नमस्कार मंडळी,
आजपावेतो १० हजाराच्या वरचा कधी फोन घेतला नाहीये. आता घ्यावा म्हणतो. आणि त्यासाठी सल्ला घेण्यासाठी मिपाशिवाय आणखी चांगली जागा कोणती?
गरजः
- गेमींग साठी नकोय. ऑफिसच्या कामासाठीच बहुतेक वेळ वापर होईल. [आऊटलूक/एक्सेल/स्लॅक/वेबेक्स]
- साऊंड, डिस्प्ले, कॅमेरा आणि ऑपरेटींग परफॉर्मन्स चांगला हवा.
- ब्लॉटवेअर्स शक्यतो कमी
- प्रोसेसर आणि अँड्रॉईड वर्जन: पुढची निदान ५-६ वर्षे तरी फोन वापरता आला पाहीजे :-)
बजेट: ३५-४० हजार पर्यंत.
मी स्वतः शोधले तेव्हा सापडलेल्या काही मॉडेल्सचे तपशील चांगले वाटले [5G, 8gb/128gb वेरियंट्स - गूगल/सॅमसंग/मोटोरोला]
अर्थात् अनेक चांगले ऑप्शन्स मी बघीतलेही नसतील. अन् मुळात एवढ्या रेंज मधले फोन कधी वापरलेलेच नसल्याने काही कळतही नाही.
त्यामुळे आपल्या सल्ल्याची नितांत गरज आहे. :-)
प्रतिक्रिया
8 Mar 2022 - 8:31 pm | गावठी फिलॉसॉफर
सध्या फोन चे फिचर झटपट बदलत आहेत. वर्ष झालं की फोन चा कंटाळा येतो. आणि कंपनी कोणतीही आसूड
8 Mar 2022 - 8:39 pm | गावठी फिलॉसॉफर
2 वर्ष झालं की मोबाईल डबघाईला येतो.महागडा मोबाईल घेण्यापेक्षा स्वस्तातील ठराविक कालावधीने अपडेटेड मोबाईल घ्या. गमला, फुटला, भिजला... टेन्शन पण नाय
8 Mar 2022 - 8:55 pm | जेम्स वांड
एक हाडाचा नोकियाकर मिळाल्याचा आनंद आहे, ती पाच अक्षरे भुरळ घालतात राव पण
तर्कवादी ह्यांची फिलॉसॉफी थोडी शेयर करतो मी, पण एकंदरीत नोकिया प्रीमियम रेंज घ्यायला मन अजुन धजावत नाहीये.
9 Mar 2022 - 3:05 am | कंजूस
दोन बटणवाले. पण ओएस s40/60 नसलेले.
एक माइक्रोसॉफ्ट ओएसवाला 630
एक माइक्रोसॉफ्टने बनवलेला लुमिया.
( चारही चालू आहेत पण 2G/3 G वर असल्याने outdated. आणि सपोर्ट गेला आहे.)
9 Mar 2022 - 4:14 pm | तर्कवादी
@जेम्स वांडजी
म्हणजे ऑफलाईन /दुकानात मिळणारा मोबाईल याबद्दलच म्हणताय ना ?
१५ हजारापर्यंत चांगला येईल नोकियाचा - ६ जीबी रॅम असलेला..
10 Mar 2022 - 8:10 am | जेम्स वांड
फोन दुकानातूनच घ्यावा हे नक्की
20 Mar 2022 - 6:00 am | कंजूस
शोधताना nanoreview dot net/en/soc-list/rating ही यादी सापडली.
21 Mar 2022 - 9:01 pm | चौथा कोनाडा
भारी आहे याददी !
28 Mar 2022 - 12:53 am | कासव
उबंटू टच चांगलं वाटतं आहे पण अजून कधी वापरलं नाही. अर्थात application कमी असणार
Ios ani Android सोडून काही ऑप्शन आहे का ?
28 Mar 2022 - 5:31 am | कंजूस
अन्यथा एक पर्याय राहिला असता.
28 Mar 2022 - 8:30 am | श्रीरंग_जोशी
Kai OS - आय ओएस व अॅन्ड्रॉइडखेरीज बाजारात हीच एक ओस थोडं अस्तित्व राखून असावी. मी स्वतः २०२० सालापर्यंत ब्लॅकबेरी १० ओसचे फोन वापरत होतो.
या ड्युओपॉलीला आव्हान देणारा तिसरा सशक्त पर्याय निर्माण व्हायला हवा.
28 Mar 2022 - 9:29 am | तुषार काळभोर
लिनक्सचं Maemo वर्जन असलेला नोकिया एन९०० मी तीन चार वर्षे वापरलाय. अॅन्ड्रॉइडचं साम्राज्य प्रस्थापित होत असताना हा कदाचित सर्वात शक्तीशाली फोन होता. फिजीकल क्वेर्टी कीबोर्डने टाईप करणं म्हणजे सुख होतं!
28 Mar 2022 - 8:25 am | श्रीरंग_जोशी
एका गोष्टीचे थोडे आश्चर्य वाटले की अॅन्ड्रॉइड फोन्सच्या विविध मॉडेल्सबाबत इतकी चर्चा होऊनही अजुन पिक्सल फोन्सचा उल्लेख झाला नाही.
28 Mar 2022 - 9:11 am | कंजूस
साठ हजारच्या फोनात 4000mah battery, पण इतर फोनात 3000maAh. ही भारतीय युजरला पटणारी नाही. तो गेम खेळतो, विडिओ पाहतो, वाट,पचा धिंगाणा. मग कशी पुरणार एक दिवस?
28 Mar 2022 - 9:39 am | धर्मराजमुटके
५०-६० हजार रुपडे मोबाईल च्या डबड्यात घालणे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. १०-२० हजार च्या दरम्यान चे मोबाईल व्हॅल्यु फॉर मनी आहेत. शिवाय दोन तीन वर्षात नवीन घेता येतो.
28 Mar 2022 - 9:48 am | सुबोध खरे
स्मार्ट फोन चे आता मोटारीसारखे झाले आहे.
थोडेसेच पैसे अधिक टाकले तर अधिक चांगले मॉडेल मिळते असं करत करत कितीही वरपर्यंत जाता येते.
यामुळे सामान्य माणूस गोंधळात पडतो.
माझ्या स्थापत्य अभियंता मित्राने फार वर्षांपूर्वी घराबद्दल सांगितलेली एक गोष्ट घरच नव्हे तर मोटार कार आणि भ्रमणध्वनी बद्दल लागू पडते.
सामान्य मध्यम वर्गीय माणूस एक बेडरूमच्या घरासाठी बजेट तयार करून येतो तेंव्हा विकासक त्याला सांगतो साहेब बजेट थोडंसंच वाढवला तर तुम्हाला एक छानसा २ बेडरूमचा फ्लॅट मिळेल. माणूस त्या मोहात पडतो आणि आपले बजेट ताणून दोन बेडरूमचा फ्लॅट घेतो पण त्याची सजावट करण्यासाठी आता त्याच्याकडे पैसे उरत नाहीत.
आणि मग पुढची पाच वर्षे त्या घराची सजावट लांबणीवर पडते आणि मग पाच वर्षात त्याला एकतर आहे तसे राहायची सवय होऊन जाते किंवा नवीन काहीतरी खर्च उपटतात आणि घराची सजावट राहून जाते.
उच्च मध्यम वर्गाला हेच २ आणि तीन बेडरूम साठी लागू पडते. दोनच्या ऐवजी तिसरी बेडरूम "उद्या पाहूणे आले तर त्यांच्यासाठी होईल" या विचारानेच घेतली जाते आणि ती बहुतांश अडगळीची खोली होऊन राहते.
अशीच स्थिती थोड्या फार प्रमाणात मोटारीला आणि आता स्मार्ट फोनसाठी लागू पडते.
घरची माणसे तीन किंवा चार असताना ७ सीटर गाडी विकत घेतली जाते ज्याचा वाढीव इ एम आय महिन्याला आणि विम्याचा खर्च दर वर्षी आपल्याच बोडक्यावर बसतो.
आपल्याला गरज नसताना भरपूर स्टोअरेज चा फोन विकत घेतला जातो आणि त्यात भरपूर कचरा आणि अडगळ (असे फोटो आणि व्हिडीओ) पडून राहते
यामुळेच आपली खरी गरज किती हे जाणून आपण आपले जास्तीत जास्त बजेट किती हे ठरवायचे आणि त्याच किमतीच्या आतील कार किंवा फोन घ्यायचा
28 Mar 2022 - 10:31 am | कंजूस
दुकानदार लगेच ओळखतात आणि फोन गळ्यात मारतात.
28 Mar 2022 - 10:35 am | कंजूस
माझ्याकडे अमुक ब्रांडचा फोन आहे हे सांगण्याकरताच कधीकधी फोन घेथले जातात. तर गाडीचंही तसंच असणार. जिओ ड्राइव इन हे बहुतेक याचसाठी असावं.