आप ची वाटचाल केंद्रात एक सक्षम पार्टी म्हणून होऊ शकते काय?

गावठी फिलॉसॉफर's picture
गावठी फिलॉसॉफर in राजकारण
11 Mar 2022 - 1:23 am

‌प्रखर मुद्दे घेऊन, जातीय आणि धार्मिक प्रश्न उचलून, घराणेशहीच्या जोरावर, प्रादेशिक अस्मितेवर, भाषेवर वर्षानुवर्षे काम करूनही राजकीय पक्षांना राज्यात एकहाती सत्ता आणता आणता दमछाक होते. किंवा काहींचे तर ते स्वप्नच राहते. परंतु विकासकग्या मुद्यावर बोलून राजकारणात नुकतेच पाऊल टाकणारी आम आदमी पार्टी दोन राज्यात बहुमताने सरकार स्थापन करते. यावरून आम आदमी पार्टी भविष्यात केंद्रीय राजकारणात भाजप कीवा इतर आघाड्यांना एक पर्याय ठरू शकते काय?

खरं पाहता देशाला एक नवीन राजकीय पार्टीची गरज आहे. विकासाच्या मुद्यावर दोन राज्यात सरकार स्थापन करणारी आणि इतर राज्यात पाळेमुळे रोवणारी आम आदमी पार्टी देशाच्या केंद्रीय राजकारणात सक्षम पार्टी म्हणून भरारी घेऊ शकते काय?

पंजाब मध्ये जातीय राजकारण आणि घराणेशाही चालते तिथे विकासाच्या मुद्यावर निवडून येणारी आम आदमी पार्टी इतर राज्यात (उदा. UP, बिहार, गुजरात, MP, महाराष्ट्र) सफल होऊ शकते का?

दिल्ली म्हणजे सुशिक्षित लोकांचा प्रदेश. तिथे आम आदमी पार्टी येऊ शकते तर केरळ सारख्या राज्यात येऊ शकते काय? डाव्यांचा प्रभाव असणाऱ्या राज्यात आम आदमी पार्टी ला स्वीकारतील काय??

दक्षिणेत प्रदेश वाद, भाषा वाद चालतो तिथे आम आदमी पार्टी कितपत यशस्वी होऊ शकते???

घराणेशाही, जातीयवाद, टगेगिरी, निष्ठावंत कार्यकर्ता, इतिहास आणि त्यावर वादविवाद यांसारख्या चिरकूट मुद्यांवर निवडणूक होणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यात आप पुन्हा एकदा पक्षबांधणी करून यशस्वी होऊ शकेल काय??

राजकारणाचा अनुभव नाही. पक्षात वजनदार नेतृत्व नाही. आता निवडून आलेले जुने राजकीय नेते आणि पक्ष उभारणी करतानाचे अनुभव नसणारे नेते यांच्यात वाद होऊन पक्ष नेस्तनाभूत तर होणार नाही ना??

भविष्यात आम आदमी पार्टी केंद्रात bjp ल पर्याय ठरू शकेल काय??

प्रतिक्रिया

sunil kachure's picture

12 Mar 2022 - 12:26 pm | sunil kachure

२ ते ३ हजार कोटी इन्कम एक व्यक्ती चा कसा असेल.
कंपन्यांचा च असणार .
इतके साधे तुम्ही समजू शकत नसाल तर अवघड आहे.

किंवा सर्व समजून पण आडगे पना करायची सवय असू शकते
ज्या कंपन्यांचा इन्कम हजारो करोड आहे त्यांची चोकशी केली च पाहिजे.
मोठ्या कंपन्या अनेक उचापती करून देशाच्या साधन संपत्ती वर डल्ला मारत असतात.
किंवा सत्ताधारी पक्षाला देणग्या देवून विविध फायदे उचलत असतात.
बँका ची कर्ज उचलून ती budavat असतात.
खरे तुम्ही दुसऱ्यावर शेरे बाजी करण्या अगोदर स्वतः काय लिहीत आहे त्याचा अभ्यास करत जा

सुबोध खरे's picture

12 Mar 2022 - 12:33 pm | सुबोध खरे

पण एक कोटी ही मर्यादा नको 2 ते 3 हजार कोटी वार्षिक इन्कम असेल तर.
त्या व्यक्ती ची सर्व कुंडली खोलली च पाहिजे.

हे तुम्हीच लिहिलेलं आहे ना?

का मगाशी काय लिहिलं त्याचा आणि आता काय लिहतोय याचा संबंध नाही?

आणि

ज्या कंपन्यांचा इन्कम हजारो करोड आहे त्यांची चोकशी केली च पाहिजे.

शेकडो कंपन्यांचे उत्पन्न २ ते ३ हजार कोटी असेल
उदा टी सी एस चे उत्पन्न १ लाख ३५ हजार कोटी इतके आहे. मग त्याच्या एक शतांश असलेल्या असंख्य कंपन्यांचे उत्पन्न २-३ हजार कोटी असेल

मोठ्या कंपन्या अनेक उचापती करून देशाच्या साधन संपत्ती वर डल्ला मारत असतात.

तुमचा विचार करणारा मेंदू आणि कळफलक बडवणारा मेंदू यांचा संबंध नाही असच दिसतंय.

बाकी चालू द्या

चांगला प्लॅन आहे. पुढच्या बजेट साठी निर्मला बाईंना सांगा.

आनन्दा's picture

12 Mar 2022 - 9:41 am | आनन्दा

कॉमी भाऊ, संतुलन सुटायला लागलंय.

हा युक्तिवाद हास्यास्पद आहे.

समाजाचे राहणीमान उंचावण्याचा *कौशल्य विकास* हा आणि हाच एकमेव मार्ग आहे.

एक उदाहरण देतो - जेव्हा अभियांत्रिकी कॉलेज चे अचानक पेव फुटले, तेव्हा खोऱ्याने इलेक्ट्रिकल आणि nechanical इंजिनिर तयार व्हायला लागले.. आणि त्यांना कंपन्या अक्षरशः 2000, 3000 वगैरे पगारावर जवळजवळ फुकट राबवून घेत होत्या..
IT आल्यावर हे यातले चांगले लोक सरळ तिकडे गेले आणि core field ला तुटवडा तयार झाला.. परिणाम म्हणून कोअर फील्ड चे पगार वाढले.

सरकारने या इंजिनीअर ना या ऐवजी बेकारी भत्ता दिला असता तर?

याचा वीज सवलतीच्या मुद्द्याशी काय संबंध हे समजले नाही बुवा. समाजाचे राहणीमान सोडा, इथे खुद्द टॅक्स पेयरला फायदा नाही का, वीज खुद्द टॅक्स पेयर साठी सब्सिडाईझ होती आहे तर इतरांसाठी सुद्धा होतीये म्हणून टॅक्स भरणाऱ्याला पोटात दुखायचे काय कारण!

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 11:30 am | मुक्त विहारि

एक कमवत आहे आणि बाकीचे त्याच्या पैशांवर जगत आहेत ...

आता सांगा की भार कुणावर?

आज भारतात टॅक्स भरणारे कमी आणि टॅक्स न भरता, सवलती घेणारे जास्त आहेत...

मग तुमचा आक्षेप एकूणच आयकर या संकल्पने वर आहे.
पण आयकर केंद्र सरकार ठरवते, दिल्ली मध्ये काही जास्त आयकर द्यावा लागत नाही. मग कुठली पॉलिसी आयकर भरणाऱ्या व्यक्तीसाठी चांगली ? स्पष्ट उत्तर त्याचे पैसे वाचवणारी.

अजूनही समजलं नसेल तर माझा पास.

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 11:45 am | मुक्त विहारि

आयकर भरणे चुकीचे नाही

पण, सवलतींचा फायदा आयकर न भरणारा पण घेतोच की ....

जाऊ द्या,

माझा पास....

अहो ते ठीक आहे ना, पण तुमचा थेट फायदा होतोय ते बघा कि ! का दुसर्याचा फायदा व्हायला नको म्हणून स्वतःच्या फायद्यावर लाथ मारणार ?

मराठवाड्यातली एक जळजळीत म्हण आठवली-
"** म्हणलं तर वाया जातं"
;)
हलके घ्या.

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 12:05 pm | मुक्त विहारि

त्याला सवलत 10 रूपये ...

दुसरा माणूस, आयकर भरत नाही आणि तरीही त्याला सवलत 10 रुपये...

आक्षेप हा आहे की, जो माणूस आयकर भरत नाही, त्याला सवलत का द्यावी?

असो,

भारतातील प्रतेक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात टॅक्स भरतो.
जो त्या टॅक्स च्या नियमात येतो.
नियमात बसून पण चोरी करणारे हे बोंब करणाऱ्या वर्गातील च असतात.
,,"आम्ही इन्कम टॅक्स भरतो,"
अशी बोंब देणाऱ्या वर्गातील.
सर्व जण विजेचे बिल भारतात.
जास्त वापरली की भाव वाढत जाणे ही सिस्टीम आहे.
विजेचा गैर वापर टाळण्यासाठी.
शेवटी वीज निर्मिती आणि नैसर्गिक साधन संपत्ती आणि ह्याचा संबंध आहे.तिचा विनाश करता येणार नाही.
सर्व जण सर्व indirect tax भरतात
पाणी बिल,service tax,gst,cst, जे काही असतील ते सर्व टॅक्स भरतात.

१) इन्कम टॅक्स,२) कॉर्पोरेट टॅक्स,३)sales tax ,४) property tax,. ५) tariff tax. ,६)estate tax.
खूप मोठी लिस्ट आहे एकदम झेपणार नाही
ह्याचा तुमचा अभ्यास झाला की पुढचे टॅक्स चे प्रकार पाठवतो.

झालेच तर, भाजीवाला, छत्री रिपेयर करणारा, हे पण टॅक्स भरतात का?

ते जाऊ द्या, तुमच्या घरातली कामवाली तरी टॅक्स भरते का?

भारतातील, प्रत्येक व्यक्ति टॅक्स भरते, अशा आशयाचे आपणच लिहिले आहे ....

कॉमी's picture

12 Mar 2022 - 12:17 pm | कॉमी

अज्ञान फारच दिसत आहे.

घरातली कामवाली टॅक्स भरते- अप्रत्यक्ष कर उदा. जीएसटी.

भिकारी 10 रुपयांचा बिस्कीट पुडा घेतो तो सुद्धा टॅक्स भरतो.

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 12:23 pm | मुक्त विहारि

हे वाचून बरे वाटले ...

सरकारचे ५७% उत्पन्न वस्तू व सेवा करातून आहे, अर्थातच-सर्व भारतीयांनी भरलेल्या करातून आहे. त्यात भिकारी, छत्र्या दुरुस्त करणारे, कामवाल्या बाया, शाळकरी मुलं सगळे आले.

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 12:32 pm | मुक्त विहारि

हे सगळे, आयकर पण भरतात का?

कॉमी's picture

12 Mar 2022 - 12:41 pm | कॉमी

नाही, आयकर नाही भरत, आणि आयकराबद्दल ही उपचर्चा नव्हतीच.

सर्व लोक जीएसटी भरतात, आणि जीएसटी सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आहे.

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 1:05 pm | मुक्त विहारि

हे वाचून बरे वाटले ....

कारण, आमच्या गावातील भिकारीण, भीक मागूनच जगते, तिला तरी कुणीच पैसे देत नाही...

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 12:12 pm | मुक्त विहारि

भिकारी कुठला टॅक्स भरतात?

इतक्या कॉन्फिडन्सने चुकीचे कसे बोलावे सेर ?

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 12:23 pm | मुक्त विहारि

एक नव्या पैशांचा टॅक्स भरत नाही ...

ना GST ना आयकर ...

असो,

कॉमी's picture

12 Mar 2022 - 12:30 pm | कॉमी

फार मजेदार आहेत मुवि.

बिस्किटाचा पुडा बघा बघू जरा, त्यात जीएसटी कुठे दिसते का पाहा ?

कि तुमच्या गावातल्या भिकार्याला जीएसटी माफ होऊन बिस्कीट मिळतं ?

सुबोध खरे's picture

12 Mar 2022 - 12:34 pm | सुबोध खरे

भिकाऱ्याला भीक म्हणून ग्लुकोजची बिस्कीट सुद्धा मिळतात

गावठी फिलॉसॉफर's picture

12 Mar 2022 - 1:21 pm | गावठी फिलॉसॉफर

दिवसभर भीक मगतात आणि संध्याकाळी गुत्यावर जाऊन अर्थव्यवस्था मजबूत करतात

ही ही ही

sunil kachure's picture

12 Mar 2022 - 1:52 pm | sunil kachure

नाही तर कोणी पण अत्यंत गरीब व्यक्ती .ती देशाची नागरिक असते .त्या व्यक्ती ची स्थिती सुधारण्यासाठी देश चा नागरिक म्हणून त्याचा हक्क असतो.
ह्या देशावर.
आणि सरकार चे कर्तव्य च असते समाज उपयोगी योजनेतून अशा नागरिकांचे जीवन मान कसे उंचावेल ह्या साठी योजना आखणे.
शेवटी देश म्हणजे एक जमिनीचा तुकडा नसतो.
कुटुंबात पण एकदा सदस्य काहीच काम करत नाही
तरी कुटुंबाचा सदस्य म्हणून त्याची काळजी घेतली जाते च ना.
तसे देश म्हणजे पण एक कुटुंब आहे असेच समजले तर च .
देशासाठी बलिदान देणारी माणसं तयार होतात.
थोडे मन मोठे करा.

गावठी फिलॉसॉफर's picture

12 Mar 2022 - 2:10 pm | गावठी फिलॉसॉफर

नुसत्या income tax वर देश चालत नाही

sunil kachure's picture

11 Mar 2022 - 6:09 pm | sunil kachure

आश्वासन दिले होते १०० स्मार्ट सिटी निर्माण करू..एक तरी नवीन स्मार्ट सिटी वसवली का?
जी अगोदर च बरी शहर आहे तीच लोकसंख्या वाढल्या मुळे पिचून गेली आहेत
सर्व मतदार बंधू मिळेल ती ट्रेन पकडुन येत आहे.

नोएडा मध्ये फिल्म सिटी बनवणार होते.
जेवढी ती बोंब अर्णव मारत होता.
नेते फुशारक्या मारत होते.
झाली का फिल्मसिटी बांधून.
सिरियल,सिनेमाचे चित्रीकरण झाले का चालू.

मुक्त विहारि's picture

11 Mar 2022 - 6:17 pm | मुक्त विहारि

भाजपच्या काळांत, स्मार्ट सिटीसाठी सर्व्हे झाला होता... पण, ह्या राजवटीत सगळेच बारगळले ...

सुबोध खरे's picture

11 Mar 2022 - 7:08 pm | सुबोध खरे

झाली का फिल्मसिटी बांधून.सिरियल,सिनेमाचे चित्रीकरण झाले का चालू.

हो झाले कि

२५ फिल्म्स चा शूटिंग झालं सुद्धा

पाहिजे तर नोएडाला येऊन पहा

तीन महिन्यात १००० कोटीच्या प्रकल्प झाला सुद्धा

हा प्रतिसाद फक्त कचरे साहेबाना आहे इतरांनी टेन्शन घेऊ नये

sunil kachure's picture

11 Mar 2022 - 7:31 pm | sunil kachure

तर यूपी मधून महाराष्ट्रात येणारी एक ट्रेन बंद करायला काही हरकत नाही.

सुबोध खरे's picture

11 Mar 2022 - 7:34 pm | सुबोध खरे

मग मुंबईतील फिल्म स्टार आणि त्यांचे चेले चमचे नोएडा ला कसे जाणार?

इंडिया टुडे (२१ फेब्रुवारी)अंकात आहे. त्यांचं म्हणणं की खासगी शाळांच्या तोडीस तोड बनवू सरकारी. मग रंगरंगोटी, वस्तू,इमारत यावरचा खर्च धरून प्रत्येक विद्यार्थी एवढे रुपये असं गणित असावं. पण मग हा खर्च capital investment असेल. दरवर्षी एवढा होणार नाही. पंजाबच्या लोकांनी याला महत्त्व देऊन मते आआपला दिली असावीत.

यापद्धतीने आप आणि केजरीवाल पुढे जाऊ लागले तर इतर सर्वच पक्षांना टीकाझोड उठवावी लागेल. अन्यथा त्यांची डिपोझिटं जाणार नक्कीच.

आप जर का मुंबई महानगरपालिकेत घुसली तर मात्र घाबरगुंडी उडेल. दहीहंडीचे दहीदुधलोणी गायब होईल ही भीती आहे.

गावठी फिलॉसॉफर's picture

11 Mar 2022 - 7:05 pm | गावठी फिलॉसॉफर

राजकारणातला अनुभव नसताना एखादा व्यक्ती दोन दोन राज्यात पक्ष कसा निवडून आणतो. गोव्यात आमदार निवडून आणतो.

त्यासाठी लागणारा निधी कोण देत असावं??? काही छुपे चेहरे केजरीवाल यांच्या मागे असू शकण्याची शक्यता आहे काय???

मुक्त विहारि's picture

11 Mar 2022 - 7:14 pm | मुक्त विहारि

भारतात, काहीही होऊ शकते ....

सुबोध खरे's picture

11 Mar 2022 - 7:36 pm | सुबोध खरे

पंजाब में आम आदमी पार्टी (AAP) की प्रचंड जीत के बाद प्रतिबंधित संगठन सिख फॉर जस्टिस (SFJ) ने पार्टी पर गंभीर आरोप लगाए हैं और कहा है कि खालिस्तान समर्थकों (Khalistan Supporters) की मदद से आप ने पंजाब चुनाव में जीत हासिल की है.

https://zeenews.india.com/hindi/india/sikh-for-justice-made-serious-alle...

sunil kachure's picture

11 Mar 2022 - 7:23 pm | sunil kachure

लोक सरकार निवडत आहे म्हणजे स्वराज्य तर आहे.
पण भारतीय जणते नी अजून सुराज्य ,सुशासन,राम राज्य,शिव राज्य काही अजून तरी
अनुभवले नाही.
रावण राज च अण् भवले आहे.
आप सुराज्य,सुशासन देण्यास सक्षम आहे असे वाटले तर.
जनता सर्वांना नाकारून आप ल स्वीकारेल

सुबोध खरे's picture

11 Mar 2022 - 7:48 pm | सुबोध खरे

पण भारतीय जणते नी अजून सुराज्य ,सुशासन,राम राज्य,शिव राज्य काही अजून तरी
अनुभवले नाही.

काय सांगताय?

मला वाटलं कि १९४७ पासून २०१४ पर्यंत सर्व काही आलबेल होतं

आणि २६ जून १९७५ पासून मार्च १९७७ पर्यंत तर राम राज्यच होतं.

नळातून पाण्याऐवजी दूध येत असे १० रुपये तोळा सोनं आणि १ रुपयाला १० क्विंटल गहू. बाकी सर्व शिधा तर घरपोच फुकट होता.

रेशनची दुकाने ओस असत. मागितला कि घरी पोचेपर्यंत फोन येत असे. फोन केला कि गॅसचा सिलिंडर एक तासात घरी

जनतेला अक्कलच नाही २०१४ मध्ये रावण राज्य आणलं त्यांनी

सुबोध खरे's picture

11 Mar 2022 - 7:50 pm | सुबोध खरे

असो

आता आप चे राज्य आले कि वीज पाणी अन्नधान्य शालेय आणि कॉलेजातील शिक्षण सगळं कसं आंतराष्ट्रीय दर्जाचं आणि फुकट मिळणार आहे.

मुक्त विहारि's picture

11 Mar 2022 - 8:18 pm | मुक्त विहारि

कुणाचे ओझे

मुक्त विहारि's picture

11 Mar 2022 - 8:17 pm | मुक्त विहारि

स्त्रीयांना दरमहा 1000 रूपये मिळणार ...

चला म्हणजे, एखाद्याने 30 बायका केल्या की, महिना निघाला...

https://www.loksatta.com/explained/5-reasons-why-aap-is-heading-for-a-cl...

गावठी फिलॉसॉफर's picture

11 Mar 2022 - 11:19 pm | गावठी फिलॉसॉफर
गावठी फिलॉसॉफर's picture

11 Mar 2022 - 11:19 pm | गावठी फिलॉसॉफर
गावठी फिलॉसॉफर's picture

11 Mar 2022 - 11:19 pm | गावठी फिलॉसॉफर
गावठी फिलॉसॉफर's picture

11 Mar 2022 - 11:19 pm | गावठी फिलॉसॉफर

इथं एक भेटेना झालीय

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 6:58 am | मुक्त विहारि

ह्या विषयावर आधारित एक जुनी चर्चा ....

https://www.misalpav.com/node/30022?page=1

गावठी फिलॉसॉफर's picture

12 Mar 2022 - 10:02 am | गावठी फिलॉसॉफर

सध्या तडजोड किंवा काहीही करा मुली भरपूर अपेक्षा ठेवून असतात. आणि जाताना छपरी पोरा सोबत पळून जातात.

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 11:25 am | मुक्त विहारि

काही अंशी सहमत आहे ...