in/Attraction_Review-g297650-d3913238-Reviews-Pa...

लक्समिनारायण मंदिर वालावल http://sindhudurginitiative.blogspot.com/2013/02/laxminarayan-mandir-wal...

धामापूर तलाव आणि त्याच्या काठी असलेले अत्यंत पुरातन असे श्री भगवती देवीचे मंदिर https://www.nisargramyakonkan.com/2018/02/dhamapurtalav-sindhudurg.html

कंजूस's picture

1 Apr 2022 - 7:08 am | कंजूस

कुठेही जा पण आल्यावर विचारतात "इकडे नाही गेलात? किती छान आहे. . आम्ही गेलेलो." मग करायचे काय. आणखी पन्नास किमी गेलात तर आणखी एक नवीन जागा असते. राजस्थानात तर आहेच. चार ट्रिपा झाल्या तरी पन्नास टक्के राजस्थान बाकीच आहे. कोकणातही आहे. जमेल तेवढं पाहायचं. कारण वारंवार येणं होत नाही. जिथे गेलो तिथे तोंड उघडायचं -"आणखी जवळपास काय आहे ?"हे विचारायचं.

चौथा कोनाडा's picture

1 Apr 2022 - 12:16 pm | चौथा कोनाडा

बरोबर !
पण काय काय आणि किती किती बघणार हा प्रश्नच आहे !

विदर्भनिवासी's picture

31 Mar 2022 - 6:53 pm | विदर्भनिवासी

सर्व सभासदाच्या सूचनांचा फायदा नक्कीच होईल , वरती सुचविलेल्या प्रमाणे हॉटेल्स युट्यूब व्हिडिओस मॅप्स बघणं सुरु आहे , गाडी स्वतःची आणि स्वतः चालविणार आहे , रात्रीच्या प्रवासा बद्दल सावध केल्याबद्द्दल धन्यवाद . रात्रीचा प्रवास पूर्ण बंद असणार आहे , आणखी काही चांगली हॉटेल्स असतील तर सुचवा .गोवा सध्या तरी नाहीय , जेजुरी करून नगर कडे येण्याचा विचार आहे ( पुणे वगळून ). आणखी काही सूचना मार्गदर्शन असतील तर सुचवा . धन्यवाद

कंजूस's picture

31 Mar 2022 - 7:02 pm | कंजूस

https://youtu.be/9J8M8_fBesI
हॉटेल सन्मान ( मासे)