गाभा:
पाकिस्तानी विरोधी राजकीय पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांना हटवण्यासाठी संसदेत अविश्वास प्रस्तावाची मागणी केली आहे. पाकिस्तानच्या घटनेनुसार , नॅशनल असेंब्लीच्या बहुसंख्य सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाला मतदान केल्यास पंतप्रधान पदावरून इम्रान खानला जावे लागेल.
याला विरोध म्हणून इम्रान ने दहा लाख लोक इस्लामाबाद मध्ये जमवण्याचे ठरवले आहे. याला विरोध करायला विरोधी पक्षांनी लाँग मार्च सुरू करायचे ठरवले आहे.
त्यात सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या किमान २४ खासदारांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात संसदेच्या कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीमध्ये मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याचे उघडपणे जाहीर केले आहे.
या घटनेचे परिणाम काय आणि कसे असतील यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
प्रतिक्रिया
21 Mar 2022 - 9:22 am | निनाद
इम्रान खानच्या विरोधात मतदान करणारे २४ खासदारांची खासदारकी रद्द करावी असा एक विचार आला आहे. पण तसे केल्यास इम्रानचेच बहुमत धोक्यात येणार आहे. पक्षांतर केल्यानंतर पक्षांतर करणारे मतदान करण्यास पात्र आहेत की नाही याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मंत्री शेख रशीद अहमद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हा एक विनोदी इसम आहे हे वेगळे सांगायलाच नको!
21 Mar 2022 - 10:10 am | sunil kachure
अस्थिर राजकीय व्यवस्था असलेला शेजारी जास्त धोकादायक असतो.अस्थिर सरकार म्हणजे
अनियंत्रित लष्कर,अनियंत्रित कायदा आणि सुरक्षा.
लवकरात लवकर पाकिस्तान मधील राजकीय पेच सुटावा.
21 Mar 2022 - 10:32 am | निनाद
मौलवी फझल-उर-रहमान प्रमुख असलेली मुत्ताहिदा मजलिस-ए-अमल ही पाकिस्तानातील पुराणमतवादी, इस्लामवादी , धार्मिक आणि अतिउजव्या पक्षांचा समावेश असलेली राजकीय आघाडी आहे.
मुत्ताहिदा मजलिस-ए-अमल ( MMA), हा पक्ष हिंदुविरोधी भूमिका घेऊन सरकार आणि समाजाचे इस्लामीकरण केले पाहिजे अशी भूमिका घेतलेला आहे. ५ धार्मिक पक्षांची राजकीय आघाडी असून त्यांचा पाकिस्तानला एक खरे इस्लामिक कल्याणकारी राज्य बनवणे हा प्रमुख कार्यक्रम आहे.
मग याचा इथे काय संबंध?
तर हीच MMA राष्ट्रीय असेंब्लीमध्ये विरोधी पक्षाचे नेतृत्व करते!
म्हणजे इम्रान गेला तर हे लोक सत्तेवर येतील!
21 Mar 2022 - 10:35 am | निनाद
चूक झाली Shahbaz Sharif हे इथले विरोधी पक्षनेते आहेत.
21 Mar 2022 - 10:38 am | निनाद
नवाझ शरीफचा हा भाऊ! मियां मुहम्मद शाहबाज शरीफ - पंजाब चा ३ वेळा मुख्यमंत्री राहिला आहे.
24 Mar 2022 - 4:20 am | दिगोचि
याला दोन बायका आहेत आणि हा भावा इतकाच श्रीमन्त आहे. या वाक्याचा धाग्याशी काहीहि सम्बन्ध नसताना लिहावेसे वाटले. तरी क्षमस्व.
21 Mar 2022 - 11:15 am | मुक्त विहारि
कत्तल होणार ती गैर मुस्लिम लोकांचीच ...
24 Mar 2022 - 11:04 am | निनाद
त्यासाठीच आपण बारीक लक्ष ठेवले पाहिजे.
24 Mar 2022 - 10:44 am | निनाद
संयुक्त विरोधी आघाडीने पंतप्रधान इम्रान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावासाठी विनंती दाखल केली आहे .
आपण कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही असा इम्रान खान नी बुधवारी असा दावा केला. हा म्हणतो की त्याच्याकडे अजूनही असे पत्ते आहेत जे ते विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाच्या एक दिवस आधी खेळतील.
आता ही बढाई मारली आहे असे वाटते आहे. सोनिया गांधी ने मोदींवर आणलेल्या अविश्वास प्रस्तावाची भाषा आणि इम्रान खानची भाषा ही इतकी एक सारखी असल्याचे पाहून खरोखर आश्चर्य वाटते.
24 Mar 2022 - 10:52 am | निनाद
२०१८च्या नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीत काय झाले होते हे पण पाहिले पाहिजे.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ला सर्वाधिक मते मिळाली आणि सर्वाधिक जागा जिंकल्या.
प्रांतीय स्तरावर, PTI खैबर पख्तूनख्वा (KP) मध्ये सर्वात मोठा पक्ष राहिला
पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) ने सिंधमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले
बलुचिस्तान अवामी पार्टी (बीएपी) बलुचिस्तानमधील नव्याने स्थापन झालेला सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला
पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) (पीएमएल-एन) ने पंजाबमध्ये सर्वाधिक जागा घेतल्या
तरी त्रिशंकू संसदेचा निकाल लागला होता.
मग अनेक अपक्ष खासदार घोडे बाजार उपलब्ध झाले. ते पीटीआयमध्ये सामील झाल्यानंतर, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ सर्वात मोठा पक्ष बनला आणि सरकार स्थापन करण्यात सक्षम झाला.
24 Mar 2022 - 1:13 pm | कंजूस
पीएम नावालाच असतात. आणि घालवणार असा अंदाज आला की भारताची स्तुती सुरू करतात. मागच्या पीएमनी हेच केलं आहे.
पण या स्तुतीचा नक्की फायदा काय?
24 Mar 2022 - 1:58 pm | सुरिया
कुठल्याही परदेशी क्रिकेटपटूने विशेष्तः पाकीस्तान आणि आस्ट्रेलिया भारतीय क्रिकेटर्सची स्तुती केल्याची हेडलाईन वाचली कि ओळखायचे, तो परदेशी क्रिकेटर एकतर त्याच्या संघासोबत भारत दौर्यावर आलाय, किंवा एखाद्या भारतीय कंपनीचा अॅम्बॅसेडर झालाय अन्यथा आयपीएल मेध्ये खेळायला आलाय. पत्रकारही असले क्लिकबेट प्रश्न टाकून बातमी क्रिएट करण्यात हुशार असतात.
त्याच प्लेयर्सनी त्यांच्या देशात जाऊन अशी कौतुके केल्याचे उदाहरणे विरळा. पूस्तकात बिस्तकात उल्लेख असला तरी ते पुस्तक त्यांना भारतात खपवायचे असते. सो असल्या कुठल्याच स्तुतीने फारसे हुरळून जायचे नसते.
24 Mar 2022 - 4:57 pm | मुक्त विहारि
सहमत आहे
24 Mar 2022 - 7:23 pm | सुबोध खरे
प्रत्येक देशाचे एक सैन्य असते
पाकिस्तानात सैन्यासाठी एक देश आहे असे म्हटले जाते
25 Mar 2022 - 5:52 am | निनाद
पाकिस्तानच्या राजकारणावर पाकिस्तानी लष्कर नियंत्रण ठेवते हे खरे आहे. पण हे कसे केले जाते? आणि कुणीच त्या विरुद्ध काही करू का शकत नाही?
1 Apr 2022 - 5:23 am | निनाद
बरखा दत्तच्या पुस्तकाचा हवाला देत इम्रान खानने सांगितले की, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ पाकिस्तानी लष्करापासून स्वत:ला वाचवण्यासाठी नेपाळमध्ये पंतप्रधान मोदींना गुप्तपणे भेटायचे. खान म्हणाला, "बरखा दत्त यांच्या पुस्तकात असे नमूद केले आहे की ते (नवाज शरीफ) नेपाळमध्ये नरेंद्र मोदींसोबत स्वतःच्या सैन्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी गुप्त बैठका घेत असत."
हाफिज सईद + बरखा दत्त
बरखा दत्त बद्दल अनेक पाकिस्तानी दहशतवाद्यांना प्रेम आहे. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदने २०१६मध्ये एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बरखा दत्तचे कौतुक केले होते. “ भारत में बरखा दत्त जैसी लोग भी मौजूद हैं (पाकिस्तानके लिए) बहुत अच्छे हैं बात करनेवाले भी मौजूद हैं (भारतात बरखा दत्त सारखे पाकिस्तानसाठी चांगले असलेले पत्रकार देखील आहेत )” सईद तेव्हा म्हणाला होता.
इम्रानवर अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अविश्वास प्रस्तावावर चर्चा न करता पाकिस्तानी संसद रविवारपर्यंत तहकूब केली गेली आहे. सत्ताधारी आघाडीतून मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट बाहेर पडल्याने पीटीआयच्या नेतृत्वाखालील सरकार संसदेत अल्पसंख्याक झाले आहे.
1 Apr 2022 - 5:33 am | निनाद
खरे तर मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटमध्ये फूट पडल्यामुळे हा पक्ष अस्तित्वात आला आहे. पाकिस्तान रेंजर्स या निमलष्करी संघटनेने दिलेले आदेश पाळून फारुख सत्तार यांनी वेगळा पक्ष म्हणून त्याची स्थापना केली होती.
मूळ मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटला तर पाकिस्तान पासून स्वातंत्र्य हवे होते. त्यांना जिनापूर हे स्वतंत्र राष्ट्र हवे होते. यामुळे फाळणीच्या वेळी भारतातून स्थलांतरित झालेल्या मुस्लिम, मोहाजिरांचे प्रतिनिधित्व करणार्या मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट एमक्यूएमच्या कार्यकर्त्यांविरुद्ध पाकिस्तानी सैन्याने कराचीमध्ये २०१५ साली अक्षरशः कत्तल खाने उघडले होती. यानंतर अनेक लोक गायब झाले जे कधीही सापडले नाहीत.
4 Apr 2022 - 11:51 am | निनाद
आजच्या धक्कादयक घटनाक्रमात आज पाकिस्तानात संसदच बरखास्त केली गेली आहे. यामुळे अविश्वास ठरावाला इम्रानला तोंड द्यावे लागलेच नाही.
आता निवडणूका होणार आहेत. नवीन पंतप्रधान येई पर्यंत इम्रान पंतप्रधान राहणार आहे.
4 Apr 2022 - 2:50 pm | कंजूस
दहशत असणार.
10 Apr 2022 - 4:10 am | निनाद
अनेक आठवडे चाललेल्या नाट्यानंतर, पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्ताव गमावल्यामुळे इम्रान खान यांचा पाकिस्तानचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ अखेर संपला. ते सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर नॅशनल असेंब्लीमध्ये हरले. पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी इम्रान यांच्यावर भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवस्थापनासह महागाई आणि कमकुवत पाक चलन इम्रानमुळे असल्याचा आरोप केला आहे.
आता अधिकृत पाकिस्तानी घटनेनुसार आपला पूर्ण कार्यकाळ पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांच्या लांबलचक यादीत इम्रान खान सामील झाले आहेत.
नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-एनचे अध्यक्ष शेहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान बनणार आहेत.
मात्र हे भारतासाठी चांगले असेल की नाही हे काळच ठरवेल. पण शरिफ मंडळी फार भामटी आहेत यात संशय नाही.
10 Apr 2022 - 8:40 am | श्रीगुरुजी
इम्रान गेला ही भारतासाठी चांगली बातमी आहे. भारतासाठी नवाझ शरीफ हेच त्यातल्या त्यात कमी वाईट आहेत (best bet). त्यांनी दोन वेळा भारताबरोबर जमवून घ्यायचा प्रयत्न केला होता (वाजपेयी व मोदींबरोबर). शाहबाज शरीफ आपल्या भावाइतकेच किंवा त्यापेक्षा कमी वाईट असावे अशी इच्छा आणि अपेक्षा आहे.
10 Apr 2022 - 4:25 am | निनाद
या सगळ्यात चीनचे नाव कुठे ही आले नाही.
खरे तर त्यांचे पैसे मोठ्या प्रमाणात पाक मध्ये अडकले आहेत. प्रकल्प अर्धवट आहेत गुंतवणूकीचा परतावा कमी आला आहे.
आणि तरीही जाणारा नेता आणि आणि येणारा नेता दोघे ही चीनचे गुण गातांना थकत नाहीत हे आश्चर्यकारक आहे.
हा सत्ता बदलाचा खेळ बहुदा चीनी दूतावासाने पाक लष्करामार्फत खेळलेला आहे असा संशय येतो.
शिवाय आपले प्यादे बसवतांना फुकटात अमेरिकेची बदनामी पण करून घेतली आहे.